गवार फाँड्यु.... एक कधीच न केलेली पा.क्रु.....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in पाककृती
18 Jul 2014 - 9:50 pm

आज पर्यंत मिपाच्या आयुष्यात बर्‍याच पा.क्रु. आल्या.

काही भाव खात अधून मधून येत राहिल्या, तर काही अतुल बेदाडे सारख्या एक-दोन डाव खेळून बाद झाल्या.पण त्या कुणीतरी करून बघीतल्या होत्या हे निश्चित.ही आजची पा.क्रु. मात्र फार अनवट आहे.

कधी-कधी मिपावर बिना फोटोच्या पा.क्रु. पण येत असतात.त्यातलीच हे एक वेगळी पा.क्रु.

मध्यंतरी मी घरी गेलो असतांना बायकोने खास "गवारीची भाजी" केली होती.मस्त गावरान गवार आणि त्यांत लसूण चटणी आणि भरपूर दाण्याचा कूट, अन जोडीला नुकतेच केलेले आंब्याचे लोणचे असेल, तर आम्हाला आमरस पण लागत नाही.(खरे तर त्या दिवशी आमचे "बियरचे" प्रमाण जरा जास्तच झाले असेल, असा मिपाकरांचा समज होणे, साहजिकच आहे आणि तो खरा पण आहे.)

जेवायला बसलो, आणि सहज, अगं मुले कुठे आहेत? असे विचारले.बायकोला विचारतांना आम्ही सहजच विचारतो. तिला आदर देणे, तिच्या होकाराला हो म्हणणे आणि तिचा नकार स्वीकारणे ह्या त्रिसुत्रीवर आमचा संसार सुरु आहे.

तिने सांगीतले, ती आत्ताच कोलंबी भजी आणि सातारी पद्धतीचा कोंबडी रस्सा खावून, मटण आणायला गेली आहेत.आज रात्री जरा मटण-कलिया करून बघायचा आहे.

आयला, हे बरे आहे. आम्हाला गवारीची भाजी आणि ह्या मुलांना मात्र मटण-मासे आणि चिकन? आयला कलीयुग-कलीयूग म्हणतात ते हेच का?

असो, इतक्या लवकर हार मानायचा आमचा स्वभाव नाही.

मग लगेच बायकोला विचारले, अगं इतक्या सगळ्या पदार्थांना गोड पदार्थाची पण जोड हवीच,मग गोड काही केले आहेस की नाही?

अहो आहे की, हे बघा चितळ्यांचे श्रीखंड (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते), हा मालवणी खाजा (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते), हा बेळगावी कुंदा (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते) आणि वाटलेच तर हा माहीमचा हलवा (आमच्या डोंबोलीत हे पण मिळते) पण आहे.

अगं ते ठीक आहे पण तू कधी "फाँड्यु" ट्राय केले आहेस का? (मिपा बंद असतांना, मी नक्की कुठल्या साईटवर जातो, हे सुज्ञ वाचकांच्या लक्षांत आलेच असेल.

ती नाही म्हणाली. मग मी तिला गूगल उघडून दिले आणि फाँड्युचे फोटो दाखवले.तिला पण हा प्रकार आवडला.रात्री जेवण झाल्यावर फाँड्यु करायचे ठरले.

मी फाँड्युत घालायला म्हणुन भेंडी, कारली, फरसबी, घेवडा आणि गवार इ. पदार्थ घेवून आलो.

रात्री फाँड्यु करायला बसलो. मी भाज्या घेवून बसलो आणि एक गवार फाँड्युत टाकून खाल्ली.आणि मुलांना सांगीतले की तुम्ही पण खा.त्यांनी पण खिशातून एक-एक पदार्थ घेवून आणि तो फाँड्युत टाकून खायला सुरुवात केली.रात्री मला जरा कमीच दिसते.काय कारण आहे, ते कळत नाही.पण मुले फाँड्यु एंजॉय करत होती.

बाजुलाच आमची कुत्री पण बसली होती.तिने पण एक-दोन वेळा माझ्या हातचे फाँड्यु खावून बघीतले.शेवटी ती पण मुलांच्या मागे-मागे गेली.

असो,

तर अशा प्रकारे मी भाज्या घालून फाँड्युचा आस्वाद घेतला.तुम्ही पण नक्की घ्या.

इति फाँड्यु पुराणं समाप्तं.

ता.क.

१. फाँड्युची लिंक

https://www.google.com.sa/search?q=chocolate+fondue&tbm=isch&tbo=u&sourc...

२. मी ही काल्पनिक पा.क्रु. लिहीली आहे.आपापल्या जबाबदारीवर ही पा.क्रु. करून बघणे.

३. लेखांत २/४ इंग्रजी शब्द आल्यामुळे वाचकांनी नाराज होवू नये.आजकाल आपल्या मराठी मायबोलीत इंग्रजी शब्द खपायला काहीच हरकत नसावी.

उरलेली ता.क. नंतर टाकल्या जातीलच.

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

18 Jul 2014 - 10:07 pm | कवितानागेश

मीच पयली! ;)
- अनपढ गवार माउ

स्पंदना's picture

18 Jul 2014 - 10:12 pm | स्पंदना

भेंडी!!!

रामपुरी's picture

18 Jul 2014 - 10:42 pm | रामपुरी

अरेरेरे! पडवळ, दोडका, दुधी आणले नाहीत? पुढच्या वेळी नक्की खाऊन बघा आणि (जगला वाचलात तर) आम्हालाही सांगा कसे लागते.

रामपुरी's picture

18 Jul 2014 - 10:45 pm | रामपुरी

हा कोबीच्या खिरीवर उतारा दिसतोय. आता बियर-भात वगैरे येऊ द्या

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 10:53 pm | मुक्त विहारि

एकदा एका मित्राने त्याची बियर चिकन-बिर्याणीत सांडली. आणि मग वडीलांचे कष्ट असे वाया जायला नकोत म्हणून, म्हणून ती बियर-चिकन-बिर्याणी ओरपली.अगदी भुरके मारत मारत.

पण शिवाय काही लोक टोस्ट पण विस्कीत बडवून मग एक-मेकांना टोस्ट करतात, असे ऐकिवात आहे.

आतिवास's picture

18 Jul 2014 - 10:54 pm | आतिवास

'नापाक'कृती! :-)

आरोग्यदायी व वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन अवार्ड विनींग पाकॄ लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन!

आत्ताच अतिंद्रिय शक्ती लेख वाचता वाचताच मला ते सर्व दिवस डोळ्यासमोर दिसत आहेत,
१)कारलीफाँड्यु ला अमेरिकन डायबेटिक असोशियनचा पुरस्कार घेतांना मुवी,
२)गवार फाँड्यु अवार्ड विनींग "मोस्ट बिझिनेस गिविंग पाकॄ फॉर वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन"
२)मुवी आणि शेफ विकास खन्ना पार्टनरशिपमध्ये Twist of Taste TV channel सुरु करत आहात आणि फोक्स ट्रॅव्हलरचे मालक रडत आहेत.

ह्यां काय जल्लां नवीन?

रेवती's picture

19 Jul 2014 - 12:59 am | रेवती

वा!! क्या बात हय!! फर्मास पाककृती! अश्याच प्रकारच्या आणखी पाकृ फोटोंसकट येऊ द्या अशी फर्माईश आहे.

प्यारे१'s picture

19 Jul 2014 - 1:21 am | प्यारे१

आज्जीस आणुमोदण!

सस्नेह's picture

19 Jul 2014 - 6:50 am | सस्नेह

खल्लास पाकृ ! फोटो शिवाय सुद्धा नजारा ड्वाले जलवून गेला!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2014 - 9:22 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/cook/chef.gif

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Jul 2014 - 9:26 am | ज्ञानोबाचे पैजार

हि पा.कृ. अंडे घालुन करता येइल का?

पैजारबुवा,

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Jul 2014 - 11:57 am | राजेंद्र मेहेंदळे

ह्या पाकृमध्ये कुठल्या प्राण्याच्या तंगड्या ठेचुन घालाव्यात याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2014 - 12:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

फर्मास पाक्रु !

ही पाक्रू स्विस लोक चीज घालून बिघडवून टाकतात ! पण त्यांचा मार्केटींगमध्ये हातखंडा असल्यानेच केवळ त्यांचे फोंड्यू जगप्रसिद्ध आहे आणि आपले (मुवि आपलेच आहेत त्यामुळे त्यांच्या फोंड्यूवर हक्क सांगणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ;) ) गवार फोंड्यू गवार... आपले गावठी समजले जाते आहे आणि तिचे चीज होत नाही. याबद्दल सगळ्या विश्वाचा टीव्र णीषेढ करून मी माझ्या चार ओळी संपवितो :)

ता क : रशिया गवार-फोंड्यू व्होडकात बुडवून खाण्याच्या कृतीचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात आहे. तो प्रयत्न हाणून पाडायला जगाच्या केंद्रभागी असलेल्या डोंबोलीपासून एक अखिलवैश्विक चळवळ काढणे अत्यावश्यक आहे असे सुचवित आहे.

मधुरा देशपांडे's picture

19 Jul 2014 - 12:17 pm | मधुरा देशपांडे

मुविकाकांच्या पुढच्या कट्ट्याचा बेत - गवार फाँड्यु आणि मुविकाका स्पेशल कुठल्यातरी वड्या आणि मध्यवर्ती डोंबोलीत मिळणारे (पण इतर ठिकाणांहून आयात केलेले) अजून काही खाद्यपदार्थ. तेव्हा पुढच्या कट्ट्याचा वृत्तांत आणि गवार फाँड्युचे फोटो असे एकत्र येतील अशी आशा करते. :)

अजया's picture

19 Jul 2014 - 2:06 pm | अजया

अहाहा ,काय पाकृ आहे!! अफ्रिकेत खाल्लेल्या घेवडा फ्लॉवर फाँड्युच्या आठवणीने तोंपासु...

प्रचेतस's picture

19 Jul 2014 - 2:11 pm | प्रचेतस

झक्कास.....!!!!!!!!!! :)

फाँड्यु हा खाद्य हिरानंदानी पवई येथील.....café mangi ह्या ठिकाणी मिळतो. वेगवेगळ्या फळांबरोबर असतो. फार मस्त

दिपक.कुवेत's picture

20 Jul 2014 - 2:23 pm | दिपक.कुवेत

मुविंनी हि पाकृ लिहिण्याचेच धाडस केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....बोला मुवि तुम्हाला काय बक्षीस देउ?

(गवार कधीच न आवडणारा) दिपक