तीर्थजननी नर्मदामैय्या आणि मी.

खुशि's picture
खुशि in भटकंती
20 Aug 2014 - 7:16 pm

खुपजण विचारतात नर्मदापरिक्रमा केल्याने काय वाटले, काय मिळाले. उत्तर आहे आत्मिक समाधान. जनतेत असलेली नर्मदेवरची श्रद्धा, असलेली सेवाभावी वृत्ती, माणुसकीचे दिव्यदर्शन, नर्मदाकिनारी असलेले अप्रतिम निसर्गसौन्दर्य, सुन्दर पक्षी, सायन्काळी प्रवाहात दिवे सोडल्यावर दिसणारे मैय्याचे काळी चन्द्रकळा सोनेरी किनारीची नेसलेले सुन्दर मनमोहक रुपडे.

प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले. जन्गलात राहणारे आदिवासी, खेड्यात राहणारे शेतकरी ते लहानमोटठ्या शहरात राहणारे नागरीक, गरीबातील गरीब, मध्यमवर्गी, श्रीमन्त, हिन्दू-मुसल्मान शीख ईसाई सर्वधर्मीय लोक नर्मदाकिनारी राहणारे सर्वच नर्मदेला मैय्या म्हणतात, तिला पुजतात, सर्वच जण परिक्रमावासीना मान देतात सर्वोतोपरी त्यान्च्या सेवेला तत्पर असतात एवढेच नव्हे तर गावोगावी अहमहमिकेने पुढे येतात स्वागतासाठी.

मी अगदी सामान्य आहे, लिहिता येत नाही असे खुप काही मिळाले मला. समुद्रात सुर्यास्त होताना आपण नेहेमीच पाहतो आणि प्रत्येक वेळ आकाशीची ती रन्गपन्चमी पाहताना आपले भान हारपून जात, मध्यरात्री जीव मुठीत घेऊन कसेबसे नावेत बसल्यावर थन्डीत कुडकुडताना आकाशातील चान्दण्या पाहताना भान हरपुन गेले, भिती कुठे पळून गेली हे समजलेच नाही, आणि पहाटे चन्द्रास्त पाहताना चन्देरी रुपड आकाशाचे आणि रत्नसागराचेही. अप्रतिम. दुसरे शब्दच नाहीत. चन्द्र मावळला आणि अरुणोदय झाला क्षणभरात चन्देरी नभ, सागर सोनेरी रन्गात रन्गुन गेले. दिव्यदर्शन होते. किती लिहू आता शब्द नाहीत माझ्या जवळ. नर्मदे हर!

प्रतिक्रिया

विलासराव's picture

20 Aug 2014 - 7:19 pm | विलासराव

हर हर नर्मदे!!!!!!!!!

नर्मदे हर!! कसे आहात विलासराव?

प्रसाद गोडबोले's picture

20 Aug 2014 - 7:36 pm | प्रसाद गोडबोले

आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदचि अंग आनंदाचे !!

अगदी खरे नर्मदामैय्या आनन्दाचे नन्दनवनआहे.

कवितानागेश's picture

20 Aug 2014 - 8:34 pm | कवितानागेश

प्रतिकुलता असतानाही माणसाने कसे आनन्दी रहावे, अडचणीन्वर मात करुन कसे जगावे, हे शिकायला मिळाले.>
हे खूप महत्त्वाचे अहे. :)

खुशि's picture

21 Aug 2014 - 6:32 pm | खुशि

धन्यवाद.

व्वा !नर्मदा एकदा पाहिलीय माहेश्वरला आणि ओंकारेश्वरला पण बाकी अनुभव परिक्रमाच्या वाचनातून मिळाला .बेटवा पाहिली ओर्च्छाला .तीपण आवडली .उज्जैनच्या क्षिप्रा नदीचं माहात्म्य (पौराणिक)मात्र कळलं नाही .एवढी मोठी पुरी तिथे वसावी ?मध्य प्र०पर्यटन खात्याने एक सुरेख माहितीपत्रक उज्जैनसाठी बनवून घेतले आहे .दोन बाइ अडीच फुटी फिकट गुलाबी कागदावर एका बाजूस मोठा नकाशा आहे .दुसऱ्या बाजूस सुंदर रेखाचित्रे रथिन मित्रा या चित्रकाराची आहेत आणि थोडक्यात माहिती .संग्राह्य आहे .पुन्हा परिक्रमेकडे वळून आमच्या एक स्नेह्यांकडे ओंकारेश्वरला यांना जी वही शिक्के मारून देतात ती पाहण्यास मिळाली आणि मार्गदर्शक पुस्तकही .
लिहित राहा आणि आणखी मनासारखे पर्यटन घडो .

मीही साम्भाळून ठेवले आहे.माझ्याकडे परिक्रमेत चालताना वाटेत मिळालेली विविध रन्गाची पाने-पिसे,दगड खुपसे काय काय आहे.मला मैय्याच्या पात्रात एक दगड मिळाला आहे त्यावर ओम अक्षर आहे नैसर्गिकपणे उमटलेले.नर्मदामैय्या माझ्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा आहे.

सस्नेह's picture

20 Aug 2014 - 9:30 pm | सस्नेह

खूप दिवसान्नी तुम्हाला पाहून नर्मदामैया भेटल्याइतका आनंद झाला !
..स्वागत मिपावर.

मलाही खुप आनन्द झाला आहे.पासवर्ड सापडत नव्हता माझा त्यामुळे काय करावे,कसे करावे समजत नव्हते नयनाशी फोनवर बोलणे झाले होते पण हे सान्गायचे विसरले होते आता अनाहिताची सदस्य झाले की खुप गप्पा मारुया.

सस्नेह's picture

21 Aug 2014 - 8:38 pm | सस्नेह

पण त्यासाठी अनाहिताची वाट पाहण्याची गरज नाही.
खवत यावे

पैसा's picture

21 Aug 2014 - 11:10 pm | पैसा

अवघा आनंदी आनंद! छान लिहिलंत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Aug 2014 - 11:50 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडलं, पण थोडस विस्कळीत आणि हातचे राखून लिहिल्यासारखे वाटले.

मनमोकळेपणे लिहा, वाचायला आम्ही उत्सुक आहोत.

पैजारबुवा,

खुप मस्त आहेत , मलाही परीक्रमेची इच्छा आहे, पाहुयात कसं जमतंय ते.

आचरट's picture

16 Sep 2014 - 4:18 pm | आचरट

तुम्ही अतिशय ओघवत्या शैलीमधे आणि प्रौढी न मिरवता लिखाण केले आहे. वाचुन परिक्रमा केल्याचा आनंद मिळाला.
तुमच्या दुसर्या परिक्रमेमधे आलेले काही अनुभव असतील तर ते हि टाकाना.