भविष्य......

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
3 Sep 2014 - 11:50 pm
गाभा: 

"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही"

"कारे"

"उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी."

"बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे."

"तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?"

"ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद."

--------

"काय रे! तू तर येणार नाही म्हणालास.मग."

"अरे नेमकी ती मंडळी आलीच नाहीत आणि आज नेमका त्या आय.पी.एल.च्या मॅचच्या शहरावर पावूस कोसळला.बोंबला तिच्यायला आणि हे काय्?तू अजून सुरुवात नाही केलीस? मग हे २ ग्लास आणि बाटली कशाला?"

"जावू दे रे. आपण काय १ नं. ज्योतिषी नाय. पण तू यावेस आणि आपण मस्त गप्पा हाणाव्या असे मनापासून वाटत होते.शेवटी तुमच्या त्या ज्योतिषा पेक्षा आमची मनाची ताकद मोठी आहे."

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

4 Sep 2014 - 5:07 am | खटपट्या

आवडलं !!!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Sep 2014 - 5:49 am | अत्रुप्त आत्मा

४००+++ :-D

विटेकर's picture

4 Sep 2014 - 12:45 pm | विटेकर

मुवि शेट..

अजून एक ग्लास मांडा... येतोच.
आणि चकण्याचे काय ?

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2014 - 1:30 pm | प्रभाकर पेठकर

>>>>चकण्याचे काय ?

त्यालाही बोलवा. येईल की तो.

असंका's picture

4 Sep 2014 - 2:50 pm | असंका

:-))

टवाळ कार्टा's picture

4 Sep 2014 - 7:58 pm | टवाळ कार्टा

=))

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 8:58 pm | प्यारे१

__/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2014 - 9:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो ना ! एक नंबरचा बेवडा आहे... त्याला बोलावणे लागत नाही ! =)) . =)) . =))

समीरसूर's picture

5 Sep 2014 - 9:50 am | समीरसूर

'पाहतो भजी, मागतो जिलेबी' या न्यायाने चकणा दुसर्‍याच घरात शिरला तर पंचाईत. :-)

आतिवास's picture

4 Sep 2014 - 1:30 pm | आतिवास

:-)
कथा आवडली.

लेखनविषय .....काथ्थाकूट........
बाकी विचार मस्तय.

दिपक.कुवेत's picture

4 Sep 2014 - 2:23 pm | दिपक.कुवेत

मग कधी बसायचं बोला?

समीरसूर's picture

4 Sep 2014 - 2:57 pm | समीरसूर

पंच सही होता. मजा आली. :-) अजून येऊ द्या...

बाकी ज्योतिष वगैरे थोतांडच आहे सगळं हे खरं. मी स्वतः अनुभव घेतला आहे.

ही कथा जीमो शैलीत लिहिली तर अजून मजा येईल असे सुचवतो. ;)

शिद's picture

4 Sep 2014 - 3:02 pm | शिद

*drinks*

सर्वसाक्षी's picture

4 Sep 2014 - 5:36 pm | सर्वसाक्षी

सादर प्रणाम

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2014 - 6:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी !

पैसा's picture

4 Sep 2014 - 10:48 pm | पैसा

तुम्हाला ज्योतिषाचा धंदा करायला हरकत नाय!

मुक्त विहारि's picture

5 Sep 2014 - 11:57 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद देणार्‍यांचे आभार...

विटेकर's picture

8 Sep 2014 - 12:49 pm | विटेकर

बहोत नाइन्साफी है ये !
फक्त आभार ? म्हन्जे आमचा ग्लास तुम्ही मांडनार नाही तर ?
पायजेल तर आमचा चकणा आमी घिउन येवू

मुक्त विहारि's picture

8 Sep 2014 - 2:53 pm | मुक्त विहारि

आभार फक्त इथे..

साग्रसंगीत बैठक पुण्याला आलो की जमवूच.....