माकुल रिंग्ज चिली.

जागु's picture
जागु in पाककृती
13 Oct 2014 - 4:49 pm

साहित्यः

नळ (पाईप्) माखुल
आल, लसुण, पेस्ट १ चमचा
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
१ ते दोन चमचे मसाला किंवा अर्धा चमचा मिरची पुड
२-३ पाकळ्या ठेचलेला लसुण
१ मोठा कांदा चिरुन
१ सिमला मिरची कापून तुकडे करून
थोडी चिरलेली कोथिंबीर
थोडिशी चिंच
चविनुसार मिठ
२ चमचे तेल.

पाककृती :

नळ माखलीची मी आधी रेसिपी दिलेली आहे त्यावरून ती ओळखता येईल.

१. नळ माखळीच्या थोड्या रिंग्ज धुवून त्याला आल-लसुण पेस्ट लावून वेळ असल्यास थोडे मुरवुन किंवा डायरेक्ट कुकरला १० ते १५ मिनीटे शिजवून घ्या.

२. एका भांड्यात तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत शिजवा.

३. आता त्यात हिंग, हळद, मसाला हे जिन्नस घालून थोडे परतवा आणि लगेच त्यात शिजलेल्या माकुळच्या रिंग्ज आणि सिमला मिरची घालून, मिठ घालून चांगले परतवा.

४. लगेच थोडा चिंचेचा कोळ घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून परतवा. २-३ मिनीटे परतवून लगेच गॅस बंद करा.

ही डिश स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता व मेन कोर्स म्हणूनही घेऊ शकता. :स्मित:

अधिक टिपा:
चिंचे ऐवजी लिंबू वापरू शकता.
आवडत असल्यास थोडा गरम मसाला वापरू शकता.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

13 Oct 2014 - 5:01 pm | दिपक.कुवेत

हे नक्कि कुठे खाल्लं होतं ते आता आठवत नाहिये पण सॉर्ट ऑफ रबर टाईप लागलेलं म्हणुन एवढं विशेष आवडलं नाहि.

दुबईत असताना 'कासा-दि-गोवा'मध्ये आमची ठरलेली चखना डिश असायची ही स्व्किड चीली.

सौंदाळा's picture

13 Oct 2014 - 5:08 pm | सौंदाळा

लाजवाब.
दिपकशेठ बरोबर शिजले आणि फ्राय झाले तर अप्रतिम लागते.
वेंगुर्ला स्थानका जवळच्या बांबू हॉटेल मधे खाल्ले होते माकुळ चिली ४ वर्षापुर्वी, चव अजुन आठवतेय.
नळ माकुळ सोडुन अजुन कोणता माकळाचा प्रकार असतो का?

सौंदाळा's picture

13 Oct 2014 - 6:56 pm | सौंदाळा

दिपकशेठ बरोबर...

ऐवजी
दिपकशेठ, बरोबर...
असे वाचावे:)

दिपक.कुवेत's picture

13 Oct 2014 - 7:44 pm | दिपक.कुवेत

मला सुद्धा आत्ता कळतयं...तुम्हि फोड केल्यावर :D

कविता१९७८'s picture

13 Oct 2014 - 5:22 pm | कविता१९७८

मस्त जागु

मस्त...शेवटचा फोटो तोंपासू.

पण माकल्या साफ करणे एक दिव्य आहे. जाम त्रास होतो त्या काळ्या शाईंच्या पिशव्यांचा.

येथे खालील फोटोंत दाखवल्याप्रमाणे गोल चकत्या साफ करुनच मिळतात त्यामूळे सफाईचा प्रश्नच येत नाही. :)

1

सानिकास्वप्निल's picture

13 Oct 2014 - 9:31 pm | सानिकास्वप्निल

मी स्किवड फारसा खात नाही.
आत्तापर्यंत फ्राईड स्किवड रिंग्ज (Calamari)खाल्ल्या आहेत, हा प्रकार चिकन चिली / पनीर चिली सारखा वाटत आहे.
छान पाकृ :)

नाहीतर वाकुल्या दाखवतात..

पाक्रु आवडली....

चला आता परत एकदा ताज्या माकुल्या खायला वेंगुर्ल्याला जायला लागणार...

:( मला माकुल्या म्हणजे काय ते ही ठावुक नाही |

जाणुन घेण्यास व्याकुळ !!
वाश्या

पण वरच्या शिद यांच्या प्रतिसादावरून माकुल म्हणजे squids असावेत असं दिसतंय.

शिद's picture

14 Oct 2014 - 10:16 pm | शिद

अगदी बरोबर.

सुहास..'s picture

14 Oct 2014 - 10:18 pm | सुहास..

ठिक आहे हो , पण ते स्किव्ड काय ते ते नेमके आहे तरी काय ? :(

जागु ह्यांचा हा धागा पहा. खात्री आहे की आतातरी सगळ्या शंका मिटतील. :)

भारतात असतो तर सरळ जेवायलाच बोलावलं असतं आणि शंका दुर केली असती.

ओय्य्य्य !! मालक , तो जो काही प्राणी आहे , जरा भिती वाटेल भौ खाताना !! कुठल्या प्रदेशात खातात ह्ये झेंगाट ? :(

हो नव्या लोकांना पाहताना थोडं वेगळ वाटेल पण चव मस्त असते.

तसही तुमच्यासमोर फायनल डीश पेश केली जाईल त्यामूळं खाताना काही वावगं वाटणार नाही ह्याची खात्री बाळगा.

आयला, पाकृ वाचल्यापासनं मला वाटत होतं की अळूच्या देठासारखं अथवा कांद्याच्या पाती सारखं काही प्रकरण आहे.
ते लिंक वाचल्यावर एकदम डचमळून आलं हो! (ब्ळॉक्क्क)

अहो तो दिसायला तसा आहे पण खायला चविष्ट असतो. तुम्ही हॉटेलमध्ये चिकन क्रिस्पी खाताना तशीच ह्याला क्रिस्पी केल्यावरही चव लागते.

प्यारे१'s picture

15 Oct 2014 - 1:43 am | प्यारे१

>>> तुम्ही हॉटेलमध्ये चिकन क्रिस्पी खाताना तशीच ह्याला क्रिस्पी केल्यावरही चव लागते.

जागुतै, मी आता 'पुअर' व्हेज आहे हो. ;)

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2014 - 2:07 am | प्रभाकर पेठकर

अरसिकेशु कवित्व शिरसी मा लिख मा लिख मा लिख...

प्यारे१'s picture

15 Oct 2014 - 2:47 am | प्यारे१

:)

गवि's picture

15 Oct 2014 - 12:42 pm | गवि

आवडेश..

यापूर्वीची ती म्हाकुळाच्या कालवणाची तुझी रेसिपी जास्त आवडली ( म्हणजे ते जास्त टेस्टी असेल अश्या अर्थाने).

हा प्राणी शिजला नाही तर मजा नाही. नुस्ते चिंगम.

पेठकर काकांशी १०००००००००००००% सहमत
गवत खाणाराना ही लज्जत उमजायचीच नाही.
प्यारेकाका मी देखील शाकहारी आहे.पण कोणाच्या अन्नाला

"(ब्ळॉक्क्क) "

म्हणणे हे फारच अती होतय.
तुम्ही खात नसाल पण त्या पदार्थाला ओकारीदर्षक उच्चार लिहून गलिच्छा घाण वगैरे हिणवणे हे कोणत्या एटीकेट्स मधे बसते.
प्रतिसाद देताना आपण ज्याबद्दल बोलतोय ते कोणाचेतरी अन्न आहे याची जाणीव ठेवावी ही विनन्ती.

प्यारे१'s picture

15 Oct 2014 - 1:45 pm | प्यारे१

खरंच चूकच झाली.

पण नॉनव्हेज खाणारांपैकी किती जण त्या प्राण्याला स्वतः मारुन खातात? अथवा मारताना बघून नंतर खाऊ शकतात?

मी स्वतः चिकन, मटन, मासे- सुरमई, पॉम्फ्रेट, बांगडा, मांदिली, खेकडे, प्रॉन्स, कालवं, रानडुक्कर,अंडी हे सगळे प्रकार बरीच वर्षं खात होतो. मित्राच्या चिकनशॉपमध्ये गल्ला गोळा केला आहे. स्वतः चार चार कोंबड्या हातात घेऊन काटा केला आहे. वजन केलं आहे त्यांचं.

कोंबड्या कशा प्रकारे स्वच्छ करतात ते पाहिलं आहे.
(आज जरा वर्णन करतो. १९९७ ला बघितलेली गोष्ट, तशीच्या तशी लक्षात राहिलीये.)

कोंबडीचं मुंडकं हळूच सुरी फिरवून अर्धवट कापलं जातं ड्रम मध्ये टाकली जाते. थोडावेळ ड्रम मध्ये कोंबडीचा फडफडाट आणि मग शांत. नंतर बाहेर काढून डोकं खटकन मोकळं करायचं आणि नंतर गरम पाण्यात स्वच्छ करायची. पिसं वगैरे बाजूला. किंवा मग वॉशिंग मशिन सारखं यंत्र असतंय. आत बोटांच्या आकाराचे रबर फिक्स केलेले असतात ठराविक अंतरानं गोलाकार. कोंबड्या त्यात टाकून यंत्र गोल गोल फिरलं की त्या रबरांना घासून पिसं निघतात. मग बाहेर काढायची. शिल्लक पिसं काढायची आणि मग पाय कापायचे नि बाजूस ठेवायचं.

नंतर गिर्‍हाईक येईल तसं अ‍ॅज अ‍ॅण्ड व्हेन रिक्वायर्ड स्किन काढून अथवा तशीच, लेग पीस वेगळा, अमुक तमुक.... शेजारी त्या ओंडक्यावर चिकन कापताना, त्या मोठ्या सुर्‍यानं / चॉपरनं तुकडे करताना शेजारी बसून शर्टावर चिकनचं रक्त उडवून घेतलंय.

तेव्हा खायचो. हे बघून पण भरपूर खाल्लं. पण आता नाही जमत. मन उडालंय. शिसारी येते. ते ब्ळॉक्क्क पण तेव्हाच लिहीलं. आता प्राण्यांना खाणं जमायचं नाही. बाकी कधीतरी अंडं खाल्लं तर खातो.

प्रभाकर पेठकर's picture

15 Oct 2014 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

जीवो जीवस्य जीवनम....

यवडं डिट्टेल मंदी लिव्हुण आम्ही काय तुमच्यावाणी शाकारी हु आसं वाटलं काय बे?
आरं जा.. णॉण्व्हेज आमचं पैलं पिरेम हाय.

सुहास झेले's picture

2 Nov 2014 - 10:55 pm | सुहास झेले

णॉण्व्हेज आमचं पैलं पिरेम हाय.... +१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Nov 2014 - 10:07 pm | निनाद मुक्काम प...

लहान पणी आमच्या शेजारी राणे काका घरी कोंबडी आणून कापायचे व शिजवायचे ,त्यांना ती मारण्यात गैर वाटत नसे व मला ती खायला.
अवांतर
सस्तन प्राण्याचे दुध हे त्याच्या अपत्यासाठी असते. ती मनुष्य स्वतःसाठी वापरतो. ह्याबद्दल सुध्धा मला खेद वाटत नाही,

सुहास झेले's picture

2 Nov 2014 - 10:58 pm | सुहास झेले

पाककृती आवडली... पण लई मेहनतीचे काम दिसते... (त्यात आम्ही मुळात आळशी)

मुंबईत हॉटेलात मिळाली की नक्की ट्राय करणार :)