१९९८ सालीप्रथम हिमालय पाहिला पटणीटॉप येथे बर्फाचा तो डोन्गर पाहुन थक्क झाले होते. नन्तर अमरनाथ यात्रा करताना त्या नगाधिराजाचे रौद्बभीशण सौन्दर्य पाहुन मन्त्रमुग्दध झाले होते आणि आदिकैलास-ओमपर्वत यात्रेच्या वीस दिवसात तो माझा मनभावन झाला.
हिमालयाच्या विविधतेचे वर्णनतरी कुठल्या शब्दाने करावे? मातीचे प्रकारच कितीतरी आहेत कुठे काळीकसदार तर कुठ भस्मासारखी राख,कुठे मुरमाड , कुठे दगडी कोळसा,समुद्रातीलवाळूसारखी वाळू मैलोन्मैल पसरलेली खडकही असेच विविध प्रकारचे.कुठे काळाकभीन्न पत्थर तर कुठे अग्निजन्य प्रस्तर कुठे सोनेरी,हिरव्या,निळ्या अशा विविध रन्गाचेखडक एखादा डोन्गर उन्हात सोन्यासारखा झळाळतो तर दुसरा चान्दीसारखा चमकत असतो.एक डोन्गर सैधवमीठाची खाणआहे.नदी-नालेही विविध प्रकारचे. सन्तापाने चवताळलेल्या काळ्यानागिणीसारखी रोरावत धावणारी कालीनदी,लाल पाण्याची वेगवान कुट्टी,कोसी या आपल्या मोठ्या बहिणीन्च्या सन्तापात सामील होणार्या धौलीगन्गा गोरीगन्गा तर आपण लहान आहोत मोठ्या बहिणीन्बरोबर गेलेच पाहिजे म्हणणारे नाले शुभ्रधवल लिपुलेक,पिवळ्या पाण्याचा टेन्करनाला,निळ्या हिरव्या रन्गाचे पाणी असलेले नाव माहीत नसलेले नाले तर दुधगन्गा हा नाला हिवाळ्यातही न गोठणारा.
विविध प्रकारच्या वनस्पतीनी नटलेला हिमालय,विविध रन्गानी नटलेल्या फुलान्चे गालिचे आपल्या अन्गावर वागवत थकल्याभागलेल्यान्चे मन रिझवतअसतो,थकवा घालवत असतो.पाइन,ओक, चीड,देवदार आदि व्रुक्षान्ची जन्गले मनाची हिरवाई जागवत असतात भुर्जपत्राची जन्गले आपल्या पुराणपर्वजान्ची, आपल्यावेदान्ची,आपल्या प्राचिन सन्स्क्रुतिची अभिमानास्पद आठवण करुन देत असतात.गमत म्हणजे जिथे खाजकुयली;जिला स्थानिक भाशेत बिच्छू म्हणतात ती,वाढलेली असते तिच्याजवळच तिच्यावरील उतारा असलेली पालक नावाची वनस्पती असते शन्कराला आवडणारा आपण दिवेलागणीच्यावेळी जाळतो त्या उदाची झुडपे सर्वत्र आढळतात,सन्जिवनीबुटीही सर्वत्र आढळते.डोलु नावाच्या वनस्पतीत मोडलेले हाड सान्धण्याचा गुण आहे बासरी ज्या पासुन बनवतात त्या वेळूची बनेही खुप आहेत.वार्याबरोबर त्या बनातुन घुमणारा बासरी सारखा मन्जुळ ध्वनी मनाचा आणि शरीराचाही थकवा घालविणारा.
फळझाडेही विविध प्रकारची.सफरचन्द,बदाम,अक्रोड यासारख्या श्रीमन्त फळान्बरोबर कुलम,बोरे,डाळिम्ब वगैरे गरीब फळेही भरपुर.या फळान्चा मधुर स्वाद घेत आपल्या मन्जुळस्वरानी मनोरन्जन करणार्या अगदी छोट्या चिमणीपेक्षाही लहान पक्षान्पासुन सामर्थ्सशाली गरुडा पर्यन्त नानाविध पक्षी समुदायान्चे हिमालय घरटे आहे.कावळाही आ ढळतो पण पिवळ्या चोचीचा;गोड आवाजाचा. झुबु,याक,घोडा या सारखे दळवळणासाठी माणसाला मदत करणारे प्राणी,आपल्या मधुरदुधाने भुक भागविणार्यागायी, आपल्या मऊ केसानी थन्डीला पळवणार्या पश्मिना मेन्ढ्या हे माणसाचे मित्रप्राणी तर पान्ढरेअस्वल,वाघ, कस्तुरीम्रुग अशा जन्गली प्राण्यानाही माणसाबरोबरच हिमालयाच्या कुशीत आश्रयअआहे.
अन्नपुर्णा,कान्चनगन्गा,नन्दादेवी या सारखी उतुन्ग हिमाच्छादित शिखरे तर कैलास आदिकैलास,ओम्पर्वत यासारखे परमेश्वरीदर्शन ही या हिमालयाची देणगी.मानस,पार्वती ही सरोवरे,गौरीकुन्ड,राक्षसतालही येथेच आहेत.
अशासुन्दर,भव्य हिमालयातील कठीणपायवाटा,डॉन्गारान्मधील तीव्रचढ-उतार,मोठमोठे ग्लेशियर,लहरी निसर्ग पण तरिही एक अद्वितिय आदिकैलास-ओम्पर्वत यात्रा उद्यापासुन.
प्रतिक्रिया
27 Aug 2014 - 1:30 pm | कंजूस
वाचतोय .
27 Aug 2014 - 2:07 pm | सविता००१
खूप दिवसांनी लिहिलंत. आता लिहा. आवडतंय वाचायला. छान लिहिता तुम्ही..
27 Aug 2014 - 4:15 pm | कवितानागेश
सुंदर लिहिलय... :)
27 Aug 2014 - 9:56 pm | अजया
अरे वा! आदिकैलास आणि ओम पर्वत यात्रा.पुलेशु.
27 Aug 2014 - 10:00 pm | मुक्त विहारि
पु.भा.प्र.
27 Aug 2014 - 10:11 pm | सस्नेह
फोटो द्या हो खुशितै
28 Aug 2014 - 1:36 pm | खुशि
फोटो हवेत पण मला टाकता येत नाहीत कसे टाकायचे शिकवा म्हणजे टाकेन.
27 Aug 2014 - 10:15 pm | किल्लेदार
फोटो दिसले तर जास्त खुशी होईल :)
28 Aug 2014 - 1:37 pm | खुशि
फोटॉ कसे टाकायचे?शिकवा प्लीज.
27 Aug 2014 - 10:38 pm | यशोधरा
वा, वा! येऊद्यात कैलास यात्रेचे वर्णन. :) जमले तर फोटोही टाका प्लीज.
28 Aug 2014 - 1:39 pm | खुशि
शिकवा कसे टाकायचे मग टाकीन.
28 Aug 2014 - 2:11 pm | किल्लेदार
तुमचा "flickr" वर अकाउंट आहे काय ?
28 Aug 2014 - 4:26 pm | खुशि
फ्लिकर वर अकाउन्ट नाही.पिकासा बेबवरअआहे.
28 Aug 2014 - 9:32 pm | सखी
छान नाव दिलयं लेखाचं, अजुन येऊ देत.
एक सुचना आधीच देते, आशा आहे राग येणार नाही, तुमचे अनुभव चांगलेच आहे फक्त थोड्या सुधारणा केल्यात तर दाताखाली खडा आल्यासारखं वाटणार नाही.
- अनुस्वार द्यायचा असेल तर कॅपिटल M वापरा म्हणजे रन्गाचे - रंगाचे raMgaache, डोन्गर - डोंगर, सन्तापाने - संतापाने असे लिहता येईल.
- तसेच मध्ये मध्ये स्पेसचीपण गरज आहे असं वाटतं- उदा. समुद्रातीलवाळूसारखी, काळ्यानागिणीसारखी, देणगी.मानस,पार्वती ही सरोवरे,गौरीकुन्ड,राक्षसतालही
इथे पिकासावरचे फोटो कसे टाकायचे ते टप्प्याटप्प्याने सांगितले आहे. पुलेशु.
29 Aug 2014 - 1:10 pm | खुशि
धन्यवाद,सखी.सुचनाकखुपच मोलाचीअआहे.फोटो टाकायला शिकवा.