बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४ भाग -१

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in भटकंती
21 Sep 2014 - 11:48 pm

बासुंदीचे जेवण - गणेश दर्शन २०१४

लेख वाचण्यापूर्वी आगाऊ (पूर्वीच्या या अर्थाने ,तसा मी सरळ माणूस आहे) सूचना
१. गणेशाचा मोदकाशी संबंध ,बासुंदी कुठून आली असे प्रश्न विचारू नये.
२. शीर्षक पाहून पाककृती सदरातील लेख इथे का टाकला असा प्रश्न विचारला तर आपल्यास रुचेल असे उत्तर मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नये.
३. हा लेख एका दुर्गाडू ने लिहिला असल्याने गणेश दर्शना व्यतिरिक्त अवांतर का लिहिले असा प्रश्न विचारण्याआधी आपण मिपावर किती अवांतर प्रतिसाद दिले आहेत याची उजळणी करावी.
४. हा लेख नीर-क्षीर मिश्रणातील क्षीर पिणाऱ्या राजहंसासाठी आहे, नीर पाहून कौ-रव करणाऱ्या 'काकां'साठी नाही.
भरपूर झाल्या आग (ला)उ सूचना. लेखाचा श्रीगणेशा करू या. सदर लेख लिहिण्याची कल्पना मला "मामलेदारांच्या पंख्याने" विचारलेल्या प्रश्ना वरील अवांतर प्रतिसादातून सुचली. सुचनांवरून अंदाज आला असेल च कि आपण कोणत्या नगरीतील गणेश दर्शनास जाणार आहोत ते ! पुण्य नगरी म्हणजेच पुणे या शहराचे मला लहानपणापासून आकर्षण आहे. मुंबई -ठाणे जशी जुळी शहरे तशी पुणे - पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालीकांत गणली जाते. पण गणेशोत्सवाच्या बाबतीत मात्र पुण्या इतकी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे गणेश दर्शन दौरा TO -DO list मध्ये होताच. तसेच यंदा २ वीकांत एकाच गणेशोत्सवात मिळाल्याने कुठल्या विकांतावर मोहीम काढावी याचा विचार चालू होता. दीड दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी शनिवार होता आणि त्या दिवशी आमच्या ढोल पथकाचे वादन कार्यक्रम होता। (सुपारी म्हणत नाही, कारण ढोल पथकातील सर्व हौशी कलाकार असतात काहीवेळेस पदरमोड सुद्धा करावी लागते ) कार्यक्रम सुद्धा वेळेत उरकल्याने ६. वाजता मुंबईहून प्रयाण करण्याचा विचार होता. परंतु, पुण्यातील भावाकडून माहिती मिळाली कि पहिले चार दिवस देखावे १०. ० च्या आत बंद होतात. त्यामुळे जाणे टाळले. तेव्हाच मनी ठरवले कि पुढच्या शनिवारी शनिवार वाड्याला प्रदक्षिणा मारणे ! देवळाला प्रदक्षिणा माहित असेल पण वाड्याला का ? याचे उत्तर आहे जर आपण दुचाकीवरून गणेश दर्शन करणार असाल तर कसब्यातून मंडईकडे येतांना वळविलेल्या वाहतुकीमुळे आपली आपोआपच प्रदक्षिणा होइल.

दिनांक ६/९/१४ - वेळ सकाळी ४. १५ - सकाळी इंद्रायणी (दुर्गान्डूंची लाडकी गाडी. जसे जुन्या पिढीतील लोकांची "डेक्कन क्वीन ", तर आताच्या पिढीची इंटरसिटी.) पकडण्याचा बेत होता. इंद्रायणी ५.४० ला छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटते.इंद्रायणी एक्स्प्रेसला लोणावळा -पुणे लोकल संलग्न असते त्यामुळे इंद्रायणी थोडी मागे पुढे झाली तरी आपली लोकल चुकत नाही. लोणावळा - कामशेत हा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला पट्टा आहे असे माझे वैयक्तिक मत . धरण ,किल्ले इ . या सर्वांची इथे उधळण आहे. मळवली हे पुण्याकडील दिशेने पहिले स्थानक. पुणे कडे मार्गक्रमण करत असता उजव्या दरवाज्याजवळ उभे राहावे. मळवली स्थानक अगोदर एक दुर्ग जोडगोळी आपल्या स्वागतासाठी उभी असते. लोहगड -विसापूर दोन्ही किल्ले म्हणजे दुर्गान्डू चा शिशु वर्ग.धुके आणि धावत्या लोकलमधून जमेल तितका त्यांना टिपण्याचा प्रयत्न केला.
लोहगड विसापूर
लोहगड- विसापूर डोळ्यात साठवून होईस्तोपर्यंत कामशेत स्थानक येते.कामशेत हा तुंग- तीकोण्यासाठी मुंबईकरांचा बेस पोईन्ट. येथील फलाट क्र. १ च्या मागे नदी/झरा वाहतो व त्याचे पाणीसुद्धा बरेच स्वछ दिसते. पावसाळ्यात येथे मासेमारीसुद्धा चालते. गाडी पुढे मार्गक्रमण करते नि एक भव्य मूर्ती आपणास दृष्टीस पडते.आपल्याला कोल्हापुरातील चिन्मय गणाधीश माहित असेलच! त्यासदृश गणेशाची एक भव्य मूर्ती आपणास बेगडेवाडी स्थानका जवळ दिसेल.
पुणे - लोणावळा या लोकलचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानक फलाट कोणत्या बाजूस येणार याचे टेन्शन नाही. कारण सगळा निवांत कारभार असल्याने येथे जलद आणि संथ लोकल असला प्रकार नाही.बहुधा सर्वत्र दोनच फलाट आहेत . पुण्याकडे जात असता कायम डावी बाजू धरावी नि पुण्याहून येत असता उलट बाजू.त्यामुळे समान घेऊन दरवाज्याजवळ ग्यानबा -तुकाराम होत नाही( हे एका मुंबईकराचे निरीक्षण आहे. फलाट कुठच्या दिशेस येतो याने पुणेकरांना काही फरक पडत नाही,पण मुंबईकरांना पडतो.) अपवाद फक्त बेगडेवाडी स्थानकाचा! येथे फलाट क्र. १ व २ मध्ये जवळपास ३ मीटरचा उंचीचा फरक आहे. येथे फलाट क्र. १ उजव्या बाजूस येतो.
आकुर्डीतील वैयक्तिक काम उरकून मी "म.न.पा." ला जाण्यासाठी संध्या . ५. च्या सुमारास बस पकडली. मनपा आणि विद्यापीठ असे मराठी शब्द पुणेकर सहजपणे वापरतात. मुंबईत VT ला BMC कार्यालयासमोर जरी कोणास मनपा कुठे असे विचारले तरी माहित नाही असे उत्तर मिळेल. असो गणेशोत्सवात मनपा नि शनिवार वाड्याच्या परिसरात बस ने प्रवास का करू नये याचा चांगलाच मला प्रत्यय आला. १ किमी चे अंतर कापावयास ३५- ४० मिनिटे लागतात. शेवटी वैतागून ११ नंबरची बस सुरु केली. शिवाजी नगर बस स्थानकाजवळ माझा चुलत भाऊ मला घ्यावयास येणार होता व येथून सुरु झाली खर्या अर्थाने गणेश दर्शन यात्रा!
चिमण्या गणपतीजवळील नात्यातील घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही प्रथम "वन्दे मातरम फाउन्देशन " सार्वजनिक मंडळाच्या गणपतीस भेट दिली. पुण्यात अनेक ठिकाणी सांगीतिक रोषणाई (musical lighting) असते. परंतु येथे आपणास संगीताच्या तालावर थुई थुई नाचणारे कारंजे दृष्टीक्षेपास पडेल.

१. वन्दे मातरम फाउन्देशन कारंजे
fountain pic

ganpati pic
यानंतर खुद्द चिमण्या गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही करवीर नगरीत पोहोचलो ! टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महालक्ष्मी मंदिराचा सुंदर देखावा साकारला होता. आणि दुधात साखर म्हणजे आम्ही ज्या वेळेस पोहोचलो त्यावेळी येथे एका ढोल पथकाचा वादन कार्यक्रम होता.
२. टिळक रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
tilak road

shivvardhan

वादनाने कर्ण तृप्त झाल्यावर आम्ही दोन हत्त्ती मित्र मंडळाकडे मोर्चा वळविला. येथे प्रवेश द्वारात मंडळाच्या नावाप्रमाणेच दोन हत्ती उभे होते. या हत्तीच्या डोळ्यातील भाव इतके खरे रेखाटले होते कि त्याचा छायाचित्र घेण्याचा मोह मी आवरू शकलो नाही.
३. हत्ती
elephant
या मंडळाने साधी पण अत्यंत सुंदर अशी सजावट केली होती. काचेचे झुंबर आणि इतर सजावटीच्या जोडीस उत्कृष्ट प्रकाश रचनेने सजावटीची एकूणच शोभा द्विगुणीत झाली होती.

४. गणपती व मंडळाची रांगोळी
tilak road

rangoli
टिळक रोड ओंकार मित्र मंडळाने सांगीतिक रोषणाई साकारली होती. माझा कॅमेरा (नि माझे कॅमेऱ्याचे ज्ञान ) हा यथातथा असल्याने सांगीतिक रोषणाई बरोबर गणपतीचा फोटो टिपणे माझ्यासाठी फार अवघड गोष्ट होती. त्यामुळे माझ्याबरोबरील तिघांचे patience मात्र पणास लागले. :)

यापुढील गणपती होता तो शिवांजली मित्र मंडळाचा - या गणपतीची सांगीतिक रोषणाई टिपण्यास मी यशस्वी झालो त्याचा हा पुरावा -
lighting
गणेशोत्सवातील मिरवणूक हा काहींच्या जिव्हाळ्याचा तर काहींच्या टिकेचा विषय.काळापरत्वे मिरवणुकीत झालेल्या बदलावर भाष्य करणारा देखावा "हत्ती गणपती" मंडळाने साकारला होता. फिरते नेपत्थ्य आपण नाटकात पहिले असेलच, त्याप्रमाणे , मिरवणूक काल (बैलगाडी नि लेझीम ) नि मिरवणूक आज (DJ चा धांगड धिंगा) असे फिरते नेपत्थ्य साकारण्यात आले होते. हा देखावा जवळपास ६-७ मिनिटांचा होता. मला व्यक्तीशः चाल्चीत्रांचे इतके आकर्षण नाही, परंतु आमचे बंधू याबाबतीत फार उत्साही त्यामुळे त्याच्याजोडीने हळूहळू पूर्ण चलचित्र पाहण्याची गोडी मला लागली.

विश्वास मित्र मंडळाचा पारंपारिक गणपती पाहून मला गिरगावातील ठाकुरद्वार जवळील एक- दोन लहान गल्ल्यांतील गणपतीची आठवण झाली. अत्यंत साध्या पण रेखीव अश्या लाकडी मखरात मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.
६ विश्वास मित्र मंडळ व गणेशासमोर रेखाटलेली रांगोळी
1
2
3
यापुढचा मुक्काम होता तो पेरु गेट चौक मित्र मंडळ. येथील चलचित्र हे भारतीयाचे आत्मकथन होते. सामाजिक भान ठेवून बनवलेले चलचित्र दाखल घेण्याजोगे होते.येथे बाप्पांची कृपा मजवर झाली व येथील एका कार्यकर्त्याने या मंडळाच्या गणपतीचे एक रेखीव चित्र मला भेट म्हणून दिले.

७ पेरु गेट चौक मित्र मंडळ
peru

यापुढील देखावा पहिला तो शनिवार वाड्याचा इतिहास सांगणारा होता. शनिवार वाद्याबद्दल तशी मला विशेष माहिती नव्हती पण या देखाव्यातून कळले कि शनिवारवाडा हा सात मजली होता आणि १९२८ च्या आगीत त्याचे नुकसान होऊन तो भग्नावस्थेत पडला. हा देखावा सदर केला होता निंबाळकर तालीम मित्र मंडळाने.
८. निंबाळकर तालीम मित्र मंडळ
talim

यापुढील गणपती होता तो प्रसिद्ध असा नातू बागेचा गणपती. हा गणपती भर रस्त्यात आहे आणि तो तो पण बाजीराव रस्त्यावर. या गणपतीची सांगीतिक रोषणाई चे क्या कहने ! अत्यंत नेत्रदीपक अशी रोषणाई या मंडळाची असते. व गणपतीपुढे जवळपास १०० फुटापर्यंत तरी लोकांची फक्त रोषणाई पाहण्याकरिता गर्दी असते. जो कोणी गाण्याच्या तालावर पदलालित्य करतांना दिसेल त्यास महिला पोलीस दंड ठोठावीत नव्हे तर दांडू मारीत. माझ्यासमोर एका दोघांना प्रसाद मिळालेला मी पाहिलंय. रेगे फेम "शिट्टी वाजली " आणि तेजाब मधील "१,२,३,४… ६" या गाण्यावरील रोषणाई तर अप्रतिम होती.
डिस्को लायटिंग असल्यामुळे नि गर्दीमुळे फोटो काढतांना माझी बरीच हालत झाली.
९. नातूबाग
natu bag
विश्वास मित्र मंडळाचा पारंपारिक गणपती पाहून मला गिरगावातील ठाकुरद्वार जवळील एक- दोन लहान गल्ल्यांतील गणपतीची आठवण झाली. अत्यंत साध्या पण रेखीव अश्या लाकडी मखरात मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.
६ विश्वास मित्र मंडळ व गणेशासमोर रेखाटलेली रांगोळी
vishwas 1
v2
यापुढचा मुक्काम होता तो पेरु गेट चौक मित्र मंडळ. येथील चलचित्र हे भारतीयाचे आत्मकथन होते. सामाजिक भान ठेवून बनवलेले चलचित्र दाखल घेण्याजोगे होते.येथे बाप्पांची कृपा मजवर झाली व येथील एका कार्यकर्त्याने या मंडळाच्या गणपतीचे एक रेखीव चित्र मला भेट म्हणून दिले.

७ पेरु गेट चौक मित्र मंडळ
peru

यापुढील देखावा पहिला तो शनिवार वाड्याचा इतिहास सांगणारा होता. शनिवार वाद्याबद्दल तशी मला विशेष माहिती नव्हती पण या देखाव्यातून कळले कि शनिवारवाडा हा सात मजली होता आणि १९२८ च्या आगीत त्याचे नुकसान होऊन तो भग्नावस्थेत पडला. हा देखावा सदर केला होता निंबाळकर तालीम मित्र मंडळाने.
८. निंबाळकर तालीम मित्र मंडळ
nimbalkar
(क्रमशः)

प्रतिक्रिया

कृपा झाली. बासुंदी कधी येतेय?

दिपक.कुवेत's picture

22 Sep 2014 - 12:49 pm | दिपक.कुवेत

सगळेच अस्पष्ट आलेत. विड्थ कमी करुन क्लीअर येतील का?

एस's picture

22 Sep 2014 - 1:03 pm | एस

मलाही पिक्सेलेट झाल्यासारखे दिसताहेत. तसेच विश्वास मित्र मंडळाच्या लाकडी मखराचा वगैरे भाग खाली परत रिपीट झालाय.

बाकी पुण्यासारखी श्रीमंती कुठल्याही शहरात नाही हे आवडले! :-)

सूड's picture

22 Sep 2014 - 4:47 pm | सूड

ते ठीकाय, आधी "दुर्गान्डूंची लाडकी गाडी." हे बदलून घ्या आणि अनुस्वार योग्य ठिकाणी देता येत नसेल तर तो शब्द वापरणं थांबवा. अर्थ बदलतोय!!

>>म्हणजे दुर्गान्डू चा शिशु वर्ग

झालंच तर हे पण बदलायला हवंय!!

विक्सभौ, बाकी "दुर्गाडू" हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे, त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

>>त्याचा अर्थ आणि व्युत्पत्ती हेही जाताजाता सांगितल्यास उपकार होतील.

+१८५७

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Sep 2014 - 9:13 pm | माम्लेदारचा पन्खा

माझ्या आठवणी ताज्या केल्यात..
माझी दर वर्षी फेरी ठरलेली आहेच....
गणपती बाप्पा मोरया !

प्रसाद देणारे देव मला फारच आवडतात .सत्यनारायणाचा प्रसाद महात्म्य सर्वांना माहितच आहे त्यामुळे सर्व संकटे दूर होतात. थोडक्यात सांगायचे तर बासुंदी लवकर पाठवा.

पैसा's picture

23 Sep 2014 - 11:21 am | पैसा

लिखाण आवडलं.