मोहान ( रामनगर जवळ) ला ३ दिवस रहिलो. तिथे फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस आहे. कुमाऊ मंडल चे पण मस्त हॉटेल आहे. फोरेस्ट मध्ये स्वस्तात सोय होऊ शकते . बाकी सर्व प्रवासासाठी कार केली. ड्रायवर साहेब आणि मी असे दोघेच होतो. ड्रायवर साहेबांना रोज एक क्वार्टर दिली की ते खूष असायचे.
गढवाल टुरीझम ची सर्व ठिकाणी हॉटेल्स अहेत (चोपता चा अपवाद ). चोपता ला ठीक ठाक हॉटेल आहे एक दिवस काढायचा असल्यास . ग्रुप ने गेल्यास काही ठिकाणी खूप छान सोय होते. मला एकट्याला ते परवडणारे नव्हते .
नीट चौकशी केल्यास फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस जवळपास सर्व ठिकाणी आहेत तेथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोय होऊ शकते गढवाल टुरीझम चे थोडे महाग पण छान आहे.
एकट्याचा खर्च अंदाजे ३० हजार ( ९ दिवस). ग्रुप ने गेल्यास अर्थातच स्वस्त पडेल…
चोपटाची अजून माहिती सांगाल का? रस्ते कसे आहेत? चोपटा ते देवरिया ताल चा रस्ता कसा आहे? चढण ग्रॅज्युअल आहे की स्टीप? बोल्डरयुक्त रस्ता आहे का? आणि अजून काय सुचेल ते.
चोपता चा रस्ता चांगला आहे. ४० किमी वर गोपेश्वर हे जरा मोठे ठिकाण आहे. पण चोपता ला राहण्यातच मजा आहे. तुंगनाथ हे पंचकेदार मध्ये सगळ्यात उंचावर आहे. १ दिवसाचा ट्रेक पण करता येइल.
देवरिया ताल साठी जवळपास सिंहगडाएवढे चढावे लागेल. ते पण तुंगनाथहून २० किमी आहे. रस्ता ठीकठाक.
मी मिपा सदस्य झाल्यापासून फोटोच्या सर्व धाग्यात सर्वोत्तम फोटो या धाग्यावर आहेत.असे नमूद करतो. याचे रहस्य उत्तम कॅमेरा व फिल्टर्स आहेत हे उघड आहे. पण किल्लेदाराकडे आहे फटोग्राफीची किल्ली. हे ही मान्य करावेच लागेल. मस्त !
प्रतिक्रिया
17 Jul 2014 - 2:13 pm | स्पा
अहाहा
फोटो कडक
पण नुसते फेस्बुक्सारखे फोटो टाकण्याऐवजी माहितीसुद्धा दिली अस्तीत तर मजा आली असती
17 Jul 2014 - 2:56 pm | शिद
+१११
बाडीस. :)
17 Jul 2014 - 2:23 pm | किल्लेदार
मला लिवायला मजा येत नाही ना.... *mail1*
17 Jul 2014 - 2:41 pm | मुक्त विहारि
बादवे,
दर माणशी किती खर्च आला?
कुठुन आणि कसे गेलात?
वाटेत खाण्याची आणि पिण्याची (?) काय सोय?
हे प्राथमिक प्रश्र्न उभे राहिले.
ह्यांची उत्तरे मिळाल्यास, पुढील प्रश्र्न नक्कीच विचारेन.
17 Jul 2014 - 2:50 pm | सविता००१
कसले मस्त फोटो आहेत...
17 Jul 2014 - 2:50 pm | कंजूस
फोटो आवडले .थोडक्यात आवडलेल्या न आवडलेल्या गोष्टी(खाणेपिणे ,प्रवास पाहणे ,सावधानता सूचना यातील )नोंद केली तरी चालेल .
17 Jul 2014 - 2:56 pm | कंजूस
पर्वतशिखरांचे स्पॉट मिटरींग जमले आहे .
17 Jul 2014 - 3:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
सजविलेली डिश समोर यावी अन खायला मिळू नये तसे वाटले...जरा लिहा की राव
17 Jul 2014 - 3:08 pm | किल्लेदार
मी एकलाच गेल्तो ….
मोहान ( रामनगर जवळ) ला ३ दिवस रहिलो. तिथे फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस आहे. कुमाऊ मंडल चे पण मस्त हॉटेल आहे. फोरेस्ट मध्ये स्वस्तात सोय होऊ शकते . बाकी सर्व प्रवासासाठी कार केली. ड्रायवर साहेब आणि मी असे दोघेच होतो. ड्रायवर साहेबांना रोज एक क्वार्टर दिली की ते खूष असायचे.
गढवाल टुरीझम ची सर्व ठिकाणी हॉटेल्स अहेत (चोपता चा अपवाद ). चोपता ला ठीक ठाक हॉटेल आहे एक दिवस काढायचा असल्यास . ग्रुप ने गेल्यास काही ठिकाणी खूप छान सोय होते. मला एकट्याला ते परवडणारे नव्हते .
नीट चौकशी केल्यास फोरेस्ट चे रेस्ट -हॉउस जवळपास सर्व ठिकाणी आहेत तेथे सगळ्यात स्वस्त आणि मस्त सोय होऊ शकते गढवाल टुरीझम चे थोडे महाग पण छान आहे.
एकट्याचा खर्च अंदाजे ३० हजार ( ९ दिवस). ग्रुप ने गेल्यास अर्थातच स्वस्त पडेल…
17 Jul 2014 - 3:51 pm | कपिलमुनी
लिहित रहा जमेल हळू हळू ..
फोटो साठी मिपाकर तुम्हाला सुद्द्लेकणाची सूट देतील :)
कोणत्या सीझन मधे गेला होतात?
टूरीस्ट कंपनीतर्फे की स्वतः बुकिंग केले होते ?
सविस्तर वर्णन लिहा ..वाचायला आवडेल .
17 Jul 2014 - 4:09 pm | किल्लेदार
मी नेहमीच डिसेंबर महिन्यात जातो. बुकिंग करत नाही पण नेटवर चौकशी करून मास्टर प्लान आणि कॉण्टिन्जन्सी प्लान तयार ठेवतो.
17 Jul 2014 - 3:41 pm | कंजूस
धन्यवाद .
17 Jul 2014 - 3:53 pm | कपिलमुनी
इतके सुंदर फोटो पाहून जायचे नक्की केले आहे
17 Jul 2014 - 5:43 pm | सूर्य
किल्लेदार,
इथले आणि फ्लिकर वरचे फोटो बघितले. फोटो निव्वळ अप्रतिम आहेत. आमचा सा.न. स्विकार करावा.
- सूर्य.
17 Jul 2014 - 6:06 pm | किल्लेदार
धन्यवाद....
17 Jul 2014 - 7:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो... बघून असं वाटतय की बॅग उचलावी आणि चालू पडावे !
17 Jul 2014 - 8:02 pm | यशोधरा
चोपटाची अजून माहिती सांगाल का? रस्ते कसे आहेत? चोपटा ते देवरिया ताल चा रस्ता कसा आहे? चढण ग्रॅज्युअल आहे की स्टीप? बोल्डरयुक्त रस्ता आहे का? आणि अजून काय सुचेल ते.
17 Jul 2014 - 8:43 pm | किल्लेदार
चोपता चा रस्ता चांगला आहे. ४० किमी वर गोपेश्वर हे जरा मोठे ठिकाण आहे. पण चोपता ला राहण्यातच मजा आहे. तुंगनाथ हे पंचकेदार मध्ये सगळ्यात उंचावर आहे. १ दिवसाचा ट्रेक पण करता येइल.
देवरिया ताल साठी जवळपास सिंहगडाएवढे चढावे लागेल. ते पण तुंगनाथहून २० किमी आहे. रस्ता ठीकठाक.
17 Jul 2014 - 8:49 pm | यशोधरा
धन्यवाद.
17 Jul 2014 - 8:59 pm | किल्लेदार
बाय दी वे. चोपता ला गेल्यावर कळले की हे चोपता आहे , चोपटा नव्हे.
17 Jul 2014 - 9:02 pm | यशोधरा
ओके, चोपता. :)
17 Jul 2014 - 8:10 pm | आतिवास
किल्लेदार यांची कुणीतरी मुलाखत घेतली पाहिजे.
इथं काहींनी सुरुवात केली आहेच त्या दिशेने :-)
या प्रश्नोत्तरांतून अधिक माहिती मिळते आहे.
17 Jul 2014 - 8:34 pm | किल्लेदार
मुलाखतीस कधीही तयार आहे....
18 Jul 2014 - 2:59 am | प्यारे१
खल्लास फटू!
इतर काही न लिहून ' अनुभवा ' असा काहीसा गुप्त संदेश नाही ना द्यायचा तुम्हाला?
18 Jul 2014 - 9:29 am | किल्लेदार
*pleasantry*
18 Jul 2014 - 9:59 am | पाटीलभाऊ
फारच सुंदर फोटू...
तिथपर्यंत कसे गेलात याची थोडी माहिती मिळाली तर फारच उत्तम... *smile*
18 Jul 2014 - 2:45 pm | मंजूताई
प्रश्णांची उत्तरे लिहीणयापेक्शा लेख लिवा की.....
18 Jul 2014 - 7:18 pm | किल्लेदार
कंटाळा !!!!
20 Jul 2014 - 11:30 am | राघव
नेहमीप्रमाणेच अप्रतीम फोटू! :)
राघव
22 Jul 2014 - 8:09 am | पहाटवारा
वाह .. नन्दादेवीच्या दर्शनाने डोळे सुखावले ...
बाप्पा .. सारे फोटू काढ्ले .. नन्दादेवी, त्रिशूळ, हाथी-घोडा .. अन नीलकंठ का म्हनून सोड्लायसा ??
-पहाटवारा
22 Jul 2014 - 4:25 pm | किल्लेदार
तो पण आहे. आज रात्री टाकतो.
22 Jul 2014 - 10:25 pm | किल्लेदार
नीलकंठ
शिवलिंग

हे माहित नाही
आणि मी
22 Jul 2014 - 10:47 pm | पहाटवारा
मस्त रे मित्रा .. तो तिसरा फोटो कामेटचा आहे बहुतेक..
-पहाटवारा
23 Jul 2014 - 12:33 am | अत्रुप्त आत्मा
हाय....हाय....! काय फोटू काढ्लेत हो. लाजव्वाब! *i-m_so_happy*
22 Jul 2014 - 7:57 pm | छबूतै
वा काय सुन्दर छायाचित्र आहेत! धन्यवाद!
22 Jul 2014 - 7:57 pm | छबूतै
वा काय सुन्दर छायाचित्र आहेत! धन्यवाद!
27 Aug 2014 - 10:58 am | सवंगडी
हे फोटू खरच तुम्हीच काढलेत न ?(लैच भारी आलेत म्हणून म्हणल)
आणि शेवटच्या फोतुटले तुम्हीच का ?
27 Aug 2014 - 1:02 pm | शरभ
मस्त.
27 Aug 2014 - 2:32 pm | खुशि
सुन्दर फोटो.तुम्ही म्हणता लिहिता येत नाही मला फोटो टाकता येत नाही.माझ्या आदिकैलास यात्रेचे फोटो असेच आहेत.
27 Aug 2014 - 5:02 pm | चौकटराजा
मी मिपा सदस्य झाल्यापासून फोटोच्या सर्व धाग्यात सर्वोत्तम फोटो या धाग्यावर आहेत.असे नमूद करतो. याचे रहस्य उत्तम कॅमेरा व फिल्टर्स आहेत हे उघड आहे. पण किल्लेदाराकडे आहे फटोग्राफीची किल्ली. हे ही मान्य करावेच लागेल. मस्त !
27 Aug 2014 - 5:26 pm | किल्लेदार
चौकटराजे …तुमच्या प्रतिक्रिया खरोखर उत्साहवर्धक आहेत. मनापासून आभार.
खुशी …. तुम्ही सांगा फक्त . फोटो आम्ही डकवून देउ.
सवंग-डी ;) शेवटच्या फोटोमध्ये मीच आहे. माझ्या गाईड ने काढला फोटो. हिमालयी अस्वलांच्या भीतीमुळे गाईड घेऊन गेलो.
27 Aug 2014 - 9:21 pm | सवंगडी
म्हणजे गाईडला अस्वलांच्या ताब्यात देऊन तुमचा सुटका करून घेण्याचा प्लान व्हता बहुतेक !
27 Aug 2014 - 9:46 pm | माझीही शॅम्पेन
एकदम खाल्लास फोटो राव
दंडवत स्वीकारा __/|\__
आयुष्यात (आणि भारतात) बरच काही बघायच राहलय , खरच अंतर्मुख झालो !!!
27 Aug 2014 - 10:20 pm | किल्लेदार
चला मग करा प्लान ....
28 Aug 2014 - 8:55 am | सवंगडी
चला होउन जाउ दे.
30 Aug 2014 - 8:47 pm | चौकटराजा
सनसेट किंवा सनराईज मधे शिखर नंदादेवी दिसतेय बहुतेक. कारण नंदादेवीला एक मोठी भिंत लागून आहे. ती भिंत आयगर सारखी टेरर आहे.
1 Sep 2014 - 5:17 pm | किल्लेदार
बरोबर....नंदादेवीच ते.