गेले दोन दिवस मस्त पाऊस पडत आहे.
काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो.
पाऊस घरात Njoy करणार्यसाठी ही आमच्या काकुच्या गावची कोकणातील खास पाकक्रुती.
साहित्यः-
डाळ.
कांदे
फोडणीचा साहित्य
मीठ
काळ्या मसाल्यासठी:-
१+१/२ चमचा बडीशोप
६/७ मिरीचे दाणे
१ चमचा खसखस
४/५ लवंगा
१ इंच दालचिनी
तमालपतत्राच १ पान
मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे.
व एकत्र पुड करावी.
क्रुती:-
१) बारीक चिरलेला कांदा प्रथम फोड्णीस टाकावा.
२)नंतर वरुन डाळ घालावी
३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या.
४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि चान उकळी काढवी.
५) धुवांधार पाऊस, वाफाळता भात आणि त्यावर गरम गरम आमटी......वा!!!!! क्या बात है...!!!!
प्रतिक्रिया
30 Jul 2008 - 6:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळ्यामसाल्याची भाजी लै आवडते आम्हाला.
भाकर चुरुन खाण्याचा रस्सा म्हणुन आम्ही त्याच्याकडे पाहतो. :)
-दिलीप बिरुटे
(खेडवळ)
30 Jul 2008 - 9:45 pm | स्नेहश्री
ती कशी बर करतात? मी अजुन भाजी खाल्ली नाही आहे....
जर शक्य असेल तर येवु दे मिपावर...
(शिकण्यास उत्सुक) स्नेहश्री...
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
31 Jul 2008 - 12:21 am | टिउ
डाळीच्या ऐवजी कुठलीही भाजी टाकली तर होणार नाही का?
(फक्त मॅगी बनवता येणारा) टिउ
30 Jul 2008 - 6:36 pm | श्रीमंत दामोदर पंत
वाह!!!!!!!!!
अत्ताच तोंडाला पाणी सुटलय.................:)
30 Jul 2008 - 6:55 pm | प्राजु
ही आमटी म्हणजे ..... काय सांगू??
मस्त आहे रेसिपी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Jul 2008 - 8:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हे सर्व मसाल्याचं सामान एकत्र भाजलं तर?
(स्वयपाकातलं ओ का ठो न कळणारी) अदिती
30 Jul 2008 - 9:41 pm | स्नेहश्री
@ अदिती
प्रत्येक मसाल्याचं सामान भाजायला वेगवेगळा वेळ लागतो...
काही वेळा पदार्थ जळण्यची शक्यता असते .......जर त्याबाबतीत तुला confidence असेल तर फारच छान.....
Go Ahead with That..................
(सावध) स्नेहश्री.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
31 Jul 2008 - 12:15 am | धनंजय
हा काळा मसाला झटपट आणि मस्त दिसतो आहे!
मुख्य म्हणजे आमच्या घरच्या काळ्या मसाल्यासारखे खोबरे नाही (माझ्या काही मित्रांना खोबरे चालत नाही, त्यांच्यासाठी करता येईल. उत्तम सोय झाली.)
31 Jul 2008 - 8:27 am | विसोबा खेचर
केवळ अप्रतीम पाकृ!
आजच करतो...!
धन्यवाद स्नेहश्री......
तात्या.
31 Jul 2008 - 8:52 am | शिप्रा
डाळ कुठलिहि चालेल का? म्हणजे तुरिचि, हरबर्याचि ? का चवित फरक पडेल?
बाकि काळा मसाला भारि आहे..कोकणातील खास पाकृ अजुन येउ दे कि..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
31 Jul 2008 - 10:23 am | स्नेहश्री
तुरीच्या डाळी बरोबर हे जास्त छान लागत..........
चवीत थोडासा फरक पडतो....
प्रत्येक डाळी बरोबर काही ठराविक पदार्थाच जातात तस आहे हे...
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
1 Aug 2008 - 10:52 am | शिप्रा
प्रतिसादाबद्द्ल आभारि आहे..
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
8 Aug 2008 - 2:29 am | स्मार्ट बनी
अरे ही अमटि ना ..डाळ हरभरा असेल तर झाक लागते ..मसल मधे खोबरे टाका मस्तच ...
8 Aug 2008 - 3:52 am | घाटावरचे भट
लैच भारी पाकृ....लगेच करुन बघतो..
रूममेटने आणलेला काळा मसाला पडलाय घरी, कशात वापरावा असा प्रश्न पडला होता...
आज रात्रौ मिशन काळया मसाल्याची आमटी...
धन्यवाद....
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद