माझ्या माहितीतील एका गृहस्थाने I Biz Infosys Private Limited या कंपनीचे कॉम्प्युटरवर फॉर्म भरण्याचे काम घेतले आहे. पार्ट टाईम जॉब म्हणून !
कंपनीचे ऑफीस पुण्यात आहे.
स्कीम अशी आहे.
पहील्यांदा २१५० रुपये भरून नोंद करावी लागते.
मग कंपनी जुजबी ट्रेनिंग देते. दोन प्रकारचे फॉर्म भरायचे आहेत. स्मॉल आणि मेडीयम. १००० स्मॉल फॉर्म भरले तर ३ रुपये एका फॉर्मसाठी.
१००० मेडीयम फॉर्म भरले तर ६ रुपये एका फॉर्मसाठी. असे हजाराच्या पटीत भरले तर जास्त इन्कम. फॉर्म फिलींग घरी बसून स्वतःच्या काँप्युटर वर करायचे आहे.
१० महीन्यांनी काँट्रॅक्ट रीन्यु (?) करता येते. म्हणजे परत ५०० रुपये भरायचे. मग ते काम पुरवणे कंटीन्यु करतात.
कुणाला काही असल्या जॉब बद्द्ल तसेच वरील कंपनीबद्दल माहीती असेल तर जरूर शेअर करणे.
हे फ्रॉड असावे. २१५० रुपये भरून नोंद करावी लागते हाच इथे ट्रॅप दिसतो. फॉर्म भरल्यानंतर पैसे मिळतील की नाही शंकाच आहे.
प्रतिक्रिया
2 Sep 2014 - 12:11 pm | जेपी
earn from home .
fraud आहे.
2 Sep 2014 - 12:12 pm | जेपी
मी पयला हे राहल.
2 Sep 2014 - 12:17 pm | सविता००१
ही लिंक सापडली. http://www.complaintsaboutbusiness.in/i-biz-infosys-such-a-fake-company/
अजुनही आहेत.पण मी बाकीच्या वाचल्या नाहीत. ही एकच पुरेशी वाटली.मागे एका मैत्रिणीने सांगितले होते की या साइट्स वर सकारात्मक लिहिणारे महाभाग पण याच कंपन्यांचे चेले असतात. त्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय नोंदणी रक्कम भरूच नये.
3 Sep 2014 - 3:30 pm | बबन ताम्बे
इथे ब-याच लोकांनी ही कंपनी FAKE आहे असे लिहीले आहे. काही लोकांनी पैसे पण गमावले आहेत.
http://www.complaintsaboutbusiness.in/i-biz-infosys-formerly-known-as-i-...
2 Sep 2014 - 12:32 pm | प्रसाद१९७१
नक्कीच फ्रॉड. काम देण्यासाठी आधी पैसे मागणे म्हणजे नक्कीच फ्रॉड.
त्यांना सांगा २१५० रुपये मी केलेल्या कामाच्या मोबदल्यातुन कापुन घ्या.
2 Sep 2014 - 1:33 pm | चौथा कोनाडा
फ्रॉडच वाटतेय. या बाबतीत आमचा अनुभव शून्य आहे. अस्मादिक "थंड" प्रवृतीचे असल्यामुळे आता पर्यंत पुढ्यात आलेल्या कसल्याच अमिषाला बळी पडलेलो नाहीय. आता तुम्हीच तुमच्या माहितीतील त्या गृहस्थाला एक एक अनुभव इथे टाकायला सांगा (म्हणजे तुम्हीच त्याला विचारून इथे टाका) म्हंजे आम्हाला स्टार्ट टू एन्ड फ्रॉड आहे का काय ते कळेल.
2 Sep 2014 - 3:28 pm | बबन ताम्बे
पण त्यासाठी थांबावे लागेल . :-)
2 Sep 2014 - 5:20 pm | vikramaditya
गोष्टीत विनासायास पैसे मिळण्याची जाहिरात करत असेल तर फसवणुक नक्की.
ह्या जगात " there are no free lunches".
कमी कष्ट आणि भरपुर पैसा हे समीकरणच चुकिचे आहे. नाहीतर जगात सर्वांनी अशी सोप्पी कामे केली असती.
2 Sep 2014 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी
दोन दशकांपूर्वी या प्रकारचेच सापळे निमशहरी व ग्रामीण भागात पाहिले आहे.
उत्तर प्रदेश वा पश्चिम बंगालमधली कसलीशी अल्पबचत कंपनी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी छोटेखानी कार्यालय सुरू करायची. त्या गावातल्या व आजुबाजुच्या खेड्यांमधील लोकांना आकर्षक व्याजदराचे आमीष दाखवणार्या योजना सुरू करायचे. सुरुवातीला काही लोकांना चांगला परतावाही द्यायचे. कार्यालयातील कारकुनी कामे करण्याकरीता उमेदवारांच्या मुलाखती घ्यायचे. निवडलेल्या उमेदवारांकडून १०-१५ हजार रुपये अनामत रक्कम घेऊन सुरुवातीचे काही महिने नाममात्र पगार द्यायचे. यास ते प्रशिक्षणाचा काळ म्हणत. चांगले काम करून दाखवल्यास या कालावधीनंतर चांगल्या पगाराची नोकरी लागेल असे आश्वासन दिले जायचे. ज्या करारपत्रावर सही घेतली जायची त्यात एक अट असायची की कंपनीबद्दल कुठलाही न्यायालयिन खटला केवळ उ.प्र. किंवा प.ब. च्या अमुक अमुक शहरातच दाखल करता येईल.
काही महिन्यांतच बाहेरगावहून आलेले कंपनीचे लोक कार्यालयाला टाळे ठोकून पोबारा करत असत.
काळ बदलला आता त्याच गोष्टी ऑनलाइन...
3 Sep 2014 - 11:12 pm | पिंगू
ऑनलाईन फॉर्म फिलींग जॉब हा निव्वळ ट्रॅप आहे. तेव्हा अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका.