भीमाशंकर - दुर्गाडूंचा स्वर्ग - शिडी घाट मार्गे - एक दिवसीय ट्रेक

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in भटकंती
24 Aug 2014 - 1:55 pm

भीमाशंकर - दुर्गाडूंचा स्वर्ग - शिडी घाट

भीमाशंकर हा असा ट्रेक आहे कि यात दुर्गा डूंच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. धबधबा,चढाई , Rock patch,ladder, देवदर्शन, निसर्ग सौंदर्य,धुके काय लिहू नि काय नको इतक्या गोष्टी आहेत. पावसाळ्यात नि श्रावण मास सुरु होण्याअगोदर भीमाशंकर ट्रेक तो बनता है boss !!!!!!!!!!

भीमाशंकर हे १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक ! तसेच भीमाशंकर हे सर्वात लहान अभयारण्य आहे जेमतेम १०० वर्ग किमी. येथे राज्य प्राणी शेकरू हा आढळतो, परंतु ज्याचे दर्शन फार दुर्लभ आहे. आता पर्यंतच्या दोन वारीत शेवटच्या वारीत mala केवळ शेपूट पाहून समाधान मानावे लागले.

तसे पहिले तर भीमाशंकर हा काही किल्ला नव्हे वा गड नव्हे. हे एक देवस्थान असून पेशव्यांनी वसई दिग्विजयानंतर पोर्तुगालांच्या चर्च ची घंटा वसईहून आणून येथे शंकरास अर्पण केली . (तेव्हा चर्चच्या घंटेने धर्म बुडाला कि नाही अशी चर्चा तरी ऐकिवात नाही . असो . तो मुद्दा नाही ).भीमाशंकर ला अलीकडच्या काळात कु प्रसिद्धी मिळाली ती माळीण घटनेने !!!! भीमाशंकर ट्रेकसाठी चोखाळलेल्या वाटा म्हणजे गणेश घाट नि शिडी घाट . यापैकी गणेश घाट तसा चढाईस सोपा . तर शिडी घाट थोडासा अवघड !!! अजून दोन वाटा म्हणजे गुगुल घाट नि आहुपे घाट . यापैकी आहुपे घाट याची वाट सोपी आहे . तर गुगुल घाटाची मला माहिती नाही . आपणापैकी कोणी या वाटेने जाणार असाल तर ये बंदा आपके साथ आणे को तय्यार है….
मेघनाद यांनी शिडी घाटाबद्दल काही शंका विचारल्या होत्या .नि बहुतेक जणांनी अति सावधानतेचे इशारे दिले होते . ते थोडे खटकले असो .(जाऊदे नव वयास्कारांचा (35 +) सल्ला मनावर नाही घ्यायचा !!! हाण तिच्या मारी ;0) आपला group जर ७ -८ जणांचा असेल नि सर्व थंड डोक्याचे नि अति उत्तेजित पेयपान वर्ज्य असणारे नि एखादा खमक्या trekkar असेल तर या वाटेने अवश्य जावे . थ्रिल काय असते ते या वाटेवरच कळते . मुंबई hikers वरील अनेक group हा ट्रेक एका दिवसात शिडी घाट ascend आणि गणेश घाट descend असा करतात. अशाच एका group बरोबर २० जुलैला भीमाशंकर करण्याचा प्लान केला . जवळपास ३० जणांचा group असल्याने बस ने जाण्याचे ठरले . बोरिवलीतून बस ने प्रस्थान केले नि पहिला टप्पा होता तो JVLR ला . आमचा group leader नि मी JVLR ला उभे होतो पण हा पठ्ठ्या Participant ची लिस्ट घरी विसरला . आली का पंचाईत !!! मग मीच त्याला सुचवले no tension तू घरी जाउन ये मी इथे मोर्चा सांभाळीन तू येइस तो पर्यंत …. त्यामुळे येणारी मुले नि वाहन चालकाचा मी group leader आहे असा समाज झाला . नि मी पण मधल्या मध्ये भाव खाऊन घेतला ….;)))) १० वाजता जी गाडीतून वरात निघाली ती २ -२ .३० च्या सुमारास खांडसला पोहोचेल असा अंदाज होता . पण ट्रेकमध्ये सगळ्याच गोष्टी ठरल्य्प्रमाणे होत नाहीत . Traffic ,रस्ता शोध मोहीम या सर्व प्रकारात आम्हास ३ .४५ वाजले खांडस मध्ये पोहोचायला......झोपेचे चांगलेच खोबरे झाले होते . फक्त वाटेत एक अजगर दिसले हेच काय ते समाधान !!!! साप वगैरे दिसणे हे मी ट्रेकसाठी शुभशकून मानतो . नाहीतर नुसता डोंगर चढून काय उपयोग कुछ और थ्रिल भी चाहिये ना!!!! गावात पोहोचून दोन तास विश्रांती करायचा बेत सपशेल रित्या फसला होता . कारण ५ .० चा trek call होता त्यामुळे अगोदर शरीर शुद्धी , चहा नि नष्ट अशी सर्व कामे उरकण्यात तास गेला … माझा एक नियम आहे आपण एखाद्या group बरोबर पैसे देऊन जात असू तर पूर्ण पैसे वसूल करणे :). अशा वेळेस पाणी सोडले तर मी काही खायची सामग्री नेत नाही . उगाच ओझे !!! सटर फटर वस्तू खाण्यापेक्षा नाश्त्याला मिळणाऱ्या पोह्यांची चव ,तेलाचा दर्जा , कांद्या बटाट्याचे त्यातील प्रमाण , पोह्यांना दक्षिण भारतीय नवरीप्रमाणे हळद लावलीये का ब्राह्मणी पद्धतीने फक्त तीका लावलाय या सगळ्याचा विचार न करता पोहे चांगले रेटवायचे.कारण त्यामुळे चढाई करतांना बाकी काही खायला नाही मिळाले तरी बेहत्तर असा आपला खाक्या … त्यामुळे सकाळी ४ .३ ० वाजता दुसर्या तिसर्यांदा पोहे मागून खाणार हा कोण प्राणी या नजरेने सगळे माझ्याकडे बघत होते . त्यात काही आन्गलाळलेल्या ललनांना तर मी दोन दिवस उपवास ठेऊन आलोय कि काय अश्या नजरेने बघत होत्या . जाऊदे आहे आपली भूक मोठी नि पचवतो पण सगळे . तुमचे काय जातंय या आविर्भावात मी खात होतो .
५ च्या ठोक्याला आम्ही चढाई सुरु केली . खांडस गावातून पुलापर्यंत पोहोचण्यास १५ -२० मिनिटे लागतात . पुलाजवळ पोहोचाल्य्वर उजवीकडे जो रस्ता जातो तो गणेश घाट नि आपण सरळ चालत गेल्यास शिडी घाटाचा रस्ता लागतो .शिडी घाटाच्या सुरुवातीस एक मोठी विहीर लागते त्या विहिरीभोवती रिंगण बनवून ओळख परेड झाली . काहीजण अगदीच नवखे होते त्यामुळे वेग मंद असणार आहे हेय तिथेच समजले . परंतु कोणी म्हटलेच आहे कि “ IF YOU WANT TO GO FAST WALK ALONE,IF YOU WANT TO GO FAR THEN WALK TOGETHER” . विहीर ओलांडली नि पावसाची रिपरिप थोडी वाढली . सर्वजण पावसाळी चिलखते घालून होते काही अति हौशी तर raincoat ची pant पण घालून आले होते . यावर्षी मनासारखे पावसाळी चिलखत ना मिळाल्याने नि Performance Bonus न मिळाल्याने (;)) मी फक्त holland च्या jersey वर पावसाचा आनंद लुटणार होतो . थोडीशी चढण पार केल्यावर एक ओढा लागतो . जुलैला एवढा पाऊस नसून suddha ओढ्याला चांगलाच force होता . भीमाशंकर ट्रेकची हीच खासियत आहे इतके पाणी लागते वाटेत कि पाण्याचा nausea येईल …. 
शिडी घाट शिडी घाट अशी जी भीती घातली जाते ते आहे काय तर दोन शिड्या एक traverse नि एक जबर्या rockpatch. कळसू बाईच्या शिड्या माणसाबरोबर हलतात . झुलते मओन्रेच ते … याउलट शिडी घाटातील पहिली शिडी चांगलीच दणकट आहे व ती शिडी नसून जिनाच आहे . या शिडीच्या टोकाला पोहोचल्यावर आपणास आधीची शिडी खाली पडलेली दिसेल . ती शिडी असतांना आपण या वाटेने आलो नाही या भावनेने तुम्हाला नक्कीच हायसे वाटेल ;) वाटेत अनेक धबधबे नि ओहोळ लागतील कि त्याची गणतीच नाही …. अरेच्चा एक गोष्ट सांगायचीच राहिली . आधी वर्णिलेल्या विहिरीजवळ उभे राहिले असता आपणास एक अजस्त्र सुळका दिसेल !!!!! घाबरू नका तो आपल्या ट्रेकचा भाग नव्हे , तो आहे पदरगड . पदर गडा बद्दल विशेष माहिती नाही पण वर चढावयास rope लागतो हे ऐकून आहे . कोणी मोहीम काढणार असल्यास अवश्य सांगावे , माझा सहभाग जरूर asel. माझी शिडी track वरून जर जास्तीच घसरली का ? असू दे … गोड मानून घ्या . पहिली शिडी चढल्यावर एक छोटासा विसावा देणारा point येतो . गुहा म्हणता येणार नाही परंतु छोटीशी जागा आहे विसाव्यासाठी .येथून पदर गडाचे लोभस दृश्य दिसते . एव्हाना आपण चांगल्याच उंचीवर आलेलो असतो नि आपणास खाली पाहण्याचा मोह होत असतो अशावेळी जरूर पाहावे माझी guarantee काही दिसणार नाही दिसले तर सगळे धुरकट दिसेल !!!! भीमाशंकर ट्रेकला गेल्यावर धुके काय असते हे दिसते म्हणजेच कळते . असो तर विसाव्याच्या जागेच्या उजव्या हाताला दुसरी शिडी आहे . हो हि शिडीच आहे नि सांभाळूनच चढावे लागते . हि शिडी चढून हुश्श म्हणतोय तो पर्यंत एक कातळ वाट सुरु होते परत एक धबधबा !!!! भिजा पूर्ण कपडे भरून …. येथे एक उदास ओकेबोके झाड दिसेल नि या झाडाच्या मागे धुक्यात लपला असेल पदरगड .आता येतो तो traverse!!!! Traverse cross करून हुश्श कारेस्तोपर्यंत rock patch आ वासून उभा असतो . या rock patch चे वैशिष्ट्य असे कि हा rockpatch नागमोडी आहे …. चेष्टा वाटते ना जाऊन या नि मग मला सांगा . पहिला टप्पा cross केल्यावर आपणास दगडात left मारायचा असतो …. पहिला patch तुलनेने सोपा आहे . परंतु दुसर्या patch च्या चढाई साठी दोन मोठे दगड आहेत . व या दगडावर प्रत्येकी एक असा माणूसच उभा राहू शकतो . तसेच या rockpatch च्या उजव्या बाजूस धबधबा आहे . यात पाणी नसले तर दगडांची घळी बघून चड्डीचा रंग बदलल्याशिवाय राहणार नाही . हा rockpatch आपण उत्तम रित्या पार केलात कि शिडी घाटाचा हत्ती गेला म्हणून समजा . कारण पुढे normal चढण आहे नि थोड्याच अंतरावर गणेश घाटातून येणारी वाट इथे milate. Yethe एक चहाची टपरी आहे .मंदिराकडे जातांना शिडी घटने आल्यास आपणास सरळ टपरी लागेल . व गणेश घटून आल्यास उजवीकडे वळण घेऊन लागेल . लक्षात ठेवा उतरते वेळीस गणेश घटनेचं उतरा !!!!!! त्यामुळे हा point फार महत्त्वाचा आहे . उतरते वेळीस टपरीच्या डाव्या हातास गणेश घाटची वाट आहे . यापुढचा रस्ता फार अवघड नाही पण हा पार करतांना तुम्हाला खरोखर अभयारण्यात आल्याचा feel येईल . वाटेत पडलेली झाडे लागतील . चिखल ,दलदल full एकदम terminator चा feel. वाटेत एक बाटली सदृश्य खोड असणारे झाड लागेल . भीमाशंकर ट्रेकला मोजकेच फोटो काढता येतात . कारण म्हणजे पाऊस नि धुके . या खोडाचा फोटो जरूर घ्या .
अंतिम चढाई सुरु …. गणेश घातात्ने आल्यास कमीत कमी ४ तासात आपण उत्तम trekker असाल तर वर पोहोचू शकता . नि शिडी घटने यासाठी एक तास कमी पकडावा . पण आधी सांगितल्या प्रमाणे आम्हाला तब्बल ५ .३० तास लागले होते . तळ्यापर्यंत पोहोचायला .!!!!! त्यापुढे होते फक्त धुक्याचे साम्राज्य ….. 10 फुटावरचे सुद्धा न दिसावे इतकी कमी visibility होती . पाऊस कमी होता हे आमचे नशीब . तळ्यात आमच्यापैकी अनेकांनी यथेछ म्हशीप्रमाणे डुंबून घेतले . पण त्या तळ्यातील पाण्याचा वापर कशासाठी होतो हेय माहित असल्याने लांबच राहिलो !!!! ट्रेक leader मी नसल्यामुळे नि ट्रेक leader स्वताच पाण्यात डुंबत असल्याने त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायचा मोह टाळला . म्हटले अज्ञानात सुख उप्भोग्तायेत भोगू देय …. या तळ्याच्या उजव्या हातास नागफणी point आहे . येथून धुके नसतांना खाली दिसणारे हिरवे माळरान मोहक वाटते . परंतु आमचा ट्रेक भिम्शानाकार एके भीमाशंकर असा असल्याने आणि त्यात पिंडीला पण शिवायचे नाही असे ठरले असल्याने माझे मन थोडे खट्टू झाले . तळ्यापासून १५ मिनिटात आपण भीमाशंकर मंदिराच्या पायथ्याशी (कि उंचवाट्याशी ? कारण मंदिर हे खाली आहे .पायर्या उतरून खाली जावे लागते .) पोहोचतो .येथे तिठा आहे . उजव्या हाताला मंदिर , डाव्या हाताला राहण्याची सोय नि थोडे मागे आल्यास सुलभ शौचालय ( हो हो सुलभ शौचालय !!!!! याची इथे नितांत आवश्यकता आहे . २०११ मध्ये गेलो असता सर्व व्यवहार आभाळा खालीच होत .) MTDC ने सध्या या स्थळाची चांगली सोय केलीये . सुरुवातीसच भीमाशंकरचा एक नकाशा लावलेला दिसेल नि शौचालयाच्या उजव्या हातास Bombay point दिसेल .( यास Bombay पोइन्त का म्हणतात माहित नाही . कारण इथे इतके धुके असते कि Bombay काय bum खाली कोणी bomb जरी ठेवला तरी दिसणार नाही !!!!
भीमाशंकर हा ट्रेक एका दिवसात करणे म्हणजे थोडे दगदगीचे होते . कारण ना आपणास दर्शन घेता येते . नागफणी विसर पण गुप्त भीमाशंकर सुद्धा आपण पाहू शकत नाही . त्यामुळे भीमाशंकरला गेल्यास मुक्काम जरूर करा . आपणास भिमाश्नाकारला मुक्काम करवयाचा असल्यास प्रथम दर्शन ना घेता राहण्याची सोय करावी नि मग दर्शनास जावे . भीमाशंकरच्या देवळाच्या पायर्यांवर इतर देवालाप्रमाणेच पेढे नि इतर वस्तूंची दुकाने आहेत . येथील कलाकंद नि खाव्यासम सदृश एक दोन पदार्थ दिसतील .जरूर लुप्त घ्या त्यांचा अगर आपणा खवय्ये असाल तर !!! देवळांच्या पायर्या उतरत असतांना वरुण राजा जरा जास्तीच वरून पडायला लागले . देऊळ परिसरात भात लावणी करताना वापरले जाणार्या इरल्याचे आधुनिक रूप भाविकांना पौसापासून बचाव करण्यासाठी विकतांना पहिले . परंतु सोसाट्याचा वार्यापुढे त्या प्लास्टिक कागदाचा काही निभाव लागत नव्हता . त्यामुळे आम्ही धावत जाऊन order दिलेल्या हॉटेलचा आसरा घेतला . तर तिथली म्हातारी आम्हा सर्वस हाकवू लागली . आली का पंचाईत . कारण त्यांनी जेवण बनवलेच नव्हते वा हॉटेल बंद आहे असे सांगून हात वर केले . ३० लोकांची आयत्या वेळी सोय होणे कठीणच होते . पाऊस पण तुफान पडत होता . नी सर्वांना भुकेमुळे नि थंडीमुळे कापरे भरायला लागले होते .कसेबसे करून आम्हाला एका हॉटेलात जेवणाची सोय झाली .नि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला .
पौसाचा लपंडाव चालूच होता . उघडीक झाली म्हणून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला . २ .१५ वाजले होते . तिथ्यापाशी पोहोचतोय काय नि जो तुफान पाऊस सुरु झालाय कि अक्षरशः एका हातभार अंतरावरील माणूस सुद्धा ओळखत येत नव्हते . आधीच उशीर झाल्याने सर्वांना पाउलांचा वेग वाढवण्यास सांगण्यात आला होता . चहाच्या टपरीपर्यंत ४५ मिनिटात आम्ही पोहोचलो होतो . पण मागे ५ -६ जन राहिले होते व त्यांच्याबरोबर असणारा troop leader त्यांना encourage करण्यापेक्षा discourage जास्त करत असल्याने ते थोडे त्रासिक झाले होते . व ते तब्बल अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी आले . त्यात अयोजाकातील एक जन वैयक्तिक कारणामुळे कर्जत मधेच थांबला . त्यामुळे ३ जणांनाच ३० जणांना manage करावे लागत होते . त्यामुळे गणेश घाटाचा रोड lead करायला कोणी नव्हते . या अयोजान्काबरोबर मी २ -३ ट्रेक केल्याने त्यांना मी ओळखीचा होतो तसेच मी भिमाशांकाराला या आधी सुद्धा आल्याने त्याने मला lead करायला सांगितले , त्यामुळे मी पुढे नि प्रजा मागे असे दृश्य होते .गणेश घाटात रस्ता चुकण्याचे फार कमी chance आहेत .पण मागच्या वर्षी याच अयोजान्कांचा group गणेश घाटात हरवला होता . नी माझा रस्त्यांच्या बाबतीत sixth sense यथा तथाच आहे त्यामुळे थोडी धाकधूक होती . पण गणेश घाटातून अनेक group ये -जा करत असल्याने तसा काही problem नव्हता . मी leader असल्याकारणाने मला पुढे राहणे भाग होते . नी रस्ता शोधणे पण !!!!! त्यामुळे आपल्या पुढे कोणता group जातोय का जात असेल तर त्याला follow करणे हे मी ठरवले होते . पण नशीब mhana ki karm mhana tase kahi navhate. Tyamule padchinhe bagha, टाकलेल्या पाण्याची bottle बघ , कचरा बघा असे करत करत मी पुढे जात होतो . गणेश घाटात चुकण्याची ठिकाणे माझ्या हिशोबाने दोनच !!!!! ती म्हणजे गणेश मंदिरापासून धबधबा वर चढल्यावर झोपडी पार केल्यावर उजवीकडे नि डावीकडे दोन्हीकडे रस्ते फुटतात . चढाई च्या वेळेस डाव्या हाताला नि उतरते वेळेस येथे उजव्या हातास वळणे . हे वळण चुकले तर जंगलात किती वळणे घ्याल याचा पत्ता नाही कारण सगळ्या पायवाटा आहेत नि सर्व वाटांवर गावकरी ये जा करत असल्याने पदचिन्हे दिस्तातात … आता तुम्ही ओळखलेच असेल मी इथे रस्ता चुकलो म्हणून !!!!! चुकलोच होतो पण माझ्या सुदैवाने मी नि माझ्या बरोबर एक महिला leader तिचा group लीड करत होती . जेथे कुठे फाटा फुटेल तिथे मी थांबून मागील सर्वांना रस्त्याचा signal देत असे . तिच्याबरोबर चा group थोडा संथ असल्याने कधी ती पुढे तर कधी मी पुढे अश्या प्रकारे गणेश घाटात आमचा पाठ शिवणीचा खेळ चालला होता . पण तिचा वेग खरच वाखाणण्या जोगा होता . नाहीतर आमच्या group मधील अर्ध्या मुली उताण्या पडायच्या बाकी होत्या ….. त्या चुकीच्या वळणावर ती नि मी सरळ पुढे गेलो , उजवीकडे न वळता … पण चार पावले टाकल्यावर आम्हा दोघांस काहीतरी चुकल्यासारखे वाटले नि आम्ही परत वळून उजवीकडचा रस्ता धरला …. गणेश मंदिराजवळ एक छोटा धबधबा आहे . येथे पण एक rockpatch आहे . यावर मी फार शिताफीने उतरलो अगदी leader प्रमाणे ….. छाती फुलून आली . पण माझ्यामागाहून काही शाळकरी मुले येत होती .त्यांचे हे गावच . त्यांनी हा rockpatch दोन उड्यात पार केला .भीमाचे जसे मारुतीने गर्व हरण केले .त्यानंतर भीमाच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले असतील तेच माझ्या चेहऱ्यावर उमटले . अगर आपणास धबधब्याची वाट कठीण वाटली तर चढाई करतेवेळी धबधब्याच्या डाव्या हातास थोडे चालून वर चढावे आपण तो rockpatch टाळू शकाल . गणेश मंदिरापाशी आल्यानंतर अर्ध्या तासात आपण खांडस गावात पोहोचू शकता . आता पुढील रस्ता मी मागे राहण्याचे ठरवले कारण वर नमूद केल्याप्रमाणे एक तिकडी (ek मुलगा नि दोन मुली ) कायम मागे राहत होती वा या सर्वांमुळे सर्व group मागे राहत होता . हा त्यांचा पहिलाच trek होता त्यामुळे मुलींची तर पूर्ण battery down होती व त्या मुलाचा एका गुढघ्याची वाटी कृत्रिम होती .( हे मलापण तेव्हाच कळले , हे ऐकून मनातल्या मनात त्याला सलाम केला ) हे तिघेही सिनेसृष्टीतील होते .यांना जेव्हा JVLR ला pickup केले तेव्हाच आम्हाला सुप्रिया पाठरेंचे दर्शन झाले .(सीने सृष्टीतील लोक इतके गोरे कसे असतात हे कोडेच आहे .रात्री ११ .०० वाजता सुद्धा ह्या बाईचा चेहर्याचा उजळपणा दिसत होता .मी स्वतः गोरा असून मला एवढे अप्रूप तर सावल्या लोकांची काय कथा !!!!! कंसातील थोडे जास्तीच झाले का ? असू दे होऊ दे खर्च , मिपा आहे घरच !!!!)यातील एक मुलगी फार उत्साही होती नि दुसरी तिच्या अगदी viruddh!!!! ह्या दुसरीने तर जेवतांना nail polish लावतांना पाहून माझा तोंडातील घास अडकला . भोचकपणे तरी मी प्रश्न विचारला जेवणार कुठच्या हाताने ? तिने साळसूदपणे उत्तर दिले , “चमच्याने ”.वरणात साखर घालून तिने वरण भात खाल्ला .असुदे पाहिलेत असे अनेक महाभाग …. पण तिचे एकाच म्हणणे होते कि आम्ही picnic समजून आलेलो ,एवढी चढाई असेल असे माहित नव्हते . त्यामुळे आयोजकांनी गर्दी जमा करतांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे किती अत्यवश्यक आहे ते समजते. पण इलाज नव्हता . तिला न्यायला काही पुष्पक विमान येणार नव्हते नि आम्ही तिला सोडून जाऊ शकत नव्हतो . त्यामुळे त्रासलेल्या त्या आयोजाकास आम्ही पुढे पाठवले . नी हि तिकडी , मी आणि एक आयोजक असे पाचजण फक्त मागे राहिलो .अर्ध्या तासाचा रस्ता उतरण्यास आम्हाला एक तास लागला … पण आम्ही फार सबुरीने घेऊन त्यांना घेऊन आलो . आम्हा पाच जनांचा एक फार सुंदर selfi पण काढला . तो selfi काय मला अजूनपर्यंत मिळाला नाहीये. त्यांनी विशेष नमूद केले कि आधीचा नेता आम्ही किती हळू चालतो हे सारखे सांगत होता याउलट आम्ही त्यास एकदाही तसे सांगितले नाही व कायम प्रोत्साहित केले. अर्धा पेला खाली नि भरलेला या गोष्टीचा तो उत्तम नमुना होता. मिळेल तेव्हा त्यातील त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसेलच . वर नमूद केल्याप्रमाणे पैसे देऊन गेलो असल्याने मी काही शिधा घेऊन गेलो नव्हतो … पण आजकाल energy bar खाण्याचे खूळ लागल्याने ६ -७ snickers घेऊन गेलो होतो . ट्रेकसाठी स्वतास्त मस्त आहार .(१५ रुपयास एक ! Cadbury प्रमाणे हादडू नये .) स्निकेर चे आमिष दाखवून मी त्यांचा वेग वाढविला . त्यात उत्साही मुलीस shoe bite झाला …(हो हो बूट चावला किंवा लागला ). पावसाळी ट्रेक असेल तर बिना मोजे बूट घालावेत . मोज्यांचा काही उपयोग नसतो . मी तीस सांगितले boot काढून चाल , पण तिला दगडांची भीती नाही तर एकटे कसे अनवाणी चालणार हा न्यूनगंड . मग मी बूट काढून अजून दोघांस काढावयास लावले .तेव्हा कुठे या madam नी बूट काढले . मला माकडांच्या गोष्टीची आठवण झाली . पण हि माकडीण नव्हती अप्सरा होती . असो विषयांतर नको . तर अशा प्रकारे येन केन प्रकारेण ६ तासांनी आम्ही खांडस गावात प्रकटलो . येथून काही हुशार पोरांनी कर्जत local पकडली नि घरी प्रस्थान केले . हुशार का म्हटले याचे स्पष्टीकरण देतो .आम्ही संध्याकाळी कर्जतला ७.१५ ते ७ .३० च्या दरम्यान होतो . त्यामुळे ७ .३९ वा 8.४६ ची कर्जत local २ .० तासात CST ला पोहोचली असती . पण मी गाडीतच बसलो नि घोळ झाला . कर्जत – पनवेल – वाशी – कांजूर अशी मोठी प्रदक्षिणा घालून मी ११ .०० वाजता कान्जुरला पोहोचलो . तेथून दोन ट्रेन बदलून गिरगाव गाठले .

आकाश गोळयाच्या पार्श्वभूमीवर पदरगड
आकाश गोळयाच्या पार्श्वभूमीवर   पदरगड

धबधबे १
धबधबे १

धबधबे 2
धबधबे 2

शिडी घाट पाय वाट
शिडी घाट पाय वाट

विसाव्याच्या जागेवर दिसणारा पदरगड
विसाव्याच्या जागेवर दिसणारा पदरगड

हॉटेल पासून सावधान
हॉटेल पासून सावधान

ओढा
ओढा

ओके बोके झाड
ओके बोके झाड

धबधबे ३
धबधबे ३

दुसरी शिडी
दुसरी शिडी

बाटली सदृश खोड
बाटली सदृश खोड

तळे
तळे

rock patch
rock  patch

ता.क. - लिखाण खांडबहालेतून केले आहे. @ वेल्ला भट - १६ ऑगस्ट रोजी वीर गर्जना आणि गिरगाव ध्वज पथक यांचा संयुक्त सराव ठाण्यात पार पडला. ८ sept ला दणका आहे...

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

24 Aug 2014 - 2:30 pm | टवाळ कार्टा

मस्तच...अप्सरेचापण फोटो लावा ;)

कवितानागेश's picture

24 Aug 2014 - 4:10 pm | कवितानागेश

मस्तच लिहिलय. पण सोबत फोटो हवे होते.
शिवाय शुद्धलेखनाकडे लक्ष दिलेत तर वाचताना काही खटकणार नाही, सलग वाचनाचा आनंद मिळेल.

विअर्ड विक्स's picture

24 Aug 2014 - 7:18 pm | विअर्ड विक्स

धन्यवाद. इंग्लिश मध्ये टंकून खांडबहाले वर copy paste करून space मारणे हे एक दिव्य आहे त्यामुळे शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष झाले... असो भा पो... पुढील वेळेस google वर लिहीन .... मि पा वर टंकण्या इतका सराव नाही......

रामपुरी's picture

26 Aug 2014 - 4:05 am | रामपुरी

मि पा वर टंकण्या इतका सराव नसला तरी हरकत नाही पण हिंदीतून मराठी न लिहिता मराठीतूनच मराठी लिहावं हि विनंती.

दिपक.कुवेत's picture

24 Aug 2014 - 6:10 pm | दिपक.कुवेत

एक वेळ वर्णन कमी चालेल पण भटकंती मधे फोटो हवेतच. विदाउट फोटो शीवाय भटकंती हे फारच विअर्ड आहे विक्स! :)

नांदेडीअन's picture

24 Aug 2014 - 7:23 pm | नांदेडीअन

राज्य पक्षी नाही, राज्य प्राणी

विअर्ड विक्स's picture

24 Aug 2014 - 8:06 pm | विअर्ड विक्स

बरोबर... संपादित केले आहे...

आभार ...

विअर्ड विक्स's picture

24 Aug 2014 - 8:18 pm | विअर्ड विक्स

छायाचित्र वर चढवण्याचा प्रयत्न फसतोय...... blurr image होतेय .... ideal picture size काय ठेवावी ?

विअर्ड विक्स's picture

24 Aug 2014 - 8:54 pm | विअर्ड विक्स

केल्याने होत आहे रे .... त्याप्रमाणेच शिकल्याने होत आहे रे ... छायाचित्रे वर चढवली आहेत....

एस's picture

24 Aug 2014 - 10:19 pm | एस

भिमाशंकर - शिडी घाट. शिड्या दिसल्या का?
KhandasShidiGhaat

कातळटप्पा ऐन पावसात
ShidiGhaatRockpatch

पदरगड - चिमनीक्लाइंब. याच घळीतून वर चिमनी-क्लाइंब म्हणजेच 'तशरीफ' आणि हातापायाची चार टोके यांचा वापर करून चढावे लागते. पुढेच दरी आहे. अतिउत्साहात सरळ खाली जाल. उजवीकडे चांगलीच घसरडी ट्रॅवर्स व कातळटप्पा पदरगडावर घेऊन जातो. वर सुळके, गुहा आणि पाण्याची टाकी आहेत.
PadargadChimneyClimb

मुक्त विहारि's picture

24 Aug 2014 - 10:43 pm | मुक्त विहारि

झक्कास.

आदूबाळ's picture

24 Aug 2014 - 11:11 pm | आदूबाळ

सोल्लिड!

तीन टिंबांचा वापर पूर्णविरामा ऐवजी करणं टाळलं तर अजून मजा येईल.

इनिगोय's picture

25 Aug 2014 - 8:34 am | इनिगोय

+१
त्याचबरोबर रोमन लिपीतले शब्दही.

सॉल्लीड अनुभव घेतलात आणि दिलात .फोटो आणि धावते वर्णन ट्रेकच्या गतीस साजेसे .निरीक्षणशक्ती आणि नोंदी वाखाणण्यासारखी .स्वाप्स धन्यवाद .गुगुळ नव्हे घोगोळ घाट .त्याची एक मजा आहे .

प्रचेतस's picture

25 Aug 2014 - 8:08 pm | प्रचेतस

मस्त फोटो आणि वर्णन.
अगदी हिरवंगार.

वेल्लाभट's picture

25 Aug 2014 - 9:10 pm | वेल्लाभट

@ वेल्ला भट - १६ ऑगस्ट रोजी वीर गर्जना आणि गिरगाव ध्वज पथक यांचा संयुक्त सराव ठाण्यात पार पडला. ८ sept ला दणका आहे...

होय ! ठाऊक आहे... सद्ध्या शेड्यूलचं भीमाशंकर झालंय, त्यामुळे मी मुकतोय या सगळ्याला. जाम इच्छा होती गणपतीला वाजवायची. असो. लवकरच पुन्हा सहभागी होईन. ८ सप्टेंबर चा दणका बघायला कॅमेरात टिपायला मात्र नक्की असणार आहे. तेंव्हा भेट होण्याची शक्यता आहे काय आपली? (म्हणजे, तू येणार आहेस का?)

विअर्ड विक्स's picture

26 Aug 2014 - 10:14 am | विअर्ड विक्स

८ तारखेला सध्यातरी येण्याचा प्लान आहे .कार्यालयातून फिरतीचा भोज्जा नाही मिळाला तर जरूर भेटू.

पैसा's picture

26 Aug 2014 - 4:02 pm | पैसा

छान वर्णन आणि फोटो! फोटोंचा साईज: साधारण ६००/६५० रुंदीचे फोटो व्यवस्थित दिसतात.

मधे मधे रोमन लिपी टाळायचा प्रयत्न करा.

आणि मिपावर गमभनमधे टाईप करणे प्रचंड सोपे आहे. जरा सवय करा!

विअर्ड विक्स's picture

27 Aug 2014 - 10:56 pm | विअर्ड विक्स

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.

सुहास पाटील's picture

1 Sep 2014 - 5:22 pm | सुहास पाटील

आपला ट्रेअक भारि