गाभा:
आज एक धक्कादायक माहिती मिळाली. भारतात मोठ्या प्रमाणावर ओरल इन्शुलिन उपलब्ध आहे. पण ते विकायला बंदी आहे.
सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलिन असते पण ते जठरात गेल्यावर नष्ट होते. फक्त उंटीणीच्या दुधातील इन्शुलिन पोटात नष्ट न होता रक्तात मिसळते. म्हणू हे दुध पिणाऱ्या लोकांना मधुमेह होत नाही. पण या दुधावर विक्री बंदी आहे हे आज कळले. भारतातील काही डॉक्टर्स हे दुध हवाबंद पिशव्यातून विकण्याच्या प्रयत्नात असून त्या साठी दोन कोटी उंटांची गरज आहे असा त्यांचा अंदाज आहे.
आज जगभर ओरल इन्शुलिन बनवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. ते व्यर्थ जाऊ नयेत म्हणून भारतातील सर्वात स्वस्त दुध विकलेच जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सरकार आमच्या साठी आहे कि परदेशी औषध कंपन्यांसाठी आहे?
प्रतिक्रिया
23 Jul 2014 - 12:50 am | भिंगरी
दोन कोटी उंटांसाठी किती मोठे वाळवंट लागेल?
आणि ते वाळवंट बिल्डरनी हडपल तर मधुमेह कोणाला होईल?
या प्रश्नांची उत्तरे द्या
नाहीतर तुमच्या डोक्याची शंभर शकले होऊन
तुमच्याच पायाशी लोळण घेतील.
मै चली>>>>>>>>>>>>>>>>
23 Jul 2014 - 1:07 am | संजय क्षीरसागर
ऊडन खटोला यांनी स्वतःसाठी एक उंटीण पाळली तर तिला दुभती करण्यासाठी दुसरा उंट पाळावा लागेल. या उंटांच्या जोडप्याला स्वतःच्या घरात बांधण्यासाठी त्यांना वरचा मजला विकत घेऊन, मधली स्लॅब तोडावी लागेल. उंट आणि उंटीण बेडरुम मधे झोपल्यावर, उडन खटोला काय करतील?
या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत तर, धाग्याची भिंगरी झाल्याशिवाय राहणार नाही.
23 Jul 2014 - 1:15 am | भिंगरी
हे क्काय बै,सारखं सारखं माझ्या मागे येणं?
भिंगरीचे धागे लाजून लाजून काळे निळे झाले की!
23 Jul 2014 - 3:29 am | खटपट्या
कुक्कुट पालनासारखा उंट पालन व्यवसाय करावा म्हणतोय !
बाहेर पाटी लावणार "येथे उंटाचे (का उंटीणीचे?) धारोष्ण दुध मिळेल" "उंटाचे दुध प्या मधुमेह टाळा"
23 Jul 2014 - 9:24 am | vrushali n
insulin is a peptide,it is degraded in g.i.t(intestine),if taken orally,
अस आम्हाला शिकवतात,(third year ,md pharmacology)
23 Jul 2014 - 1:01 pm | शैलेन्द्र
तेच्च.. खुप बेसिक आहे हे..
23 Jul 2014 - 10:22 am | सुबोध खरे
माझे दोन शब्द
सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधात इन्शुलीन असते. हे इन्शुलिन पोटातील विकरांमुळे(enzyme) मुळे विघटन पावते आणि शरीरात शोषले जात नाही. उन्टीणीच्या दुधात असलेले इन्शुलिन सहज पणे विघटन पावत नाही किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपात असते असा अंदाज आहे त्यामुळे ते शरीरात थोड्या फार प्रमाणात शोषले जाऊ शकते. प्राथमिक संशोधनात असे आढळले आहे कि उंटीणीचे दुध (यात इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ असतात) किंवा त्यात इन्शुलिन मिसळून दिले असता मधुमेहाच्या रुग्णाची इन्शुलिनची गरज कमी होते किंवा पूर्ण नाहीशी होऊ शकते. यावर बरेच संशोधन होणे अजून बाकी आहे. ( इतक्या कमी संशोधनावर निष्कर्ष काढणे हे तितकेसे बरोबर नाही असे बर्याच शास्त्रज्ञांचे मत आहे).
राहता राहिला एक प्रश्न या बर्याचशा संशोधनात उंटीणीचे दुध हे न तापवता/ उकळता वापरले आहे. कारण दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात.
भारतीय मनोवृत्ती अशी आहे कि दुध हे न तापवता वापरले जात नाही. याचा फायदा म्हणजे दुधातून येणारे क्षयरोगाचे आणि इतर रोगांचे उदा ब्रुसेलोसिस जीवाणू उकळल्यामुळे मारले जातात. म्हणजे आपल्याला आत्ताच्या स्थितीत एकतर मधुमेह बरा करायचा( हे जेंव्हा सिद्ध होईल तेंव्हा) कि क्षयरोग ओढवून घ्यायचा ते ठरवावे लागेल. कारण जोवर आपले पशुधन हे काटेकोरपणे आरोग्यदायक वातावरणात वाढवून दुग्ध निर्मिती करता येत नाही तोवर दुध उकळून पिणे हे सुरक्षित आहे असे मला वाटते.
राहिली गोष्ट -- भारतात उंटीणीच्या दुधाच्या विक्रीला प्रतिबंध आहे असे वाटत नाही कारण बिकानेरला उंट संशोधन केंद्र आहे आणि ते लोक तेथे उंटीणीच्या दुशावर संशिधान आणि त्याचे विपणन विक्री याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. दुर्दैवाने उंटीणीच्या दुधाला एक विचित्र वास आणि थोडीशी खारट चव असते( ती कदाचित तेथल्या मचूळ पाण्यामुळे/ पाण्यातील क्षारामुळे असेल) आणि ते आपण फार आवडीने पिऊ शकू असे मला तरी वाटत नाही. आणि मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे. भारतात असलेल्या मधुमेही रुग्णांची संख्या पाहता तेवढ्या लोकांना ताजे ( न तापवलेले) उंटीणीचे दुध भारतभर पुरवणे हे कमीत कमी सहा पंचवार्षिक योजनांचे काम असावे.
त्यामुळे यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा डाव आहे असे समजणे हे फारच ओढून ताणल्यासारखे वाटते.
23 Jul 2014 - 11:06 am | चिगो
खरेसाहेबांचा (नेहमीप्रमाणेच) संतुलित आणि अभ्यासू प्रतिसाद आवडला.. सुप्परलाईक..
(भावी मधुमेही) चिगो..
23 Jul 2014 - 11:53 am | प्रभाकर पेठकर
सविस्तर आणि चांगला प्रतिसाद.
उंटीणीचे दूध इथे (मस्कतमध्ये) सुपरमार्केट मध्ये पाहिले आहे. पण कधी चव घेतली नाही. पण क्षयरोगाची वगैरे भिती असेल तर नकोच उगीच विषाची परिक्षा.
23 Jul 2014 - 12:41 pm | सुबोध खरे
पेठकर साहेब
एखादे वेळेस प्यायल्याने नक्कीच क्षय रोग होणार नाही. चव घेऊन पहा. जर विचित्रच (मचूळ) असते. लोक त्याच प्राण्याचे( घरच्या गायीचे/ म्हशीचे) दूध न उकळता बरेच दिवस प्यायले तर तो होऊ शकतो अर्थात त्या प्राण्याला क्षयरोग असेल तरच.
23 Jul 2014 - 3:12 pm | प्रभाकर पेठकर
>>>> दुध उकळले कि त्यातील इन्शुलिन किंवा इन्शुलिन सदृश्य पदार्थ नष्ट पावतात.
आणि न तापवता/उकळता उंटीणीचे दूध पिणे धोकादायक आहे असे आपल्याच प्रतिसादात आहे.
>>>>मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला रोज ५००-७०० मिली दुध पिणे आवश्यक आहे.
रोज एव्हढे दूध न तापविता प्यायल्यास पचवू शकेन का ही शंकाच आहे.
जाउ द्या. चालणे, पोहणे आणि मेट्फॉर्मिनचा खुराक सध्या चालू आहे.
23 Jul 2014 - 3:19 pm | पगला गजोधर
माझी आपली ऐक कल्पना हं, कृ ह घ्या, सहज पणे विघटन न पावणारे (किंवा ते नानो पार्टीकल च्या स्वरुपातील), इन्सुलिन (की जे आतड्यात शोषले जाऊ शकते), असे इन्सुलिन, 'अमुल कुल' वै. सारख्या प्याकेज्ड/पाश्चराईस्ड/सुगंधी/गोड दुग्ध पेयांमध्ये मिसळून बाजारात आणले तर ? म्हणजे सरकारने तसे करण्यासाठी प्रोत्साहन दिले तर ?
23 Jul 2014 - 10:23 pm | श्रीगुरुजी
डॉक्टरसाहेब,
चांगला व माहितीपूर्ण प्रतिसाद!
23 Jul 2014 - 11:42 am | सुबोध खरे
एक चूक क्षमस्व
उंटीणीच्या दुधाला अजून कायदेशीर मान्यता नाही हे सत्य आहे. पहा http://timesofindia.indiatimes.com/india/Camel-milk-Cant-get-over-the-hu....
पण त्यावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवलेली आहे. ( म्हणजे ते बेकायदेशीर नाही पण मग नक्की ते कायदेशीर आहे कि नाही?) हे मला तरी सांगता येणार नाही.
असो. बिकानेरचे उंट संशोधन केंद्र हे दुध विकते हे सत्य आहे आणी हि गोष्ट कायदेशीर करण्यसाठी त्यांचे सरकार दरबारी प्रयत्न चालू आहेत.
23 Jul 2014 - 5:24 pm | साती
http://www.maayboli.com/node/50034
इथे दिलाय म्हणून परत इथे प्रतिसाद देत नाही.
23 Jul 2014 - 10:48 pm | मुक्त विहारि
चला मान्य करू या की, उंटीणीचे दूध प्यायला मुळे, मधूमेह आटोक्यात राहतो किंवा मधूमेह होत नाही.
म्हणजेच राजस्थान किंवा जगातील इतर भागांत, जिथे उंटीणीचे दूध जास्त प्रमाणांत प्यायला जाते, त्या भागातील लोकांत मधूमेहाचे प्रमाण कमी असायला हवे.
हाकानाका...
24 Jul 2014 - 1:46 am | स्वप्नांची राणी
कतार हा जगातला एक श्रीमंत देश आहे. पण जगाच्या नकाशात अक्षरशः एक टिंब असणार्या या देशात स्थुलतेचं आणि त्यामुळेच मधुमेहाच प्रमाण भयावह आहे. याबाबतित त्यांनी अमेरिकेलाही मागे टाकलय. एकंदरित स्थानिक (कतारी) लोकसंख्येच्या सुमारे १७% लोक मधुमेही आहेत, (अमेरिकेत ८% आहेत).
अतिशय लहान वयात मधुमेह होतो या लोकांना. त्यामागे विशिष्ट जेनेटीक संरचना आणि जवळ्च्या नात्यांमधे विवाह करणे हि २ प्रमुख कारणे आहेत असे आता संशोधनाअंती मानले जाते. या देशाचा विकास गेल्या अवघ्या ३५-४० वर्षातला आहे. म्हणजे गेल्या जेमतेम २ पिढ्या हे ऐश्वर्य भोगतायेत. त्याआधी तर वाळ्वंटातच राहात होते आणि बहुतेक उंटांवरच पुर्ण उपजिविका अवलंबुन होती. आणि मधुमेह तर पिढ्यानपिढ्या आहे असं म्हणतायेत (जेनेटिक पूल). म्हणजे सांडणीमातेच दुध हा काही फारसा परिणामकारक उपाय नसावा असे आपले माझे मत!!
24 Jul 2014 - 4:29 am | रेवती
सांडणीमातेच दुध
ही ही ही. कैच्याकै शब्द! ;)
24 Jul 2014 - 8:29 am | सुनील
एक सांडणी दिवसाला साधारणपणे किती शेर दुध देते?
टीप - सांडणी बिकानेरी बर्र्का, कोकणातील नव्हे!
24 Jul 2014 - 1:38 pm | बॅटमॅन
कोकणात सांडण्या आणि कुठून आल्या म्हणे? सदाहरित प्रदेशातली नवी जात आहे की काय ;)
24 Jul 2014 - 10:36 am | प्रसाद१९७१
खरे साहेब - तुम्ही दिलेली माहीती वाचली की मिपा वर घालवलेला वेळ कारणी लागला असे वाटते.
24 Jul 2014 - 1:32 pm | नित्य नुतन
]]
१++++++++++++++++