फुलझाडे कशी लावावीत?

लबाड मुलगा's picture
लबाड मुलगा in काथ्याकूट
3 Aug 2008 - 3:41 pm
गाभा: 

नर्सरी किंवा बागेची साहित्य (रोपे वगैरे) न आणता कमीत कमी किंमतीत (फुकटातच म्हणा ना)
फुलझाडे वगैरे लावुन बाग कशी सजवावी‍?

प्रतिक्रिया

II राजे II's picture

3 Aug 2008 - 6:54 pm | II राजे II (not verified)

>>>फुलझाडे वगैरे लावुन बाग कशी सजवावी‍?

मी कशी सजवली हे सांगतो...

जेथे जे फुल... झाड आवडेल त्याचे एक एक रोपटे कोठून ही विकत / फुकट / रानातून / जंगलातून आणले व बागेत लावले !

व फुलबाग संगोपनाची खुप पुस्तके बाझारात भेटतात तेव्हा त्यातील एक आणुन खत व ईतर माहीती गोळा केली... बस्स !!

झाली बाग तयार !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सैरंध्री's picture

4 Aug 2008 - 2:35 am | सैरंध्री

झेंडू ची रोपे स्वस्त मिळतात. २-३ रोपे आणून लावायची. मग जी फुले येतात ती वाळली की त्याच्या पाकळ्या आणि आतील तंतू वगैरे वेगळे करून परत मातीत घालायचे. त्यांचीही रोपे तयार होतात. गुलाबाची ही झाडे बराच काळ टिकतात. त्यामुळे एकदा रोपांवर खर्च करायचा. मग खत , पाणी , व्यवस्थित निगराणी केली की झाड बरेच वर्ष छान फुले देते. जास्वंद ही एकदा व्यवस्थित लावली की खूप मोठी वाढू शकते आणि फुले ही भरगोस व मोठमोठी येतात.
सैरंध्री