गोळ्यांची आमटी

इशा१२३'s picture
इशा१२३ in पाककृती
2 Aug 2014 - 8:03 pm

गोळ्यांसाठी साहित्यः
डाळीचे पीठ १ वाटी
ज्वारी पीठ २ चमचे
तांदूळ पीठ २ चमचे
तिखट २ चमचे
लसूण १ चमचा ठेचलेला
आले १/४ चमचा
जिरे १ लहान चमचा
हिंग चिमुटभर
हळद चिमुटभर
खा.सोडा चिमुटभर
मीठ चवीनूसार
तेल २ चमचे (मोहनासाठी)
g1
कृती : प्रथम सर्व साहित्य एकत्र करून घेणे.त्यात २ चमचे तेल कडकडीत गरम करून घालणे.
g2
या मिश्रणात पाणी घालून गोळा भिजवणे.हाताला तेल लावून त्याचे लहान लहान गोळे बनवून घेणे.कढईत पाणी उकळायला ठेवून त्यात चमचाभर तेल घालणे.या उकळत्या पाण्यात एक एक गोळे टा़कून ५ ते ७ मिनिट उकळणे.गोळे हलके होउन वर येतात.गोळे चाळणीत काढून घेणे.(पाणी फेकू नये. आमटीसाठी वापरता येते.)हे गोळे तेलात तळून घेणे.
g3
आमटीचे साहित्यः
कांदे २ मोठे भाजलेले
खि.खोबरे १/४ वाटी
धनेजिरे पावडर १ चमचा
गरम मसाला १/२ चमचा
लसूण ४-५ पाकळ्या
आले १/२ चमचा
मिरे ३-४ दाणे
लवंग २
तिखट २ चमचे
दालचिनी २ पेरभर तुकडा
शहाजिरे १ लहान चमचा
तमालपत्र १
कोथिंबीर २ चमचे
g4
कृती: प्रथम कांदे गॅसवर भाजून घेणे.(कांद्यात सुरी खुपसून भाजता येइल.)खडा मसाला किंचित गरम करावा.खोबरे भाजून घ्यावे.भाजलेले कांदे व इतर साहित्य(गरम मसाला सोडून) मिक्सरवर थोडे पाणि घालून वाटून घ्यावे.
g5
तयार वाटण तेलाची फोडणी(हळद नंतर घालावी) करून त्यात किंचीत साखर आणि तिखट घालावे.तिखट करपू न देता त्यात वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतणे.त्यात हळद गरम मसाला घालावा.हवे तेवढे पाणी(गोळे उकळलेले पाणी वापरावे)घालून उकळी आणावी.
आमटी वाढते वेळी गोळे त्यात सोडावेत.
गरम आमटी भाकरी,पोळी,भात कशाबरोबरही खाउ शकता.=) :smile:
g6

प्रतिक्रिया

कंजूस's picture

2 Aug 2014 - 8:29 pm | कंजूस

कांदा न घालता आणि गोड न केलेली आम्ही करतो .कधीकधी हेच गोळे कढीत घालतो .लसुणाची फोडणी वाली कढी .
फोटो छान आले आहेत .

मधुरा देशपांडे's picture

2 Aug 2014 - 8:53 pm | मधुरा देशपांडे

झक्कास फोटो आणि पा़कृ.

दिपक.कुवेत's picture

2 Aug 2014 - 9:02 pm | दिपक.कुवेत

गोळ्यांची आमटि. प्रकारहि नविन दिसतोय. आवडला. ह्या पिठात बदल म्हणुन जेव्हा सीझन येईल तेव्हा बारीक चीरलेली मेथीहि छान लागेल. नेहमी उपलब्ध असणारा पालकहि घालता येईल. ईनफॅक्ट माझ्या मते बारीक चीरलेली कुठलिही भाजी छान लागेल...गाजर, कोबी, कांद्याची नुसती हिरवी पात ई.

हो भाज्या घातलेले गोळे छानच लागतात पण मग ते तळल्यावर सरळ पोटातच जातात.आमटीसाठी उरतच नाहित.=) :smile:

मुक्त विहारि's picture

2 Aug 2014 - 9:18 pm | मुक्त विहारि

आमच्या मातोश्री ही आमटी फार मस्त करतात.

पैसा's picture

2 Aug 2014 - 10:46 pm | पैसा

अगदी व्यवस्थित तपशीलवार लिहिले आहेस. फोटोही छान आलेत. नक्कीच छान लागत असणार!
(तुझ्याकडेही भांड्यांचं मस्त कलेक्शन आहे हे लक्षात आलंय! *biggrin* )

एस's picture

4 Aug 2014 - 12:05 pm | एस

(तुझ्याकडेही भांड्यांचं मस्त कलेक्शन आहे हे लक्षात आलंय! )

अगदी अगदी. आमच्याकडे नाय ना असली भांडी. नायतर डझनभर पाकॄ आमीबी टाकल्या असत्या. हाय काय अन् नाय काय! ;-) फोटु काडलं की लोक इच्चारत्याती कोन्ता क्यामरा हाय भाऊ? पाकृला आमी इच्चारतो का कंदी आमटी कडाक झालीयं, कोन्ती कढई वापरता हो तुमी? :-D

भांड्याच कलेक्शन...धन्यवाद ताई... =) :smile:

मस्तच! फोटू, कृती सगळे छान आलेय. सवडीने करणारच गं!

भिंगरी's picture

2 Aug 2014 - 10:55 pm | भिंगरी

आम्हीही करतो,पण गोळ्यांमध्ये ज्वारी आणि तांदळाचे पीठ नाही घालत,पण आता करून पाहीन.

चौकटराजा's picture

3 Aug 2014 - 8:30 am | चौकटराजा

आमच्याकडे ही आमटी कांदा न घालता चिंच व गूळ घालून करतात. पिठल्याप्रमाणे हरबरा डाळीचे पीठ ही लावतो.
महिन्यातून एकदा तरी बदल म्हणून संध्याकालच्या जेवणात होते. पातळ भाकरीशी मस्त लागते. भाताशी ही आवडते.

मदनबाण's picture

3 Aug 2014 - 9:47 am | मदनबाण

वा ह... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Gulabi... ;) { शुद्ध देसी Romance }

Maharani's picture

3 Aug 2014 - 3:07 pm | Maharani

वा वा छान *ok*

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2014 - 3:11 pm | स्वाती दिनेश

गोळ्यांची आमटी छान दिसतेय,
स्वाती

पिंगू's picture

3 Aug 2014 - 3:48 pm | पिंगू

एक नंबर जीवघेणी आमटी...

- पिंगू

प्यारे१'s picture

3 Aug 2014 - 4:01 pm | प्यारे१

बेष्ट दिसतेय.

अनन्न्या's picture

3 Aug 2014 - 5:11 pm | अनन्न्या

मी माहेरी गेले की आई ही आमटी, कुळथाची उसळ आणि कळण हे करतेच!
आमच्याकडे गरम मसाला न वापरता गोडा मसाला वापरतात.
आता तुझ्या पध्दतीने करून पाहते.

सानिकास्वप्निल's picture

3 Aug 2014 - 6:28 pm | सानिकास्वप्निल

गोळ्यांची आमटी छान दिसतेय , वेगळी पद्धत आवडली :)

आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात व आमटीत चिंच - गुळाचाही वापर करतात.

>>आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात

+१

प्रभाकर पेठकर's picture

5 Aug 2014 - 10:42 am | प्रभाकर पेठकर

आमच्याकडे चण्याची डाळ भिजवून, वाटून त्यात इतर जिन्नस घालून गोळे केले जातात.

आमच्याकडेही. विशेषतः कढी-गोळे करताना. आलं-हिरव्या मिरच्या-जीरं-कोथिंबीर-मीठ इ.इ.इ. जिन्नस चण्याच्या वाटलेल्या डाळीत मिसळून गोळे उकडून कढीत सोडले जातात.

हो मी तूमच्याच पद्धतिने करते. इडली पात्रात उकडुन.

अशीही करून पहाते..धन्यवाद..

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2014 - 12:14 am | अत्रुप्त आत्मा

*good*

मृत्युन्जय's picture

4 Aug 2014 - 12:00 pm | मृत्युन्जय

एकदमा खणखणीत आणी चमचमीत. गोळ्यांची आमटी हा एक अतिशय आवडता खाद्यपदार्थ आहे.

त्रिवेणी's picture

4 Aug 2014 - 2:17 pm | त्रिवेणी

गोळे न उकळता डायरेक्ट तळणार.

सविता००१'s picture

4 Aug 2014 - 2:41 pm | सविता००१

आम्हीही ज्वारी, तांदूळ पीठ नाही वापरत. आता अशीपण करून पाहीन. एकूणच आवडता प्रकार

सर्व प्रतिसादाबद्दल आभार..=) :smile:

फोटोत गुलाबजामुअन दिसले मला... ;)
मस्त अन सव्विस्तर रेसिपी.