'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

Primary tabs

सवंगडी's picture
सवंगडी in राजकारण
26 Sep 2014 - 8:15 am

'ब्ल्यू प्रिंट कि कार्बन प्रिंट ?'

म.न.से. ची तथाकथित ब्ल्यू प्रिंट आली एकदाची.
९ वर्ष काम चालू होत यावर.(म.न.से. स्थापन होऊन ८ वर्ष झाली; तारीख ९ मार्च २००६)
ते असो.

२००९ च्या निवडणुकीत म.न.से.नी 'वचकनामा' जाहीर केला होता,त्यावेळी 'मराठी' हा मुद्दा महत्वाचा होता;आणि "खळ फट्याक" ला साजेसा होता.

कालच्या जाहीरनाम्याच्या कव्हरवरचे ब्रीद वाक्य "हो हे शक्य आहे" आणि निळ्या रंगातला राज ठाकरे यांचा फोटो म्हणजे चक्क बराक ओबामाच्या जाहीरनाम्याची कॉपी आहे.

म.न.से. च्या ब्ल्यू प्रिंट मध्ये मराठी हा मुद्दा अजून आहेच,त्याच बरोबर महाराष्ट्राला स्वायत्तता देऊ असा पण उल्लेख करून मात्र राज साहेबांनी अनेक प्रश्नांचे नवनिर्माण केले आहे.

महाराष्ट्र आत्ता कसा आहे मग ? केंद्रातील सरकारच्या परवानग्या घ्यायला जाणार नाही असा भाषणात उल्लेख !
मागच्या ६ महिन्यापूर्वी तर मोदींचे गुणगान करत होते ना साहेब तुम्ही ?

हे सगळे लोकांना कळायचे नाही का ?
अहो आपले सगळ्यात जास्त उमेदवार मुंबई, पुणे अश्या शहरी भागातले शिकलेले लोक आहेत त्यांना स्वायत्तता कळणार नाही का ?

हे म्हणजे भारतीय संविधानाला सुरुंग लावणे होईल. अहो फेडरल आणि युनियन यांचा मेळ घालून, संविधान बनवले आहे हो, आणि महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आपल्या संकेतस्थळावर पण नाही त्यात शेवटची अपडेट म्हणजे आपला मार्च महिन्यातला दौरा दिसतोय.
महाराष्ट्राच्या विकासात म न से एवढं मागे ?
कशी मतं द्यायची आम्ही ?

प्रतिक्रिया

विलासराव's picture

26 Sep 2014 - 9:01 am | विलासराव

बहुतेक मि ***चा!!!!

श्रीरंग_जोशी's picture

26 Sep 2014 - 9:25 am | श्रीरंग_जोशी

मी त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली.
व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर काही आठवडे किंवा काही महिनेही लागू शकतात.

जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे. व्यवस्थित अभ्यास केल्या खेरीज टोकाचे निष्कर्ष काढणे टाळावे.

दुवा - mnsblueprint.org

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 9:58 am | टवाळ कार्टा

जवळ जवळ आठ साडेआठ वर्षे हे काम चालले आहे.

इतका वेळ घेऊनसुध्धा जर कोणी थोड्या शंका विचारल्या तरी मन्शेवाले अंगावर धाउन जाणार हे नक्की

पुण्याचे वटवाघूळ's picture

26 Sep 2014 - 11:07 am | पुण्याचे वटवाघूळ

आपण लाख अभ्यास करू हो पण मनसेवाल्यांनी खरोखरच ही ब्लूप्रिंट अभ्यास करून बनविली आहे आणि नुसते चोप्य-पस्ते नाही याची काय खात्री आहे? किंबहुना कोणत्याही प्रकारचा अभ्यास करायला मनसेवाले पात्र आहेत हे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या आशावादाला कडक सलाम!! म्हणजे हे ब्लू-प्रिंट काहीही बनवोत--चोप्य-पस्ते कोणीही करू शकतो.स्वतःचीच ब्लू-प्रिंट समजून त्यानुसार काम करायची पात्रता या मनसेवाल्यांची आहे असे मला तरी अजिबात वाटत नाही. आणि हो कोण बोलत आहे यापेक्षा नुसते काय बोलले जात आहे यावरून मी माझी मते ठरवायला स्युडो नक्कीच नाही :)

विलासराव's picture

26 Sep 2014 - 9:36 am | विलासराव

मला घर हवंय म्हणुन मी फक्त "निवारा" वाचुन पाहीला. त्यात त्यांनी लिहिलय सर्व एसआरए प्रकल्प सरकारने राबवावेत. आयडीया चांगली आहे पण केवळ घर मिळेल या आशेवर नवीन लोकांना सरकार बनवु द्यायला किती लोक तयार असतील ते निकालात कळेलच. मी तरी यासाठी तयार नाही, खासकरुन नाशिकचा विचार केल्यावर.

बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 9:54 am | टवाळ कार्टा

बाकी हे मांडायला ९ वर्ष तर प्रत्यक्षात उतरायला किती?? माझ्या हयातीत तर नक्कीच नाही.

+१११११११११११

चौकटराजा's picture

26 Sep 2014 - 9:56 am | चौकटराजा

नव्या तांत्रिक प्रगतीमुळे सार्वमत शक्य आहे व ते मनसे ला मान्य आहे. मला वाटते सार्वमत जर आले तर समाजासमाजात फूट पाडून आरक्षणासारखे निरनिराळे खेळ करण्याच्या प्रव्रुतीला पायबंद बसेल. व खरोखरीच्या हुशार व गरीब
असे दोन्हीही निकष असणार्या सर्व जातीतील मुलाना उत्तम शिक्षण मिळेल. मनसे ने सार्वमताची कल्पना मांडून दाखविली आहे मला वाटते कॉंग्रेस हा पक्ष आणखी २०० वर्षे तरी ही कल्पना स्वीकारणार नाही. ( तो पक्ष २०० वर्षे राहिला तर ).

राज्याला स्वायत्तता देणार …. यावर कोणी बोलाल का ?
आणि श्रीरंगजी तुम्ही संकेतस्थळाला भेट दिली आणि
साडे आठ वर्ष काम चालले (असे समजू ब्लू प्रिंट चे) याचा संबंध स्पष्ट करा. पक्ष सांगतो म्हणजे खरे असते असा निष्कर्ष आपण काढू नका.

मदनबाण's picture

26 Sep 2014 - 1:04 pm | मदनबाण

ह्म्म... काल आर ठाकरे काय सांगतात ते ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी म्हणुन न्यूज चॅनल लावुन बसलो,लाईव्ह टेलिकास्ट सुरु झाली, आर ठाकरे बोलत होते,मधेच टायमिंग बद्धल देखील बोलले ! आणि काही क्षणातच भाजपाने ही टायमिंग उधळुन लावली ! युटी तुटल्याची बातमी दाखवण्यासाठी आर ठाकरे यांची लाईव्ह फीड ऑफ झाली आणि भाजपाची ऑन ! सगळे टिआरपी भाजपा खाउन बसली आणि आर ठाकरेंची ब्लू-प्रींट निळी-का-काळी ते कळलेच नाही.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- काजळमाया

आगाऊ म्हादया......'s picture

10 Oct 2014 - 11:49 am | आगाऊ म्हादया......

मला वाटत म न से चा प्रयत्न स्तुत्य आहे. कारण मी आरोग्य हा विभाग जास्त पाहिला , उगाच च्या उगाच काही लिहिलेला नाहीये ....रेफरन्सेस दिलेले आहेत.
मत देईन कि नाही माहित नाही पण शाबासकी नक्की. al Gore सारख वाढवून इलेक्शन क्याम्पेन करण्यापेक्षा खरच यंत्रणा राबवून एक प्रामाणिक प्रयत्न समोर ठेवलाय.

नितिन शेंडगे's picture

16 Apr 2015 - 8:44 pm | नितिन शेंडगे

मत दयाच !!!