मिसळपाव ग्रामस्थांची गावकी...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
9 Nov 2007 - 12:58 pm
गाभा: 

राम राम मिसळपावकर ग्रामस्थ मंडळी!

या सदरात आपल्या सर्व मिसळपाव ग्रामस्थांची गावकी भरवण्यात येत आहे -

गावकीपुढील आजचा विषय -

इस्कुट नावाच्या ग्रामस्थाने मिसळपाववरील अन्य एका ग्रामस्थाला संदर्भहीन तसेच मूर्खासारखा मजकूर असलेले/ली पोष्टकार्ड/कार्डे पाठवले/ली आहे/आहेत अशी तक्रार मिसळपावचेच एक सन्माननीय ग्रामस्थ मनिष यांनी आमच्याकडे केली आहे. तरी आम्ही मनिष यांना अशी विनंती करतो की त्यांनी इस्कुटरावांनी त्यांना पाठवलेले/ली पोष्टकार्डे/कार्डे इथे प्रसिद्ध करावीत. पोष्टकार्डातील मजकूर अगदीच आक्षेपार्ह किंवा इथे चारचौघात प्रसिद्ध करावयास प्रशस्त नसेल तर कृपया मनिषरावांनी तो मजकूर मिसळपाव पंचायत समितीला पोष्टकार्डाने पाठवावा!

इस्कुटरावांनादेखील अर्थातच येथे काय तो खुलासा करण्यास पूर्ण मुभा/अधिकार आहे!

पंचायत समितीनेदेखील तिचा काय तो निर्णय (न्यायालयीन आदेश!) इथे भर गावकीतच जाहीरपणे द्यावा. म्हणजे पंचायत समितीच्या आदेशाप्रमाणे संबंधित ग्रामस्थावर प्रशासकीय अनुमती, किंवा इतरांना व्य नि पाठवण्यास निर्बंध, किंवा मिसळपाववरून सदर सदस्याची उचलबांगडी यासारखे उपाय सरपंचांना करता येतील! :)

मिसळपावच्या इतर ग्रामस्थांनीही त्यांच्या वरीलप्रमाणे फौजदारी स्वरुपाच्या तक्रारी यापुढे इथेच या सदरात मांडाव्यात ही विनंती!

मिसळपाववरील तांत्रिक बाबी किंवा इतर दिवाणी स्वरुपाच्या तक्रारी कृपया इथे गावकीसमोर मांडू नयेत, त्या त्यांनी कृपया इथे मांडाव्यात किंवा मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांत यांना पोष्टकार्ड पाठवून कळवाव्यात ही विनंती!

आपला,
(फौजदारी/दिवाणीची विलक्षण हौस आणि आवड असलेला एक कट्टर लोकशाहीवादी कोकणी!) तात्या देवगडकर!

:)

प्रतिक्रिया

लबाड बोका's picture

9 Nov 2007 - 1:16 pm | लबाड बोका

तात्या

असेच काहि प्रकार झाले म्हणुन मी मिसळपाव खाणे बंद केले

गंमत म्हणजे मला अनेक नवीन आय डी तयार करुन संदेश आले पण काही काहि हुशार (?) मंडळी मात्र संदेश नवीन आयडीतुन पण सहीच्या ठिकाणी जुना च प्रसिद्ध आयडी :)

५ जणांचे बुरखे फाटले......
आणखी गंमत त्यातील एकाने नवीन आयडी ने शिवीगाळ करुन संदेश पाठविला अर्थात खाली मुळ नाव लिहुन व नंतर मुळ नावाने साळसुदपणे माझ्या कंपनीची माहिती मागितली त्याला जौब बदल करायचा होता:)

फार वाइठ वाटले
मुद्याला मुद्दा देता नाही आला तर चक्क अभद्र भाषेत पत्र???

तात्या तुम्ही काम करत रहा

भविष्यात कधी मनाला वाटले तर परत मिसळ खाईन

बोका

विसोबा खेचर's picture

9 Nov 2007 - 1:49 pm | विसोबा खेचर

असेच काहि प्रकार झाले म्हणुन मी मिसळपाव खाणे बंद केले

का बंद केलेत? मिसळपाववर पंचायत समिती आहे ना? त्यातल्या सर्व सदस्यांची नांवेही जाहीर केलेली आहेत! त्यांच्यापैकी एखाद्याला व्य नि पाठवून आपण तक्रार का नाही केलीत? आम्ही काय मेलो होतो का? मनिषरावांनी जशी आम्हाला व्य नि पाठवून आमच्याकडे तक्रार केली तशी आपण का नाही केलीत??

मनिषरावांनी आम्हाला व्य नि पाठवून तक्रार केली त्याची आम्ही किती तातडीने दखल घेतली हे खुद्द मनिषरावही कबूल करतील!

येथे असं सगळं लोकशाहीवादी वातावरण असताना आपण आवाज न उठवता मिसळपाव खाणं बंद केलंत हा दोष आपला की मिसळपावचा? आपणच ठरवा काय ते!

गंमत म्हणजे मला अनेक नवीन आय डी तयार करुन संदेश आले पण काही काहि हुशार (?) मंडळी मात्र संदेश नवीन आयडीतुन पण सहीच्या ठिकाणी जुना च प्रसिद्ध आयडी :)

आणखी गंमत त्यातील एकाने नवीन आयडी ने शिवीगाळ करुन संदेश पाठविला अर्थात खाली मुळ नाव लिहुन व नंतर मुळ नावाने साळसुदपणे माझ्या कंपनीची माहिती मागितली त्याला जौब बदल करायचा होता:)

आपल्याला वरील प्रकार आक्षेपार्ह वाटतोय ना? मग करा की सगळं इथे प्रसिद्ध! फाडा की तिच्यायला बुरखे! नाही कुणी म्हटलंय? :)

हे सदर म्हणजे मिसळपावचं फौजदारी वृत्तपत्र/तक्रारपुस्तिका आहे असं समजा! मिसळपाव पंचायत समिती आपल्या तक्रारीची निश्चितच दखल घेईल आणि योग्य तो न्यायनिवाडा करील याची खात्री बाळगा! तशी खात्री नसेल तर मात्र आपण इथे न आलेलंच उत्तम!

फार वाइठ वाटले

तक्रार न करता नुसतं वाईट वाटून काय उपयोग?

भविष्यात कधी मनाला वाटले तर परत मिसळ खाईन

मर्जी आपली! मिसळपावकडून आपलं नेहमी स्वागतच केलं जाईल!

असो..

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Nov 2007 - 11:48 am | प्रकाश घाटपांडे

पारदर्शकता ठेवा , नंगेसे खुदा भी डरता है |
"मुद्याला मुद्दा देता नाही आला तर चक्क अभद्र भाषेत पत्र???
"
प्रसिद्ध करा. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्या सारखे करु नका. आम्हाला बी कळूं द्या कि, म्ह़जे आम्ही बी सावध राहू.
प्रकाश घाटपांडे

सर्किट's picture

10 Nov 2007 - 12:59 pm | सर्किट (not verified)

मलाही श्री/कु/सौ इस्कुट ह्यांचा निरोप आला होता, त्यात "अबे ओ सर्किट" हे आमच्या नागपुरी मराठीतले संबोधन होते. मला त्यात काहीही गैर वाटले नाही.

- सर्किट

इस्कुट's picture

10 Nov 2007 - 6:54 pm | इस्कुट

नागपुरी मराठीतले संबोधन करण्याचा या कोल्हापुरी पामराने प्रयत्न केला. तो आपणास अक्षेपर्ह वाट्ला नाही हे ऐकुन बरे वट्ले.
मायमराठीची नाळ विसरुन इंग्रजीचा सभ्यपणा मिरवणार्या या सुशिक्षीत लोकाना काय म्हणावे?

असो...

आप्ल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आम्ही येथे हलवत आहोत. इस्कुटरावांनी यापुढील खुलासा देखील येथेच काय तो करावा, हे सदर खास त्याकरताच आहे.

हा सूर्य आणि हा जयद्रथ -

.
.
.
अर्जदार : इस्कुट

प्रति : गावचवडी सदस्य,

अर्ज सादर करणेस कारण ऐसे जे की,

मिसळ्पाव ग्रामच्या कायदे-कानुन याना साक्षी ठेवुन आणि न्यायदेवतेच्या चरणी नतमस्तक होउन मी माझ्यावरील अन्यायाविरुद्ध मिसळ्पाव न्यायमंदीरात दाद मागत आहे.

मनिष नामक माझ्या मिसळ्पावच्या ग्रामबन्धुने माझ्यासन्दर्भात चालवलेली ++++ मी आपल्या समोर मान्डत आहे.
मी एक सदाचारी, सदविचारी नागरिक आहे आणि मिसळ्पाव गावचा माला पुर्ण अभिमान आहे. माझी आपणास विनन्ती आहे की आपन माझ्या अर्जाचा सहनुभुतिपुर्वक विचार करुन निर्नय घ्यावा.

माननिय श्री. मनिष याना मी पाठविलेला सन्देश सोबत देत आहे...

मनिषकाका,
काय विशेष?
काय म्हन्ते दिवाळी?

आता यामद्ध्ये काय वाइट लिहीले हो मी? ओळख नस्लेल्या लोकन्शी काका, मामा असे म्हणावे असा संकेत आहे.
'पिवर कोल्हपुरी ' भाषेत हाक मारली आसती तर मनिषकाकांना राग आला आस्ता.

हे म्हन्जे वाघ म्हंट्ले तरी खतो, आणि वघोबा म्हंट्ले तरी खतो अशिच अवस्था झाली की हो माझी.

यामद्ध्ये काहि अक्शेपार्ह आस्ल्यास आपण द्याल ती शिक्शा मला मन्य आहे.

माझ्या अर्जचा सहानुभुतिपुर्वक विचार व्हाव ही नम्र विनन्ती.

चुक भुल देने - घेने.

मनिषकाका सर्व ग्रामस्थांची दिशाभुल करित आहेत आसे मी छातीठोकपने सान्ग्तो.

मनिषकाका आहेत गंडवत्...सर्वाना माझा साश्टांग दंडवत !!!

त्या कालच्या प्वाराला तुमी 'काका' म्हनलं, आन वर येवडा मोटा अपराध क्येलाच नाय म्हणून सांगतासा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Nov 2007 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या इस्कुटाचे आमालाबी तीन व्य. नि. आले.
पहिला व्य. नि. ची प्रश्नोत्तरे या प्रमाणे

दिलीप काका
काय म्हणते दिवळी ?
आमचे उत्तर

लै भारी !

दुसरा व्य.नि.

काका,
तुम्ही म्हन्ता लै भारी ...
म्हनूनच आम्ही म्हन्तो ....

"जगात भारी, मीनाकुमारी
आपली मराठी भाषाच खरी"

यालाही आम्हाला अजून उत्तर सुचले नाही.

तिसरा व्य.नि.

विषय :-काका मला वचवा
आता मला सान्गा काका, मी काय हो वाइट लिहीले हो तुम्हाला? आ़णि इतरांनाही मी काय वाईट लिहीले नाही.
एक सरळ शुभेच्या संदेश लिहीला. आनी हे काही तथाकथीफ सो कॉल्ड खुप हुशार लोक माला राग्वत आहेत.

काका मला वचवा...

यालाही आम्हाला अजून उत्तर सुचले नाही, पाच पन्नास विद्यार्थ्यापैकी एखाद्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असतो असे समजून आम्ही हे प्रकरण सोडून दिले आहे !!! पण, यांच्या आजारावर यांना औषध-पाण्याची गरज आहे, हे मात्र खरे !!!

इस्कुट's picture

10 Nov 2007 - 7:22 pm | इस्कुट

तुमच्यासारखे मास्तर आहेत म्हणून X X X X X X X X x X X x x x x

"The best brains are found on the last benches of classroom"

औषध-पाण्याच्या प्रतिक्षेत...

-इस्कुट

मनिष's picture

11 Nov 2007 - 12:24 pm | मनिष

मझ्या नावाने शिमगा आणि मला पत्ता बी नाई म्हनायचा....

मजकूर "आक्षेपार्ह" नाही (मई तसए म्हटलेही नाही). पण इस्कुट (आता मायला वय/लिंग माहित नाही तर काका/मामा/भाऊ/मावशी/ताई/माई/अक्का का करा? आम्ही रंकाळ्यापासून, नागपूरापर्यंत बारा घाटाचे पाणी पिलो आहोत, कुठे काय म्हणतात माहिती आहे) सगळ्यांन स्वतःची इतर काही ओळख न देता लईच सलगी करू लागले. बर जाऊ द्या म्हणलं तर blog वर comment टाकताहेत -

"tich tich kavita kadhi badalnaar?

Aata aaslyaa kavitanchaa kantaala yeto dada..."

(आवतण दिलं व्ह्तं का - blog वाचा म्हुनशान???)

शिवाय त्याचदिवशी माझ्या ब्लॉगचा पासवर्ड रिसेट करण्याचाही प्रयत्न झाला. (तो एक योगायोगही असू शकेल हे मला मान्य आहे.)

मिसळपाववर जरा lurk केले तर काय - प्राजु च्या कवितेवरही ह्यांची पिंक आहेच.

मी पहिलय त्याना, माझ्याच गाडीवरुन मिरवताना
माझ्याच समोरुन, देखण्या पोरी फिरवताना . .

म्ह्टलं बेणं लईच अगोचरपणा करुन राहिलय...

सिरीयसली मला हा प्रकार उगाच खोडसाळपणाचा वाटतो आहे - खासकरुन private message ची गरज नव्हती, ती देखील स्वतःची ओळख लपवुन. सभ्यपणे ओळख सांगून 'private message' पाठवता येतो की! हा सगळा प्रकार मला irritating वाटला म्हणून तात्याच्या (खाजगीत) कानावर घातला तर तो मला कल्पना नसतंना चव्हाट्यावर आला (हरकत नाही म्हणा). पण मला असे private message नकोत. शिवाय


"जगात भारी, मीनाकुमारी
आपली मराठी भाषाच खरी"

ह्याला (मुर्खपणा नाही तर) काय म्हणावे? अजून एक बघा -


'मिसळपाव' खावुन दिवस ढकलावे लागताहेत हो आजकाल आम्हाला...

"मिसळ्पाव गावचा माला पुर्ण अभिमान आहे"

मी दिशाभूल करतो आहे का? (मायला, इस्कुट खोडसाळपण करतो आहे हे मी बी छातीठोकपणे सांगतो) मला एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर मी प्रशासकाला कळवले - दुसर्‍याला नाही होणार कदाचित हा त्रास, म्हणून मी का गप्प राहू? मला मिसळपाव खावू द्या कि गुमान - बाकीच्यांना (अनाहुतांना) का लई पंचायती???

एक सांगा राव - किती लोकांना वाटले कई असले private message नाही आले तर बरे?

(वैतागलेला) मनिष

ता.क. इस्कुट ला हाकला असे मी म्हटले नाहई, पन आवरा की वो जरा - लईच शाणंपना करुन राहिलाय....

विसोबा खेचर's picture

11 Nov 2007 - 12:40 pm | विसोबा खेचर

हा सगळा प्रकार मला irritating वाटला म्हणून तात्याच्या (खाजगीत) कानावर घातला तर तो मला कल्पना नसतंना चव्हाट्यावर आला (हरकत नाही म्हणा).

मनिषराव, आपण माझ्या कानावर खाजगीत घातलेला प्रकार मी आपल्या पूर्वपरवानगीशिवाय चव्हाट्यावर आणला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपली मनापासून क्षमा मागतो.

परंतु माझ्या मते आपण एक सभासद म्हणून आपले गार्‍हाणे माझ्यापाशी मांडले होतेत, ते काही कुठलं कौटुंबिक किंवा इतर खाजगी स्वरुपाचं पत्र नव्हतं. ते पत्र म्हणजे मिसळपाववरील सभासदांच्या एकमेकांतल्या वैयक्तिक तक्रारीचा मला तो एक भाग वाटला आणि म्हणून अश्या प्रकारच्या तक्रारी मांडण्याकरता सर्वांनाच एक कॉमन व्यासपीठ मिळावे जेणेकरून पंचायत समितीला त्याकडे लक्ष देणे सोपे जाईल, या एकाच हेतूने मी हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. अन्य काहीच कारण नाही! तरीही पुन्हा एकदा क्षमस्व!

मला असं वाटतं की इस्कुटराव आणि मनिषराव या दोघांनीही आपली म्हणणी मांडली आहेत तरी यावर पंचायत समितीने आता योग्य तो न्यायनिवाडा करण्याची वेळ आलेली आहे. सरपंच पंचायत समितीच्या निकालाची वाट पाहात आहेत...:)

आपला,
(कट्टर लोकशाहीवादी) तात्या.

मनिष's picture

11 Nov 2007 - 12:45 pm | मनिष

खुलेआमच ठरू दे!
"ignore this person" - असा पर्याय आहे का? तेवढीच डोक्याला शांतता! :)