कोबीची खीर

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
18 Jul 2014 - 4:09 pm

कोबीची खीर
साहित्य ---------
किसलेला कोबी १ वाटी
दुध अर्धा लिटर
साखर पाउण वाटी
सोललेले वेलची दाणे ४
वेलची पूड १ लहान चमचा.
साजूक तूप २ चमचे
बदाम पिस्ते बारीक चिरलेले दोन लहान चमचे.

कृती---------------
कोबी धुवून किसणीवर किसून घ्यावा.
पिळून त्यातील पाणी काढून टाकावे
भांडे गरम करून त्यात तूप टाकावे,
तूप तापल्यावर त्यात वेलचीचे सोललेले दाणे टाकावे
दाणे .तडतडले कि त्यात कोबीचा कीस टाकून चांगला परतून .घ्यावा.
मग त्यात दुध टाकून किस शिजून द्यावा.
कोबी शिजला की साखर टाकून एक उकळी काढावी.
साखर विरघळली की भांडे खाली उतरवून त्यात वेलची पावडर,बदाम,पिस्ते टाकावे.
(साखर आवडीनुसार कमी जास्त घ्यावी )

प्रतिक्रिया

अजया's picture

18 Jul 2014 - 5:02 pm | अजया

आमचा पास *sorry2*

अधिराज's picture

18 Jul 2014 - 5:04 pm | अधिराज

फोटो असल्यास पाहण्यास उत्सुक!

कोबीची खीर...

जय गांधी (जय नेहरू)

(आता गवारीची खीर किंवा घेवड्याच्या खीरीच्या अपेक्षेत.....)

भिंगरी's picture

18 Jul 2014 - 5:08 pm | भिंगरी

*sorry2*

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 5:12 pm | मुक्त विहारि

सॉरी कशाबद्दल..

आम्ही कोबीचा आणि गाजराचा उपयोग फक्त सॅलड साठी करतो.

आता आम्हाला हे पदार्थ आवडत नाहीत, ह्याचा अर्थ असा नाही की, इतर कुणालाच ते पदार्थ आवडू नयेत.

आणि

एका वेगळ्या चवीची पा.क्रु. दिल्याबद्दल धन्यवाद...

संजय क्षीरसागर's picture

18 Jul 2014 - 5:15 pm | संजय क्षीरसागर

कोबीला अंगचा दर्प असतो त्यामुळे (तो परतला तरी) खीरीची वाट लागत असेल. शिवाय कोबीच्या कुरकुरीतपणाची मजा कोशिंबीरीसारख्या पदार्थातच आहे.

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 5:24 pm | मुक्त विहारि

कोशिंबीरीसारख्या पदार्थातच आहे.

+१

एक नंबर...(आपल्या पुणेकरांच्या भाषेत)

चलो इ बातपे एक बियर हो जाय...

भिंगरी's picture

18 Jul 2014 - 5:28 pm | भिंगरी

प्रत्येकाची आवड निराळी.मी स्वतः ही खीर विशेष आवडीने खात नाही,पण वेगळी पाकृ म्हणून दिली.
न आवडणार्यांचा साई सुट्ट्यो 00000000000000

मिपा धोरणानुसार नवीन होतकरु लेखक लेखिकांना प्रोत्साहन देणे ह्या सदराखाली कोबीची खीर ह्या पाककृतीस छान असा शेरा देण्यात येत आहे. धन्यवाद!

फोटो टाकल्यास 'वा!' असा शेरा वाढवला जाईल.

(भोपळ्याच्या खीरीपेक्षा फार काही वेगळी लागायची नाही. पण कोबीचा उग्र वास कसा घालवणार म्हणे?)
बाकी गाजराची खीर ही एक अत्यंत छान होणारी खीर आहे.
गाजर उकडून त्याचा मध्यातला हिरवट भाग हळूवार काढून टाकायचा नि लालसर गुलाबी/ ऑरेंज भाग घेऊन दुधामध्ये मॅश करुन घालावा. बाकी नॉर्मल खीर करतात तशी. माहीत नसल्यास मांजरास विचारणे. :)

मुक्त विहारि's picture

18 Jul 2014 - 5:31 pm | मुक्त विहारि

जास्त उकळल्यास, गाजराचा हलवा तयार होतो का?

जाणकारांच्या प्रतिसादांच्या अपेक्षेत...

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 5:34 pm | प्यारे१

थोडी जास्त नाही, खूप जास्त उकळावी लागेल. तसेच त्या खीरीस सातत्याने ढवळत रहावे लागेल. तरी ह्या होणार्‍या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे.
(गाजर खीरीत दुधात गाजर घालतात, हलव्यात गाजरात दूध घालतात. )

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2014 - 6:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

...तरी ह्या होणार्‍या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे.
हा पदार्थ शिजवताना सतत हलवत रहावे लागतो... तेव्हा तोपर्यंत त्याला "हलवा" म्हणावे आणि नंतर चांगला झाला की तो खावासा वाटेल तेव्हा त्याला "खवा" म्हणावे असा तोडगा सुचवतो ;) :)

(तोडगातज्ञ) इए

भिंग्रीतै, तुम्ही चेष्टा करताय असे धरून चालते.
कालच गाजराची खीर केली होती. हलव्यापेक्षा थोडी वेगळी चव लागते पण जिन्नस साधारण तेच असल्याने थोडी तशीच लागते. एकूणच छान लागते. ;)

दिपक.कुवेत's picture

18 Jul 2014 - 8:02 pm | दिपक.कुवेत

अशी गत येईल ओ भिंगरितै एखाद दिवशी....फोटो नसतील तर का उगाच नुसत्या पाकृ देउन आपला वेळ वाया घालवताय. प्रतिसादांचं कसं अवांतर होतेय ते बघताय ना? ईथे अगदि निष्णात / सजवलेले / जळावु फोटो हवेतच असा काहि नियम नाहिये. जो पदार्थ केलाय तो निदान दिसतो तरी कसा ह्याची पुसटशी कल्पना देणारा किमान एक तरी फोटो टाकलात तरी पुरे. फोटो काढुन तो फ्लिकर किंवा पिकासा तर्फे ईथे कसा अपलोड करायचा हे विचारलत तर जाणकार मंडळी नक्किच मार्गदर्शन करतील. सबब अधीक काहि बोलत नाहि आणि हो कोबी हा फक्त सॅलेड, भाजी, कोशींबीर ह्या स्वरुपातच आवडतो. अगदि खवा घालुन जरी त्याची खीर दिलीत तरी आपला पास.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2014 - 12:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

कल्पनेच्या मनोर्‍यांचे फोटो काढता येत नाहीत ओ :( ;)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2014 - 9:15 am | अत्रुप्त आत्मा

नव प्रयोगाला नवनाम द्या हो.. कोबिची खीर म्हणण्याऐवजी जरा खिरीतला कोबी म्हणून पहा बरं!
कोबिचा एकंदर स्व भाव धर्म पहाता,हे नाम अधिक सयुक्तिक वाटतं.

भिंगरी's picture

19 Jul 2014 - 2:34 pm | भिंगरी

खेड्यातून महाविद्यालयात,आलेला, नवखेपणाने बुजलेला, कावरा बावरा झालेला,
नवख्या वातावरणात,गोंधळलेला, आधुनिक तंत्रज्ञान थोडफार माहित असलं तरी त्यात तरबेज नसल्याने सगळ्यांच्या कुचेष्टेचा विषय झाल्याने बावरलेला आणि तरीही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारा विद्यार्थ्याची जी अवस्था होते तशी अवस्था माझी झाली आहे.
मिपावाल्यांनो फोटोसाठी क्षमस्व! मात्र ते तंत्रज्ञान शिकल्यानंतर फोटो नक्कीच टाकेन.
बाकी आपल्या पाकृची दाखल घेतली जात आहे हे ही नसे थोडके.

मुक्त विहारि's picture

19 Jul 2014 - 2:44 pm | मुक्त विहारि

हां, थोडी फार चेष्टा-मस्करी जरूर होते आणि ती चांगल्यापैकी खेळी-मेळीत होते. आणि ती त्या तेव्हढ्या लेखापुरतीच असते.

थोडे दिवस थांबा,

एखादी नवी पा.क्रु. किंवा एखादा उत्तम लेख टाका...

इथलीच माणसे, तुमच्या त्या लेखाला अथवा पा.क्रु.ला नक्कीच नावाजतील.

स्वप्नांची राणी's picture

19 Jul 2014 - 3:22 pm | स्वप्नांची राणी

ए कुचेष्टा नाही ग भिंगरी...गम्मत-जम्मत चाल्लीय तुझी..!!! देख, बदनामीमेंभी नाम हो गया कि नै...

जेनी...'s picture

21 Jul 2014 - 12:15 am | जेनी...

जाउदे गं !

उच्च पातळीवरचे लेख आणि त्यावर तेव्हड्याच ताकतीने दिलेल्या प्रतिक्रिया पाहूनच मिपावर आकर्षित झाले. आणि थट्टा मस्करी ही तर असायलाच हवी.
म्हणूनच एक नवी रेसिपी,पण हिचा फोटो मात्र तंत्रज्ञान शिकले तरी काढता येणार नाही.

खास सोमंबुगुशुशरवारी साडेबत्तेचाळीस वाजता करावी.

पाकृला हवे ते नाव द्या. (किंवा हवी तेवढी नावे ठेवा.)

पोकळ खेकड्यात दही भरून त्यांच्या पाठीवर फ्राय केलेली कारली ठेवावी.
आणि खेकड्याला हळू हळू कोबीच्या खिरीत सोडावा
सजावटीसाठी बटर (चहात बुडवतात ते) वापरावे.

मुक्त विहारि's picture

19 Jul 2014 - 7:27 pm | मुक्त विहारि

तुम्ही पण थट्टेवारी नेलेत ते बरे झाले...

मनीषा's picture

19 Jul 2014 - 6:31 pm | मनीषा

वा ! मस्तं पाकृ
या ़ खिरी बरोबर वांग्याच्या पुर्या चांगल्या कि तोंडलीच्या पुर्या बर्या लागतील ?

च्यामारी हे काय नविनच ! आत्ता पर्यंत कोबीचा वापर उपम्यात पाहिला होता,पण खीर हा प्रकार आजच समजला हो ! *SCRATCH*
बाकी फोटो टाका ना... हे असे हटके प्रकार फोटोतुन कसे दिसतात ते तरी कळेल ना.

मदनबाण.....
आत्ताची बदलेली सही :- Tune Maari Entriyaan... :- GUNDAY

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 12:02 am | संजय क्षीरसागर

तुम्ही फोटो मागतायं!

लीलाधर's picture

20 Jul 2014 - 5:17 pm | लीलाधर

कोबीचीबी काय खीर असते काय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2014 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मान्य आम्हाला पाकृतीचं काही कळत नाही, म्हणुन कोबीची खीर... अंहं बात कुछ हजम नहीं हो रही !

-दिलीप बिरुटे

हाजमोला लेलो ... कोबीखीर हजम करलो *crazy*

राही's picture

21 Jul 2014 - 4:09 pm | राही

अहो ही खीर खरंच करतात. पाकशास्त्राच्या इतिहासाच्या उलथापालथीत काही खास चीजा हाती लागल्या. पूर्वी 'कालनिर्णय'वाले पा.कृं.च्या स्पर्धा जाहीर करीत आणि विजेत्या रेसिपीज़ त्या वर्षीच्या कालनिर्णयमध्ये छापीत. अशा खूपश्या विजेत्या पा.कृंचे त्यांनी एक पुस्तक छापले. बहुधा ही पा. कृ. त्या पुस्तकात वाचलेली आहे. ती तिच्या 'पानगोभीची लच्छेदार खीर' अशा काहीश्या हिंदी वळणाच्या शीर्षकामुळे लक्षात राहिली. लेखिकाताई बहुतेक इंदौरच्या होत्या. त्यात अशी सूचनासुद्धा दिलेली आठवते की गोभी अगदी कोवळा आणि घट्ट गाभ्याचा घ्यावा, बाहेरची हिरवी पाने काढून टाकावी म्हणजे त्याचा कीस शेवयांसारखा बारीक पडतो. आणि तो तुपावर मंद आणि खमंग परतून घ्यावा म्हणजे त्याला वास येत नाही. किसाच्या मानाने दूध जास्त असावे. आटवताना काही वेळाने किसाभोवती दुधाचे लच्छे तयार होतात.... वगैरेवगैरे.

भिंगरी's picture

21 Jul 2014 - 4:28 pm | भिंगरी

ही खीर माझ्या आईला एका रेड क्रॉस संस्थेच्या बंगाली बाईंनी करून दाखवली होती