झट्पट दहीवडे

भिंगरी's picture
भिंगरी in पाककृती
5 Jul 2014 - 3:15 pm

झटपट दहीवडे
साहित्य ...
बटर (चहात बुडवून खातात ते.)
गोड दही
चिंच खजुराची चटणी
जिरे पावडर
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
कृती.............
दह्यामध्ये साखर व चवीपुरते मीठ टाकून चांगले फेटून घ्यावे.
बटर कोमट पाण्यात बुडवून लगेच बाहेर काढून प्लेट मध्ये ठेवावे.
एक मिनिटाने त्यावर फेटलेले दही टाकून त्यावरआवडत असल्यास चिंचेची चटणी टाकावी.
वरून लाल तिखट,जीरा पावडर,चवीनुसार मीठ टाकावे कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावे.
थोडावेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास थंडही छान लागते.

प्रतिक्रिया

स्वप्नांची राणी's picture

15 Jul 2014 - 2:59 am | स्वप्नांची राणी

ऑजॉया बेंगॉली...ऑजॉया मिष्टी दोइ खॉबे! तुमी की खॉबे...???

खेकड्यांच्या लोणच्याची पक्रू आहे का ?

मुक्त विहारि's picture

12 Jul 2014 - 7:20 pm | मुक्त विहारि

साहित्य :

१. कुठलीही कं.
२. कुठलीहा शाखा
३. कुठलाही प्रदेश अथवा राज्य
४. महाराष्ट्र सोडून इतर कुठल्याही प्रदेशातील मॅनेजर

आणि

५. बाकी सगळे मराठी कामगार.

क्रुती.

एकदम साधी आहे.

मॅनेजरने ज्याला अजिबात अक्कल नाही अशा मराठी माणसाला, पगार वाढ द्यावी.त्यानंतर मराठी माणसांत आपापसात जे काही घडेल त्याला खेकड्यांचे लोणचे म्हणतात.

बादवे,

ह्या लोणच्याचा आस्वाद इतर परप्रांतीयच घेतात, हे सांगायला नकोच.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 9:38 am | अत्रुप्त आत्मा

एsssssssssssssssss, काय बोंबाबोंब लावलीये रे माझ्या नावानी??? http://www.sherv.net/cm/emoticons/sea-animals/crabby-crab-smiley-emoticon.gif
==========
*blum3*

आदूबाळ's picture

12 Jul 2014 - 3:16 pm | आदूबाळ

मयत री कर्नार क?

रतनगडच्या पायथ्याचे खेकडे आणि मोहाची XX याचे पुराण इथेच लिहू का दुसरा धागा काढू ?

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 9:53 am | मुक्त विहारि

तेच उत्तम

कोनाड्यात उभा दह्यातला खेकडा
मिपाचं नाव घेते माझा नं. पयला..

मुक्त विहारि's picture

13 Jul 2014 - 3:07 pm | मुक्त विहारि

+१

भिंगरी's picture

13 Jul 2014 - 3:57 pm | भिंगरी

धन्यवाद मिपावाले,
माझ्या मिपावरील प्रवेशाच्या पहिल्याच पाककृतीवर इतका प्रतिसाद मिळाला.
अजून काही प्रतिसाद आले कि शतक पूर्ण होईल
आणि ही सारी किमया माझ्या नजरचुकीमुळे गळपटलेल्या प्रतिसादामुळे.
जो भी होता है अच्छे के लिये होता है

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2014 - 7:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

.

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2014 - 7:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

..

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2014 - 7:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

...

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Jul 2014 - 7:46 pm | राजेंद्र मेहेंदळे

शतक झाले बघा
हा का ना का :))

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jul 2014 - 8:25 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/laughter.gif

मुक्त विहारि's picture

14 Jul 2014 - 9:33 pm | मुक्त विहारि

.......

इरसाल's picture

15 Jul 2014 - 9:47 am | इरसाल

दह्यातला खेकडा......मिपाकर कित्ती कित्ती ते आंबटशौकीन !!!!!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Aug 2014 - 12:19 pm | ज्ञानोबाचे पैजार

कालच नरकोंडम बेटावरुन परत आलो. काय मस्त साखरेसारखी गोड केळी मिळाली म्हणुन सांगू? अमावस्येच्या आधि उतरवल्या मुळे चांगली भरलेली होती. मग काय चांगली ४०-५० डझन केळी पाठीवर बांधुन घेतली आणि मारली समुद्रात उडी तिकडून बंगालच्या उपसागरातुन पोहत पोहत, कृष्णा, भीमा, मुळा-मुठा मार्गे पुणे गाठले.

उद्या म्हणजेच रविवारी नरकोंडम बेटावरची केळी, भरलेले खेकडे, आणि बटर दहिवडे यांचा आस्वाद घेण्यासाठी एक कट्टा रायगडाच्या टकमक टोकावर आयोजीत केला आहे.

सर्वांना सस्नेह निमंत्रण.

पैजारबुवा,

भिंगरी's picture

2 Aug 2014 - 2:58 pm | भिंगरी

उद्या टकमक टोकावरून कुणाकुणाचा कडेलोट होणार आहे?
माझा तर आधीच झालाय,चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद देऊन.

जेपी's picture

9 Sep 2014 - 5:30 pm | जेपी

मस्त कट्टा व्रुतांत.
पहिल्यांदाच हजेरी लावली आणी भरले बटरवडे आणी खेकडे पण खाल्ले.

भिंगरी's picture

9 Sep 2014 - 6:40 pm | भिंगरी

चला, म्हणजे गणपती गेले आणि खेकड्यावर उपवास सुटला म्हणायचा तर.....