Vivid Sydney - रंगबिरंगी सिडनीतला रंगबिरंगी कलाविष्कार...

नानबा's picture
नानबा in भटकंती
7 Jun 2014 - 10:01 am

दक्षिण गोलार्धामधली सगळ्यात happening city म्हणजे सिडनी. अमेरिका युरोप आणि एकूणच बहुतांश प्रगत जगापेक्षा उलट्या बाजूला असलेल्या ऑस्ट्रेलिया मधलं सगळ्यात मोठं शहर. पृथ्वीच्या दक्षिणेकडे असल्यामुळे उत्तरेकडच्या जगापेक्षा इकडे सगळंच उलटं. एप्रिल मे मध्ये जगभर उन्हाळा असताना इकडे कडक थंडी, तर सारं जग बर्फ़ात आणि थंडीत कुडकुडत सांताक्लॉजचं स्वागत करत असताना इकडे मरणाचा उकाडा.

अशा सिडनीतला सगळ्यात entertaining festivals मधला एक महत्त्वाचा festival म्हणजे Vivid Sydney. दरवर्षी हिवाळ्याच्या सुरूवातीला, म्हणजे मे च्या अखेरीस हा festival आयोजित केला जातो. २००९ मध्ये New South Wales governement ने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या फ़ेस्टिव्हलची सुरूवात केली. आणि त्यांचा हा उपक्रम बराच यशस्वी झालाय. दरवर्षी या कालावधीत फ़क्त vivid show पाहण्यासाठी जगभरातून जवळपास ५-६ लाख पर्यटक सिडनीला भेट देतात. सिडनी CBD च्या मध्यात, ओपेरा हाऊस, हार्बर ब्रिज, द रॉक्स, डार्लिंग हार्बर वगैरे भागात या वेळेत संध्याकाळी ६ ते ९.३० या वेळेत बरेच कार्यक्रम आयोजित होतात. रॉक कॉन्सर्ट्स, म्युझिक फ़ेस्टिव्ह्ल्स वगैरे चालू असतात. खाण्यापिण्याची तर चंगळ असतेच, पण सगळ्यात मुख्य आणि बघण्यासारखा कार्यक्रम म्हणजे या वेळेत चालणार लेझर शो. ओपेरा हाऊस, हार्बर ब्रिज आणि सगळ्या वास्तूंवरची लेझर डिझाईन्स आणि ऍनिमेशन शो पाहण्यातली मजा अवर्णनीय.

यंदाच्या Vivid show ला जायची संधी मिळाली. फ़ोटु आणि व्हिडीओ जोडले आहेतच.

sf
Sydney Museum of Contemporary Arts च्या इमारतीवरचा लेझर शो

ad

sd

asf

sd
रस्त्यांवर केलेली लेझर डिझाईन्स

ad
मित्रमंडळ

आणि हे काही व्हिडिओ

https://www.youtube.com/watch?v=UFfpP7mQSRk

https://www.youtube.com/watch?v=y1A-DMUQGx8

https://www.youtube.com/watch?v=31q2HIAO0Ok

https://www.youtube.com/watch?v=BqvLadIil6Y

(थेट लिंक देण्याचा प्रयत्न फसल्यामुळे हा प्रताप.)

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

7 Jun 2014 - 11:07 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jun 2014 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट आहेत लेझर शोज !

मुक्त विहारि's picture

7 Jun 2014 - 3:17 pm | मुक्त विहारि

मस्त रे मित्रा....

आता केंव्हा येतोयस आपल्या मध्यवर्ती डोंबोलीला?

नानबा's picture

7 Jun 2014 - 4:03 pm | नानबा

येईन लवकरच.... :)

इनिगोय's picture

7 Jun 2014 - 5:03 pm | इनिगोय

वाहवा!
बाकी वर्णनही येऊदे की. लेझर शोखेरीज आणखी कायकाय पाहिलंस? ऎकलंस?

लेझर शोखेरीज आणखी कायकाय पाहिलंस?

त्यावेळेत तिकडे सगळीकडे लेझर शो असतात. बिल्डींग्स, झाडं, रस्ते, सगळीकडे लेझरच्या करामती.
आम्ही गेलो होतो त्या दिवशी कॉन्सर्ट नव्हता. वर्किंग डे होता त्या दिवशी. आज रॉक कॉन्सर्ट आहे म्हणे...
बाकी खाण्याच्या बाबतीत आपण मागे कधीच नाही. त्यामुळे squid salad, calamary rings, sushi with teriyaki chicken इ इ. पदार्थांवर मनसोक्त ताव मारल्या गेला.. ;)

मुक्त विहारि's picture

7 Jun 2014 - 7:18 pm | मुक्त विहारि

डोंबोली कर शोभतोस खरा...

खाण्या-पिण्यात मागे राहतो, तो डोंबोलीकर न्हवेच...

सुबोध खरे's picture

7 Jun 2014 - 9:03 pm | सुबोध खरे

वा नानबा
एन्जॉय करून घ्या
एकदा लग्नाचे लिगाड मागे लागले कि कुठे एन्जॉयमेंट?

दुसरा व तिसरा फोटो फार आवडले.

दिपक.कुवेत's picture

9 Jun 2014 - 11:25 am | दिपक.कुवेत

व्हिडिओ सवडिने बघतो.

अच्छा !! तुम्ही सिडनीत असता तर!! ;)

जोक्स अपार्ट, मस्त फोटु. हापिसात व्हिडो बघता यायचे न्हाईत, घरला गेल्यावं बगतो.

नानबा's picture

9 Jun 2014 - 3:18 pm | नानबा

कसं व्हायचं सूड्राव तुम्चं??

पैसा's picture

10 Jun 2014 - 12:34 pm | पैसा

मस्त आहे सगळं. खूपच सुरेख!

अवांतरः सूड सिडनीमधे रहाणार्‍यांना कधीचा शोधतो आहे. माहिती नाही का रे!

प्यारे१'s picture

10 Jun 2014 - 12:57 pm | प्यारे१

मस्तय!

मदनबाण's picture

12 Jun 2014 - 10:12 am | मदनबाण

मस्तच ! और भी आने दो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}