साहीत्यः
गरज आण आळशीपणा.
घरात जे उपलब्द्ध होते ते.
मोकळा॑ शिजवुन घेतलेला भात.
घरी बनवलेले गावरान तुप.
मोहरी.
हिरवी मिरची(एकच मिळाली).
कढीपत्ता.
अर्धा कांदा, अर्धा टोमॅटो बारीक चिरुन.
नासपती,पेरु आनी थोडे डाळींबाचे दाणे.
सजावटीसाठी काजु.
पाककृती: मी लालबागला रहातो. गणपतीच्या धांदलीमुळे घरातुन खाली उतरायचा कंटाळा आल्याने घरातच काही बनवावे असे मनाने घेतले. जे असेल त्यातच भागवायचे होते. वरील साहित्य मिळाले.बनवल्यावर फोटो काढावा वाट्ला मग पुढे इथे लिहायचे ठरवले. आमच्या मंडळात खासदार्,आमदार्,नगरसेवक सकाळीच हजेरी लावुन गेलेत. रंगारी बद़क चाळीच्या गणपतीचे हे ७५ वे वर्ष आहे त्यामुळे उत्सव जोरात आहे. असो. त्यामुळेच हा प्रपंच सुचलाय खरतर.असो.
घरी बनवलेल्या गावरान तुपामधे थोडी मोहरी,हळद्,मिरची,कढीपत्ता टाकुन मग कांदा परतुन घेतला. थोड्या वेळाने टोमॅटो घालुन परतले. मग नासपती,पेरु घालुन झाकण ठेवले. ३-४ मिनिटानंतर डाळींबाचे दाणे घातले. मग भात घालुन परतले, थोडेसे मीठ चवीपुरते घातले. मग घरातील ईतर खाद्यपदार्थांबरोबर चापला आण लिहायला बसलो.
प्रतिक्रिया
29 Aug 2014 - 4:02 pm | प्रभाकर पेठकर
विलासराव,
'आळशी लोकांचा' म्हणण्यापेक्षा 'असाही एक पुलाव' हे शीर्षक जास्त शोभून दिसलं असतं. खरोखरची आळशी माणसे एव्हढेही करीत नाहित. त्यांचा आवडता.... 'खयाली पुलाव'. असो.
पुलाव नक्कीच चवदार झाला असेल. पण शेवटच्या छायाचित्रातील सजावटीतील पदार्थांचा परस्पर संबंध सजावटीपेक्षा पोटभरूपणाकडे जास्त झुकलेला आहे.
29 Aug 2014 - 4:04 pm | विलासराव
सहमत.
29 Aug 2014 - 4:02 pm | आदूबाळ
रंगारी बदक चाळीला हे नाव का पडलं?
29 Aug 2014 - 4:05 pm | विलासराव
मी येथे भाडेकरु आहे दिड वर्षांपासुन. मलाही ते माहीत नाही.
29 Aug 2014 - 9:55 pm | प्रभाकर पेठकर
चाळ मालकाचे नाव रंगारी होते म्हणून रंगारी म्हणायचे, आज चाळ १ ते ५ यात ख्रिश्चन, मुस्लिम, इज्राईल, ज्यू लोक राहत होते, ६ नंबर पासून १६ नंबर पर्यंत मराठी भाषिक लोक होते, प्रत्येक चाळीत ३६ खोल्या होत्या आणि एक सार्वजनिक नळ होता. ख्रिश्चन लोक बदक पाळायचे. बैठ्या चाळी असताना संध्याकाळी फुटपाथवर सगळी बदंक फिरत आसायची, त्यामुळे लोक या चाळीला बदक चाळी म्हणायला लागले.
29 Aug 2014 - 10:13 pm | विलासराव
चला आता मीही सांगु शकतो. आता चाळ म्हणतात पण चाळ नाही राहीली. आणि अर्थातच बदकंही.
30 Aug 2014 - 4:59 pm | पोटे
बदके आता वाळकेश्वरला असतात
29 Aug 2014 - 11:51 pm | रेवती
असे आहे तर! माहितीबद्दल धन्यवाद.
29 Aug 2014 - 4:38 pm | प्रसाद गोडबोले
शेवटचे चित्र पाहुन ह्याला पुलाव पेक्षा मिसळ हे नाव जास्त शोभुन दिसेल असे सुचित करतो =))
29 Aug 2014 - 4:48 pm | प्यारे१
छान बॅचलर पाकृ.
नासपती म्हणजे काय पण?
29 Aug 2014 - 4:55 pm | विलासराव
नासपती हे पेरसारखं दिसनारे एक फळ आहे बॉ.
29 Aug 2014 - 4:55 pm | शिद
29 Aug 2014 - 7:20 pm | प्यारे१
धन्स.
29 Aug 2014 - 5:07 pm | दिपक.कुवेत
पुलावात आधीच नासपती आणि पेरु घालुनहि वरती जोडिला तीळगुळ आणि बर्फि घेतली आहे??? तोंड फारच गोड गोड होईल....
29 Aug 2014 - 5:21 pm | विलासराव
फोटोत दिसतय आहे त्यापेक्षा जास्त गोड खाल्लय.
आवडतं आपल्याला गोडधोड.
29 Aug 2014 - 5:09 pm | दिपक.कुवेत
हे नाव जास्त शोभुन दिसेल. हरकत नसेल तर संमंला सांगुन बदल करुन घ्या.
29 Aug 2014 - 5:18 pm | विलासराव
माझी काहीही हरकत नाही.
आता तो पोटातही विसावलाय. नावात काय ठेवलंय.
29 Aug 2014 - 6:28 pm | पिंगू
विलास राव कधी आम्हीपण येऊ खाण्याची देवाणघेवाण करायला..
29 Aug 2014 - 8:14 pm | विलासराव
या, पण लवकर. एकदोन दिवसात लालबाग सोडाव लागेल असं दिसतय. आत्ताच खाली जाउन आलोय. काय ती गर्दी, काय तो उत्साह लोकांचा. लहान लहान मुलांना घेउन लालबागच्या राजाच्या दर्शनाला रांगेत उभ्या रहानार्या आयांच्या धाडसाला सलाम करुन आलोय. दर्शन घेउ बाहेर पडणार्या लोकांचे चेहरे पाहुन मी धन्य झालो. आता राजाच्या दर्शनाची गरज नाही उरली. आधील लाल रंगात रंगलेले आमचे लालबाग आज विवीध रंगांनी फुलुन गेलेय नुसते. आलात तर भेटुच.
31 Aug 2014 - 10:31 am | पिंगू
निवांत वेळ काढून भेटू. कोलाहलापासून दूर कुठे तरी भटकंती म्हणून जाऊ.
31 Aug 2014 - 8:23 pm | विलासराव
नक्कीच. २ आन ६ तारखेला आहे मी पुण्यात.
29 Aug 2014 - 7:19 pm | सुहास झेले
व्वा व्वा... मस्तच :)
29 Aug 2014 - 7:22 pm | रेवती
फोटू आवडला हो विरा!
रंगारी बदक हे नाव वाचून हसतीये.
29 Aug 2014 - 7:40 pm | आदूबाळ
अहो लई फ्यामस असतो इथला "लाडका लंबोदर". मध्य मुंबै / गिरणगावच्या टाप १० मध्ये नक्कीच असेल.
फक्त चाळीला असं नाव का हे तीनचार जणांना विचारूनही समजलं नाहीये.
29 Aug 2014 - 8:16 pm | विलासराव
खरच लई फेमस आहे हो. पण नाव असे का हे मलाही माहीत नाही. आणी जाणुन घ्यायची इच्छाही नाही.रंगारी बदक तर रंगारी बदक. काय फरक पडतो?
29 Aug 2014 - 9:58 pm | दशानन
वा वा वा, ही कला देखील आहे का तुमच्याकडे. मग आपण कला बंधू आहोत तर... ;)
या कधीतरी आमच्या घरी, मी केलेले जेवण पोटभर जेवण्यासाठी.. "दाखवतो मज्जा" :P
29 Aug 2014 - 10:09 pm | विलासराव
जरुर. तुम्हीही मौका द्या मला सेवेचा.
29 Aug 2014 - 10:23 pm | मुक्त विहारि
झक्कास...
30 Aug 2014 - 8:54 pm | माझीही शॅम्पेन
अरे वाह मस्त आहे की ,
कधी कधी कितीही थकलो तरी आपण केलेल खण्यात एक समाधान असत !!!
30 Aug 2014 - 10:42 pm | कवितानागेश
गमतीदार दिसतेय पाकृ.
31 Aug 2014 - 11:50 am | पोटे
फोटु आता दिसला. स्वयपाकघरात काही फोटो लावायचे आहेत. तुमची निवड केलेली आहे.
र्ऑयल्टी दिलि जाणार नाही.
3 Sep 2014 - 12:22 am | कवितानागेश
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या.शिवाय सफरचंद, डाळिंब, आणि फ्रीझरमध्ये सापडलेलं थोडं किसलेलं चीज असं घालून. :)

बघा.
3 Sep 2014 - 1:04 am | श्रीरंग_जोशी
मूळ पाकृ अन प्रतिक्रियात्मक पाकृ दोन्ही आवडल्या.
प्रतिक्रिया न देण्याचा आळशीपणा दूर सारला :-).
3 Sep 2014 - 10:23 pm | सूड
सफरचंद?? *nea*
4 Sep 2014 - 3:10 am | प्रभाकर पेठकर
'काश्मिरी पुलाव' नांवाचा जो पदार्थ उपहारगृहातून मिळतो त्यात सफरचंद, द्राक्ष, पीच वगैरे वगैरे फळं असतात.
10 Sep 2014 - 11:46 pm | विलासराव
माझ्याकडे आळशीपणा ऑलरेडी भरपूर आहे. पण आळशीपणा करुन शिवाय पुलावही करता येतो, या विलासरावांच्या विचारानी इनस्पायर होउन मीपण आज असाच पुलाव केला. असलेल्या सगळ्या भाज्या ढकलल्या.
आपण एक्सेंज करुया का? मला तर तुमचा पुलावच जास्त आवड्ला.
3 Sep 2014 - 10:09 pm | पैसा
आळशी म्हणा, काही म्हणा, भात 'बरा' दिसतोय (कोंकणी भाषेतला बरा). त्यात काहीही टाकता येईल हे महत्त्वाचे. उरल्यासुरल्या भाज्या वापरता येतील.
मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत!
10 Sep 2014 - 11:49 pm | विलासराव
मात्र त्याच्याबरोबर जे काही खायला घेतलंत ते जेवणात नाय ब्वा आवडत!
खरतर(सांगायचं नव्ह्तं पण सांगतो) राईस थोडाच होता. मग बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागल्या. तसंही मला खाण्यापिण्याचं कुठलही पथ्य नाही.
11 Sep 2014 - 1:00 am | प्रभाकर पेठकर
>>>>तसंही मला खाण्यापिण्याचं कुठलही पथ्य नाही.
हे वाक्य वाचून डोळ्यात पाणी तरळलं.