पिझ्झा ऑन (थीन क्रस्ट) ब्रेड!!!

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
4 Aug 2014 - 1:56 pm

Final 1

साहित्यः

पिझ्झा सॉस साठि:(करायचा कंटाळा असेल तर रेडिमेड बाजारात मिळतो)
१. लालबुंद टोमॅटो - ३
२. ४ ते ५ पाकळ्या लसुण
३. १ छोटा बाउल ऑलिव्ह ऑईल
४. १/२ छोटा बाउल टोमॅटो केचप
५. पिझ्झा सीझनींग (हे रेडिमेड मिळतं) - २ चमचे
६. चवीनुसार मीठ

Sauce 1

कॄती:
१. टोमॅटोंना + चीर देउन उकळत्या पाण्यातुन एक ३-४ मि. घालुन ब्लांच करुन घ्या. गार झाले कि सालं काढुन मिक्सर मधे प्युरे करुन घ्या.

Sauce 2 Sauce 3

२. लसुण पाकळ्या सोलुन बारीक चीरुन घ्या. आता कढईत तेल तापलं कि बारीक चीरलेला लसुण घालुन परतुन घ्या.

Sauce 4 Sauce 5

३. लसुण सोनेरी झाला कि प्युरे + केचप एकत्र करुन घाला व मंद आचेवर सतत ढवळत रहा. बाजुच्या कडेने तेल सुटु लागलं कि पिझ्झा सीझनींग मसाला थोडा तळहातावर क्रश करुन घाला.

Sauce 6 Sauce 7

४. सॉस स्प्रेड करण्याईतपत घनता आली कि गॅस बंद करा. पिझ्झा सॉस तयार आहे.

Sauce 8

टिप: हे रेडिमेड पिझ्झा सीझनींग जर मिळालं नाहि तर ड्राय बेसील, ओरॅगॅनो, ईटालीयन मिक्स हर्ब्स प्रत्येकि १ चमचा घ्या आणि हलकेच क्रश करुन घाला

आता थीन क्रस्ट ब्रेड पिझ्झा साठि:

साहित्यः
१. स्लाईस ब्रेड
२. लाल, पिवळि, हिरवी भोपळि मिरची - प्रत्येकि १ चौकोनी चीरुन
३. ब्लॅक ऑलीव्हज - ३ चमचे
४. २ मध्यम कांदे चौकोनी चीरुन
५. मोझ्झेरेला किंवा आपापल्या आवडिचं चीझ
६. पिझ्झा भाजण्यासाठि तेल किंवा बटर
७. आवडत असल्यास मश्रुम्स (मी विसरलो *wink*

Bread 1

कॄती:
१. एका बाउल मधे चौकोनी चीरलेल्या भोपळि मिर्च्या, कांदा आणि ब्लॅक ऑलीव्ह्ज घालुन एकत्र करा.

Bread 2

२. आता थीन क्रस्ट ईफेक्ट साठि ब्रेड स्लाइस घेउन पोळि लाटतो त्या प्रमाणे लाटुन घ्या. अश्या सर्व स्लाईस करुन घ्या.

Bread 3 Bread 4

टिपा:
१. थीन क्रस्ट ब्रेड नको असेल तर स्लाईस तशीच ठेवा. थीक क्रस्ट होईल.
२. अधीक हेल्दि/पौष्टिक करण्यासाठि ब्राउन किंवा मल्टि ग्रेन ब्रेड घेउ शकता.

फायनल असेंबलींगः

१. नॉन स्टिक तवा मंद आचेवर तापत ठेवा. पोळपाटावर सपाट केलेली ब्रेड स्लाईस ठेवुन त्यावर पिझ्झा सॉस लावा.

Bread 5

२. एकत्र केलेल्या भाज्या हलकेच सर्व बाजुनी पेरा. मोझ्झेरेला चीज घालुन टॉपअप करा.

Bread 6

३. मंद आचेवर आधी एक २ मि. भाजा. मग झाकणं ठेवुन चीझ वितळेस्त भाजा. तो पर्यंत ब्रेडची खालची बाजुहि मस्त खरपुस होईल. ओव्हन असेल तर बेक करा (त्यावर असलेल्या सुचनांनुसार). गॅस मंदच असु द्या अन्यथा ब्रेड खालुन करपेल.

Bread 7 Bread 8

४. गर्मागरम ब्रेड पिझ्झाचा लुफ्त घ्या

टिपा:

१. आवडत असल्यास सर्व करतेवेळि वरुन चीली फ्लेक्स / पारमेझान चीज घालायला विसरु नका.
२. नॉन व्हेज वाले ह्यात त्यांच्या आवडिने व्हेरीएशन्स करु शकतात.
३. भाज्या अश्याच थोड्याश्या वाफवुन मस्त क्रंची राहतात पण तश्या नको असतील तर टॉपींग करण्याआधी कढईत घालुन एक/दोन वाफा काढुन घ्या. पण त्यात मजा येत नाहि आय मीन खाताना त्या ओलसर लागतात आणि वाफवल्यामुळे कदाचीत ब्रेडवर नीट सेट होणार/बसणार नाहित.
४. ह्याच ब्रेडचे चार भाग केले कि बाईट साईझ मिनी पिझ्झा ह्या नावाने पार्टि स्टार्टर म्हणुन सर्व करता येतील.
५. हा असा सॉस रेडि करुन ठेवला कि झट्पट कधीहि मनात आल्यावर पिझ्झाचा लुफ्त घेता येईल. काय मग कोसळणारा धो धो पाउस, हे असे बाईट साईझ पिझ्झा आणि वाफाळणारा आलं किंवा पाती चहा घालुन केलेला चहा....कस वाटतं चित्र??? चियर्स... *drinks*

Final 2

प्रतिक्रिया

गणपा's picture

4 Aug 2014 - 2:01 pm | गणपा

मस्त आणि झटपट !

शिद's picture

7 Aug 2014 - 3:37 am | शिद

असेच म्हणतो.

फोटो व पाकृ एकदम झक्कास्स्स्स. *ok*

शिद's picture

7 Aug 2014 - 3:37 am | शिद

असेच म्हणतो.

फोटो व पाकृ एकदम झक्कास्स्स्स. *ok*

त्रिवेणी's picture

4 Aug 2014 - 2:13 pm | त्रिवेणी

मस्त आयडिया. अशाच तिखट पाककृती येवु द्या.

मुक्त विहारि's picture

4 Aug 2014 - 2:45 pm | मुक्त विहारि

आणि

उत्तम फोटो आणि एकंदरच सुंदर सादरीकरण..

(बादवे, सोमवारी पा.क्रु. टाकल्याबद्दल धन्यवाद...)

ब़जरबट्टू's picture

4 Aug 2014 - 3:05 pm | ब़जरबट्टू

आवडला... *ok* झक्कास...

( स्वगत :- हे एक स्मायल्यांचे बेष्ट्र झाले राव.... *ok* *biggrin* *mosking* *new_russian* *drinks* )

पिलीयन रायडर's picture

4 Aug 2014 - 3:06 pm | पिलीयन रायडर

आवडलं!!!!! झक्कास!!!

सर्वसाक्षी's picture

4 Aug 2014 - 3:11 pm | सर्वसाक्षी

झट्पट शाकृति आवडली, लगेच करुन पाहणार.
धन्यवाद

साक्षी

सविता००१'s picture

4 Aug 2014 - 3:30 pm | सविता००१

काय बेक्कार माणूस आहेस रे तू....... सतत छळवाद आणि तोही सुंदर. काय करावं आम्ही? *sad*

पिंगू's picture

4 Aug 2014 - 3:30 pm | पिंगू

एक नंबर आयडिया..

प्रभाकर पेठकर's picture

4 Aug 2014 - 3:32 pm | प्रभाकर पेठकर

व्वा! झकास! असे पदार्थ पाहिले की मन आवरत नाही.

कसे वजन कमी करू? बिपिन कार्यकर्त्यांना गुरू केलं पाहिजे.

पैसा's picture

4 Aug 2014 - 3:33 pm | पैसा

हा दुष्ट माणूस आला परत! पण यावेळची पाकृ जरा सोप्पी आहे! करून बघेन!

कढई फारच काळी झालीये नै?

हुश्शः जळजळ कमी झाली...

दिपक.कुवेत's picture

4 Aug 2014 - 3:46 pm | दिपक.कुवेत

ह्म्म्...तु येतोयस का घासायला?? का भारतात येताना आणु? तेवढेच तुझे ईकडे यायचे कष्ट वाचतील *blum3*

सूड's picture

4 Aug 2014 - 4:17 pm | सूड

*ROFL*

चांगला दिसतोय ब्रेड पिझ्झा!

रायनची आई's picture

4 Aug 2014 - 4:13 pm | रायनची आई

सोपी आणि चविष्ट पाककृती. वीकेंड ला नक्की करून बघणार..

यशोधरा's picture

4 Aug 2014 - 4:24 pm | यशोधरा

लय भारी! *man_in_love*

आवडली पाकृ० . पावसात मस्तच .कढईचं मनावर घेतलं नाहीये .

अनन्न्या's picture

4 Aug 2014 - 6:13 pm | अनन्न्या

मस्त आवडती डीश! मी पण फ्राय पॅनमध्येच करते पिझ्झा, त्या वेगवेगळ्या रंगाच्या भोपळी मिरच्या मिळत नाहीत.

पैसा's picture

4 Aug 2014 - 8:01 pm | पैसा

मारुतीमंदिरच्या बस स्टॉपशेजारी (स्टेडियमसमोर) मिळतात.

कवितानागेश's picture

4 Aug 2014 - 6:36 pm | कवितानागेश

मस्तच दिसतोय. रन्गित रन्गित. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2014 - 6:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता पाऊस पडतोय इथे. आणा बाईटसाईझ्द्ड चखणा आणि बसुया व्हरांड्यात मस्त पावसाची मजा पाहत... *drinks* *ok*

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2014 - 7:30 pm | स्वाती दिनेश

ब्रेड पिझ्झा छान दिसतोय..
स्वाती

हे नक्की करता येईल - प्रयत्न करतो! :-)

भाते's picture

4 Aug 2014 - 7:58 pm | भाते

नक्की करून बघेन.
श्रावण संपल्यावर चिअर्स!
चहाबरोबर खाण्यापेक्षा, श्रावण संपल्यावर, रंगीत पाण्याबरोबर चकणा म्हणुन खायला आवडेल.
अर्थातच, तोपर्यंत पावसात स्वत: करून खायला आवडेल.
याआधीच्या सोमवारी टाकलेल्या पाकृ माफ. :)
श्रावण संपेपर्यंत अश्याच शाकाहारी पाकृ आणखी येऊदे.

एक प्रश्न - ३ टोमॅटो साठी अख्खा १ बाऊल ऑलिव्ह ऑइल जास्त नाही का?

दिपक.कुवेत's picture

6 Aug 2014 - 10:39 am | दिपक.कुवेत

तेल अंमळ जास्त झालयं खरं. मला वाट्तं १/२ बाऊल पुरेल.

खुलाशाबद्द्ल धन्यवाद! बाकी नेहमीचेच.... :-)

प्यारे१'s picture

4 Aug 2014 - 8:24 pm | प्यारे१

कसलं भारी!

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2014 - 8:48 pm | अत्रुप्त आत्मा

भूक..भंयंकर चाळवणारे फोटू! ;) आणि वर्णनंही! *biggrin* शेवटाच्या फोटुतले दोन्ही,कल्पनेनी(म्हणजे माझ्या मनानी केलेल्या! *man_in_love* ) उचलून...वचावचा खाऊन टाकणेत आलेले आहेत! *i-m_so_happy*

सानिकास्वप्निल's picture

4 Aug 2014 - 9:18 pm | सानिकास्वप्निल

छान दिसतय चीझ् चिली टोस्ट :)
असेच मिनी पिटा ब्रेड पिझ्झा पण करता येतात.

सुहास झेले's picture

4 Aug 2014 - 9:51 pm | सुहास झेले

सहीच... नक्की करून बघणार :)

अजया's picture

5 Aug 2014 - 7:07 am | अजया

आजच करणार आहे.

प्रचेतस's picture

5 Aug 2014 - 8:54 am | प्रचेतस

हे शाब्बास...!!!!!!!

नेक्स्ट टाईम ट्राय करेन
IMG_20140522_174059664

बनवला,मस्त झाला होता,माझ्या लेकाला फार आवडला. विशेषतः पिझ्झा सॉस आणि थीन क्रस्ट !

दिपक.कुवेत's picture

6 Aug 2014 - 10:43 am | दिपक.कुवेत

अजुन एक कल्पना सुचली आहे. जर पिझ्झा नको असेल तर सॉस तसाच ठेवुन भोपळि मिरच्या, कांदा, उकडलेले बटाटे आणि काकड्या गोल कापुन पिझ्झा चिझ सॅन्डविच बनवु शकतो. पिझ्झा चा फ्लेवर आणि सॅन्डविच ची मजा...दोन्हिहि.

अनन्त अवधुत's picture

13 Aug 2014 - 5:50 am | अनन्त अवधुत

एक तर आहे हीच पाककृती तोंडचे पाणीपिपासू आहे , त्यात आणखी उपप्रकार कशाला. येत्या शनिवारी / रविवारी मुख्य पाकृ करून पाहण्यात येईल.

इशा१२३'s picture

12 Aug 2014 - 9:59 am | इशा१२३

मस्त!!मी वाटीने ब्रेड गोल कापून घेते.आणि छोटे पिझ्झा बनवते असेच.
पण पिझ्झा सॉसची कृती मला नविन.आवडली.मी तयार सॉस वा एखादे स्प्रेड वापरते.असा ताजा सॉस करेन आता.याची चव नक्कीच जास्त छान लागत असेल.

सुजल's picture

17 Aug 2014 - 7:14 pm | सुजल

मस्त पाक्रु :)

पिझ्झा सॉसची पाकृ आवडली. करुन पहाण्यात येइल अन रिझल्टस कळवण्यात येतील.

विशारद's picture

9 Sep 2014 - 8:13 pm | विशारद

आल्मोस्ट असाच पिझ्झा केला होता.
फक्त मैदा पोटात नको जायला, म्हणून देसी चवी वापरल्या होत्या.
पिझ्झा बेस म्हणून थालिपीठ वापरले होते.
शिवाय चिली फ्लेक्स वापरले होते सर्व्ह करताना...

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 11:10 am | दिपक.कुवेत

थालीपीठ पिझ्झा बेस म्हणून वापरायला ठिक आहे पण भाजणीला मुळातच स्वःताची अशी एक चव असते त्यात पिझ्झा आयटम घातले तर चवींचाच पिझ्झा होईल. मैदा अगदिच टाळायचाच असेल तर मल्टि ग्रेन किंवा बाउन ब्रेड वापरु शकतो. ब्रेडच टाळायचा असेल तर बेस्ट आपल्या कणकेच्या पोळ्या/फुलके (जरा जाडसर लाटलेल्या).

पोळ्या/फुलके ऐवजी?

दिपक.कुवेत's picture

10 Sep 2014 - 9:26 pm | दिपक.कुवेत

भाकरी (पातळ लाटलेली) किंवा पिटा ब्रेड हे ऑप्शन्स आहेत. जाडसर डोसा किंवा उत्तपा कितपत क्रिस्प होईल शंका आहे. पातळ डोसा क्रिस्प/कुरकुरीत असतो पण त्यावर टॉपिंग्ज बसणार नाहित. बेसीकली ज्या पदार्थाचा बेस जाड आहे आणि शेकल्यावर क्रिस्प होउ शकतो असं काहिहि चालेल.