पुन्हा ५ रुपयात जेवण!

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
6 Jul 2014 - 6:36 am
गाभा: 

कुठलाही पक्ष सत्तेवर बसला की आपोआप माजोरडा बनून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मनोभावे करू लागतो असे वाटू लागले आहे. अच्छे दिन येतील तेव्हा येतील. तूर्तास महागाई, दुष्काळ, अन्नटंचाई ह्या गोष्टी अक्राळविक्राळ रुप धारण करत असताना भाजपाच्या एका मस्तवाल नेत्याने, आशिष शेलारने असे विधान केले की मुंबईत ५ रू. मधे पोट भरता येते आणि ५००० रु. मधेही भरता येते.

जॉर्ज ऑरवेलच्या अ‍ॅनिमल फार्म ह्या पुस्तकाची आठवण येते. माणसाची सत्ता झुगारून टाकण्याकरता डुकरे इतर प्राण्यांच्या मदतीने क्रांती करतात आणि मग प्राण्यांची सत्ता येते. मग डुकरे अच्छ्या दिनांचे गाजर लटकवत स्वतः माणसासारखे वागू लागतात. दोन पायावर चालू लागतात. बाकी प्राण्यांवर जुलुम सुरु होतो. वगैरे वगैरे.
http://www.dnaindia.com/mumbai/report-after-congress-leaders-now-bjp-s-a...

शेलार साहेबांना योग्य त्या कानपिचक्या मिळतील अशी आशा. पार्श्वभागावर लाथ मिळाली अधिकच आनंद वाटेल.

महागाई खाली आणता येत नसेल तर त्या दु:खावर कमीत कमी डागण्या तरी देऊ नयेत अशी लोकांनी अपेक्षा केली तर ती वावगी म्हणता येईल का?

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

6 Jul 2014 - 2:27 pm | प्यारे१

दिन... अच्छे है!

आपण त्याने नेमके काय म्हणले ते वाचले का? त्याचे वाक्य असे होते की ५००० मध्ये मिळते आणि ५ मध्येही मिळते. त्यामध्ये किमान काँग्रेसचा मस्तवालपणा नाही. कृपया विपर्यास करू नये ही विनंती.

विजुभाऊ's picture

7 Jul 2014 - 2:06 pm | विजुभाऊ

ओ हुप्प्या काका.
अ‍ॅनिमल फार्म परत एकदा वाचा.
डुकरे बिचारी नेहमीच "सम आर मोअर इक्वल" या उक्तीचा अनुभव घेत कष्ट सहन करीत असतात.

तुमचा अभिषेक's picture

7 Jul 2014 - 3:01 pm | तुमचा अभिषेक

कृपया मुंबईत स्वस्त जेवण मिळते या अफवा(?) वा असली विधाने पुन्हा पुन्हा करू नका.
आधीच आमच्या मुंबईत मरणाची गर्दी आणि परप्रांतीयांच्या लोंढ्याचा प्रॉब्लेम आहे, उगाच त्यात आणखी भर.

ऋषिकेश's picture

7 Jul 2014 - 5:18 pm | ऋषिकेश

च्यामारी आता "चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला" ही म्हणही वापरायची चोरीच म्हणा की!
लसं म्हटलं की लागलंच मस्तवाल नावाचं बिरुद मागे!

(मस्तवाल) ऋ

हुप्प्या's picture

14 Jul 2014 - 9:03 pm | हुप्प्या

आपण आता सत्ताभ्रष्ट झालेले असल्यामुळे काय वाट्टेल ते बोला. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असा प्रकार करण्याची सत्ताभ्रष्ट लोकांना पूर्ण मुभा आहे. सत्ताधारी लोकांनी मात्र मोजून मापूनच बोलले पाहिजे.

नितिन थत्ते's picture

15 Jul 2014 - 2:25 pm | नितिन थत्ते

ऐला ऋषिकेश सत्तेत होता हे आधी नाय सांगायचं? कायतरी फायदा करून घेता आला असता की. :(

ऋषिकेश's picture

15 Jul 2014 - 2:31 pm | ऋषिकेश

=))

हुप्प्या's picture

30 Jul 2014 - 11:28 pm | हुप्प्या

विठोबाच्या भक्तीत रममाण होणारे नामदेव आणि महाराणींच्या भक्तीत तल्लीन होणारे सदर महोदय ह्यात फार फरक नाही बरे.

आशु जोग's picture

15 Jul 2014 - 5:55 pm | आशु जोग

हुप्प्या यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी काळाबरोबर राहतात
आणि रोजचा पेपर ते वाचतात

हुप्प्या's picture

30 Jul 2014 - 11:32 pm | हुप्प्या

http://www.loksatta.com/desh-videsh-news/only-rich-people-eat-tomatoes-s...
केवळ श्रीमंत लोक टोमॅटो खातात तेव्हा टोमॅटोचे भाव वाढले तरी फार बिघडत नाही. प्रभात झा, भाजप नेता

तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा!
ह्या "झा"ला कुणी जबाबदार नेता "झा"डून काढेल का?