सेव्हन कप केक

लव उ's picture
लव उ in पाककृती
12 Jun 2014 - 10:58 am

सेव्हन कप केक
7cup_cake

मिपावर पाककृती द्यायचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. तस म्हणायला केक पण चविला मात्र बर्फीसारखी अस काहिस आहे.

7cup_cake
साहित्य:
बेसन १ कप
साजुक तूप १ कप
दुध १ कप
ओल्या नारळाची चोय १ कप
साखर ३ कप

कृती:

  1. वरील सर्व साहित्य कढईत एकत्र करून घ्यावे.
  2. मंद आचेवर १५ मिनिटे सतत ढवळत रहावे.
  3. कडा सुटायला लागल्यावर गस बंद करवा.
  4. एका ताटाला थोडे तूप लावून घ्यावे.
  5. त्यात हे मिश्रण गरम असतानाच ओतून पसरावे.
  6. चौकोनी आकारात वड्या कापाव्यात.

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

12 Jun 2014 - 11:09 am | दिपक.कुवेत

त्यामुळे प्रतिक्रिया देण्यास असमर्थ आहे.

लव उ's picture

12 Jun 2014 - 11:22 am | लव उ

आता काय करु?

फोटो फ्लिकरवर आहेत काय ? कारण जर तसं असेल तर मलाही आज इकडे फ्लिकरवरचे फोटो टाकण्यास जमले नाही.

लव उ's picture

12 Jun 2014 - 11:45 am | लव उ

हुश्श! बनवताना जेवढ दमायला झाल नव्ह्त तेव्हढ ह्या फोटोनी दमवलय. *smile*

लव उ's picture

12 Jun 2014 - 11:41 am | लव उ

7 cup cake

7 cup cake

स न वि वि's picture

12 Jun 2014 - 12:19 pm | स न वि वि

पण हा केक सेव्हन कप केक नावाचा का? त्यात ७ पदार्थ सुद्धा वापरले नाहित?

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2014 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

पदार्थ सात कपात (कपांच्या मोजणिने) घेतले आहेत की वो :)

लव उ's picture

12 Jun 2014 - 2:46 pm | लव उ

*ok*

लव उ's picture

12 Jun 2014 - 2:46 pm | लव उ

*ok*

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jun 2014 - 12:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

पदार्थ सात कपात (कपांच्या मोजणिने) घेतले आहेत की वो :)

लव उ's picture

12 Jun 2014 - 2:45 pm | लव उ

सेव्हन कप केक म्हणजे ७ माप जिन्न्स. सहित्य निट मोजलत तर ते ७ कप भरेल म्हणुन सेव्हन कप केक

काय राव केक सांगून बर्फी देता होय..

पैसा's picture

12 Jun 2014 - 2:59 pm | पैसा

मस्त आहे पाकृ! केक म्हणा, नाहीतर वड्या म्हणा! चांगलंच लागत असणार!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Jun 2014 - 3:11 pm | अत्रुप्त आत्मा

@नाहीतर वड्या म्हणा! >>> calling मु.वि. ;)

मुक्त विहारि's picture

12 Jun 2014 - 11:49 pm | मुक्त विहारि

आमच्या वड्यांच्या यादीत, हा एक नविन पदार्थ पण अ‍ॅडवला आहे..

...खूष?

मोहनथाळीसारखं वाटतंय का थोडं ?

लव उ's picture

12 Jun 2014 - 5:01 pm | लव उ

चव अफाट आहे याची.

इरसाल's picture

12 Jun 2014 - 4:08 pm | इरसाल

पाकृ कशी का असेना आपल्याला तुमचं नाव जाम आवडलं बघा. पुपाशु.

लव उ's picture

12 Jun 2014 - 5:02 pm | लव उ

सौन्दिडियन लोक बनवतात.

रेवती's picture

12 Jun 2014 - 4:16 pm | रेवती

तेलुगु लोक बनवतात ना हा पदार्थ? एका तेलुगु मुलीने मला सेव्हन कप्स स्वीट नावाने शिकवला व छानच लागतो.

लव उ's picture

12 Jun 2014 - 5:03 pm | लव उ

*smile*

सखी's picture

12 Jun 2014 - 5:24 pm | सखी

मीही हेच म्हणणार होते, तेलगु मैत्रिणीने एकदा केलेल्या या वड्या - पण तिने (खाली अनन्न्या म्हणाली तसे) साखर कमी करुन बदाम+काजुची पुड १ कप घातली होती. फार सुरेख झाल्या होत्या त्या वड्या.
फक्त इथे सगळे साहित्य आधीच एकत्र केले आहे तिने बेसन तुपावर परतुन घ्यायला सांगितले होते, ते बरोबर वाटते नाहीतर डाळीचे पीठ कच्चे लागेल असे वाटते.

अनन्न्या's picture

12 Jun 2014 - 4:36 pm | अनन्न्या

यात तीन कप साखर घातल्यास जास्त गोड होतात, दोन कप घालून करून बघा. बेसनाऐवजी मूगपीठ वापरले तर आणखी पौष्टीक होतील. छान लागतात चवीला!
माझा लेक याला पौष्टीक वड्याच म्हणतो, त्याला खूप आवडतात.

लव उ's picture

12 Jun 2014 - 5:04 pm | लव उ

छान माहिती

कवितानागेश's picture

12 Jun 2014 - 5:27 pm | कवितानागेश

या सातवाटीच्या वड्या म्हणून ऐकल्यायत. सोप्या आहेत.

सोप्या आहेत.

मलातर जाम अवघड वाटताहेत. बायकोला करायला सांगतो. :-)

प्यारे१'s picture

12 Jun 2014 - 7:51 pm | प्यारे१

त्या वड्या अथवा केक जे काय असेल ते चवीला भारी असणार.

अवांतरः ते नाव बदला राव! लव 'उ'? कितीही प्रयत्न केला तरी 'हाव इज इट पासिबल'?

एस's picture

12 Jun 2014 - 7:59 pm | एस

अवांतरः ते नाव बदला राव! लव 'उ'? कितीही प्रयत्न केला तरी 'हाव इज इट पासिबल'?

खिक् ;-)

लव उ's picture

13 Jun 2014 - 9:56 am | लव उ

*yahoo*

प्रभाकर पेठकर's picture

13 Jun 2014 - 10:26 am | प्रभाकर पेठकर

एक कप साजुक तुप आणि ३ कप साखर हे दोन भयावह जीन्नस सोडता अतिशय आकर्षक पाककृती वाटते आहे. करुन पाहीनच एकदा पण वड्या/केक मित्रमंडळीत वाटावा लागेल.

निवेदिता-ताई's picture

23 Jun 2014 - 9:12 pm | निवेदिता-ताई

मगतर करा लवकर