टि टाईम स्नॅक्स प्रकार ३ - राजस्थानी तिक्कर

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
22 Jul 2014 - 11:46 am

Tikkar1

साहित्यः
१. मक्याचं पीठ - १ बाउल
२. बीया काढुन बारीक चीरलेले टोमॅटो - १ बाउल
३. पेस्ट - १ बाउल (पेस्ट साठि १ मध्यम कांदा, ३ पाकळ्या लसुण, पेरभर आलं आणि २ हिरव्या मिरच्या)
४. साजुक तुप - २ मोठे चमचे
५. गव्हाचं पीठ - १ बाउल
६. मुठभर बारीक चीरलेली कोंथिंबीर
७. बारीक किसलेलं गाजर - १ बाउल
८. चवीनुसार मीठ
९. तिक्कर भाजण्यासाठि साजुक तुप किंवा बटर

Sahitya

कृती:
१. एका बाउल मधे मक्याचं आणि गव्हाचं पीठ एकत्र करुन त्यात साजुक तुप घालुन सारखं करा. तुप सर्व पिठाला लागेल असं बघा. असं केल्याने तिक्कर आतुन खुसखुशीत होतो

peeth & tup

२. आता त्यात अनुक्रमे बारीक चीरलेले टोमॅटो, वाटलेली पेस्ट, कोंथिंबीर, गाजर आणि चवीनुसार मीठ घालुन गोळा मळा. शक्यतो पाण्याची गरज भासत नाहि. टोमॅटो आणि वाटलेल्या पेस्ट्चा अंगभुत ओलावा पीठ मळण्यास पुरेसा होतो
mix all gola

३. पोळपाटावर पीठ पसरुन थालीपीठ थापतो त्या प्रमाणे तिक्कर थापा. स्टिलचं उलथण्यानी अलगद काढुन नॉन स्टिक तव्यावर साजुक तुप / बटर घालुन दोन्हि बाजुनी खरपुस भाजा

thapa kadha

bhaja

४. गरमागरम तिक्कर आवडत्या चटणी, सॉस, लोणचं किंवा चहासोबत सर्व करा. हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात (हो हो...निदान मला तरी थालीपीठ चहात बुडवुन खायला आवडतं *smile*

Final 2

टिपः
१. ह्यात वेगवेगळ्या भाज्या घालुन वेगवेगळ्या प्रकारे तिक्कर करता येईल. उदा. बारीक चीरलेल्या कांद्याची पात + पालक घालुनहि छान लागेल

प्रतिक्रिया

Mrunalini's picture

22 Jul 2014 - 12:12 pm | Mrunalini

वाव... मला खुप आवडला हा प्रकार. आज संध्याकाळीच करुन बघते. आणि हो, फोटो सुद्धा अप्रतिम. :)

प्रचेतस's picture

22 Jul 2014 - 12:13 pm | प्रचेतस

ह्म्म

जेवायच्या वेळेलाच असले प्रकार टाका आणि जळवा.

प्रभाकर पेठकर's picture

22 Jul 2014 - 12:14 pm | प्रभाकर पेठकर

अरे व्वा! राजस्थानी थालीपिठ करून पाहिलेच पाहिजे.
मला हे लोणच्या बरोबरच, दहि किंवा/आणि लोण्याबरोबर जास्त आवडेल.

मनिष's picture

22 Jul 2014 - 1:15 pm | मनिष

मलाही दही आणि लोणच्याबरोबर आवडेल. पाहिजे तर बरोबर गरमा-गरम कॉफी वगैरे! :P

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2014 - 4:24 pm | दिपक.कुवेत

काका लोण्याबरोबर तर कशाचीच सर येणार नाहि. गर्मागरम तिक्करवर लोण्याचा गोळा....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2014 - 12:15 pm | स्वाती दिनेश

राजस्थानी थालिपीठ आवडले,
स्वाती

किसन शिंदे's picture

22 Jul 2014 - 12:17 pm | किसन शिंदे

झक्कास प्रकार दिसतोय, आपल्या तिखट भाकर्यांच्या जवळपास जाणारा..

पोटे's picture

22 Jul 2014 - 12:37 pm | पोटे

करणार

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 1:06 pm | अत्रुप्त आत्मा

@हे तिक्कर थालीपीठा प्रमाणे चहात बुडवुन मस्त लागतात>>> फोटो पाहूनच खात्री पटली होती..आणि अत्ता दुपारच्याला (आजच्या पावसाळी वातावरणात..) हे मिळावं अशी लै लै विच्छा होते आहे!

आज एकादशी असल्यामुळे आम्ही आजच्या दिवस तूर्तास साबुदाणा वडे आणि चटणी इतकुश्याच अन्नावर जिवंत रहायचे ठरवलेले आहे. म्हणून धागा वाचला तरी वाचला नाही असे समजून पास करत आहे. ;-)

स्पंदना's picture

22 Jul 2014 - 1:16 pm | स्पंदना

मस्त! तिक्कर!
करुन पहाते. टिफीनला एक नविन प्रकार!

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 1:28 pm | कवितानागेश

मस्त दिसतायत. :)

सुहास झेले's picture

22 Jul 2014 - 1:45 pm | सुहास झेले

सहीच... करून बघणार नक्कीच :)

आयुर्हित's picture

22 Jul 2014 - 1:53 pm | आयुर्हित

खासच आहे ही पाकॄ! फोटो ही छान आलेत.
घटकही उत्त्म आहेत खाण्यासाठी.
धन्यवाद.

तिक्कर हा शब्द प्रथमच ऐकतो आहे. राजस्थानात नेमक्या कोणत्या प्रांतात होतो हा पदार्थ?
कारण मेवाड, मेवात आणि मारवाड मध्ये असतांना नाही ऐकला/खाल्ला कधी! त्यामूळे उत्सुकता आहेच.
(दिल्ली/पंजाबातही "सरसोंदा साग और मकईदी रोटी" हमखास बनतो.)

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2014 - 4:26 pm | दिपक.कुवेत

हा राजस्थान मधल्या नक्कि असा कुठल्या प्रांताचा पदार्थ आहे माहित नाहि. खैर छोडो हम सिर्फ आम खाते है.....क्युं?

कंजूस's picture

22 Jul 2014 - 2:10 pm | कंजूस

आता पावसाळ्यात खमंग पदार्थाँचा पाऊस पडतोय मिपावर .दिपक मला चहात थालीपिठ ही कल्पना आवडली ,शिवाय दही आणि लोणचे (कच्छी)ची पारंपारिक पध्दत आवडतेच .कुरमा बाटी जशी पाच डाळींच्या वरणात बुडवून खातात तसेही करायला हरकत नाही कारण यांत गहू आणि मकापिठ आहे ,डाळींची पिठं नाहीत .
चहात बुडवायची रीत :
एक तिक्कर एका बशीसारख्या खोलगट डिशमध्ये ठेवायचे .सुरीने वड्या कापतो तसे लहान तुकडे करायचे .चहा यावर ओतायचा .भिजले की एक एक तुकडा चमच्याने उचलायचा .चीज सैनविजला असे खाता येते .
दिपकराव आता राजस्थानी हल्लाबोल होणार काय ?रोज एक पदार्थ दिलात तरी वर्षात संपायचे नाहीत .

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2014 - 4:30 pm | दिपक.कुवेत

मोडुनच चहात बुडवुन खायचा. बशीत ठेवुन त्यावर चहा ओतला तर लगदा होईल मग मजा जाईल त्यातली. तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 5:15 pm | अत्रुप्त आत्मा

@तुकडा बुडवुन खाल्ला कि लगेच एक घोट चहा प्यायचा....अहाहा मजा येते.>>> http://www.sherv.net/cm/emoticons/smile/smiley-says-yes-emoticon.gif
त्यात ते शिळं झालं की अजुन! *good*

छानच!
चहात बुडऊन थालीपीठ?

छानच!
चहात बुडऊन थालीपीठ?

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2014 - 4:31 pm | दिपक.कुवेत

विचित्र वाटलं तरी एकदा खाउन बघ.

मधुरा देशपांडे's picture

22 Jul 2014 - 2:16 pm | मधुरा देशपांडे

मस्त दिसतंय. सगळं साहित्य आहेच घरी. आजचा बेत फिक्स.

छान दिसतय..नक्की करुन बघेन :)

मस्तच पदार्थ दिसतोय...सोपा आणि मुलांना नक्की आवडेल असा.करुन बघेन.

मुक्त विहारि's picture

22 Jul 2014 - 2:42 pm | मुक्त विहारि

करुन बघेन.

सूड's picture

22 Jul 2014 - 2:43 pm | सूड

रेशिपी मस्त!!

चहा थालीपीट म्हटल्याबरोबर दोन weird प्रकार आठवले. शेजारची एक ताई चहासोबत भात खात असे. मूळचा एमपीचा असलेल्या एका कलिगने आमरस-भात साजूक तूपासोबत खायला सुचवलं होतं ते आठवलं. ;)

दिपक.कुवेत's picture

22 Jul 2014 - 4:36 pm | दिपक.कुवेत

शेवटि पसंद अपनी अपनी. माझी मावशी तर फोडणीभातावर दुध घालुन खाते. वर जे म्हणाला आहेस तसा आमरस-भात साजूक तूपासोबत खाला आहे. आवडला होता *ok*

>>शेवटि पसंद अपनी अपनी.

सहमत.

अरे वा! पहिल्यांदाच ऐकतीये, बघतीये हा पदार्थ! फोटू छान आलेत.

अनन्न्या's picture

22 Jul 2014 - 5:15 pm | अनन्न्या

मस्त लागेल असे वाटतेय, करून पहाते.

दिसतंय छान पण चव इमॅजिन करता येत नाहिये.
अर्थात इमॅजिन करण्यापेक्षा करूनच बघतो :)
आभार!

सानिकास्वप्निल's picture

22 Jul 2014 - 6:26 pm | सानिकास्वप्निल

ए मस्तचं रे दिपक, तिक्कर करुन बघावेसे वाटत आहे :)
मस्तं पाकृ +१

देशी तिखट बिस्किट म्हणून चहात बुडवून खायला आवडेल..

छबूतै's picture

22 Jul 2014 - 8:01 pm | छबूतै

मस्त! आता करुन बघने आले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2014 - 8:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय आमचे वजन वाढवायचा विडा उचलाय की काय? आँ? ;)

प्यारे१'s picture

22 Jul 2014 - 8:59 pm | प्यारे१

आडौली राजस्थानी थालिपीठे!

त्रिवेणी's picture

23 Jul 2014 - 8:18 am | त्रिवेणी

धन्यवाद दीपक
आज तिखट आणि सोपी पाककृती टाकल्याबद्दल. रविवारी मक्याचे पीठ आणल्यावर करून पाहीन. तसेच आम्हा वयोवृद्ध लोकांना जमतील अशा रेसीपी आल्या की करून बघता येतात.

पैसा's picture

1 Aug 2014 - 11:00 pm | पैसा

नवी पाकृ. मक्याच्या पिठामुळे कडक होत नाहीत ना मक्याच्या रोट्यांसारख्या?

दिपक.कुवेत's picture

3 Aug 2014 - 5:56 pm | दिपक.कुवेत

म्हटलं ना आपल्या थालीपीठाचा राजस्थानी प्रकार....एकदम खुसखुशीत