मला एक जुनं गाणं आठवतं.
"आम्ही दैवाचे दैवाचे
शेतकरी रे
करूं काम,स्मरूं नाम
मुखी नाम हरी रे"
त्याच कल्पनेने
"आम्ही काव्याचे काव्याचे
काव्यकरी रे
लिहूं काव्य,स्मरूं शब्द
मनी प्रेम प्रेम रे"
हे असं सांगताना कवी काय किंवा शेतकरी काय दोन्ही बिचारे स्वतःला कामात व्यग्र ठेऊन समाजाची सेवाच करत असतात म्हणाना.अर्थात एक पोट पुजेची सोय करतो तर दुसरा मनाच्या पुजेची सेवा करतो असं म्हणायला हरकत नाही.
अलिकडच्या वातावरणाची तुलना विचारात घेतली तर कवी आणि computer programer हे पण जवळ जवळ सारखेच.दोघेही निर्मीती करीत असतात.कवितेची कल्पना सारखी असली अथवा कवितेचा विषय सारखाच असला तरी दोन कवी तेच शब्द वापरून काव्य करतील असं नाही किंबहूना शेतकऱ्या सारखं "जशी मेहनत तसे फळ" तसंच ज्याच्या त्याच्या कल्पना चातुर्यावर final product होईल असं मला वाटतं.
computer programer चं पण असंच.ती त्याची, त्याची निर्मीती असते.त्याने लिहीलेला program,दुसरा तसाच लिहील असं होऊच शकणार नाही.final product तेच असेल.
तर माझ्या बाबतीत काय आहे,की विषय डोक्यात घोळू लागला की,शब्द सरसावून पुढे येतात.आणि शब्द सुचायला लागले की मग राहवत नाही,ते उतरून काढल्याशिवाय चैनच पडत नाही.नऊ महिने संपल्यावर जशी एखादी बाई बाळंत होतेच,दोन चार दिवस इकडे तिकडे म्हणा,तसंच काहीसं कवितेच होतं.मग वाटतं की ही एक नैसर्गीक प्रक्रिया तर नसेल ना?
एक मात्र नक्की.गद्यातून सांगण्याएवजी पद्यातून म्हणजे कवितेतून सांगणं जास्त परिणामकारक होऊन थोडक्यात सांगता येतं असं मला वाटतं.उदा.प्रे.बुशला तुझे राजकारण विषेश करून तुझे हे इराक war मला मुळीच आवडलेल नाही.हे सांगण्यासाठी मी रकानेच्या रकाने भरून लिहीले तरी माझी तृप्ती होणार नाही.तेच मी कवितेत असं लिहीलं.२००३ च्या मार्च मधे त्याने इराक वर युद्ध लाद्लं.त्या वर्षाच्या December मधे X'mas ची वेळ होती त्यावेळी मला ही कविता सुचली.
हे जॉर्ज डब्ल्यू बूश
मी तर आहे तुझ्यावर नाखूष
केलास तूं यवनांनच्या"ब्यागद्यादवर" हल्ला
आता ते सदैव म्हणू लागले "अल्ला अल्ला"
डब्ल्यू एम डी आणि ऍलिमिनीयम ट्यूब्स
हा सर्व होता तूझा बकवास
तुझ्या वडीलांच्या सूडाचा तूं ठेवलास
सूडबुद्धीचा अट्टाहास
क्लिन्टने जाता जाता
दिले डॉलर्स ट्रिलीयन
कपाळकरंट्या तुझ्या कारकीर्दीत
झाले ते नाईन ईलेवन
तिन ते चार हजार निरपरार्धी
जेथे गेले
त्याला तूं म्हणतोस हेवन
युद्ध करून प्रश्न कधीच नव्हते मिटले
व्हियेटनामच्या युध्दावरून तुला
ते कसे नाही पटले?
सोडून दे आता ही धुसफुस
आण तूं त्याठीकाणी पीस
ज्याला तूं म्हणतोस मिडिल ईस्ट
आज आहे जन्म त्याचा
ज्याला म्हणतात ख्रिस्ताचा जिसुस
स्मरून त्या देव दुताला
म्हणू आपण सर्व जगाला
मेरी ख्रिस्मस
आशय तोच आहे फक्त आहे पद्दात.
त्याअगोदर ९/११ झाले.ते twin towers चे द्रुश्य पाहून मला एक कविता सुचली.
ह्यांचे राजकारण चुकीचे झाल्याने जगाच्या विशेषकरून आतंकवाद्याच्या मनात खुपच खुन्नस निर्माण होऊन त्यानी हे कृत्य केलं.माझ्या दृष्टीने अमेरिका ही एक हत्ती समान असून हे एकोणीस मुंगळे ,आतंकवादी ,त्याच्या कानात शिरून त्याला हैराण करून त्याचे दोन सुळे ,twin towers . त्यानी मोडून टाकले अशी कल्पना करून ही कविता मला सुचली.
हत्तीची उतरली मस्ती.
एक होता गलेलठ्ठ हत्ती
त्याला झाली होती
आंसूरी मस्ती
समजायचा तो स्व्त:ला
अख्या जंगलाचा आपण राजा
छोटे मोठे शत्रु गेले रसातळाला
कुणी नाही मला आता
आव्हान द्यायला
राहीला तो अशा भ्रमांत
विश्वास होता त्याला
त्याच्या श्रमांत
बोलावीत राहीला आपल्या
जंगलात इतर प्राण्याना
गाफील राहीला तो
अशा घमेंडीत
उत्तर दक्शिण माझी
पूर्व पश्चिम माझी
गाफील मी रहाणार
माझे काय कोण करणार?
लहान लहान प्राणी आणि पक्षी
बसती त्याच्या लठ्ठ देहावर
करु लागले कट कारस्थान
मारुन तिथेच बस्थान
होते त्यात सफेद बगळे
आणि काळे कभीन्न कावळे
नवलाईची गोष्ट अशी की
होते त्यात एकोणीस
हिरवे मुंगळे
असेच एकदा ह्त्तीने
फिरता फिरता जंगलात
तुडविले एक हिरव्या
मुंगळ्याचे वारुळ
सर्व मुंगळ्या बाहेर येऊन
करु लागले काहूर
त्यातल्या एकोणीस मुंगळ्यानी
केला एक कट
म्हणाले माजलेल्या हत्तीची
ऊधळूया सारी वठ
गाफिल हत्तीचा घेतला
त्यानी फायदा
त्याच्याच अंगावर
स्वैरपणे फिरुन
मोडला त्याचा कायदा
एकोणीस हिरवे मुंगळे
गेले कानाजवळ सगळे
शिरताना त्याच्या कानात
मुद्दाम झाले वेगळे
कानात गेल्यावर
ते कडाडून चावले
संतापलेला ह्त्ती
झाला सैरभैर
झाडे तोडू लागला
फांद्या मोडू लागला
मुंगळ्याना माहीत होते
असल्या वागण्यामुळे
तुटणार आहेत
त्याचे दोन
दिमाखी सुळे(ट्वीन टॉवर्स)
अगदी तसेच झाले
तुटले त्याचे दोनही सुळे
मुंग्याना वाटत होते
काही नसे त्यात आगळे
न जाता कुणाच्या वाटेला
शांती येऊ दे पूर्या जंगलाला
कवी पाडगांवकरनी आपल्या एका कवितेत म्हटलं आहे,त्यात जरा फरक करून मी म्हणेन
"आपली कविता अशी असली पाहीजे
असं आपल्यावर कुणाचं बंधन नसतं
आपली कविता तशी असली पाहीजे
असंही आपल्यावर कुणाचं बंधन नसतं"
"तुमचं आणि आमचं जेव्हा मत जुळतं
तेव्हा आपल्या कवितेचं मर्म आपल्याला कळतं"
विषय कुठलाही एकदा डोक्यात आल्यावर शब्द जुळत जातात.
कूणी दुःखी होऊन कविता लिहीतात,तर कुणी आनंदी मनाने कविता लिहीतात,कुणी निसर्गावर कविता लिहीतात तर कुणी आपले विचार प्रकट करण्यासाठी कविता लिहीतात.आणि असे असंख्य विषय घेऊन कविता लिहीली जाते.
निसर्ग, वेदनेतूनच निर्मीती करत असतो.त्याचप्रमाणे दुःखाच्या वेदना होऊन कविता सुचतात.त्या जास्त परिणामकारक असतात असं मला वाटतं.त्याचा अर्थ इतर कविता परिणामकारक नसतात असं मुळीच नाही.काही विनोदी कवितापण हुदयाला चटका देऊन जातात.कधी कधी रोजच्या व्यवहारात होणार्य गोष्टी संवादाच्या रूपाने परिणामकारक करता येतात.
कधी कधी असं पण होतं की वाटतं आता संपलं सारं,सर्व विषय आपल्या कवितेत येऊन गेले आहेत.आता आपल्याला कविता सुचणं कठीण.आणि असे बरेच दिवस जातात,आणि खरंच खात्री होते,कविता लिहीण्याचा अंत आला.पण निर्मीतीला अंत नसतो,नाहीपेक्षा निसर्गाचापण अंत झाला असता नाही काय?त्यामुळे कविता ही पण अशीच निर्मीती मानल्यास,त्याचा अंत कसा होणार? ठीक आहे काही दिवस असेच जातील.आणि खरंच एक दिवस का कुणाष्टाऊक एकदम एखादा विषय डोक्यात शिरतो आणि एखादी कविता निर्माण होते.
वय झालं तरी काही लोक आपल्याला वाढदिवसाचे कौतुक करीत असतात.मनात येतं आता दिवस कसले वाढणार?आता उतरणीचे दिवस.असेच एका ७० वर्ष ओलांडून जाणार्या व्यक्तीच्या "वाढदिवशी" गेलो असता,तो सोहळा बघून कविता सुचली ती अशी,कारण मी पण जवळ जवळ त्याच वयाचा आहे.
शिर्षक आहे "काढ दिवस".
वंय झाले आता सत्तर
कसे म्हणू आता
झाले तरी बेहत्तर
आता कसले वाढदिवस
राहीले ते फक्त काढदिवस
पर्वताच्या उतरणीवर
दिसू लागले आभाळ
चढणीच्या वाटेवर
स्वैर पक्षांचा थवा हेरण्याचा
गेला तो काळ
अपेक्षा लोपून गेली
उमेदीने पाठ फिरविली
नैराशाने गांठ बांधली
भुतकाळातील यातनां
भविष्यकाळातील स्वपनें
मिसळती एकच वेळी
चेहर्यावरी दिसती
दुःख अन कष्ट
राहूं कसा मी संतुष्ट?
म्हणावे त्याला जाणकार
कल्पनेने जाणतो भविष्यकाळ
झाले आता वंय फार
आता कसले वाढदिवस
राहिले ते आता काढदिवस
लोकं आपली कविता वाचतात पण कधी त्याची "दाद" मिळ्त नाही.पण दाद कशी मिळणार? लोक कविता वाचतात,मनात दाद देतात.बरी वाटली नसल्यास मनात म्हणतात "ठीक आहे" आहे "so so". सर्वेच लहान मुलं गुडगुडीत कुठे असतात?एखादं किडकिडीत पण असतं.पण त्या मुलाच्या आईला आपली मुलं सुंदरच वाटतात.कसं असलं तरी ती त्याचे प्रेमाने मुके घेतेच नां?तसंच काहीसं कवीला आपल्या कविते विषयी वाटतं.म्हणून की काय काही कवीनी काव्यवाचन करण्याची प्रथा सुरू केली.तसं करताना त्याना समोरच मिळाली तर दाद मिळते.आणि त्याना मनस्वी बरं वाटतं.पण ती झाली मोठमोठया कवींची गोष्ट,आमच्या सारख्यांना असा chance कुठे मिळायचा?पण ही मनातली व्यथा मी कवितेच्याच रूपाने एकदा express केली ती अशी.
तरी हरकत नाही.
माझ्या कविता
कुणिही गात नाही
कुणिही वाचत नाही
वाचली तरी ऐकत नाही
परंतु
कविता लिहील्याविना
मला राहवत नाही
लिहूया कविता म्हणून
लिहीली जात नाही
विचारांच्या वेलीची
शब्दरुपी फुलें जेव्हा
मनाच्या पाण्यात
एकत्र तरंगतात
तेव्हा कविता लिहील्या
वाचून रहावत नाही
दुःखा मागून
आनंद डोकावतो
यातना मागून
निर्मीती होते
कवितेचे असेच आहे
अशावेळी
कविता लिहील्यावाचून
रहावत नाही
अन तुम्ही
गायिलीत नाही
वाचलीत नाही
आणि वाचून
ऐकलीत नाहीत
तरी हरकत नाही
कविता लिहील्या शिवाय
मी सोडणार नाही.
श्रीकृष्ण सामंत