भरले खेकडे

जागु's picture
जागु in पाककृती
4 Jul 2014 - 1:05 pm

पहिला खेकड्यांची थोडीशी माहीती करून घेऊ.

खेकडे म्हणजे लहान मुलांचा आवडीचा बाऊ. अगदी त्यांना चालताना पाहण्या पासून ते खाण्या पर्यंत. लहानांबरोबरच मोठ्यांनाही खेकडे म्हणजे आवडते प्रकरणच. त्यात हे खेकडे लाखेने भरलेले असले म्हणजे तर अजूनच चविष्ट गंमत. तर ह्या खेकड्यांचेही अनेक प्रकार आहेत. त्यापैकी मला माहीत असलेले समुद्रातले, खाडीतले व डोंगर-जमिनीतले खेकडे. डोंगरातील खेकडे काळे कुळकुळीत पाठीचे असतात. त्यांना मुठे म्हणतात. इतर खेकड्यांपेक्षा हे जास्त चविष्ट असतात. समुद्रातील व खाडीतीत खेकडे जरा फिक्कट कळापट-करड्या रंगाचे असतात. समुद्रात तर नक्षिदार पाठीचे खेकडेही असतात.

अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात. पण मी आणते त्या अनुभवा वरून तसे मला काही आठळले नाही. कधी कधी मिळतात भरलेले तर कधी कधी नाही. तर भरलेले खेकडे ओळखण्यासाठी खेकड्याची पाठ दाबून पहावी. दाबताना जर पाठ वाकत म्हणजे आत सहज जात असेल तर तो पोकळ आणि जर कडक असेल तर तो भरलेला खेकडा. शिवाय चांगल्या लाखेसाठी माद्या जास्त बघून घ्यायच्या. जर आपल्याला खेकड्यांचे पाय काढता येत नसतील तर ते शक्यतो कोळणींकडूनच काढून घ्यायचे.

खेकड्यांच्या पाठीच्या आकारा वरून नर-मादी ओळखायची. खालील फोटोतील पहीला नर खेकडा, दूसरी मादी खेकडा (खेकडीण किंवा मिसेस खेकडीण म्हणायची का? :हाहा:)

आता बर्‍याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते म्हणून हे खेकडे पिशवीत बांधून फिजर मध्ये ठेवा. साधारण १ तासानंतर ते पूर्णपणे मंद होतात. मग आरामात ह्यांचे पाय काढता येतात. काही जण बाजूच्या दोन मिशांसारख्या :हाहा: नांग्या ठेवतात. पण त्या ठेवल्याने भांड्यात जागा कमी पडते म्हणून मी ठेवत नाही.

तर आता पाककृती कडे वळू.

प्रमाण ७-८ खेकड्यांसाठी लागणार्‍या जिन्नसाचे देत आहे. मी जास्त खेकड्यांसाठी केले आहे फोटोत.
७-८ खेकडे
४ मोठे कांदे चिरून
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
आल्,लसुण्,मिरची कोथिंबीर पेस्ट
अर्धा चमचा हिंग
१ चमचा हळद
२ चमचे मसाला
१ चमचा गरम मसाला
चविनुसार मिठ
पाव वाटी तेल
पाणी गरजे नुसार

लिंबा एवढ्या चिंचेचा चिंचेचा कोळ (जास्त घेऊ नये.)

कांदा खोबर्‍याचे वाटण
साधारण पाऊण सुक्या खोबर्‍याची वाटी किसून
२ मध्यम आकाराचे कांदे चिरून

भ्ररायचे सारण.
१ मोठी वाटी बेसन (अंदाज येत नसेल तर थोड जास्त घेतल तरी चालेल)
पाव वाटी तांदळचा पीठ
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद पाऊण चमचा मसाला
अर्धा चमचा गरम मसाला
चवी नुसार मिठ
१-२ चिंचेचा कोळ (लिंबापेक्षाही कमी आकार होतील इतका चिंचेचा गोळा)

खेकड्यांचे पाय काढले की खेकडे आणि त्याचे पुढचे जे जाडे पाय (नांगे) स्वच्छ धुवून घ्या.


बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.

आता खालील फोटोत दाखवल्या प्रमाणे खेकड्याच्या कडेच्या मधोमध टोकदार जाडी टोकदार वस्तूच्या सहाय्याने खेकड्याची पाठ व पोट वेगवेगळे करा.

ह्यांच्या मध्ये जर काळसर छोटी पिशवी सारखे करखरीत वाटले तर तो भाग काढा.

आधीच पिठाचे पुढील प्रमाणे सारण करून ठेवा.
बेसन थोडे भाजून घ्या. त्यात तांदळाचे पिठ, हिंग, हळद, मसाला, गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ टाकून थालीपिठा एवढे घट्ट करा. अगदी पातळ नकोच. चिंचेचा कोळही प्रमाणातच वापरा. जास्त नको.
''

आता हे सारण खेकड्याच्या पोटाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या खाचेत तसेच पाठीच्या मध्य भागात भरून घ्या.

आता पाठ आणि पोट पुन्हा एकत्र जुळवा. पहिल्यांदाच केल्यामुळे एकत्र राहणार नाही असे वाटत असेल तर दोर्‍याने बांधून घेतले तरी चालेल.

राहिलेल्या पिठाचे गोळे करून बाजूला ठेवा. ते नंतर रश्यात सोडता येतात.
आता आपण रस्सा करायला घेऊ.

भांड्यात तेल गरम करून त्याला लसूण पाकळ्यांची फोडणी द्या. त्यावर कांदा गुलाबी रंग येई पर्यंत परतवा.

ह्यावर आले- लसुण पेस्ट टाकून परता मग त्यात हिंग, हळद मसाला घालून ढवळा व १ ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त गरजे नुसार पाणी घाला आणि खेकडे अलगद त्यात ठेवा.

वरून खेकड्यांचे मोठे नांगे टाका.

आता झाकण टाकून चांगले उकळू द्या. पाणी भांड्या बाहेर जाईल असे वाटत असेल तर थोडी गॅप ठेवा झाकणात.

एकीकडे कांदा खोबर्‍याचे वाटण करायला घ्या.
कांदा अगदी चमचाभर तेलात भाजून घ्या. नंतर सुके खोबरे बाजून घ्या.

थंड झाले की मिक्सर मधून वाटून घ्या.

रस्सा उकळत असताना मधूनच हलक्या हाताने ढवळून घ्या. पहिल्या उकळी नंतर ढवळल्या नंतर पिठाचे केलेल गोळे रश्यात शिजण्यासाठी सोडा.

साधारण १५ ते २० मिनीटे तरी मध्यम आचेवर हा रस्सा उकळू द्या. पाण्याची गरज वाटल्यास मधून पाणी टाका. आता २० मिनीटां नंतर ह्यात चिंचेचा कोळ घाला नंतर खांदा-खोबर्‍याचे वाटण, मिठ गरम मसाला घाला. व पुन्हा चांगली उकळी येऊ द्या.

उकळले की गॅस बंद करा. वाटल्यास थोडी चिरलेली कोथिंबीर स्वादासाठी वरून पेरा.

तय्यार आहे पिठ भरल्या खेकड्यांचा रस्सा.

अधिक टिपा:
बहुतेक टिपा मी वर दिल्या आहेतच. तरीपण चिंच कमी घाला. कारण चिंबोर्‍याचा रस्सा इतर माश्यांप्रमाणे आंबट चांगला नाही लागत. फक्त वास मोडण्या करीता चिंचेचा वापर केला आहे.

लाख म्हणजे काय हा ही प्रश्न बर्‍याचदा विचारला आहे म्हणून खालील आख्खा शिजवलेला खेकडा लाखेने भरलेला. लाख अंडे किंवा गाभोळीच्या प्रकारात मोडते.

बर्‍याच व्हेजी लोकांना फोटो पहावणार नाहीत पण बर्‍याच जणांनी मला ही रेसिपी विचारली होती म्हणून डिटेल मध्ये दिले आहे.

प्रतिक्रिया

बाकीचे बारीक पाय असतात काढून फेका किंवा ते धुवून मिक्सरमध्ये फिरवून त्याचा रस्सा गाळून तो रस्सा करताना वापरा. ह्यामुळे चव येते पण कटकटीचे काम असल्याने मी करत नाही टाकून देते.

आम्ही मात्र हे करतो. पाट्यावर खेकड्यांचे पाय थोडे पाणी टाकुन वाटतो आणि ते सर्व गाळुन रस्सा करताना वापरतो. मस्त चव येते.
तुमची रेसिपी क्लासच

जागुताई काय टायमिंग आहे.
मागच्या रविवारीच खे़कडे केले होते.

आता पावसाळा चालु झाला की आम्हा मत्स्यप्रेमींना खेकडे, सुकट वगैरेवर ३/४ महीने काढायला लागतात :)
बाकी अमावस्येला पकडलेले खेकडे चांगले भरलेले असतात यात काही तथ्य आहे का?

मला नाही वाटत कारण मी मध्ये कधी घेतले तरी भरलेले मिळतात. आणि अमावस्या पौर्णीमेलाही मला पोकळ मिळालेले आहेत.

सौंदाळा's picture

4 Jul 2014 - 1:35 pm | सौंदाळा

स्वारी..
तुम्ही वरती लेखातदेखिल याचा उल्लेख केला आहे पण तोंडाला पाणी सुटल्यामुळे मी डायरेक्ट कृती आणि फोटोंवरच उडी मारली.
आम्ही लाख काढुन टाकतो. आजी ठेऊन देत नाही. कशी लागते बघायला पाहीजे.

भिंगरी's picture

5 Jul 2014 - 3:24 pm | भिंगरी

अमावास्येला भरलेले खेकडे मिळतात. म्हणजे साधारणपणे अमावास्येच्या दरम्यान मादी अंडी घालते असे म्हणतात म्हणून त्या दरम्यान भरलेले खेकडे मिळतात. कधी अंडी आधी सोडली असतील तर अमावास्येला पोकळ खेकडाच मिळेल.

दिनेश शिन्दे.'s picture

4 Jul 2014 - 1:24 pm | दिनेश शिन्दे.

*ok*

प्रभाकर पेठकर's picture

4 Jul 2014 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर

नेहमीप्रमाणे चित्ताकर्षक आणि जठराग्नी प्रज्वलीत करणारी अजून एक झणझणीत पाककृती.
छायाचित्रांसाठी भांडी जरा दूसरी आणि स्वच्छ घ्यावीत हे जरा छायाचित्रकरणाच्या दृष्टीकोनातून सुचवत आहे. एव्हढी मस्त पाककृती, भांड्यांना कडेवर लागलेल्या खरकट्याने, रसभंग करते आहे. राग मानू नये.

प्रभाकरकाका तुम्हाला खरकटे कुठे दिसले छायाचित्रात? रस्सा ज्या पातेल्यात केलेला आहे त्याच पातेल्यात तो रस उकळून वर आलेला असल्याने त्या अन्नपदार्थाचे काही अंश तिथे लागलेले आहेत. ते सहाजीकच आहे दिसणे.

यशोधरा's picture

5 Jul 2014 - 7:12 pm | यशोधरा

जागू, पेठकरकाकांनी प्रेझेंटेशनच्या दृष्टीने लिहिले आहे. त्यांचा स्वतःचा हाच व्यवसाय असल्याने त्यांचा सल्ला मनावर घ्यावास असे सुचवावेसे वाटते. सानिका, दीपक, गणपा ह्यांचे धागे ह्या दृष्टीने जरुर पहा. तुझ्या पाकृ चांगल्या असतातच, थोडी प्रेझेंटेशनची अधिक काळजी घेतलीस तर त्यात फायदाच आहे. :)

यशोधरा ताई प्रभाकर काकांच्या सुचनेचे स्वागतच आहे. पुढच्यावेळी नक्कीच लक्षात ठेवेन. आणि इतर वेळीही मी बर्‍याचदा करते. पण ही पाकृ अशी आहे की साफ करण्यापासुन ते पूर्णहोईपर्यंत वेळ आणि श्रम दोन्हीला चिकाटी लागते त्यामुळे शेवटी आहेत तसे फोटो टाकलेत.

मला फक्त खरकट ह्या शब्दाविषयी म्हणायच आहे. खरकट म्हणजे जेऊन झाल्यानंतर जे काही अन्नकण सांडलेले असतात त्याला आमच्याइथे खरकट म्हणतात. वरील फोटो झाल्या झाल्या काढल्याचे आहेत. खरकट्याचा संबंध येत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

10 Jul 2014 - 4:35 pm | प्रभाकर पेठकर

>>>> खरकट म्हणजे जेऊन झाल्यानंतर जे काही अन्नकण सांडलेले असतात त्याला आमच्याइथे खरकट म्हणतात.

जागु,

खरकटं आणि उष्टखरकटं हे दोन वेगळे प्रकार आहेत असं माझं मत आहे.

जेवण शिजवलेले (खाल्लेले नाही) एखादे भांडे नुसते विसळून आपण ठेवत नाही कारण ते खरकटं असतं. 'उष्टी-खरकटी काढण्यातच जन्म गेला आमचा.' अशी वाक्य आपण ऐकतो. म्हणजे उष्टे सांडलेले आणि उष्टे नसलेले आणि सांडलेले अन्नकण असे दोन प्रकार अभिप्रेत आहेत्/असावेत. जेवण वाढताना ते जमिनीवर, टेबलावर सांडले असेल त्यालाही खरकटंच म्हणतात. अन्न शिजवताना गॅस भोवती, ओट्यावर सांडलेल्यालाही खरकटं म्हणतात.

माझी शब्दयोजना चुकली असेल पण त्याला अशी पार्श्वभूमी आहे. माझ्या मते पातेल्याला आतून जे अन्न लागलेलं आहे ते खरकटंच आहे. पण तुम्हाला शब्द खुपला असेल तर माफी मागतो.

पण छायाचित्र काढण्याआधी पातेल्याला, बाऊलला लागलेले अन्नकण साफ करुन घ्यावेत एवढेच सुचवायचे होते.

जागु's picture

17 Jul 2014 - 3:24 pm | जागु

अहो राग नाही आला. उलट ह्यापुढे मी फोटो काढताना खबरदारी घेईन. फक्त तो खरकट शब्द मनाला खटकला. पण तुम्ही आता त्याच तुमच्या मनातल विश्लेशण दिलत आणि ते खटकणेही गेल.

प्रभाकर पेठकर's picture

17 Jul 2014 - 3:53 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद, जागु.

विशाखा राऊत's picture

4 Jul 2014 - 2:15 pm | विशाखा राऊत

जागुताई खेकडे खावेसे वाटत आहेत.. मस्तच :)

केदार-मिसळपाव's picture

4 Jul 2014 - 2:34 pm | केदार-मिसळपाव

"आता बर्‍याच जणांना जीवंतपणी खेकड्याचा रस्सा करणे अवघड वाटते तसेच त्यांचे इतर पायही काढायला भिती वाटते"

हे अती भयंकर वाटले.

खाण्यासाठी हिम्मत करावी लागेल.

काही मंडळींना आवडत नसलं तरी अनेकांसाठी हे अन्न आहे.
वंगाळ स्मायाल्या टाकुन अन्नाचा अपमान करु नये.

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2014 - 3:23 pm | प्रसाद गोडबोले

पण रस्सा करताना खेकडा जिवंत असतो की मेलेला ? मागे एकदा फुगु मासा बनवण्याचा व्हिडीयो पाहिला होता , त्याला तर अपटुन अर्धमेला करतात ... आणि मग सोलतात !!

तसंही म्हणा आपल्याला काय फरक पडतो , चव मस्त झाल्याशी मतलब ! !

बाकी पाककृती अप्रतिम !!

केदार-मिसळपाव's picture

6 Jul 2014 - 5:12 pm | केदार-मिसळपाव

मी ती स्मायली टाकतांना पुर्ण बघुन नाही टाकली. लै वंगाळ आहे ती शेवटी शेवटी.
संपादकांना व्यनी केला आहे. ते योग्य ते पाउल उचलतील.

गणपा's picture

4 Jul 2014 - 2:53 pm | गणपा

बेसन भरण्याचा प्रकार नवाच.
बाकी पद्धत शेम २ शेम.

सुहास झेले's picture

4 Jul 2014 - 3:06 pm | सुहास झेले

जबराट... :)

भन्नाट पाकॄ, असलं पाणी सुटलं आहे ना तोंडाला पाकृ पाहून. *crazy*

आम्ही पण साधारण ह्याच पद्धतीनं खेकडा रस्सा बनवतो पण आमच्या घरी बेसन वापरत नाही. आता आईला सांगुन बनवायला हवं तुमच्या पद्धतीनं.

डहाणुला आत्याकडे गेलो तर यथेच्छ खेकडे खायला मिळतात. आम्ही नुसते उकडुन पण खातो पण गाभोळी भरलेले खेकडे असतील तर मग मज्जाच मज्जा. खेकड्यांचे फांगडे देखील फोडून आतील मांस/गर खाता खाता गप्पा मारत मस्त टाईमपास होतो.

अमावस्या-पोर्णिमे नुसार खेकडे भरलेले मिळतात असे म्हणतात.

अमावस्येला गडद काळोखात खेकडे अंडी घालतात म्हणून ते गाभोळी भरलेले असतात असं मानलं जाते. बाजारातून कधी खेकडे आणायचे असतील तर माझी आई अमावस्येच्या मागे-पुढे आणायची.

भावना कल्लोळ's picture

4 Jul 2014 - 3:21 pm | भावना कल्लोळ

आमच्या कडे (माहेरी आणि सासरी सुद्धा) या जीवाला आमच्या ताटात प्रवेश निषिद्ध आहे, कारण कधी खरेच तसे काही आहे का शोधण्याचा प्रयत्न केला नाही … याला खाले कि कान फुटतात म्हणे ……. *wink*

कपिलमुनी's picture

4 Jul 2014 - 3:22 pm | कपिलमुनी

लाळेने कीबोर्ड ओला झाला ;)

बेसन भरण्याची पाकृ नवी.. येत्या पावसाळ्यात ट्राय करायला हवी..

आम्ही नांग्या मोडून परतून खातो ..

समुद्री खेकडे आणि नदी - ओढ्यामधले खेकडे या मध्ये चवीला / कृतीमध्ये फरक आहे का ?

( मी फक्त नदी - ओढ्या मधलेच खाल्ले आहेत)

एस's picture

4 Jul 2014 - 3:24 pm | एस

इतक्या डिट्टेलवारी दिल्याबद्दल धन्स.

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2014 - 3:26 pm | प्रसाद गोडबोले

पाककृती अप्रतिम आहे :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2014 - 4:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

तेवढा खाताना कवचं काढायचा त्रास सोडला तर चव मात्र अनेक समुद्रान्नांच्या तोंडात मारणारी असते ! :)

बॅटमॅन's picture

4 Jul 2014 - 4:14 pm | बॅटमॅन

तेवढा खाताना कवचं काढायचा त्रास सोडला तर चव मात्र अनेक समुद्रान्नांच्या तोंडात मारणारी असते !

समुद्री शहाळंच जणू!!!!!

'फणसाअंगी काटे(ऑर कवच, व्हॉटेव्हर), आत अमृताचे साठे' म्हणताना शेख महंमदांनी फणसाऐवजी खेकडा म्हटलं असतं तरी चाललं असतं, नै?

आयुर्हित's picture

4 Jul 2014 - 8:52 pm | आयुर्हित

जागुताई, किती किती मेहनत घेतली ग आमच्यासाठी.
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही सारे मिपाकर!
मनापासुन धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

5 Jul 2014 - 11:59 am | सानिकास्वप्निल

आम्ही पण असेच बनवतो चिंबोर्‍या फक्त बेसन आणि कोळ वापरत नाही.

क्लास दिसत आहे, तोंपासू :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jul 2014 - 2:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मसालेदार बेसन आणि चिंचेचा कोळ तर चिंबोर्‍यांत "वॉव फॅक्टर" मिसळतात ! :)

रश्मी's picture

5 Jul 2014 - 1:42 pm | रश्मी

मस्त पाककृती *blum3*

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा. हे असे भरलेले खेकडे एकदा खाल्लेले पण समहाउ नाहि आवडले. ते बेसनाचं सारण घट्ट होतं आणि ते खेकड्याच्या पाठिला चिकटुन बसतं. त्यामुळे ते नुसतं खाव लागलं जे नाहि आवडलं. पण खेकड्यांचा रस्सा.....अहाहा. निव्वळ स्वर्गसुख. असा नुसता रस्सा, वाफाळणारा भात (तो सुद्धा जर का लाल, हातसडिचा मिळाला तर अतीउत्तम) आणि बाहेर कोसळणारा धो धो पाउस.....अहाहा चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.

तुमचा अभिषेक's picture

5 Jul 2014 - 7:49 pm | तुमचा अभिषेक

खेकडे फारच आवडतात पण जोडिला भरपुर वेळ हाताशी हवा तरच ते खायची मजा.
+७८६
खेकड्याचा बेत असेल तर मी तब्बल तास-दिड तास जेवतो. त्यातही चपाती-भाकरी नाहीच तर निव्वळ खेकड्याचे कालवण आणि भात.

तसेच भरलेल्या खेकड्यात बेसणाचे सारण घट्ट होऊन चिकटून बसले आणि ते खेकड्याच्या चवीत विरघळले नाही तर मजा गेली हे ही खरेच.

आमच्या घरीही चांगलेच होतात खेकडे पण तरीही खेकडे म्हटले की मित्राचे गाव आठवते, श्रीवर्धन .. चार दिवस राहिलो होतो पण रोजच संध्याकाळी ताजे खेकडे असायचे जेवणात, आणि नुसते असायचे नाही तर त्या आज्जी काय क्लास बनवायच्या. मी तिथेही तासभर जेवायचो. बरोबरचे बावळट मित्र चोच मारल्यासारखे खाऊन उठायचे पण त्यांच्यात खेकडा खायची आवड आणि अक्कल मला एकट्यालाच असल्याने (भले वासरांत लंगडी गाय शाणी) पण त्यामुळे त्याची आजीही मोठ्या कौतुकाने खाऊ घालायची मला.

अर्धवटराव's picture

6 Jul 2014 - 12:03 am | अर्धवटराव

खेकड्यासाठी जीव तळमळला... त्याचे तुकडे पडताना बघुन... व हि पाकृ आपल्या पानात पडण्याचे चान्सेस सध्यातरी नगण्य आहे या सत्याच्या जाणिवेने देखील :(
असो. आता एखाद्या कोंबडीवर ताव मारतो. तसंही कोंबडी खेकड्यापेक्षा लाख बरी (आंबट द्राक्षांनी भरलेलं तोंड लपवायची स्मायली आहे का?? ;) )

जागु ताई... अप्रतीम जमलीय भट्टी. हॅट्स ऑफ्फ.

केलेल्या भांड्यातून वेगळ्या सर्विंग बोल मध्ये घेतले स्वच्छ टेबलक्लॉथवर तो बोल ठेवुन फोटो घेतला तर बरे पडेल. चव छानच असणार. ते पाय कापायचे आणि खेकड्याने मेहनतीने घातलेली अंडी ते उल्लेख वाचून कसे तरी झाले.

माझ्याच्याने काही झेपत नाही अशी पाकॄ पाहणे ! ;) पण अ‍ॅज गणपा सेठ इज ऑलरेडी सेड... फूड इज कप्लीट ब्रम्हा ! आय विल ट्राय टु नो मोअर अबाउट इट. ;)
नाग्यां सुद्धा खातात ? कशा लागतात ?
बादवे... मी जंगलातले खेकडे पकडले आहेत.पण खाण्यासाठी नाही हं, फकस्त कुतुहल म्हणुन ! एखाद्या बारीक काडीला गांडुळ बांधायच आणि ती काडी याच्या बिळात सरकवायची हा या खेकड्याला पकडायचा नुस्का ! ;) मला त्यावेळी आमच्या मित्रांपैकी कोणी सांगितले होते की त्यांच्या नांगित बोट अडकले तर तो ते तोडुन टाकु शकतो ! हे खरयं का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2

सुंदर पाककृती जागू ताई..आमची आज्जी पण असच बनवायची..

बाकी आम्बट शेरे देणार्या लोकानू..कोंबडी ची अंडी खाणे ..मृत कोंबड़ी चे पाय तोड़णे आणि हयात तात्विक दृष्ट्या फारसा फरक नाही..

बाक़ी चलने दो..

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2014 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

गोष्ट इतक्यावरच थांबत नाही ! भाज्या आणि फळे जमिनीतून उपटणारे, तोडणारे, कापणारे, कच्चे खाणारे, इ इ लोकांनी...

हे वनस्पतींनाही भावना असतात जरूर वाचावे ! ;) :)

ब़जरबट्टू's picture

7 Jul 2014 - 1:37 pm | ब़जरबट्टू

खेकडे कधी खाल्ले नाहीत.. पण तुमची केलेली पाककृती अप्रतीम आहे..
पाककृती शेयर केल्यबद्दल धन्यवाद..

बाकी ते फोटो प्रेझेंटेशनचे मनावर घ्याच... :)

उपाशी बजरू.

आईगं... काय मस्त दिसतायत गं... दे ना इकडे पाठवुन.

रामपुरी's picture

9 Jul 2014 - 10:57 pm | रामपुरी

जिवंतपणी पाय तोडून घेणे, उभे चिरले जाणे, उकळले जाणे वगैरे शिक्षा त्यांच्या नशिबात असतात. तेही त्यांचा काही गुन्हा नसताना. अतिशय वाईट वाटले. :(
असो...

संदीप चित्रे's picture

9 Jul 2014 - 11:19 pm | संदीप चित्रे

तुला भेटणं अत्यंत आवश्यक आहे :)
खेकडे मस्तच!!!!!!

मला तो खालुन दुसरा फोटो खुप आवडला. अगदी तो.पा.सु.

जासुश's picture

15 Jul 2014 - 1:10 pm | जासुश

जागू मीच तुला ही रेसिपी मा बो वर विचारली होती....प्रतिसाद उशिरा देते य...तू तिथे सुद्धा रेसिपी दिली होतीस ..पण प्रतिसाद देऊ शकले नाही....खूप खूप धन्यवाद..मी हे खेक्डे एका ओळखीच्या व्यक्ती कडे खाल्ले होते..

पद्मश्री चित्रे's picture

16 Jul 2014 - 5:56 pm | पद्मश्री चित्रे

म्हणतो आम्ही.करतो असंच बेसन व चिंच सोडून . खेकडे करणं कला आहे आणि खाणं पण. पायांचा रस टाकून चव मस्त होते

एक नंबर. धागा वर आलाच पाहिजे.....

भटकंती अनलिमिटेड's picture

14 Jul 2016 - 3:14 pm | भटकंती अनलिमिटेड

तोंड को पाणी सुट्या! गेल्या आठवड्यातच तब्बल वीसेक खेकड्यांचा फडशा पाडलाय म्हणून कीबोर्ड ओला झाला नाही इतकंच.

हरिश्चंद्रगडला काय खेकडे खाल्ले होते तीन दिवस. पाऊस सुरु व्हायच्या वेळी वीकडेला तीन दिवस गेलो होतो. कोकणकड्यालाच एका बळदात मुक्काम. सगळा गड आमचाच. भास्कर विचारायचा पंकजदादा चला खेकडे धरु. आम्ही त्याच्यामागे मोठं पातेलं घेऊन. अंधारात टॉर्च मारली की दोनतील खेकडे झोतात पळत यायचे. आपण फक्त उचलून पातेल्यात भरायचे. फक्त एक चमचाभर तेल, मीठ मिरची आणि पाण्यात कालवून ज्वारीचं पीठ एवढ्याच सामग्रीवर काय कालवण बनवायचा भास्कर. अजून जिभेवर चव रेंगाळते आहे. खाण्याची अक्कल फक्त मलाच. बाकी लोक फक्त रस्सा आणि अर्धी-चतकोर भाकरी खाऊन बाजूला व्हायचे आणि मी मात्र दोनेक तास मैफिल लावायचो. बळद लहान असल्याने झोपायला जागा न मिळाल्याने बाकीच्यांची चिडचिड. झोपल्यावर रात्री केव्हातरी कडकड आवाज आला की समजून घ्यायचे गुहेबाहेर कवच फोडायला कोल्हे-लांडगे आलेत.

http://www.pankajz.com/2014/07/blog-post_3667.html

भारीच, ते चेपुवरचं भटकंती अनलिमिटेड तुमचंच आहे का?

भटकंती अनलिमिटेड's picture

22 Jul 2016 - 1:08 pm | भटकंती अनलिमिटेड

व्हय मीच तो पामर, जो सगळ्यांना उगा बोअर करतो.

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

14 Jul 2016 - 4:04 pm | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

खेकडे जिवंत असताना तळतात,उकडतात ,शिजवतात हे मला आवडत नाही ,यासाठी जागुतैचा उपाय आणखी पुढे नेतो,खेकडे आणल्यावर आधी ते फ्रिजरच्या आईस कंपार्टमेंटमध्ये तासभर ठेवावेत ,ते मरुन जातात ,मग त्यांना शिजवावे.

पूर्वाविवेक's picture

14 Jul 2016 - 4:08 pm | पूर्वाविवेक

मस्त ग जागु, एवढे फोटो काढायचे म्हणजे भारी सयंमचाच काम आणि सजवून फोटो काढेपर्यत धीर कुणाला. रस्श्याच्या घमघमाटाने पोटात कावळ्यांची फौज जमा होते.
आमच्याकडे पण असच करतात. पण चिंचेचा कोळ नाही वापरत. मी ते भरायचं पीठ अंमळ जास्तच करते. त्याचे गोळे रश्श्यात सोडते. लेकीला ते गोळे फार आवडतात.

नूतन सावंत's picture

16 Jul 2016 - 10:53 pm | नूतन सावंत

कधी बोलावतेस?

चांदणे संदीप's picture

14 Jul 2016 - 4:53 pm | चांदणे संदीप

खेकड्याला खायचा प्रयत्न केल्या जाईल!

Sandy

जागु's picture

18 Jul 2016 - 11:54 am | जागु

अरे धागा वर आला. (हाहा)
धन्यवाद.

भटकंती अनलिमिटेड मस्त वाटल वाचून. असे अनुभव भारीच असतात.

पूर्वा मी पण पूर्वी नाही चिंचेचा कोळ टाकायचे. पण सासू म्हणते चिंचेच्या कोळाने वईस वास जातो. तेव्हापासून टाकते.