नमस्कार,
मागे एकदा एका संस्थेने आयोजिलेल्या ट्रेकबद्दल माहिती देण्यासाठी धागा उघडला होता. तसेच दोन आकर्षक ट्रेक आयोजिल्याचे समजले आहे. अनेक मिपाकरांकडून ट्रेकबद्दल विचारणा आल्या, 'आम्हाला घेऊन न गेल्याने निषेध' :) असे प्रतिसाद आले. म्हणून म्हटलं की मला कळलेली ही माहिती इथे शेअर करावी म्हणजे इच्चुकांना लाभ घेता येईल. आयोजक संस्थांशी/ग्रूप्सशी माझा काहीही संबंध नसून ही केवळ माहिती म्हणून इथे टाकत आहे; जाहिरात करायचा हेतू नाही. :)
धागा आक्षेपार्ह असल्यास संपादकांनी योग्य निर्णय घ्यावा.
--------------------------------------------------------------------------------------
पहिला पर्याय
" हिंदवी स्वराज्याची राजधानी
गडांचा राजा, राजियांचा गड " असे ज्याचे वर्णन आपल्या लाडक्या शिवप्रभूंनी केले त्या राजगडा वर आपणास जावयाचे आहे.
जगात खूप कमी व्यक्ती अशा असतात ज्या ऋषितुल्य जीवन जगतात ...एखाद्या ऋषि प्रमाणे प्रसिद्धी पासून अगदी अलिप्त रहातात . तसेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. आप्पा परब . जे एक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व दूर्गसंशोधक आहेत . केवळ साऱ्या जगाला शिव छत्रपती कळावे म्हणून मनापासून प्रयत्न करणाऱ्या , आणि आयुष्यभर शिवाजी आणि सह्याद्री ह्यांचा ध्यास घेतलेल्या या ज्ञानयोग्याचा सहवास यावेळी आपणांस "शिवशौर्य ट्रेकर्स " या संस्थेने आयोजित केलेल्या " शिवतीर्थ राजगड " या भ्रमंती मध्ये आपणास मिळणार आहे . राजगड तुम्ही आता पर्यंत पहिला असाल हि पण ह्या वेळी तुम्हाला राजगड समजेल, याची खात्री आहे. तरीही सर्व शिवप्रेमींनी याचा लाभ उठवावा ..
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित "शिवतीर्थ राजगड भ्रमंती "
शनिवार, १ नोव्हेंबर २०१४ ते रविवार, २ नोव्हेंबर २०१४
शुक्रवार , ३१ ऑक्टोबर २०१४ ला मुंबई येथून राजगड कडे खाजगी बसने रात्री १० वाजता प्रस्थान.
शनिवार , १ नोव्हेंबर २०१४ - भल्या पहाटे राजगड पायथ्याशी आगमन. तिथून श्री अप्पा परब यांच्या बरोबर गड भ्रमन्तीस प्रारंभ. व रात्री राजगडावर मुक्काम .
रविवार , २ नोव्हेंबर २०१४ - सकाळी पुन्हा श्री अप्पा परब यांच्या बरोबर गड भ्रमन्ती व नंतर सायंकाळी मुंबई कडे प्रयाण. रात्री १० वाजेपर्यंत मुंबईत आगमन.
संपूर्ण खर्च रु. 1400/- (रुपये एक हजार चारशे फक्त ) प्रती व्यक्ती ( प्रवास व जेवण अंतर्भूत ). शनिवारी सकाळचा एक वेळचा नाश्ता स्वतः आणणे.
लवकरात लवकर आपली नावे या वैशिष्ट्यपूर्ण ट्रेक साठी आपल्या भ्रमंती मुल्यासकट नोंदवा. नोंदणी करण्याची अंतिम तारीख :-
२१ ऑक्टोबर २०१४
विशेष सूचना :
• नाव नोंदणीची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2014 असेल.
• 21 ऑक्टोबर नंतर मोहीम फी : रु. 1500/- असेल
आपण आपले भ्रमंती मूल्य पुढील बँकेच्या शाखांमध्ये खाली दिलेल्या खात्यांमध्ये भरू शकता किंवा व्यक्तिगत भेटूनही भरू शकता.
Bank Details : - Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
A/c. No. 60134804616, IFSC Code : MAHB0000318, Branch Code : 000318
A/c. Name : SHIVASHOURYA TREKKERS
बँकेत शुल्क भरल्यावर त्वरित 9320 755 539 या क्रमांकावर कळवावे.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल
घेतलेले भ्रमंती मूल्य कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
न्यावयाचे सामान :- सॅक , पिट्टू बैग ( छोटी सॅक ) , कॅमेरा , टॉर्च , पाण्याच्या बाटल्या, ताट , मग, चमचा , बूट , सॉक्स, अतिरिक्त चप्पल, झोपण्यासाठी साहित्य जसे सतरंजी , स्लीपिंग बॅग / स्लीपिंग मॅट वैगरे, टूथपेस्ट व टूथ ब्रश, टॉवेल , साबण, इत्यादी. थंडीचे दिवस असल्याने स्वेटर आवश्यक.
विशेष सूचना : गडावर निवासाची व्यवस्था नसल्याने थंडी साठी अंथरूण पांघरूण अवश्य आणावे. sleeping bag असल्यास उत्तम.
सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही. ही इतिहास समजून घेण्याची मोहीम आहे, पिकनिक नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
कार्यक्रमात बदल करावयाचे सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत .
अधिक माहिती साठी संपर्क :-
शार्दूल खरपुडे - 9967 49 3532
अमित मेंगळे - 9320 75 5539 / 9869 10 9970.
आपला नम्र -
शार्दूल खरपुडे (मोहीम प्रमुख)
9967 49 3532
ईमेल : shivashourya.trekkers@gmail.com
फेसबुक : http://www.facebook.com/ShivashouryaTrekkers (शिवशौर्यचे ट्रेकफोटो पाहण्यासाठी)
ब्लोगर : www.shivshouryatrekkers.blogspot.com
पिकासावेब : https://picasaweb.google.com/shivashourya.trekkers (शिवशौर्यचे ट्रेकफोटो पाहण्यासाठी)
---------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------------
दुसरा पर्याय
Dear All,
Bhramar have organized a Trek to Rajgad on 08th - 09th NOV '14.(Starting 07th Night)
Renowned Historian Shri Appa Parab will be with us to explore history of Rajgad.
Brief introduction about Shri Appa Parab is given at the end of this email.
Some Information about the fort:
Rajgad
Type: Hill Fort
Height: 4182 feet
Grade: Medium
Base Village:Gunjavane
About Rajgad:
Rajgad – The name describes the place itself - The king of all the forts.
It is to the south-west 40 Kms from Pune. It boasts the highest number of days stayed by Chhatrapati
Shivaji Maharaj on any fort. He spent almost 25/30 yrs here. Rajgad is famous for its construction.
The fort can be divided into four different parts based on geographical terrain and fortification. There
are the three sub-plateaux (Machee) namely Padmavati Machee, Suvela Machee and Sanjevani Machee,
and at the centre is the Ballekilla.
Padmavati Machee (north end): This machee is the site of Padmavati Temple, Padmavati Lake, Chor
Darwaja, Pali Darwaja, Gunjavane Darwaja, Daru Kothar (storage of arms and ammunition),
Diwankhana, Rajwada (ruins), Ghod Tale (Horse Lake), Sadar (office) and Dhalkathi (flag hoisting place).
Sanjeevani Machee (southwest/west end): This huge, beautiful and royally constructed machee faces
west and has a three-stepped (layered) fortified structure. Each of the lower levels is separated from the
higher one by a fortified bastion with a gate that could be defended independently. The lowest level is
beautifully fortified by double curtain walls (chilkhathi) separated by a deep trench, on average 12 feet
across. One can walk between these walls. The outer wall has openings to let soldiers out for sudden
attack.
Suvela Machee (south east): This is another grand machee facing east with lots of secret routes and
doorways. This one is a double-stepped fortified machee with the steps separated by a beautiful
bastioned doorway. At the end of first step a hole cuts across the rock; one can sit in this hole (nedhe).
The final (lowest) step like Sanjeevani Machee has a double curtain wall. To the south side of this
machee one can see a beautiful triangular bastion called Kaleswari buruz having an escape door near it.
The home of the renowned military leader Tanaji Malusare was in this machee.
Bale Killa (centre): This is the highest part of the fort which has remains of palaces, water cisterns and
caves. It has a beautiful entrance door called Mahadarwaja. One can view the whole fort and the vast
surrounding expanse.
Itinerary:
Day 1: Friday Night.07th NOV 2014
Meeting Point: Thane East, Near Anand Talkies,11:30 PM sharp
Our journey starts with the private vehicle from Thane till Gunjavne, the base village of Rajgad.
Day 2: Saturday 08th NOV
> Start our trek by 7:30 am, reach the top till 10.30 AM.
> Explore two Machi and the Ballekilla till the eve.
> Dinner, and go to bed (we will be sleeping in the temple on the Padmavati machi.)
09th Nov:
> Explore the remaining fort
> Start descending.
> Lunch by 2 at the base village.
> Start our journey back by bus/private vehicle
> Return back to Mumbai by 8 pm tentatively.
The cost for the event will be Rs 2000/- per head, which includes,
Travelling from Thane to Thane,
Food (3 meals, 2 breakfasts),
Expertise
Things to carry:
Water 2 litre
ID proof
Torch with extra batteries, Candles.
Bedding with extra Papers, Extra Clothes
A plate, mug, and spoon,
Cloths to protect from winter such as Windcheaters, Cap, etc.
Camera, (Optional)
some ready to eat food. Plum cakes, Biscuits etc.
Medicine those if u require usually.
Good trekking shoes, extra pair of socks
A haversack to put in all the things to be carried....so that one has ones hands free while trekking. (Please
do not carry sling bags or Jholas.)
Please avoid wearing Gold and other ornaments.
Registration:
Registration through phone calls only. One needs to handover full payment prior 30th OCT to below mentioned members.
• Anup Malandkar: 9702010507
• Kailas Bhangare: 9702292244
• Rucha Malandkar: 9594074434
• Bhushan Mohite: 9870343490
No refund will be provided for cancellation post 30th OCT.
Few Lines about Appa:
इतिहासाचा आढावा घेऊन प्रसिद्धीच्या मागे असणारे बरेच इतिहासकार आहेत पण निस्वार्थ मानाने लोकांसमोर खरा इतिहास पोहचवत असतानाही प्रसिद्धी पासून वंचित राहिलेले एक इतिहास संकलक म्हणजेच "श्री अप्पा परब" आहेत...
आज आपण अनेक गड -किल्ले फिरत असतो,जणू काही इतिहासाची पान पलटत असतो.
इतिहासाची मूक साक्षीदार आपल्या आजूबाजूला असतात .याच इतिहासाला बोलके करण्याचे काम इतिहासकार करतात ,पण प्रसिद्धीचा कोणताही हव्यास न धरता काम करणारे म्हणजे ज्येष्ठ इतिहास संकलक ''श्री.आप्पा परब''.
श्री पुरुषोत्तम परब ज्यांना सर्व इतिहास चाहते व दुर्ग प्रेमी श्री आप्पा परब या नावाने ओळखतात, एक ज्येष्ठ इतिहास संकलक व दुर्ग संशोधक आहेत.काही मोजके जाणकार सोडले तर फारसे हे नाव कुणाला परिचत नसेल ,पण ज्यांना एकदा ते कळले कि मग तुमच्या हृदयात त्यांचे अढळ स्थान हे नक्की. अतिशय साधी राहणी ,कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास नाही. ते इतिहासाबद्दल बोलताना त्यांची तंद्रीच लागते
बालपणापासूनच ज्यांनी स्वतःचे आयुष्य स्वराज्यासाठी इतिहास संशोधनात झोकून दिले आज वयाच्या ७५ व्या वर्षीही आपले कार्य तसेच चालू ठेवत आहेत ही गोष्ट खरीच प्रेरणादायी आहे
आप्पांबद्दल जितके सांगू तितके कमीच आहे. एखाद्याने जर गड किल्ल्यांबद्दल किंवा शिव-शंभू बद्दल आप्पांना विचारले आणि आप्पांनी त्या व्यक्तीला समाधानकारक माहिती दिली नाही असे कधीच झाले नाही.तासनतास आप्पा माहिती देत बसले तरी कधीच कंटाळा करत नाही हा फक्त समोरील व्यक्तीची त्या गोष्टी जाणून घ्यायची तेवढी क्षमता असावीत
त्यांची अनेक पुस्तके यापूर्वी प्रकाशित झाली आहेतच .मुद्देसूद मांडणी ,विषयावरच भाष्य आणि अतिशय माफक किंमत हे त्यंच्या पुस्तकाचे वैशिष्ट
एक ज्येष्ठ इतिहास संकलक श्री. आप्पा परब हे तसे प्रसिद्धी पराङमुख !!
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जवळ जवळ सर्वच किल्ल्यांना आप्पांनी भेट दिली असल्यामुळे आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे त्या किल्ल्या संबंधी बारीक सारीक तपशीलाबद्दल माहिती असल्यामुळे त्यांच्या तोंडून इतिहास जिवंत होऊन बाहेर पडतो.
मराठ्यांचा इतिहास सांगतो म्हणणा-यांना मराठ्यांच्या परंपरा, त्यांचे रीतीरिवाज याबद्दल देखील माहिती नसते....
पण एवढे असूनही....... इतिहास जगत असताना देखील ते वास्तवाचे भान विसरत नाहीत...........
Do Not Litter
Participants are requested to carry the waste back to the city and dispose it off in dustbins.
All our treks are Eco-friendly; kindly take care of nature around us. Smoking and Drinking alcohol during
Trek is strictly prohibited if anyone found doing that will be expelled from trek without refund. Respect
The Heritage and culture.
Be a group: It is of utmost importance that all participants stick together in the group.
Everyone is responsible for his/her own safety. The leader’s decision will be final and binding on all
Members. No Arguments will be entertained.
In case of any injury, sickness, accident, death or any other casualty or loss or damage of valuables or
luggage or any equipment; Bhramar, it’s instructors, organizers, volunteers or any other person involved
wholly or partially, either individually or jointly, shall not be responsible in any manner for the same and
no claims of the participants, parents, guardians, relatives or friends of participants will be entertained.
Regards/Team Bhramar
प्रतिक्रिया
15 Oct 2014 - 2:01 pm | माम्लेदारचा पन्खा
कधीही ट्रेक न केलेल्या माणसासाठी हे ट्रेक कितपत कठीण असू शकतील?
तसेच मी आजपर्यंत फक्त लोहगड आणि प्रतापगड पाहिलेले आहेत...माझ्यासाठी राजगड कसा राहील? जायची इच्छा प्रबळ आहे..
15 Oct 2014 - 8:56 pm | वेल्लाभट
कधीच ट्रेक न केल्याने जरा कठीण वाटेलच. चोरदरवाज्याने जायचं म्हणजे अडीच तीन तासाची चढाई आहे. पण बरीच मंडळी असतील तर होतं शक्य, एकमेकाना उभारी देत देत. बघा, म्हणजे, मिपावरच्या मुरलेल्या ट्रेकर्स चं मत घ्या म्हणजे अजून बरं पडेल तुम्हाला ठरवायला.
16 Oct 2014 - 1:02 am | किसन शिंदे
चोर दरवाजाने जाताच का? सरळ भोसलेवाडीत जाऊन पाल दरवाज्यातून वर जा की, राजगड चढण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे तो. मानाने गुंजवण्याकडची वाट फारच दमछाक करणारी आहे.
16 Oct 2014 - 2:33 am | विलासराव
चोरदरवाज्याने जायचं म्हणजे अडीच तीन तासाची चढाई आहे.
मी मिपावरच्या जिप्सींबरोबर याच मार्गाने गेलो होतो. तरी आम्ही संध्याकाळीच गुंजवणे गावातुन चढाई करुन मधे एका टप्यावर एक कुटूंब रहाते त्यांच्या घरी गोनीदा रहायचे बर्याचदा. तेथे राहीलो होतो. सकाळी लवकर निघुन बाकी चढाई केली तरी बर्यापैकी दमछाक झाली होती. अर्थात मी काही नेहमीचा ट्रेकर नाही.
16 Oct 2014 - 7:03 am | वेल्लाभट
त्यात मी कसा बदल करणार? मी आधी चोर दरवाज्यानेच गेलोय. मी ठरवत असतो तर पाली दरवाजा केला असता. पण ठीक आहे.... हरकत नाही......
16 Oct 2014 - 1:07 am | मुक्त विहारि
मुलाला पाठ्वीन म्हणतो....
16 Oct 2014 - 7:07 am | वेल्लाभट
१-२ ला जाणार आहे मी