अनवाणी .........

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in काथ्याकूट
1 Oct 2014 - 4:58 pm
गाभा: 

नवरात्रात अनवाणी चालण्याविषयी चर्चा वाचली ,त्या अनुषंगाने लिहित आहे
माझा असा अंदाज आहे कि नवरात्र सुरु होते तेव्हा नुकताच पावसाळा संपलेला असतो त्यामुळे सगळीकडे हिरवळ असते
आणि हिरवळीवरून अनवाणी पायाने चालण्यामुळे भरपूर फायदे होतात
रक्ताभिसरण सुधारते ,डोळ्यांचे आरोग्य सुधारते ,आणखी इतरही बरेच फायदे होतात हिरवळीवरून चालण्याने
त्यामुळे आरोग्याचे हे सगळे लाभ किमान ९ दिवस तरी व्हावेत म्हणून हि नवरात्रात अनवाणी चालण्याची पद्धत निघाली असावी .
तसही आपल्याकडे देवाधर्मासाठी करायचं म्हटलं कि लोक सगळ करतात
म्हणून याला धार्मिक रूप दिल गेल असाव

आताच्या काळात रस्ते इतके अस्वच्छ असतात कि अनवाणी चालण्यामुळे फायदा होण्यापेक्षा
नुकसान होत

पण आपल्याकडे रूढी परंपरा मागची कारण समजून न घेता आंधळेपणाने त्या पाळल्या जातात
म्हणून आताही लोक नवरात्रात अनवाणी फिरतात ,
आताही हि परंपरा बंद व्हायला पाहिजे ,कारण आताच्या काळात रस्त्यावरून अनवाणी चालण म्हणजे
आजाराला निमंत्रण

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Oct 2014 - 5:08 pm | माम्लेदारचा पन्खा

असेल बुआ...

जेपी's picture

1 Oct 2014 - 5:15 pm | जेपी

धागाकर्तीशी सहमत.
पंखा सायबाला नोटीश बजावत है.
मी पयला ©®है

माम्लेदारचा पन्खा's picture

1 Oct 2014 - 11:40 pm | माम्लेदारचा पन्खा

नोटीस मागे लो ! इस बार हमारी सरकार.....

संजय क्षीरसागर's picture

2 Oct 2014 - 12:03 am | संजय क्षीरसागर

अनवाणी कसं चालेल?

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Oct 2014 - 8:28 am | माम्लेदारचा पन्खा

इतकी वर्ष बघीतलंयच की आपण .. अनवाणी चालणं काय अवघड आहे?

संजय क्षीरसागर's picture

2 Oct 2014 - 9:52 am | संजय क्षीरसागर

शीर्षासन झालं!

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Oct 2014 - 10:32 am | माम्लेदारचा पन्खा

बरं आस्तंय कधीतरी केल्यालं ...

प्रसाद१९७१'s picture

1 Oct 2014 - 5:17 pm | प्रसाद१९७१

@ मनरंग - तुम्ही नका ना फिरु अनवाणी, काही जबरदस्ती नाही तुमच्यावर.

पण कोणाला असेल फिरायचे अनवाणी तर फिरु दे की

मी कशाला अडवू कुणाला अनवाणी चालायला ?
कुणाला चालायचं असेल तर खुशाल चालू दे *wink*

सौंदाळा's picture

1 Oct 2014 - 5:21 pm | सौंदाळा

आयुर्हीत दिसले नाहीत बरेच दिवसात

आयुर्हीत दिसले होतो बॉ दोन दिसापुर्वी.
काही कॉपीपेस्ट मटेरीयल मिळत नसेल मनुन शांत असतील.

काउबॉय's picture

1 Oct 2014 - 5:44 pm | काउबॉय

आणखी काही कारण नसावे.... बाकी काही वैज्ञानिक कारणे असतील नसतील तर अवश्य प्रकाश टाकावा...

संजय क्षीरसागर's picture

1 Oct 2014 - 6:14 pm | संजय क्षीरसागर

सबब उगीच कार्यबदल करु नका.

आयुर्हित's picture

2 Oct 2014 - 9:33 am | आयुर्हित

अनवानी चालल्याने आपल्या तळपायात असलेली नर्व्हसेंटर्स दाबली जावून कार्यान्वित होतात व शरीरातील विभिन्न अवयव स्वच्छ, दुरुस्त व अधिक कार्यशाली बनतात. याचा परिणाम रोगांवर नियंत्रण ठेवण्यावर होवून स्वास्थवर्धन होते व दीर्घायुष्य मिळते.

तळ पायावरील एक्यूप्रेशर पॉइंट्स

पण ज्याला मधुमेह आहे (किंवा ज्याच्या घरात मधुमेहाचा इतिहास आहे) किंवा हेमोफिलीया असलेल्या माणसांनी अनवानी फिरू नये.

अनवानी फिरण्यासाठी सोसायटीतिल किंवा सार्वजनिक बागेतील लॉनवर, जॉगिंग ट्रॅकवर पहाटे/सकाळी फिरण्याने अगणित फायदा तर होतोच पण अशी हि जागा स्वच्छ ठेवता आल्याने पायाला जखमा होत नाहित. इतरत्र रस्त्यावर अनवानी फिरणे म्हणजे अपघाताला निमंत्रणच ठरेल.

ज्या लोकांना फिरणेच शक्य नाही त्यांनी बसल्याजागेवरुन आपले तळपाय काशाच्या(ब्राँझ धातुच्या)वाटिने झोपायच्या आधी चांगले रगडुन घ्यावेत. त्यानेपण अनवानी चालल्याचे सर्व फायदे मिळतात.

काही उदाहरण:
१) एक विश्वप्रसिद्ध (व तेव्हढेच कुप्रसिद्धहि) चित्रकार मकबुल फिदा हुसेन वयाच्या ४४ वर्षापासुन मरेपर्यंत (वयाच्या ९५ वर्षापर्यंत) अनवानीच फिरत असत.

२) सम्राट अकबर आपल्याला मुल व्हावे म्हणुन अजमेर शरिफ ख्वाजा मोइनुद्दिन चिश्ती साहेबांच्या दर्ग्यापर्यंत अनवानी
चालत आला असल्याची इतिहासात नोंद आहे

३) वॄंदावनातील जमीन ही अनवानी फिरण्यासाठी अतिशय योग्य आहे. तेथे बरीच भाविक अनवानी फिरतात व पूण्य पदरात पाडुन घेतात.