गंगा शुद्धीकरण -एक शिवधनुष्य

उडन खटोला's picture
उडन खटोला in काथ्याकूट
9 Jun 2014 - 6:44 am
गाभा: 

पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन!

प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .

या महाकाय प्रकल्पातील मोठी आव्हाने-

१, गंगा किनार्यावर असणार्या प्रदूषणकारी प्रकल्पांचे विस्थापन

२, साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर गंगेचे दोन्ही काठ कॅनॉल प्रमाणे बांधून दोन्ही तीरावर मोठी गटारे बांधणे

३, धार्मिक व अन्य कारणामुळे होत असलेले प्रदूषण रोखणे , ज्यात मॄतदेह गंगेत फेकणे / गंगाकिनारी प्रेत जाळून राख नदीत फेकणे इत्यादी गोष्टी ना(श्रद्धा न दुखावता) पर्यायी व्यवस्था निर्माण करणे

४,वाराणसी व गंगा किनारी राहणार्या रहिवाश्यांचे प्रबोधन करून गंगा शुद्धीकरण व स्वच्छता नियमांचे महत्त्व पटवणे , ज्यायोगे भविष्यातही गंगा शुद्ध राहिल .(असे नको की वारेमाप पैसा खर्च करून सरकारने गंगा स्वच्छ आणि शुद्ध करायची आणि लोकानी पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत पुन्हा अशुद्ध करायची )

५, वाराणसी ते कोलकाता एवढ्या प्रचण्ड अन्तराच्या भागावर ही योजना राबवणे व त्यासाठी आवश्यक त्या प्रचंड खर्चाची तरतूद करणे / कामाचा दर्जा उच्च राखणे

अशी अनेक आव्हाने आहेत . तरीही काल वर्तमान-पत्रात आलेल्या या बातमीने मन हरखून गेले -

http://timesofindia.indiatimes.com/india/A-waterway-from-Varanasi-to-Kol...

अशी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्या महापुरुषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम!

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!

तसेच यातून गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर होत असलेला प्रचंड खर्च देखिल वसूल होईल अशीही शाश्वती वाटते!

आपणास काय वाटते?

प्रतिक्रिया

काळा पहाड's picture

9 Jun 2014 - 10:20 am | काळा पहाड

अशी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्या महापुरुषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम!

दादांच्या असावी काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2014 - 11:07 am | डॉ सुहास म्हात्रे

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!

याऐवजी हे "कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक सुनियोजीतपणे केलेले आवश्यक आणि अभिमानास्पद असे मोठे विकासकाम ठरेल यात संशय नाही!" जास्त व्यवहार्य आहे

दुर्दैवाने गेल्या काही शतकांत भारतिय नागरिकाला "सुनियोजीत गैरनियोजन (well managed mismanagement)" पाहण्याची इतकी सवय लागली आहे की सर्वसामान्य आणि आवश्यक विकासकाम देखील त्याला अद्भुत आश्चर्य वाटू लागले आहे !

आत्मशून्य's picture

9 Jun 2014 - 11:24 am | आत्मशून्य

बेंच्मार्क लो झालाय हे अतिशय खरयं.

कवितानागेश's picture

9 Jun 2014 - 3:07 pm | कवितानागेश

शुद्धीकरण ठीक आहे. पण जलमार्ग वगरै कशासाठी? त्यातल्या माश्यांचे आणि मगरींचे काय होईल?
ते जीव जरी मतदार नसले, तरी आपल्या देशाचे नागरीकच आहेत! :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jun 2014 - 11:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आपण रस्ते, रेल्वेरूळ बांधतो तेव्हा काय होते ?

बॅटमॅन's picture

10 Jun 2014 - 11:06 am | बॅटमॅन

एग्झॅक्टली! सिलेक्टिव्ह उमाळे रोचक वाटतात.

आत्मशून्य's picture

10 Jun 2014 - 12:03 am | आत्मशून्य

भारतीय मच्छीमारांच्या सुटकेबद्दल मला आनंद व (यापुढे) त्यांचे हाथुन मारले जाणार्‍या माश्यांबद्दल मला दुखः वाटते.! मतदानाचा हक्क हा सर्वात पवित्र हक्क आहे! जे तो बजावत नाहीत त्यांची या देशात रहायची लायकी नाही. बाकी सर्व जीव शिव... (एकच.)

पोटे's picture

9 Jun 2014 - 4:34 pm | पोटे

टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे. इतकी वर्शे घाण यान्च्याच काळात झाली. आता हेच ती घाण साफही करणार, तर त्याचे कौतुक कशाला?

गन्गा साफ ठेवा म्हणुन कॉम्ग्रेसने आदेश काढला असता तर हिन्दुत्ववादी सन्घटनानी आन्दोलने सुरु केली असती.

सेतु प्रकल्पाचेही हेच झाले. वाजपेयी सरकारने सेतु प्रकल्प आनला. तॅन्व्हा हिन्दु सन्घटना गप्प होत्या. वाजपेयीजाउन कोन्ग्रेस आल्यावर त्यानी तोच प्रकल्प पुढे न्यायचाम्हटला तर लगेच आन्दोलन सुरु झाले. गम्मतच सगळी !

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2014 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

कॉणी काय चांन्गले कॅरायचे ठॅरॅवले तरी काही जणान्चे पोट दुख्ते हेच खरे नाय्का ? ;) =))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jun 2014 - 11:48 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>>टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे
ती काय मुळामुठा आहे ? भली मोठी आहे ती.

यशोधरा's picture

10 Jun 2014 - 10:25 am | यशोधरा

मिठी नदीपेक्षाही मोठी आहे म्हणे!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Jun 2014 - 2:55 am | विश्वनाथ मेहेंदळे

मुंबईकरांना मिठी बद्दल जाज्वल्य अभिमान वाटत नसल्याने, तुमचा टोमणा फुकट गेला आहे. मुंबईकर बिचाऱ्या मिठीला नाला,खाडी काय वाटेल ते बोलत असतात. :-)

जाताजाता :- पुण्या आणि मुंबईत फरक हा की एका शहरात नदीला नाला म्हणतात आणि दुसऱ्यात नाल्याला नदी ;-)

मी काही टोमणा मारला नव्हता. मुळा मुटेह्वरुन मला सहज मिठीचा प्रलय वगैरे आठवले त्यावरुन म्हटले. प्रत्येक जण मिपावर फक्त टोमणेबाजी करायला येत नाही :)

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2014 - 9:25 pm | श्रीगुरुजी

>>> टिथे गन्गेच्या काठी इतकी वर्शे भाजपाचीच सत्ता आहे.

१९४७ पासून आजतगायत किती वर्षे भाजपची सत्ता होती/आहे?

>>> इतकी वर्शे घाण यान्च्याच काळात झाली.

इतरांच्या काळात तिथे काय अमृत होते का?

>>> आता हेच ती घाण साफही करणार, तर त्याचे कौतुक कशाला?

आजवर इतर कोणीच घाण साफ करायचे मनावर घेतले नव्हते, म्हणूनच कौतुक.

>>> गन्गा साफ ठेवा म्हणुन कॉम्ग्रेसने आदेश काढला असता तर हिन्दुत्ववादी सन्घटनानी आन्दोलने सुरु केली असती.

राजीव गांधींनी गंगा शुद्धीकरणाचा विचार मांडला होता. पण कार्यवाही झाली नव्हती. तेव्हा कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली नव्हती.

जरा इतिहास नीट वाचा व समजून घ्या. तुमच्यात इतिहासाचे बरेच अज्ञान आहे.

राही's picture

9 Jun 2014 - 6:21 pm | राही

गंगा तिच्या मुखापासून सुमारे आठशे किलोमीटर आतपर्यंत नॅविगेबल आहे. (खरे तर अलाहाबाद पर्यंत.) इन फॅक्ट हा भारतातला सर्वांत मोठा जलमार्ग समजला जातो. त्यातून मालवाहतूक होते. अर्थात यात सुधारणा आणि डागडुजीला पुष्कळ वाव आहे. टर्मिनल्स, मालधक्के यांची दुरुस्ती आणि देखभाल गरजेची असावी.

प्रदीप's picture

10 Jun 2014 - 1:26 pm | प्रदीप

कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!

अगदी. पण क्रूझ वाराणशीहून निघून हूबळी येथे पोहोचल्यावर तिथे धक्क्कामगारांचा/कारकूनांचा/अधिकारीवर्गाचा/ अजून कुणाही संबंधित/असंबंधित माथेफिरूंचा संप सुरू झाला आहे, त्यामुळे पुढील पंधरा दिवस (कमीत कमी) काहीही हालचाल होणार नाही, असे समजल्यावर बोट पुन्हा उलटी न्यावी लागेल! तेव्हा ह्या क्रूझच्या प्नॅनिंगसाठी, बंगालात समांतर जोरदार साफसफाई होणे आवश्यक आहे!

सुनील's picture

10 Jun 2014 - 1:49 pm | सुनील

पण क्रूझ वाराणशीहून निघून हूबळी येथे पोहोचल्यावर

नदीजोड प्रकल्पदेखिल सुरू झाला वाट्टं! ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Jun 2014 - 11:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे

समजा जोडल्या नद्या, हुबळी ला कुठली नदी जाणार ? अर्ध किंवा सुडो कन्नडीगांनी प्रकाश टाकावा ;-)