दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातील अनागोंदी कारभाराला कावलेल्या शिवसेना खासदारांनी राडा केला आणि त्यांच्या न्याय्य आणि उचित मागण्या मागे पडल्या आणि एका सच्चा रोझेदार मुस्लिमाला त्याचा रोजा भंग करायला लावण्याचे महामहामहापाप त्यांच्या डोक्यावर बसले. मूळ समस्या साफ मागे पडली आणि नसते लचांड गळ्यात पडले. आता दादापुता करुन आपण मुस्लिमांचे तारणहार कसे आहोत. सर्व धर्मांचा आपण कसा आदर करतो वगैरे फालतू आणि खोटारडी बडबड शिवसेनेच्या विविध नेत्यांच्या तोंडून ऐकावी लागत आहे.
महाराष्ट्र सदनाच्या प्रशासनाची जबाबदारी असणारा हरामखोर मराठीद्वेष्टा कुणी मलिक नामक महाभाग ज्याच्या पार्श्वावर लाथ मारुन त्याला त्या पदावरुन हाकलून द्यायची गरज आहे तो आता पार विसरला गेला आहे.
शिवसेना आणि तिचे खासदार मूर्ख आहेत असे वाटते. राजकीय मुत्सद्दीपणा जो खासदार माणसाकडे असायला हवा त्याचा पूर्ण अभाव दिसतो आहे. पत्रकार, छायाचित्रकार यांचा गोतावळा घेऊन हे खासदार म. सदनात गेले. हा सूर्य आणि हा जयद्रथ असे पुराव्यानिशी शाबित करण्याची सुवर्णसंधी ह्या खासदारांना मिळाली होती पण राडेबाजीच्या सोसामुळे ह्या संधीची त्यांनी अगदी माती केली. आता भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ ह्या पुंगवांवर आली आहे.
असल्या बिनडोक पक्षाबरोबर युती केल्याचा बहुधा भाजपालाही पश्चात्ताप होत असावा. पण आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून मूग गिळून बसण्यापलीकडे ते काही करु शकत नाहीत.
प्रतिक्रिया
25 Jul 2014 - 10:25 am | समीरसूर
खरे आहे. अरेरावी आणि दादागिरीची नशा वाईटच. बातमीमध्ये येण्यासाठी असे सनसनीखेज कृत्य केले जाते. सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकारण्यांनी सभ्यता सोडलेलीच आहे. गुंडगिरी हाच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा स्थायीभाव झाला आहे. राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, मनसे असो, किंवा अजून कुठलाही पक्ष असो; 'राडा', 'खळ्ळखटॅक', 'नाद नाय करायचा', 'बघतोस काय, मुजरा कर', 'होऊ दे खर्च', 'बघतोस काय रागानं?' छाप गुंडगिरीसदृष्य राजकारण चालू आहे. अर्थात सगळीकडेच थोड्या-फार प्रमाणात अशीच दडपशाही चालू आहे. सामान्य माणूस गपगुमान लांबच राहतो; निमूटपणे सगळे सहन करतो.
आता अर्थातच शिवसेनेच्या मागे नसतं झेंगट लागलं आहे हे खरं. मला वाटते उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे माफी मागून विचारेंना जरा झापलं असतं तर प्रकरण थोडं शमलं असतं पण यांचे इगो हिमालयाएवढे असतात. चूक प्रांजळपणे कबूल करून जाहीर झापाझापी (निदान तोंडदेखली) केली की प्रकरणं लवकर थंड होतात.
25 Jul 2014 - 10:42 am | प्रमोद देर्देकर
कशाला असल्या रटाळ विषयावर इकडे चर्वितचर्वण करुन उगा मि.पा. चे वातावरण खराब करायचे.
सालं त्या प्रसिध्दि माध्यामांना काय कमी उद्योग आहेत. नेते ते प्रसारमाध्यमे सगळे एक जात आपली पोळी भाजुन घेणारे भाडखाव आहेत.
25 Jul 2014 - 10:53 am | खटपट्या
दर्दुकाका, विषय रटाळ नाही वाटत मला. महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्रातल्या खासदारांना दिली जाणारी अपमानजनक वागणूक हा मुद्दा चपाती प्रकरणामुळे झाकोळला गेलाय.
25 Jul 2014 - 10:46 am | पुतळाचैतन्याचा
नेम चुकला हेच बरोबर आहे.
25 Jul 2014 - 11:39 am | नाव आडनाव
जिथे तिथे "शिवसेना स्टाईल" असं म्हणून तोडफोड करायची आणि त्यालाच आंदोलन म्हणायचं ही एकंच गोष्ट राहिलीये यांना करायला. मी स्वतः शिवसेनेचा कार्यकर्ता नसलो तरी समर्थक होतो, पण या लोकांनी सचिन तेंडूलकर ला दम दिला आणि वर त्याचा समर्थन सुद्धा केलं तेंव्हापासून यांची "स्टाईल" पटेनाशी झाली. आणि "आम्ही (? नवे साहेब स्वतः ची मतं मांडताना सामनाच्या संपादकीय मध्ये "आम्ही..." म्हणतात :) ) मुस्लिमांच्या विरोधात नाहीत, फक्त गद्दारांच्या विरोधात आहोत" असं जेंव्हा म्हणतात (सामानाच्या भाषेत साहेब डरकाळी फोडतात, ठनकावतात , खडसावतात, सुनावतात, ऐकवतात :)) तेंव्हा ते खरंच हास्यास्पद वाटतं. मतांसाठी कायपण.
25 Jul 2014 - 11:47 am | नानासाहेब नेफळे
दिल्लीत मराठी माणसे राडा करतात/ करु शकतात हे बघुन आनंद वाटला, रोझेचा मुद्दा बळच उकरुन काढला आहे,त्यात तथ्य नसावे व फार स्पष्टीकरण द्यायची गरज नाही .अनेक पक्षाचे खासदार त्यात होते वा टेलिव्हिजनवर दिसले ,फक्त नेतेगिरी करण्याच्या नादात सेना अडकली.
25 Jul 2014 - 11:47 am | प्रसाद गोडबोले
ह्या देषात आता आंदोलन करताना सुध्दा लोकांचा धर्म बघुन करावे लागणार तर ...
25 Jul 2014 - 12:04 pm | मृत्युन्जय
आंदोलन करण्यात काहिच चूक नाही. पण एखाद्या माणसाच्या तोंडात बळजबरीने अन्न कोंबण्याचा प्रयत्न करणे मुर्खपणा आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना दिली जाणारी वाईट वागणूक हा मुख्य मुद्दा होता. तसे असेल तर त्याचा योग्य मार्गाने निचरा करणे योग्य होते.
पत्रकारांना बरोबर घेउन जाउन कसे कदान्न वाढले जाते हे सिद्ध केले असते आणि योग्य ते नमुने घेउन अन्न आणि औषध खात्याकडे तक्रार केली असती तर काम झाले असते. पण यांना हिरोगिरी करायची होती आणि माजही आला होता. नसते पालथे धंदे करायला गेले.
या सगळ्यात आयआरसीटीसी ची झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली. निकृष्ट अन्नपदार्थ पुरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हायची बाजुलाच राहिली. वर त्यांनी चोर तो चोर वर शिरजोर या न्यायाने धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा केला आणी साळसूदपणाचा आव आणुन स्वतःच सेवा बंद केली.
बिपिन मलिक तर या सर्वांचा सवाई निघाला. त्याच्यावरच्या मराठी खासदारांचा रोष भलतीकडेच राहिला. आयआरसीटीसी ला पुढे करुन परत तो नामानिराळाच.
बळजबरीने त्या सुपरव्हायजरला घास भरवायचा प्रयत्न करुन शिवसेनेच्या खासदारांनी मातीच खाल्ली. अन्नाचा दर्जा राखणे हे त्याचे काम असेलही. जर तो त्याच्यात चुकत असेल तर त्याची चुक सिद्ध करुन त्याच्यावर कारवाई करायला भाग पडणे एवढ्या मोठ्या खासदारांना अवघड नसावे. पण सत्ता आणि अधिकार यांच्या माजातुन आलेली मुजोरी आणि सुसंस्कृतपणाचा मुळचा अभाव यातुन हे असले प्रकार घडतात. सत्ता आली तशी शालीनता आली पाहिजे. नपेक्षा हे सरकार आधीच्या सरकारपेक्षा काही वेगळे नसेल. भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येउ नये म्हणजे झाले.
अपरिपक्व राजकारण ते हेच.
25 Jul 2014 - 12:08 pm | मनिष
अगदी. अगदी!
25 Jul 2014 - 1:09 pm | बॅटमॅन
अगदी नेमकेपणे हेच म्हणतो. मूळ मुद्दा राहिला एकीकडे आणि आता त्यांना सहानुभूती मिळतेय. पूर्वी मराठे युद्धात जिंकून तहात कसे काय हरत असतील असा प्रश्न कधीकाळी पडत असे त्याचे उत्तर हे असे किस्से पाहून मिळतं एकदम.
25 Jul 2014 - 2:01 pm | प्रसाद गोडबोले
एकदम सो टके की बात !!
25 Jul 2014 - 6:35 pm | यशोधरा
सहमत.
25 Jul 2014 - 3:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१.
आणि
>>>"अपरिपक्व राजकारण ते हेच." या वाक्याशी--- "अपरिपक्व" हा फारच कोमल मनाने वापरलेला शब्द आहे अश्या नोंदीसह--- १००% सहमत.
25 Jul 2014 - 5:01 pm | मैत्र
सगळं प्रकरण इतकं नेमकेपणे मांडलं आहे एका प्रतिसादात..
कुठेतरी एका संस्थळावर - (शिवसेनेला गोत्यात कसं आणता येईल हे बघणार्या माध्यम स्थळावर)
त्या जेवणाच्या थाळीचा फोटो पाहिला. तो खरा असेल आणि हेच अन्न तिथे उद्धटपणे दिलं जात असेल तर संताप कोणालाही येईल. हॉटेल मध्ये जर १५० रु. ला जर हे पुण्या मुंबईत कोणी दिलं तर भांडणे होतील आणि बातमी होईल.
पण खासदार असणे -- ज्याला Law makers म्हणतात त्यांनी त्यावर कसं वागावं आणि कायदा वापरून या मलिकसारख्या सगळ्यांना सरळ कसं करावं हे या अननुभवी खासदारांना समजत नाही हे स्पष्ट आहे.
पण महाराष्ट्र सदनात भाजपचेही खासदार असतीलच की पुण्याच्या शिरोळेंसारखे नवखे आणि अहीर / गांधी / दानवे असे जुने जाणते. ते कुठे नाहीत या गदारोळात? का साळसूद होत आहेत?
दुसरं हे की इंग्रजी माध्यमांचा खोटेपणा आणि कांगावा तिडीक आणणारा आहे.
मी मराठी आणि इतर काही प्रतिनिधींना बरोबर घेऊन हे लोक दंगा करायला गेले होते.
तरी एन डी टी व्ही म्हणते की या खासदारांना हे माहीत नव्हते की त्यांच्या वागण्याचा व्हिडीओ उपलब्ध आहे.
काही फोटोंमध्ये तर शेजारी उभा असलेला कॅमेरामन दिसतो आहे.
हा दुवा काय घडलं याचा.
http://t.co/UtthstlD80
जर सत्ता असताना आणि तथाकथित दबाव असताना इतकं खोटं दडपून छापलं जातं (उदा. मुद्दाम केलं वगैरे) तर
आधी काय करत होते आणि माध्यमे काय लोकांपर्यंत नेत होती हे कल्पनेच्या पलिकडचं आहे.
25 Jul 2014 - 6:27 pm | प्यारे१
बळंच काँस्पिरसी (थोडं तथ्य असावं) ;)
सेनेला गोत्यात आणण्याचा हा भाजपाचा डाव नसेल कशावरुन? असंही भाजपावाले जरा चंगळ करत आहेत सध्या. सेना नकोच आहे त्यांना लोकसभा विजयामुळं.
25 Jul 2014 - 6:29 pm | बॅटमॅन
कॉन्स्पिरसी थेरी सत्य मानली तरी सेनेला डोकं नको होतं काय? वाईट गंडले राव ते.
25 Jul 2014 - 6:46 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
थोडेफार सहमत. भाजपाचे खासदार अजूनतरी गप्प्गुमान आहेत. सध्याचे वातावरण पाहता ते गुजरात भवनमध्ये ढोकळा खाण्यात मग्न असावेत.
समाजात्,विशेष करून महाराष्ट्राबाहेर कसे वागायचे ह्याचे ट्रेनिंग किंवा तुमचा तो क्रॅश कोर्स करणे महाराष्ट्रातील राजकारण्यांवर सक्तीचे करावे ही एक माफक अपेक्षा.
25 Jul 2014 - 6:34 pm | यशोधरा
फारच रे अपेक्षा तुझ्या :)
25 Jul 2014 - 1:44 pm | पोटे
जनतेला रिजल्ट हवे असतात. रीझन्स नाही.
दिल्लीत गेल्यावर पोट कसे भरावे ही अक्कल ज्या खासदाराना नाही ते म्हाराश्ट्राचं पोट कसे भरणार?
नेते दिल्लीला गेले.. आणि हे नेते जन्तेला काय ऐकवतात ? किचनमध्ये जेअण नव्हतं , संडासात साबण नव्हता !
25 Jul 2014 - 4:54 pm | मराठी कथालेखक
एकदम भन्नाट प्रतिसाद. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना (!!) ट्विट करा.
25 Jul 2014 - 1:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नसानसात मस्ती व माज भरलेल्यांना निवडून दिले की काय होते ते महाराष्ट्र सदनात दिसले रे हुप्प्या.
काय मागण्या होत्या? प्रकरण अंगाशी आले की मराठीच्या नावाने गळा काढायचा,अगदी यशवंतरावांपासून हे चालत आलय.
मोदीजींनी राजन विचारेंना उद्या पोळी ऐवजी उंधियो भरवला तर विचारे तोच उंधियो मोदींच्या तोंडात कोंबण्याची धमक दाखवतील?
ते गेले २५वर्षे हेच करत आले आहेत रे.हेच वर्तन कॉन्ग्रेस वा ईतर पक्षाच्या खासदारांनी केले असते तर स्वराज्,जेटली एव्हाना उपोषणाला बसले असते.
25 Jul 2014 - 4:35 pm | vikramaditya
आणि सर्व प्रतिक्रिया अगदी अचूक.
अती तेथे माती.
25 Jul 2014 - 5:40 pm | बन्डु
त्याला धरायचं सोडून नोकर माणसाशी कसला खेळ करत बसलेत?
28 Jul 2014 - 8:36 pm | मराठी_माणूस
लोकसत्तेच्या आजच्या अंकात एक महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तो म्हणजे आपले राष्ट्र जर धर्मनिरपेक्ष आहे तर कार्यालयीन कामकाजात धर्म हा वादाचा मुद्दा कसा काय होउ शकतो
सदर->लोकमानस शिर्षक :"आयुक्तांचा पळपुटेपणा"
http://epaper.loksatta.com/311850/indian-express/28-07-2014#page/8/2
29 Jul 2014 - 9:43 pm | हुप्प्या
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/maharashtrian-food-in-Maha...
राड्याचे फळ!
29 Jul 2014 - 9:52 pm | शिद
सामान्य माणसाला २ वेळच्या जेवणाची भ्रांत आणि ह्या खासदारांना असे प्रश्न विधायक वाटतात...फालतूगिरी सगळी.
29 Jul 2014 - 9:54 pm | शिद
वा वा...चान चान.
29 Jul 2014 - 10:38 pm | तुमचा अभिषेक
सहिये !
केला तो तसा मुर्खपणाच पण राडा कामात आला.
बाकी बदनामी वगैरे तर आपल्या देशात सहज विसरले जातात.
29 Jul 2014 - 11:14 pm | प्रसाद गोडबोले
शिवसेना रॉक्स !!
30 Jul 2014 - 11:58 am | आशु जोग
हुप्प्याराव हे न चुकता नेमाने नियमाने व्रतस्थपणे अविरत न थकता न थांबता अविश्रांतपणे सतत संतत
चालू बातम्या इथे टाकत असल्याने रोजचे वर्तमानपत्र बंद करण्याचा विचार आहे. काय वाटते आपल्याला
30 Jul 2014 - 2:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
तिकडे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत-५० हजार कर्ज तर कधी १ लाख्कर्ज. आणि दिल्लीत त्यांचे प्रतिनिधी कोल्हापूरी चिकन्,पुरणपोळ्या झोडण्यात आता मग्न आहेत.
वा रे शिवसेना.
30 Jul 2014 - 3:40 pm | प्रतापराव
खासदारांना कोल्हापुरी चिकन, पुरणपोळ्या चापायला मिळणार अभिनंदन. राडा कामी आला. मुंबई पालिकेतील शाळात विध्यार्थ्यांना जो आहार दिला जातो त्याची क्वालिटी पाहता प्रश्न पडतो कि हा आहार कोणाच्या तोंडात कोंबायचा. जेवणाचे कंत्राटदार तर सेनाच ठरवते ना.
1 Aug 2014 - 9:56 pm | आशु जोग
हुप्प्यारावसाहेब यांनी माळीणची बातमी इथे न चिकटवल्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो...
आपल्यावर विसंबून आम्ही सर्व पेपर बंद करून टाकले आहेत...