गाभा:
आपण मिपावर तर नेहमी भेटतच असतो पण कधी प्रत्यक्षात भेटावं असं वाटत असेल ना.
आप आपल्या शहरातील मिपाकरांसाठी meetup.com वर एक कट्टा (meetup) बनवूयात का … आणि मग ठरवून प्रत्यक्षात कधी तरी भेटू …
सगळ्या मिपाकरांसाठी सुद्धा एक meetup बनवावा.
या बद्दल काय मत आहे …
प्रतिक्रिया
1 Nov 2014 - 4:44 pm | जेपी
जे काय लिवलय ते इस्कटुन सांगा
आन मी पयला
1 Nov 2014 - 4:57 pm | कंजूस
भेटणारे मिपाकर धागा इथे टाकतात /व्य०संदेश पाठवतात/फुनवरून हाळी देतात/घुसेँगो करतात. आता हा आणखी एक प्रकार येतोय. छान.आलिया भोगासी असावे सादर.
1 Nov 2014 - 5:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाच्या कट्ट्यांची कट्टापूर्व चर्चा इथेच मिपावर धागा काढून होते आणि नंतर त्याचा अहवालही इथेच टाकला जातो. त्यासाठी इतर संस्थळाची मदत घ्यायचा द्रविडीप्राणायाम करायची काय गरज आहे ?!
...आणि त्याचा फायदा काय आणि कोणाला ?
1 Nov 2014 - 8:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे
ह्यां ??? फार तर असे म्हणा की कधी कधी धागे काढले जातात
1 Nov 2014 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
मुख्य मुद्दा...
इतर संस्थळाची मदत घ्यायचा द्रविडीप्राणायाम करायची काय गरज आहे ?!
हा होता :)...आणि त्याचा फायदा काय आणि कोणाला ?
3 Nov 2014 - 12:13 pm | इरसाल
म्हणजे राहुल द्रविड प्राणायाम करायचा.
1 Nov 2014 - 9:49 pm | टवाळ कार्टा
+११११११११
2 Nov 2014 - 6:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुजीत अंकल, मिपाकर भेटायचे तेव्हा भेटण्यासाठी इथे मिपावरच धागा काढतात आणि त्याचा वृत्तांतही टाकतात. काही मिपाकर नित्यनियमाने व कामानिमित्तही सहज ''इकडून चाललो होतो, म्हटलं भेट घ्यावी म्हणुनही भेटतात'' त्याचा वृत्तांत येत नै पण भेटीगाठीची बातमी येत असते. आणि यासाठी माध्यम असते मिपाच.
असो, कधी भेटायचं आपण गप्पा मारायला ? गाव कंचं तुमचं आणि यत्ता कितवी ?
-दिलीप बिरुटे
3 Nov 2014 - 3:14 am | बहुगुणी
सुजित-जी, तुम्ही ५ वर्षांपासून मिपा-सभासद आहात, मग इथे कट्टे-वर्णन सातत्याने येत असतं हे कसं लक्षात आलं नसेल असं वाटलं. कदाचित ५ वर्षांपूर्वी सभासदत्व घेऊन मग मध्यंतरीच्या काळात इथे येणं झालं नसावं, [आणि गेल्या पाच दिवसांत ५ लेख लिहिलेले दिसताहेत :-) ]
असो, मिपावरील काही कट्ट्यांची आणि कट्टेकर्यांची माहिती इथे मिळेल. तुमचाही झेंडा लावा, आणि या पुढच्या कट्ट्याला आजूबाजूला कोण-कोण आहे ते शोधून.
बाकी मीट-अप.कॉम च्या माहितीबद्दल धन्यवाद!
3 Nov 2014 - 5:44 am | खोंड
झेंडा लावला आहे …