ऑरेंज चीली आईसक्रिम

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
7 Jul 2014 - 4:50 pm

Final 1

साहित्यः
१. संत्री - ५ ते ६
२. लिक्वीड क्रिम - २५० मिलि
३. साखर - संत्र्यांच्या गोडिनुसार कमी / जास्त
४. टँग च अर्ध पाकिट (चित्रात आहे ते १०२ ग्रॅम चं आहे)
५. सुख्या लाल मिरच्या - २ किंवा चीली फ्लेक्स १/२ चमचा (कश्या तिखट आहे त्या प्रमाणात)
६. ऑरेंज कलर - १/२ चमचा
७. एका लिंबाचा रस (to cut the sharpness of chilli)
८. लिंबाची/संत्र्याची किसलेली साल - प्रत्येकि १ चमचा
९. सजावट आपल्या आवडिप्रमाणे

Sahitya

कॄती:
१. लिंबु आणि सत्र्यांच साल किसुन घ्या

Zest

२. सत्र्यांचा ज्युस काढुन घ्या. थोडा पल्पहि वेगळा ठेवा. सालं फेकुन देउ नका. सालींचा पांढरा भाग दिसेस्त ती चमच्याने स्कुप करुन घ्या आणि पाण्यात घालुन ठेवा जेणेकरुन सुकणार नाहित. फायनल स्टेप ला आपल्याला आईसक्रिम ह्यातच सेट करायचं आहे

Juice Cups

३. लिक्वीड क्रिम मधे चवीप्रमाणे साखर घालुन व्हीप्ड करुन घ्या. मिक्सर मधे मिरच्या भरडसर वाटुन घ्या

vipped cream Chilli

४. आता क्रिम व्हिप्ड केलेल्या भांड्यात अनुक्रमे ऑरेंज ज्युस+पल्प, ऑरेंज+लेमन झेस्ट, लिंबाचा रस, टँगचं अर्ध पाकिट आणि ऑरेंज कलर घालुन हलक्या हाताने मिक्स करा. लहान मुलांचा पोर्शन वेगळा काढुन बाकिच्या मिश्रणात भरडसर वाटलेल्या मिरच्या घालुन मिक्स करा.

Mix all added chilli flakes

५. प्लॅस्टिक फॉईल लावुन फ्रिजर मधे सेट होण्यास ठेवा. एक ३-४ तासानी सेट झालं कि बाहेर काढुन परत एकदा चमच्याने मिक्स करुन सेट होण्यास ठेवा. हिच स्टेप अजुन २ वेळा रीपीट करा. असं केल्याने आईस क्रिस्टल्स फॉर्म होत नाहित.

set cups repeat mix

६. चौथ्या वेळी पाण्यात घालुन ठेवलेले ऑरेंज कप्स पेपर टॉवेल किंवा टिश्युनी हलक्या हाताने पुसुन घ्या. सेट झालेलं आईसक्रिम ह्या रीकाम्या कप्स मधे भरुन कप्स परत सेट होण्यास ठेवा.

७. आईसक्रिम पुर्ण सेट झालं कि मस्त आंबट, गोड, तिखट ईनोव्हेटिव्ह ऑरेंज आईसक्रिम तितक्याच ईनोव्हेटिव्हली पेश करा.

Final 2

टिपा:

१. सजावटिसाठि सर्व करण्याआधी भरलेल्या ऑरेंज कप्स मधे एक छोटासा खड्डा करुन त्यात संत्र्याचे गुच्छ / पुदिना पान
लावुन सर्व करु शकता. माझ्याकडे चेरीज होत्या त्या मी अर्ध्या करुन डेकोरेट केल्या
२. सर्व करतेवेळि ह्या कप्सच्या खाली टिश्यु पेपेर किंवा पेपेर टॉवेल ची घडि करुन द्यायला विसरु नका अन्यथा कप्स प्रचंड थंड असल्या कारणाने हात बधीर होतील
३. ऑरेंज ईसेंन्स असेल तर जरुर घाला

प्रतिक्रिया

मधुरा देशपांडे's picture

7 Jul 2014 - 5:01 pm | मधुरा देशपांडे

आली का नवीन पाकृ. चिली फ्लेवर च्या आइस क्रीम बद्दल फक्त ऐकले आहे. कधी खाल्ले नाही. हे बरेच वेळखाऊ काम वाटते आहे तेव्हा करून बघेन वगैरे असे काही म्हणत नाही. पण सादरीकरण आणि फोटो फारच भारी.

'सादरीकरण आणि फोटो फारच भारी' हे आणि 'दुष्ट माणसा कुफेहीपा' असेही म्हणते :)

'सादरीकरण आणि फोटो फारच भारी' हे आणि 'दुष्ट माणसा कुफेहीपा' असेही म्हणते :)

भिंगरी's picture

7 Jul 2014 - 5:07 pm | भिंगरी

आहे बौ काय तरी नवीन
लई भारी !!!!!!!!!!!!!!!!

कवितानागेश's picture

7 Jul 2014 - 5:20 pm | कवितानागेश

आला का हा दुष्ट माणूस?! :)

अजया's picture

7 Jul 2014 - 5:30 pm | अजया

एवढे कष्ट घेणे काही होणार नाही !! फोटोतलं काढुन घेतलं आहे असं समजा !

दुष्टा, अतिशय दुष्ट माणसा, कुफेहीपा?

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:40 pm | दिपक.कुवेत

अश्या उत्तमोत्तम पाकृनी (हे आपलं माझं मीच म्हणतोय हो) माझ्या पापांचा घडा मला भरलेला आवडेल. चियर्स... *drinks*

दाढ काढलीये आज!! तुम्हीच खा. नेहमीप्रमाणेच खास पाकृ हेवेसांनल

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2014 - 11:57 am | प्रभाकर पेठकर

दाढ काढली म्हणून एव्हढ्याशा मिरच्यांनी कांही होत नाही. (मी मिरच्यांचे लोणचे खाल्ले होते, ते असो.)
आईस्क्रिम मुळे उघडलेल्या रक्तवाहिन्या बंद व्हायला मदत होईल. मिपावर कोणी दंतवैद्य असतील तर सांगतीलच.

आता मँगो चिली आईस्क्रिम बनवायचा विचार करतोय. तसेही तीन दिवस झाले आता दाढ काढून. ;)

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:41 pm | दिपक.कुवेत

लवकर कर....मँगो/चीली तर अतीउत्तम लागेल. फोटो नक्कि पाठव.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2014 - 6:06 pm | अत्रुप्त आत्मा

दु... :-/ दु... :-/ दु... :-/

अधिराज's picture

7 Jul 2014 - 6:09 pm | अधिराज

अहाहाहा! येकदम ब्येस!

कंजूस's picture

9 Jul 2014 - 1:37 pm | कंजूस

कसं सुचतं सर्व ?

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:43 pm | दिपक.कुवेत

बघतो आपली गाजराची पुंगी करुन....वाजली तर वाजली नाहितर मोडुन खाल्ली.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2014 - 2:43 pm | ज्ञानोबाचे पैजार

कातिल पाक कृती.

पण या दिपकशेठच्या पाक कृती घरी दाखवायची चोरी असते. ते हापुस अंब्याचे आईस्क्रीम माझ्यावरच बुमरँग झाले होते.

दिपकशेठ तुम्ही नाव बदला. सध्यातरी तुमचे पदार्थ आम्हाला फोटोत बघुन मिटक्या माराव्या लागतात.

पैजारबुवा,

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:45 pm | दिपक.कुवेत

काय कठिण काम नाय बघा. घ्या त्या पांडुरंगाचं नाव आणि करा सुरुवात. होउनच जौदे....

सुहास झेले's picture

9 Jul 2014 - 2:58 pm | सुहास झेले

काय नेहमी तेच तेच बोलायचे.... खल्लास !!!

तुम्ही दिलेल्या रेशिपीप्रमाणे मँगो चिली बनवून पाहायचा विचार आहे. :)

पिंगू's picture

9 Jul 2014 - 3:15 pm | पिंगू

सही आहे..

पहिल्यांदाच या प्रकारचे आईसक्रीम बघत आहे. छान दिसतेय. चवीचा अंदाज येत नाहीये.

जेवढ्या पाकृ टाकाल तेवढ्या पाकृ खिलवण्याचे बंधन बाय डिफॉल्ट लागू होत आहे. :)

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:46 pm | दिपक.कुवेत

एकदा भेट तर....

सस्नेह's picture

9 Jul 2014 - 3:33 pm | सस्नेह

मेले मेले !

आलं लिंबू आणि मिरची अशा दोन फ्लेवरचं आईस्क्रीम आमच्या बदलापूरात आनंद (आताचं चितळे आईस्क्रीम) आईस्क्रीममध्ये मिळत असे एके काळी!! आता का बंद केलंनीत देव जाणे.

भाते's picture

13 Jul 2014 - 9:39 am | भाते

सुमारे १० वर्षांपुर्वी ठाण्याला राम मारुती रोड वर टेम्पटेशन मध्ये आलं लिंबू , मिरची आणि शहाळ्याच्या स्वादातले आईसक्रिम मिळायचे. शहाळ्याचं आईसक्रिम खाल्याचं आठवतंय. तेव्हा मिरची वैगरे खायची हिंमत झाली नाही. अजुनही तिकडे हे स्वाद मिळतात का याची कल्पना नाही.

स्पा's picture

9 Jul 2014 - 3:57 pm | स्पा

अगंग्ग्ग
मेलो

अनन्न्या's picture

9 Jul 2014 - 4:19 pm | अनन्न्या

करून पहायला बरीच खटपट आहे, आणि आता आमच्याकडे मस्त पाऊस पडतोय त्यामुळे कांदा भजी खायचे दिवस आलेत!

मुक्त विहारि's picture

10 Jul 2014 - 12:06 am | मुक्त विहारि

डोंबोलीला कधी येणार आहात?

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:48 pm | दिपक.कुवेत

दर वर्षी भारतवारी प्रमाणे आता मध्यवर्ती डोंबोलीची वारीहि ठरलेली आहे. सो यायच्या आधी व्यनी करुन फक्कडसा बेत करुच.

स्वाती दिनेश's picture

10 Jul 2014 - 12:20 am | स्वाती दिनेश

मस्त...आइसक्रिम छानच दिसते आहे, लगेच उचलून खावेसे वाटते आहे.
-असे संत्र पोखरुन त्यात संत्र्याचे आइसक्रिम, लिंबू, अननस इ. पोखरुन ते ते आइसक्रिम तर करवंटीत टेंडर कोकोनट आइसक्रिम ही फिरेन्सच्या गिलेटोरियांची खासियत!
स्वाती

दिपक.कुवेत's picture

12 Jul 2014 - 2:54 pm | दिपक.कुवेत

ईथेहि एक दोन हॉटेलात असं त्या त्या फळांचं त्या त्या फळांमधे भरलेलं आईसक्रिम पाहिलयं. प्रेझेंटेशनच्या दृष्टिने एकदम कातील दिसतं ते!

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2014 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर

पाकृ आणि सजावट नेहमी सारखीच, दिलखेचक, क्षुधावर्धक वगैरे वगैरे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2014 - 2:28 pm | राजेंद्र मेहेंदळे

मिरची आणि आईस्क्रीम..कायतरी भन्नाट चव असणार
पाकृ आवडली बर्का

शिद's picture

10 Jul 2014 - 3:57 pm | शिद

जबरा पाकृ.

पण ह्या वेळी पाकृमध्ये आंबा वगळल्यामुळे धन्यवाद. ;)

मला दिसलेला हा धागा कोरा आहे.काळ्या ट्रे मधले सुंदर तीन ओरेंज मला दिसतच नाहियेत.चिलि घातलिये का चेरी सज वलिये ...काय नाविन्यपुर्ण रेसेपी आहे ..काहि म्हणजे काहिच दिसत नाहिये.
मी सुखी आहे.. *wink*

पिलीयन रायडर's picture

10 Jul 2014 - 6:51 pm | पिलीयन रायडर

हा माणुस जरा वेडाय का??
आम्हाला येतं का हे करता? मग फुकट कशाला जळावा जळवी करतो??
छे..

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:55 pm | दिपक.कुवेत

जळजळ होतेय का??? लगेच एक ऑरेंज कप उचल...नक्कि जळजळ थांबेल आणि हो, हा १००% सुरक्षीत आणि आरोग्यदायी उपाय आहे बरं!!!

पिलीयन रायडर's picture

10 Jul 2014 - 6:57 pm | पिलीयन रायडर

तू भारतात येतोयस ना? थांब तुझी सुपारीच देते कुणाला तरी!!

दिपक.कुवेत's picture

10 Jul 2014 - 6:53 pm | दिपक.कुवेत

पाकृ थोडिशी खटपटिची / वेळखाउ असली तरी एकदा तरी नक्कि करुन बघा. आखीर अच्छा खाने के लीये कुछ मेहनत तो करनी पडती हहै भाई| मस्त रिफ्रेश व्हायला होतं आणि खाताना जो मिरचीचा मधुनच हलका झटका लागतो....अहाहा वर्णन करुन उपयोग नाहि तो अनुभव घ्याच.

मदनबाण's picture

11 Jul 2014 - 7:24 am | मदनबाण

अफलातुन !
कुठेतरी वडा आईसक्रिम पाहिल्याचे आठवत, बेसनच्या पिठात आईसक्रिमचा गोळा टाकुन तो तळुन खाण्याचा काहीतरी अजब प्रकार होता तो !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ishq Samundar :- Kaante

तुमचा अभिषेक's picture

11 Jul 2014 - 10:46 am | तुमचा अभिषेक

अफलातून आहे. संत्र्याची वाटीही भारीच. चमच्याच्या जागी मस्त बोट टाकून खायचे ;)

दिपक.कुवेत's picture

12 Jul 2014 - 2:58 pm | दिपक.कुवेत

अभ्या काय आठवण काढलीस रे!! फार वर्ष झाली बोटाने आईसक्रिम खाउन...

संजय कथले's picture

12 Jul 2014 - 3:24 pm | संजय कथले

लई भारी दीपकराव

रमेश आठवले's picture

12 Jul 2014 - 11:37 pm | रमेश आठवले

पाककृति आणि फोटो छान आहेत.
अमेरिकेत गार्लिक नावाची हॉटेल्स ची चेन आहे. त्यांच्याकडे सर्व पदार्थ लसुण घातलेले मिळतात . मी
सानफ्रांसिस्को मधील त्यांच्या हॉटेल मधे या स्वादाचे आईसक्रिम खाल्ले आहे.

Maharani's picture

13 Jul 2014 - 6:40 am | Maharani

Wah kya baat hai....lai bhari

त्रिवेणी's picture

14 Jul 2014 - 2:25 pm | त्रिवेणी

हे पहा तुम्ही गोडच्याच पाककृती देता नेहमी.
पण आम्हा तिखट आवडणार्यांचाही विचार करावा ही विनंती. पाकृ मस्तच पण हल्ली ईतक्या खटपटीच्या पाककृती नाही जमत वयोमानामुळे.

दिपक.कुवेत's picture

14 Jul 2014 - 3:25 pm | दिपक.कुवेत

तिखटहि आहे कि....अजुन झणझणीत हवी असल्यास मिरच्यांच प्रमाण वाढवा. पण एवढं तिखट तुम्हाला झेपेल का? नाहि वयोमान झालं म्हणताय म्हणुन....

त्रिवेणी's picture

15 Jul 2014 - 11:08 am | त्रिवेणी

*ok*