Blue Print

Primary tabs

सुहास..'s picture
सुहास.. in राजकारण
26 Sep 2014 - 4:10 pm

काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत.

सर्वात महत्त्वाचे ..

मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही. मी मिपावर येतो ते एक मिपाकर म्हणूनच, चार मित्र भेटावेत ,त्यांच्याशी जीवाभावाच्या गप्पा व्हाव्यात, थोडी माफक करमणुक व्हावी , थोडसं वास्तव इतरांना ज्ञात करुन द्यावे ( अर्थात दुसरं काही येत ही नाही मला, ग्रास रूट लाच काम करु शकतो मी ! ) या शुध्द हेतुने येतो ! हा धाग्या काढण्याचे कारण म्हणजे L0 लेव्हलच्या काही प्रश्नांना उत्तरे देणे. L1, L2 आणि L3 प्रश्नांकरिता कृपया मला व्यनी, मेल , फोन करावा. मिपाचा युएसपी, मान राखावा हि नम्र विनंती ! अर्थात , ऑफीस काम, प्रचार, वैयक्तीक कामे ही मागे आहेत ..जस जमेल तसे उत्तर देईन ..आणी शिव्या ही खाईल ( तेव्हढा हक्क मनसेवर अपेक्षा ठेवणार्‍यांचा आहेच, अर्थात we are not superman हे ही लक्षात ठेवावे ) अर्थात अभ्यास नसलेले, केवळ बातम्या बघुन स्फुरण चढलेल्यांनी, टवाळ, पुर्वग्रहदुषितांनी कृपया दुर रहावे ही पुन्हा विनंती करतो....
माझा हेतु - पाच वर्षांत एक चान्स मिळतो आपल्या सर्वांना ! त्यानंतर साधारण १८२५ दिवस , ४४४४८ तास हात चरफरत बसावं लागत ! योग्य तो निर्णय घ्या..मनसे असो वा ईतर कुठला ही पक्ष !!

तु कोण रे बाजीराव...

माझ नाव सुहास , होय फक्त सुहास ..मी आडनाव सांगत नाही आणि जे आवर्जुन सांगतात त्यांना फाट्यावर मारतो. त्याला कारण आहे आणी कारण सर्वपरिचित आहे. मी कॉलेजला असतानापासुनच राजच्या विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष होतो. एकुण चार कॉलेज अंडर मध्ये होती सक्रीय राजकारणात आहे ( मला बाहेर उभ राहुन वा एसी त बसुन राजकारण वा समाजकारण करता येत नाही ) तेव्हापासुन ते आजपावेतो म्हणजे एक महिन्यापुर्वी नौकरी धरल्याने मला सध्याचा पदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. सध्या मी हॉरीजॉन्टल मध्ये आहे . काय आहे हॉरिजॉन्टल ते ही सागंतोच आहे !! इतर परिचय माझ्या लेखांवरुन आजवर झाला असेल असे मी गृहीत धरतो ( स्वतः ची लाल नव्हे परिचय )

who the hell is Raj Thakare ?

हाच प्रश्न जया भादुरी ला पडला काही वर्षांपुर्वी ...असो ....सेनेशी कट्टर असताना हळु हळु सेनेच विभाजन व्हायला लागल्यावर बाळासाहेबांपर्यंत पोहोचायची मुष्किली आमच्यासारख्यांवर आली, रस्त्यात बरेच खड्डे लागायला लागले, पहिला सर्वात मोठा खड्डा होता संजय, इतर तर काही विचारुच नका दोन अडीज वर्षे एक ही अ‍ॅन्डॉसमेंट ( बाळासाहेबांच सही असलेले शिफारस पत्र ) आली नाही..तेव्हा कार्यकर्ते झुंडीने राज ठाकरेंकडे जात होते, एव्हाना राज ठाकरे राजकीय सन्यास घ्यायच्या तयारीत होते. अध्यक्ष म्हणुन उध्दवांच नाव ही त्यांनीच सुचविले..त्यांना विनंती करत होते, तेव्हा राज ठाकरे कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या, कार्यकर्त्यांना समजावयचे , अरे त्याला थोडा वेळ द्या करेल तो ..बरच नंतर बिघडत गेलं ..राज ठाकरेंनी शेवटी पक्ष बनवायचा निर्णय घेतला. ( त्यावेळी त्यांच्या कडे स्वतःसाठी काहीतरी करायच असतं तर गप एखाद्या लिडींग पार्टीमध्ये जावुन मंत्रीपद घेवुन आयुष्यभराची सोय लावुन घेतली असती )...पाठीहुन राजकारण !!

मनसे आणि ईतर पक्ष

कम्पेर मांडतो आहे, हे खेदकारक आहे माझ्यासाठी ही ! मोठ्या पवांरानी हातान घालवुन घेतलय , हे कोणी ही मान्य करेल, महाराष्ट्राची (जी आहे ती ) प्रगती आणि अधोगती दोन्ही पण या राजकारणी घराण्यामुळे आहे, जितके प्लॅनींग त्याच्या दुप्पट पैसै खाणे आणि अंगात असलेली मुसद्दीगिरी ..एक उदाहरण सांगतो , मागच्या वर्षी देशमुख साहेब सोलापुरसाठी प्यायला पाणी मागत होते, तो मुद्दा सफाईदार पणे कोर्टात ढकलला गेला , जेणे करुन उजनी पर्यंत पाणी पोचण्यास वेळ लागावा ! खर तर एका सही मध्ये तो पास करत आला असता ..कारण घडले नंतर जेव्हा पाणी सोडले गेले..तेव्हा ते दौंड च्या धरणात अडले) अडणारच होते. त्यांनतर चा त्यातले १० % उजनी पर्यंत पोचले आणी ते पोचेपर्यंत पाउस ही पडला ..चांदी झाली ती दौंड च्या शेतकर्‍यांची !! राज्याला प्यायला पाणी नव्हते आणि तिथे शेतकर्‍यांना उसाला देखील पाणी , यातुनच समजा कसा चालतो तो पक्ष ..मुंबईत या पक्षाच्याकार्यालयात सहा एका पाठी एक अश्या सहा रुम्स आहेत..यामध्ये शेवटच्या खोलीत पैशाचे व्यवहार मी माझ्या डोळ्याने पाहिले आहेत. दुसरा त्यांचा सहकारी पक्षातली मॅडम आली होती दुष्काळी भागाचा दौरा करायला , तिला डांबरी रोड दिसला ओला झालेला, तिच्या त्या इटालियन-हिन्दी अ‍ॅक्सेन्ट मध्ये " पाऊस तर आहे इथे " ऐकताना वाटल एक सट्टदिशी ....असो .....ढेकळ फुटली की नाही कळत नाही....प्रश्न च कळत नाही..उत्तर कधी शोधणार ? ..अजुन आहे भाजपा आणी सेनेविषयी ..पण ते कदाचित नंतर आता नाही ..

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे गी ..हा विभाग विचार देतो ..टोल विषयक आधी अभ्यास या विभागानेच मांडला सुरु केला. अर्थात देवेंद्र आणी सोमय्या आरोप करत होते , पण तसा अभ्यास नव्हता तिथे...केवळ एक दोन कार्यकत्यांची पत्र आणि त्यानंतर जनजागृती सक्रीय गटाकडे आली ..त्यांचा आडत्यांमुळे निर्माण झालेले प्रश्न आणी त्याच सोल्युशन बघुन मी खुप ईम्प्रेस झालो होतो, सरकार येवो न येवो , हा मुद्दा डिसेंबर च्या सुमारास सुरु करणार आहोत ( डिसेंबर का ? आत्ताशी कुठ सक्रीय गटाकडे निवेदनाच्या कॉप्या गेल्यात , विभागवार )

पक्ष बांधायला आणि Blue Print ला वेळ का ?

..पक्ष स्थापनेचा ज्या दिवशी विचार पक्का झाला त्यानंतर दोन वर्षांनी पक्ष स्थापन झाला, स्वतः राजच्या भाषेत सांगायचे तर ..काय तमाशाचा फड काढत होतो का गणेश मंडळ स्थापन करत होतो ? असो ...जेव्हा पक्षबांधणीच काम सुरु झालं तेव्हा त्याचे सरसकट दोन भाग केले गेल , सक्रीय आणि असक्रीय ( यालाच हॉरिझॉन्टल म्हणतात ) ..असक्रीय हा केवळ वैचारिक बाजु संभाळणार असे ठरले..खुप नामवंत मंडळी आहेत यात, उद्योगपतीही आहेत ..हि लोक्स सदोदित राज ला सल्ले ,फॅक्स संवाद आणी वेळ पडली की कानपिचक्या ही देत असतात, हा विकास आराखडा मांडणारे तेच !! Primary Blue Print त्या आधी एक वर्षे ..होय वेळ लागतो , इतका कचरा आणि कॉम्प्लिकेशस करून ठेवलं आहे की विचारु नका ..बर झाल ते आरटीआय तरी आल , नाहीतर घोळच होता ..एक साधी माहीती ...माझ्या वार्डामध्ये दरिद्री रेषेखाली किती जनता आहे ? हे माझ्यापर्यंत पोचण्यासाठी पंधरा दिवस लागावेत असा लेखी नियम आहे फक्त .. वास्तवात तीन ते चार महीने लागतात , ते ही दहा वेळा फॉलो-अप केल्यावर !! काल ती Blue Print रिलीज होईपर्यंत त्यात आजवर साधारण १०२ वेळा सुधारणा झाल्यात. बरेच जण म्हणताहेत की ती विकास आयोजन आराखड्याची कॉपी आहे , त्यांना दंडवत सांगा आमचा ..या सरकारी (तेच आयोजन वाले) कर्मचार्‍यांशी भेट घालुन देतो मी ! ( पुण्यात इथं मागं लाल देवळापाशी ' राजधानी बार ' मध्ये भर दुपारचे सापडतील तुम्हाला !! ) प्रत्येकाला एक कागद द्या आणी म्हणा की माझ्या इथुन गटार आहे ते शाळेच्या गेट मधुन जाते, शाळेतल्या विद्यार्थांना तिथल्या ड्रेनेज चा त्रास होतो, ते तिथुन दुसरीकडे हलवण्यासाठी व शाळा ड्रेनेज मुक्त करण्यासाठी दहा बुलेट पाँईंट्स लिहुन द्या ...शप्पथ्थ ! लिहीले तर मी राजकारण हा शब्द देखील काढणार नाही तोंडातुन !!

बर्‍याच सुचना आल्या आहेत त्यात , मी स्वता: मागच्या वर्षी पुणे ग्रामीण फिरुन माहीती आणुन पोचवली आहे ..हा केवळ आराखडा आहे .बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे ..केवळ मुंबईच शांघाय करु, मेट्रो २००१ ते २०१० ते २०२० ते २०३० पर्यंत करूच अशी काही प्रतिज्ञा नाही ..विश्वास ठेवा ती पुर्ण अभ्यासाअंतीच मांडलेली आहे माझ सरळ-सरळ मत अस आहे की .
राज्य कारभार करता येत नसेल तर तो किमान पारदर्शक ठेवावा ..

चुका ...

होय ! गंभीर चुका झाल्यात मनसे कडुन , पण कार्यकर्ते ते पोचवत नाहीत असे काही नाही राज कडे , व्हेरी फ्रॅन्कली !! ..पोचवितात ...अगदी आता जी महापौरपदासाठी राष्ट्रवादीची मदत ई. ..उत्तर मिळतात ...ज्यांनी मदत केली ते पक्ष बदलुन मनसे मध्ये प्रवेशासाठी उत्सुक आहेत. आता राजिनामा देवुन, पुन्हा निवडुन येवुन मग पांठिबा देण्यापेक्षा तिथल्या स्थानिक मनसेने त्याला होकार दिला. निवडणुका पाठिशी लावायच्या नव्हत्या .

आणि दुसर काय ते खासदारकीच्या निवडणुका ...त्यावेळी माझ्यासकट एक खुप मोठा गट होता जो म्हणत की खासदारकी ला उमेदवार देवुच नका. मोदींना पांठिबा द्या आणि संपवा ..दुसरा गट मात्र , विषेशतः मुंबईवाले त्यांनी मात्र पारंपारिक सेनेच्या किमान उभ रहाण्यासाठी तरी उमेदवार द्याच असा आग्रह धरला , मत विरोधात गेली ..माझ मत अस आहे की ती गेली मोदींमुळे, सेनेमुळे नाही .असो ..ही खरोखरच घोडचुक होती .... अर्थात त्यातुन ही बाहेर येवु ...मात्र पुन्हा एकदा सांगतो ..तुमच मत मग ते कोणत्याही पक्षाला असो ..देताना फक्त विचार करा ...चेपुवर आंजावर दोन चार विनोदांचा आधारावर जावु नका ..अगदी आप चं असल तरी ...

अरे हो, Blue Print बद्दल अजुन ही काही प्रश्न असतील तर तुम्ही मला बिनधोक पणे p9373991526@gmail.com वा 9665185564 ( हा व्हाट्स अ‍ॅप चा पण नंबर आहे ) विचारु शकता वा मिपावर व्यनी करा ...इथे उत्तर देवु शकणार नाही, देणार नाही ( मी इथे एक मिपाकर म्हणुनच वावरू इच्छीतो ) धन्यवाद !

प्रतिक्रिया

नितिन पाठे's picture

26 Sep 2014 - 4:34 pm | नितिन पाठे

पेटली होती मुंबई
राक्षस होते वावरत...
आया , बहिणी, लेकरांना
आश्रू नव्हते आवरत...
कधी जाईल जिव कुणाचा
कुणा काही कळेना... उभी होती मुंबईसाठी
फक्त तेव्हा
"शिवसेना"..............

actually...राजसाहेब ही तेव्हा शिवसेनेतच होते.....

बाकी...लिहिलेत खूप छान...

hitesh's picture

8 Nov 2014 - 10:58 am | hitesh

पेटली कुणामुळे ?

जेपी's picture

26 Sep 2014 - 4:49 pm | जेपी

मी blue print मधले मला महत्वाचे वाटणारे तिन मुद्दे आरोग्य महिला धोरण आणी रोजगार.
मुद्दे पटतात पण..
रोजगारवरील मुद्दे जरा गोलमोल वाटतात खासकरुन स्वंयरोजगारबद्दल.

इम्प्लिमेंटेशन प्लॅन आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनची वाट पहात आहे. तोपर्यंत मतप्रदर्शन करण्यातही अर्थ नाही.

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 5:18 pm | बॅटमॅन

यग्जाकटली!

प्यारे१'s picture

26 Sep 2014 - 5:13 pm | प्यारे१

ब्लु प्रिंट छानच आहे. अम्मलबजावणी कशी होते ते बघू या. काडीमोडांमुळं कव्हरेज कमी मिळालं ह्याबाबत दु:ख वाटत आहे. तरीही ब्लु प्रिंट सगळ्यांपर्यंत पोचेल अशी अपेक्षा आहे.

कोऽहम्'s picture

26 Sep 2014 - 5:33 pm | कोऽहम्

मित्र सुहास,

दोन वचने :

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!!

आणि

आधी केले मग सांगितले !!!

ह्यापैकी पहिले वचन खरे होवो ह्यासाठी मनसे शुभेच्छा (निळप्रत)!!!

दुसरे वचन अपूर्ण आहे त्याचा विसर न व्हावा हि दोस्तीखात्यातील मागणी (खळफट्याक - मी मराठी. टोलनाके, मराठी युवक/युवतीं रोजगार प्राधान्य ई.ई. )

कळावे,
मित्र.

सवंगडी's picture

26 Sep 2014 - 5:56 pm | सवंगडी

छान लेख ! विशेष म्हणजे आपण हे सगळ जवळून पाहिलं आहे हे फार चांगलं.
मी अजिबात पूर्वग्रहदुषित नाही मला एखाद्या गोष्टीतले चुकीचे किवा दम नसणारे मुद्दे लवकर दिसतात एवढंच.
आता तुम्ही म्हणले कि मी मिपा वर काही बोलणार नाही म्हणून मला पडलेले प्रश्न मी विचारात नाही.
इ मेल आणि नंबर घेतलाय. निवडणुकीनंतर नक्कीच भेटून बोलायला आवडेल.

पुण्याचे वटवाघूळ's picture

26 Sep 2014 - 6:11 pm | पुण्याचे वटवाघूळ

मनसेचे दोन भाग केलेले आहेत ..एक सक्रीय आणि दुसरा असक्रीय ..हा असक्रीय भाग म्हण्जे हिमनगाखालचा शिखर आहे...खुप बुध्दीवंत, प्रामाणिक आहे, त्यात खुप मंडळी आहेत, सोशल वर्कर्स पासुन उद्योजकांची एक खुप मोठी फळी आहे

या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 7:35 pm | प्रसाद१९७१

या बुध्दीवंत आणि प्रामाणिक लोकांना राज ठाकरे यांच्या कार्यपध्दतीमध्ये आणि वक्तव्यांमध्ये काहीच वावगे वाटत नसेल तर मात्र गॉड सेव्ह महाराष्ट्र!!

+१११११११११११११११११११११

विलासराव's picture

26 Sep 2014 - 7:15 pm | विलासराव

मी काही राजकारणी नाही तरीही मला मनसेकडुन फार अपेक्षा वाटत होत्या.पण साफ निराशा झालीय.

असेच माझे देखील काहीसे मत झाले आहे, मनसेकडून मला खूप व चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती. अजून ही पर्याय म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला तयार होतो. पण, ज्याचा निवडणूक होण्याआधी विरोध केला त्याचाच सपोर्ट घेणे-देणे समजले नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Sep 2014 - 2:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनसेकडून टोलचा प्रश्न मार्गी लागेल होते असं वाटलं. अनेक टोलवरुन त्यांनी माहिती मागितली. डेटा जमा केला पण त्यातून आउटपूट काहीच निघालं नाही हे सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. प्रश्न निवडला की तो धसास नेला पाहिजे ते मनसेला जमल नाही. नाश्कात माझा मित्र आहे तो म्हणतो नाश्कात काही अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अजिबात उतरल्या नाही. बाळासाहेबांचं नेतृत्त्व पाहिलेल्यां ना तोच वारसा नेणारा एक माणुस पुढे आला असे वाटत होते. धमाकेदार वकृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांची फळी होती. शिवसेनेच्या नेतृत्वावर नाराज असलेले लोक मनसेकडून मोठी अपेक्षा बाळगत होते. एक मतदार आणि एक महाराष्ट्रीयन माणुस म्हणुन ते फार अपेक्षा पूर्ण करु शकले नाहीत, असे मला वाटते.

दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

27 Sep 2014 - 7:41 pm | किसन शिंदे

सरांच्या संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. सुरूवातीच्या काही वर्षांनंतर मनसेने त्यांच्याकडे अपेक्षेने पाहणार्‍या महाराष्ट्रातल्या लोकांचा अपेक्षाभंगच केला.

पण मोदीमुळे कार्यक्षम नेता कोणाला म्हणावे याचा न भूतो असा बेंचमार्क सेट झालाय आज महाराष्ट्राला स्वत:चा मोदी हवाय पण... कोंग्रेसकड़े पृथ्वी बाबा, राकों कड़े सहकार, सेनेकड़े सहानुभूती अन मनसे कड़े आहे Blue Print

जनता गोंधळली नाही तरच आश्चर्य. यावेळी मतदान जोरात होइल % वाटत नाही.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 7:50 pm | प्रसाद१९७१

संपादित

तर साहेब, मागच्या निवडणुकीतील ( सर्वच ) मनसे च्या निवडुन आलेल्या आणि न आलेल्या उमेदवारांबद्दल पण बोला की. तुम्ही आता अगदी आतल्या गोटातले आहात तर हे ही सांगा गेल्या ५ वर्षात मनसे नगरसेवकांची संपत्ती कीती वाढली ( दाखवायची नाही खरी खरी ). हे नगरसेवक पोटापाण्यासाठी काय व्यवसाय करतात? आम्ही १० तास काम करुन आम्हाला दर सहा महीन्याला नविन चारचाकी का घेता येत नाही, पण त्यांना कशी येते?

पुर्वी एका प्रतिसादात लिहीले होते जेव्हा पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या बायकोला मनसेने तिकीट दिले होते आणि राज ठाकरेंनी त्याचे समर्थन केले होते (बायकोच्या नावावर गुन्हे असतील तर बोला म्हणे) तेव्हाच ठाकरे मनातुन उतरले.
आगामी विधानसभा निवडणुकांबद्दल बोलायचे तर पिंपरी चिंचवडमधे शिवसेनेचे तर गुंडच आहेत. राष्ट्र्वादीचे गुंड भाजपामधे गेलेत आणि राष्ट्रवादीत नविन गुंड आले आहेत.
माझा सध्याचा कल तर काँग्रेस (ही वेळ येईल वाटले नव्हते), मनसेने जर चांगला उमेदवार दिला तर मनसे नाहीतर NOTA.
भाजपाने त्यांच्या चांगल्यासाठी ही कचरा भरती थांबवावी अशी इच्छा आहे.

बाकी जर मनसेने २०+ वगैरे जागा काढल्या तर त्यांची भुमिकादेखिल महत्वाची राहील असे वाटते.

प्रसाद१९७१'s picture

26 Sep 2014 - 8:10 pm | प्रसाद१९७१

केजरीवाल नी घोळ घालुन ठेवला. महाराष्ट्राच्या निवडणुका लढवल्या असत्या तर एक ऑप्शन तरी राहीला असता.

विवेकपटाईत's picture

4 Nov 2014 - 1:35 pm | विवेकपटाईत

महाराष्ट्र वाचला कि .... नाही तर कचरा केला असता इथे ही...

सुहास झेले's picture

26 Sep 2014 - 10:03 pm | सुहास झेले

मला आवडली ब्लू प्रिंट... मराठीत इतकी टेक्निकली परफेक्ट साईट मी बघितली नाही. मी काल काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या होत्या त्याच वेबसाईटवर.... त्यांनी आज फॉलो अप केला त्यावर... फक्त हे थोडे आधी म्हणजे निवडणुका जाहीर झाल्या तेव्हाच व्हायला हवे होते... पण असो. त्यांना अपेक्षित यश मिळो :)

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2014 - 10:13 pm | श्रीरंग_जोशी

या ब्लू प्रिंटमध्ये आपल्या राज्याच्या संबंधीत समस्या व विकासासंबंधीत एवढे सारे विषय त्यात आहेत की त्याचा जेवढा अभ्यास करू तेवढे आपले ज्ञान वाढेल.

कदाचित हेच काम मनसेने २००९ च्या निवडणुकींच्या आधी पूर्ण केले असते तर अधिक प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या. किंवा हेच प्रकाशन अराजकिय संस्थेकडून झाले असते तरीही फरक जाणवला असता.

ते काहीही असो, स्वतःसाठी म्हणून का होईना जमेल तेवढा अभ्यास करण्यासाठी एक चांगले साधन आहे.

आतिवास's picture

26 Sep 2014 - 10:42 pm | आतिवास

'निळी प्रत'चा दुवा आहे का?

vrushali n's picture

26 Sep 2014 - 10:56 pm | vrushali n
खटपट्या's picture

27 Sep 2014 - 1:36 am | खटपट्या

सुहास राव.

बरे झाले लिहिलेत. या निमित्ताने मनसेच्या आतल्या गोटातील माणसाचे मनोगत कळले. सुरवातीला मनसे बद्दल प्रचंड आकर्षण होते, आदर होता. पण जसजसा वेळ जावू लागला तसा आदराची जागा गोंधळाने घेतली आणि शेवटी आत्ता या घडीला तो पक्ष माझ्या मनात ५ व्या क्रमांकावर आहे.

तुम्ही म्हणताय कि मी निळ्या प्रती संबधीच्या प्रश्नांना इथे उत्तरे देणार नाही आणि तुम्हाला एक मिपाकर म्हणून रहायचे आहे. तर मग एक कट्टा का होऊ नये. समोरा समोर प्रश्न उत्तरे होतील…. इच्छुक मिपाकर हजेरी लावतील.

मिपावरील कट्टाकिंग सद्या देशाबाहेर आहेत तरी कोणत्याही मध्यवर्ती ठिकाणी आपण भेटू शकू :)

बाकी निळी प्रत बनवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत दिसून येते. माहिती काढतानाच बऱ्याच वेळेला मूळ समस्या माहित होतात. व उपाययोजना अमूर्त स्वरूपात तयार होतात. बाकी अंमलबजावणी बद्दल अन्य मिपाकारांशी सहमत.

बॅक ग्राऊंडमध्ये impletation plan चे कामकाज केव्हापासुन चालु आहे

हे दिसायला पाहीजे. आजकाल तर न केलेली कामेसुध्दा आपल्या नावावर खपवण्याचा जमाना आहे.

बाबा पाटील's picture

27 Sep 2014 - 12:46 pm | बाबा पाटील

पुणे जिल्ह्यातल्या दोन बेसिक चुका १) गजा मारणे आणी २) संदिप भोंडवे ? याबाबत काय स्पष्टीकरण देवु शकाल ?पुणे जिल्ह्यातले टॉप लेव्हलचे लेटीकेशन प्रॉपर्टी व इंडस्ट्रियल स्क्रप हा यांचा खरा व्यवसाय, आता तो कसा चालतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

आवो साहेबानू ,त्येचा अन आमच्या ब्ल्यू प्रिंटचा कसला संबंध हो ? आणि माणूस चुकातूनच शिकतो हे खरे नव्हे काय?
आपणास असलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वत्ता इचारून सोडा कि उमेदवारांना !

आशु जोग's picture

27 Sep 2014 - 1:08 pm | आशु जोग

चांगली माहीती दिली आहे सुहासरावांनी

नन्दादीप's picture

27 Sep 2014 - 2:27 pm | नन्दादीप

प्रचंड मेहनत दिसून येतेय ब्लू प्रिंट मधे......

नाखु's picture

27 Sep 2014 - 4:05 pm | नाखु

नुसती (नक्कल+बेरीज) केलीय ही भाषणांची. आणी हे आम्ही न्हाई म्हणत, मिपाचे थोर्र्$थोर्र विचारवंत "सोका(व्)जी नाना सांग्त्यात म्हंजी कस खोटं असेल बरं?

चांगल्याला चांगल म्हणण्याची दानत असलेला
चावडी बाहेरचा पांढरपेशा(बिगारी)

अमोल केळकर's picture

27 Sep 2014 - 4:02 pm | अमोल केळकर

म.न.से बद्दल खुप आदर आहे. लोकसभेत त्यांनाच मत दिले होते ( ठाणे - अभिजीत पानसे)

राज साहेबांना एकदा भेटायचे इच्छा आहे, बघू या जमते का

अमोल केळकर
बेलापूर

मृत्युन्जय's picture

27 Sep 2014 - 5:50 pm | मृत्युन्जय

मागच्या विधानसभेत मनसेलाच मत दिले होते. अबु आझमीला उचलुन बाजुला केल्यामुळे वांजळेंना दिलेले मत सार्थकी लागले. मात्र राज ठाकरे नुसतेच बोल बच्चन आहेत असे लोकांचे मत बनले आहे. ती छबी मोडण्यासाठी राज ठाकर्‍यांना बरीच मेहनत करावी लागेल. संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.

बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

टवाळ कार्टा's picture

27 Sep 2014 - 10:47 pm | टवाळ कार्टा

संधी कशी मिळणार हे मात्र कळत नाही.

संधी नाशकात मिळालेली...पण तिथे मनसे बाकीच्यांपेक्शा वेगळी नाहीये हेच दिसून आलेय

बाकी राज ठाकर्‍यांच्या टोल आंदोलनाचे काय झाले ते काही कळेना.

मांडवली झाली...आता थोडा हिस्सा तिथे पण जातो

सामान्यनागरिक's picture

6 Oct 2014 - 12:14 pm | सामान्यनागरिक

जे राज ठाकरे वेडावुन छगन भुजबळांची नक्कल दाखवत्र होते तेच भुजबळांच्या दारात लाचार होऊन उभे राहिले. कश्यासाठी ? नाशिक मधे कुंभमेळ्यासाठी भक्कम निधी येतोय ! त्यावर कुणाचीही पाणी सोडण्याची तयारी नाही !कितेक नगरसेवकांनी कोट्यावधी रक्कम खर्च केली आहे या निवडणूकीसाठी ! ती दामदुपटीने वसूल करायची आहे.... विचका करुन ठेवलाय यांनी नाशिकचा. आणि परत कसलीही लाज नाही. काही करता आले नाही तरी चालेल पण महापौराच्या खुर्चीवर बसुन रहायचे. आता कुंभमेळ्याच्या वेळी दिसेलच ! जनता नक्कीच पार्श्वभागावर लाथ मारुन हाकलुन देईल !

पाषाणभेद's picture

27 Sep 2014 - 9:44 pm | पाषाणभेद

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोठे उल्लेख आहे?
मराठी अस्मिता या टॅबमध्ये नाही काही.
(मला सांगितले असते तर कंटेंट राईट करून दिले असते.) :-)

सवंगडी's picture

28 Sep 2014 - 9:39 am | सवंगडी

तुम्ही चांगलाच पाषाणभेद केला !
पण महाराष्ट्र स्वायत्त होणार सांगितलन त्यांनी !
मंग त्यात शिमा प्रश्न कुठून घुस्वायलेन तुमी ?
तुमी कान्शेप्ट नीट करत असाल तर बोला भौ. त्याची गरज हाय.

आतिवास's picture

28 Sep 2014 - 10:26 am | आतिवास

ब्लू प्रिंट एक उत्तम डॉक्युमेंट आहे यात शंकाच नाही. ('कुठल्या एजन्सीकडून करुन घेतलाय' असा एक खवचट प्रश्न नकळत मनात आला - पण सध्या तो बाजूला ठेवला आहे.)
शंका आहे ती अंमलबजावणी करण्याच्या मनसेच्या क्षमतेबाबत.
गेल्या दहा वर्षांत दिल्लीचे युवराज आणि मुंबईचे राज, यांपैकी कुणी जास्त अपेक्षाभंग केला, हे ठरवणं अवघड आहे माझ्यासाठी.
बाकी, बजबजपुरीचा फायदा थोडाफार होईल मनसेला यावेळी - असा अंदाज आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2014 - 10:52 am | प्रकाश घाटपांडे

एकदा राजदीप सरदेसाई ने जेव्हा राज ची मुलाखत घेतली होती तेव्हा राजने पुरेशी प्रगल्भता दाखवली नाही. त्यामुळे पत्रकारांचा एक मोठा वर्ग हा राज मधील अरोगन्स हा राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण मानू लागला. पत्रकार हे खवचट प्रश्न विचारत असतात. त्याचा शांत व संयमी पणे सामना करता यायला पाहिजे. राजमधील आक्रमकता ही एका बाजूला धडाडी असली तरी दुसर्‍या बाजूला ती लोकशाही मूल्याला घातक असते. मिडियाचा रोष घेतला की ते अनुल्लेखाने मारायला सुरवात करतात.
मनसे ची अकादमी हा एक संघटनेचा सशक्त मुद्दा आहे.अनिल शिदोरे ते समर्थपणे सांभाळतात.
सुहास च्या या धाग्यानिमित्त एक चांगली चर्चा होईल असे अपेक्षित आहे.

नाखु's picture

30 Sep 2014 - 8:22 am | नाखु

प्रतापः
http://deshgujarat.com/2014/09/29/rajdeep-sardesai-attacked-a-person-his...

अशा भाट्-छू-मंतर पत्रकारांमुळे मिडिया किती विश्वासार्ह आणि नि:पक्ष आहे हे समजायला जनता दुध खुळी नाही.
बाकी नमोंनाही "राक्षस्/हुकुमशहा/रक्ताळलेल्या हाताचा" असे मिपावर चघळले गेले आहेच त्यामूळे राज वर टीका काही नवल नाहीच.

माहितगार's picture

28 Sep 2014 - 1:22 pm | माहितगार

L0 ............. L1, L2 आणि L3 हे काय असते ?

-अनभिज्ञ माहितगार

टवाळ कार्टा's picture

28 Sep 2014 - 1:46 pm | टवाळ कार्टा

हे थोड्याफार फरकाने सगळ्याच पक्षांत असते... ळ० म्हणजे ० पैसा खाणारे...ळ१ म्हणजे थोडासाच पैसा खाणारे...जशीजशी ळ चा नंबर तसातसा पैसा पण वाढतो

श्रीरंग_जोशी's picture

28 Sep 2014 - 11:49 pm | श्रीरंग_जोशी

मा. तं. प्रकल्पांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतर रोजचा वापर सुरू असताना त्यावर लक्ष ठेवणार्‍या व्यक्तिंची वा चमूंची हे वर्गीकरण असते. L0 म्हणजे सतत लक्ष ठेवणारा पण त्या अंमलबजावणीचे केवळ वरवर ज्ञान असणारा. जेव्हा अचानक उद्भवलेली समश्या समस्या L0 सोडवू शकत नसेल तर L1 ला संपर्क केला जातो. तसाच क्रम L2 आणि L3 चा लागतो.

L3 वाल्यांचे उपाय शक्यतो दीर्घकालिन उपयोगाचे पण वेळखाऊ असतात.

ते बाकि तुमचे ब्लुप्रिंट वगैरे ठिकाय हो...पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो.... शिंचे भाजपा वाले काय करुन राह्य्ले कळला का काहि...??? धणुष्यबाण मात्र वेगात सुट्णार यावेळी.....

पण यावेळि तुम्हास येवढ्यावरच मत कस काय द्यायच ..?? प्रश्नच आहे हो....

सहमत!

सामान्यनागरिक's picture

6 Oct 2014 - 12:20 pm | सामान्यनागरिक

या भांडणात शिवसेनेचा फायदा होणार हे नक्की ! अगदी कालपरवा नाडीची गाट। बांधता न येणारे सुद्धा निवडुन येतील ! नंतर काही करता येणार नाही या बाजार बुणग्यांना घेऊन पण पुढील पाच वर्षे वाया जातील हे नक्की !

तथाकथित पुढारलेल्या महाराश्ट्राची शोकांतिका होणार हे नक्की ! उगीचच जोड तोड करुन भाजपने सरकारन्बनवण्याचा प्रयत्नं करु नये !नाहीतर महाराष्त्राची दिल्ली होईल !

पोटे's picture

29 Sep 2014 - 2:19 am | पोटे

सगळे थेरॉटिकल लिहिले आहे.

रवीराज's picture

29 Sep 2014 - 7:12 am | रवीराज

घोर निराशा केली मनसेने, तरुणाई मोठ्या आशेने पहात होती मनसेकडे, पण यांनी दाखवून दिले कि आम्हीही काही वेगळे नाही.

मार्कस ऑरेलियस's picture

29 Sep 2014 - 9:45 am | मार्कस ऑरेलियस

मिपावर चाललेल्या एका चर्चेत कोणीतरी " शिवसेना भाजपाला तोडघाशीपाडण्यासाठीच मनसेची स्थापना झाली होती , ते काम २००९ मधे करुन झालय , आता त्यांचा काही उद्देशच राहिलेला नाहीये, ह्या २०१४ च्या निवडणुकीत मनसेचे अवतारकार्य संपेल व गाशा गुंडाळण्यात येईल" अशी भविष्यवाणी केली आहे .
मलाही मनसेचे ह्या निवडणुकीत काय होते ह्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे . राजसाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे पण त्यांन्च्या मागे सेकंड लाईन ऑफ लीडरशीप जवळपास शुन्य आहे ... यंदा अन पुढेही मनसेचे अवघड आहे असे वाटते पण महायुती तुटल्याचा नक्कीच फायदा होईल .

असो.

(अवांतर : तुम्ही मनसे समर्थक आहात हे पाहुन आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे हे जाताजाता नमुद करतु इच्छितो )

प्रसाद१९७१'s picture

29 Sep 2014 - 11:27 am | प्रसाद१९७१

एक उदाहरण म्हणुन ह्या निळ्या पुस्तकातला "पिण्याचे पाणी" हा महत्वाचा प्रश्न बघितला.

प्रश्न ठीक लिहीला आहे, "असे का होते?" हे पण ठीक आहे ( जास्त खोलात जायला नको ). पण जे फार महत्वाचे होते की मनसे कडे ह्या प्रश्ना साठी काय उत्तर आहे, त्यासाठी "काय करायला हवं" हा पॅरॅ बघितला आणि पार निराशा झाली.

ह्या कुठेही छॉटासा सुद्धा Action Plan नाही.

ही काही वाक्य बघा, हे इतके तात्विक आहे आणि सगळ्यांना माहीती आहे, पण मनसे सरकार त्या गोष्टी प्रत्येक्षात आणण्यासाठी काय करणार आहे, कधी करणार आहे आणि त्यासाठी काय काय बदलांची गरज आहे हे कुठेच नाही.

ही मोठी मोठी वाक्य बघा

पाण्यावरील सामुदायिक मालकी मान्य करण्याची गरज आहे.
ग्रामीण व नागरी भागातील स्थानिक भागीदार व सार्वजनिक क्षेत्राचे परस्पर सहकार्य तसेच त्यांच्या क्षमता बांधणीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न सोडविता येणे शक्य आहे.
त्यासाठी गावपातळीवरील गरज पडताळणी, नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रण इ. विविध टप्प्यात भागीदारांचा विशेषत: महिला, तरुण व समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे.
पिण्याच्या पाण्याच्या सुविधांवर स्थानिक जनतेची स्वामित्वाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
हंडामुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी, गावातील वा शहरातील प्रत्येक कुटुंब, अंगणवाडी व शाळेला शुध्द, पुरेशा, सुरक्षित व शाश्वत स्वरुपातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा लागेल.

म्हणजे नक्की काय करणार? कधी करणार. त्याला खर्च कीती येणार, तो पैसा कुठुन येणार? ७ वर्ष अभ्यास केल्यावर इतक्या बेसिक गोष्टी तरी अपेक्षीत नाहीत का?

आणि नंतर मलकापूर चे उदाहरण देण्यात आले आहे. जे आत्ताच्या शासनानेच राबवले आहे. पण तसे काही मनसे ने नाशिक मधे केल्याचे ऐकीवात नाही.
पाण्याला मिटर लावावेत असेही कुठे तरी म्हणले आहे, नाशिक ला कीती मीटर लावले आत्ता पर्यंत. पुण्यात पण कधी मनसे ने ही मागणी केल्याचे ऐकले नाही.

ऋषिकेश's picture

29 Sep 2014 - 3:14 pm | ऋषिकेश

माझे विचार आणि कल इथे सर्वांनाच परिचित आहे. अर्थातच मनसेचा मी काही समर्थक नाही हे माहिती आहेच.
मात्र ब्लु प्रिंट आणि वेबसाईट बघुन माझ्या मनात आलेले विचार मी फेसबुक वरही मांडले आणि इतरत्र मराठी संस्थळांवरही. इथे मांडले तर योग्य त्या व्यक्तीपर्यंत माझा अभिप्राय पोचेल म्हणून चोप्य पस्ते करतोयः
======

बर्‍याच उशीरा का होईना मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्लु प्रिंट सादर केली आहे. संपूर्ण आराखडा इथे वाचता येईल.
मी बर्‍यापैकी मुद्दे वाचले, माझे मतः
१. आतापर्यंत कोणत्याही पक्षाने इतकी स्वच्छ, तपशीलवार व आकडेवारीसह विदा प्रस्तुत करून आपली भुमिका मांडलेली मी बघितलेली नाही. चुकीचे ऐतिहासिक संदर्भ ते हवेत मारलेले तीर ते बाष्कळ दिग्विजयी बडबड प्रचलित असणार्‍या काळात अशी मांडणी, कंटेन्ट सारेच सुखावह आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्याबद्दल माझ्यातर्फे मनःपूर्वक अभिनंदन! अतिशय स्तुत्य पायंडा आहे.
२. अनेक विषयावर मांडलेली मते व त्यासाठी दिलेला विदा वाचनीय आहे. (त्यातील प्रत्येक मताशी सहमती असेलच असे नाही, पण किमान भुमिका मांडलेली आहे)
३. प्रत्येक विषयात मनसेची प्रस्तावित योजना व त्या मागची कारणमिमांसा आहे. प्रत्येक योजना थोर्थोरच आहे असे नव्हे पण बर्‍यापैकी तपशीलात दिली आहे. नुसते बुलेट पॉइंट्स नाहीत.
४. संस्थळाची मांडणी, रंगसंगती वगैरे वेधक व सुंदर आहे. नॅविगेशन सोपे आहे.

एक नव्या व दमदार सुरूवातीसाठी मनसेला मनसे शुभेच्छा!

प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार असल्याने मनसेलाही कमी संधी नाही

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2014 - 10:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश, आपला वरील प्रतिसाद निवडणुकीपूर्व होता. विधानसभेच्या निवडणुकीत मनसेची जी वाताहात झाली ती पाहता लोकांना चकाचक महाराष्ट्र नकोय असं नव्हतं, ब्ल्यु प्रिंटमधे स्वप्नांचे मनोरे होते शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योग, पायाभूत सुविधांचा विकास अशा खुप गोष्टी होत्या पण सर्वात मुख्य एकच गोष्ट होती ती म्हणजे या गोष्टी घेऊन कोण येतंय. लोकांचा राज ठाकरें यांच्यावरील काही सामाजिक प्रश्न तडीस न नेल्यामुळे विश्वास उडाला होता. नवीन मुद्दे राहीले नव्हते. गल्लो गल्ली मनसेचं ’काय खरंय’ अशी भाषा बोलली जात होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही गेल्या काही वर्षात स्थानिक पातळीवर लक्षवेधक कामे केलेली दिसली नाही. नेतृत्वातही तो कस नव्हता. साहेबांनी बोलून सत्ता आणल्या तसं दिवास्वप्न आता कोणत्याच नेतृत्वाने पाहु नये. आणि म्हणुन मला वाटतं ’ब्ल्यु प्रिंट’ ना सुशिक्षित लोकांवर प्रभाव पाडू शकली ना अशिक्षित लोकांना उत्कंठा वाटावी असं काही त्यांच्याकडून घडलं. मनसेला आता एक तर ’हिंदु्त्व’ नै तर शिवसेनेत विलिनीकरण असा काही तरी लोकांच्या मनावर राज्य करणारा पर्याय आणावा लागेल आणि असंच काही झालं तर भविष्यात त्यांना काही संधी आहे, असं वाटतं नै तर मनसेचं काय खरं नाही. सत्तेच्या जवळ जाऊ शकत नाही ना ना सत्तेत असणा-यांवर काही ते प्रभाव टाकू शकतील. आणि हीच अवस्था राहीली तर हा पक्ष असा एकटाच राहील आणि निवडुन येणारे स्वबळावर एकटे दुकटेच निवडून येतील असेच वाटते. भविष्यात काय तरी धाड्सी निर्णयाशिवाय सध्या तरी त्यांच्याकडे कोणताही पर्याय नाही, असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे