गाभा:
माझ्या रिकाम्या डोक्यात(म्हणजे रिंगणात) कधीकधी काही शब्दांची,अक्षरांची झटापट,मारामारी (आणि मरामरी सुद्धा)चालू असते.
नवरा आणि नवरी हे शब्द इतके मारामारी करतात की त्यांची घटस्पोट घेण्यापर्यंत मजल जाते.
आता पहा ना,
नवरा म्हणजे न-वरा म्हणजेच ज्याला न वरावा असा.
नवरी म्हणजे न-वरी म्हणजेच त्याला न वरणारी.
पण प्रत्यक्षात मात्र ते एकमेकांना वरतात
नंतर मात्र या वरण्यावरून (आणि वरणावरून सुद्धा) भांडत बसतात.
काही अक्षरे आपल्या मृत्युमधून लिंग भेद दाखवतात.
जसे
च_मेली (स्त्री लिंग)------------चमेली
घ _मेलं (नपुसंक लिंग)--------घमेलं
झ_मेला (पुल्लिंग)-------------झमेला
अगदी गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रर्र्र्र्र्र्र्र्र थांबून जाते हो माझी.
प्रतिक्रिया
7 Jul 2014 - 5:10 pm | योगी९००
तुमच्या शंका वाचून माझ्याही भरलेल्या डोक्यात काही शंका निर्माण झाल्यात...!!!
राहूदे विचारत नाही नाहीतर आणखी शंका तुम्हाला यायच्या...
7 Jul 2014 - 5:11 pm | गणपा
तुम्हाला कस्ली शेंका आहे ते कळ्ळ नाही.
बाकी दरवेळी ते गर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रर्र्र्र्र्र्र्र्र प्रकरण डोक्यात जातं राव.
7 Jul 2014 - 5:26 pm | ज्ञानोबाचे पैजार
श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
आणि
शंकरास सुमनाने पुजिले, शंकरास सु मनाने पुजिले, शंकरास सूमनाने पुजिले
आणि
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
हे आठवले
7 Jul 2014 - 5:54 pm | बाळ सप्रे
अहो या शंका सोडा.. तुमच्या दहिवड्यावरच्या तुमच्याच प्रतिसादाने भलत्यासलत्या शंका सगळ्यांच्या मनात येतायत.. तिकडे जाउन सगळ्यांच शंकानिरसन करा आधी..
9 Jul 2014 - 2:52 pm | भिंगरी
ओह शिट !!!!
ते किनई माझा नेम चुकला.
भरलेल्या खेकाड्यावर द्यायची प्रतिक्रिया चुकून दहीवड्यावर गेली.
आणि माझी अवस्था दही खाऊ माही खाहू अशी झाली.