मासे ४०) कान्टा

जागु's picture
जागु in पाककृती
6 Jun 2014 - 12:41 pm

साहित्य :

कान्टांचे २ वाटे
लसूण पाकळ्या १५-२०
२ चमचे मसाला
अर्धा चमचा हळद
लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
मुठभर चिरलेली कोथिंबीर
२ मिरच्या
चवीनुसार मिठ
२ पळ्या तेल

पाककृती:
कान्टांची खवले, शेपुट व पोटातील घाण काढुन टाकावी व कान्टा तीन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
भांडे तापवून त्यात तेल घालावे. तेल चांगले तापले की त्यावर लसूण पाकळ्यांची फोडणी द्यायची. त्यावर लगेच हळद, मसाला व चिंचेचा कोळ घालायचा. मग त्यात साफ केलेल्या कांन्टा व मिठ घालायचे. शिजू लागले की एकदा हलक्या हाताने ढवळायचे. जोरात ढवळल्याने त्या तुटतात. ५-७ मिनिटे शिजले की त्यावर मोडलेल्या २ मिरच्या व चिरलेली कोथिंबीर कालून १ मिनिट ठेवून गॅस बंद करायचा. चविला अप्रतिम लागतात.

टिपा:
कान्टां हे समुद्रातील मासे. आकाराने साधारण बोटाएवढेच असतात. ह्यांचा सिझन असतो. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये भरपूर प्रमाणात हे मासे मिळतात. हे मासे काही प्रमाणात काटेरीच असतात पण खुप चविष्ट असतात.

ह्यांचे वरील प्रमाणे सुकेच जास्त चांगल्या लागतात.

मसाल्या ऐवजी १ चमचा तिखट वापरू शकता.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Jun 2014 - 1:58 pm | मुक्त विहारि

सुट्टीचा दिवस...

त्यामुळे

मासे खायला, मी पहिला...

क्रुती नंतर वाचतो.

चला या पंगतीला....

विशाखा राऊत's picture

6 Jun 2014 - 2:51 pm | विशाखा राऊत

जागुताई.. मस्तच ग.. कधी येवु ते सांग हे सगळे खायला मी ;).. मासा जीव आहे ग माझा

दिपक.कुवेत's picture

6 Jun 2014 - 8:59 pm | दिपक.कुवेत

हाय लगा.....मासे आणि पाकॄ नेहमीप्रमाणेच तोंपासु.

पिवळा डांबिस's picture

6 Jun 2014 - 9:34 pm | पिवळा डांबिस

+१: कान्ट्याचं सुकं चवीला मस्त असतं!
-१: घरात सगळ्यांना पुरे पडायचे म्हणजे हे ढीगभर विकत घ्यावे लागतात. आणि तसे ते घेतल्यावर ते साफ करायचं काम माझ्यावर पडायचं. तासभर तिच्यायला नुसता माशे साफ करतोय!!! त्यामुळे या माशांवर व्यक्तिगत राग आहे!! *diablo*
हां जर दुसर्‍या कुणी साफ करून, (आणि तिसर्‍या जणीने शिजवून!) जर पानात पडले तर मात्र मस्त मजा आहे!!!
*ok*

पिवळा डँबिस हे मात्र खर की हे साफ करायला खुप किचकट काम आहे. कारण एकतर छोटे आणि हातातून सटकणारे पण. पण टेस्टच्या पुढे जरा हे श्रम मागे पडतात.

मुक्त विहिर, दिपक धन्स.

विशाखा कधीही ये.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jun 2014 - 2:58 am | प्रभाकर पेठकर

आपण पेडवे म्हणतो त्या पैकी दिसते आहे. ह्याच्याच जरा मोठ्या जातीला तारली म्हणतात असे वाटते.

खवले साफ करण्यात जास्त वेळ जातो हे खरे आहे. पण हे मासे चवीला अप्रतिम असतात.
तारलीपेक्षा पेडव्यांचे खवले जास्त सहज निघतात. बाजारातून आणल्यावर मासे जरा पाण्यात ठेवावेत त्यामुळे खवले निघण्यास मदत होते.

तारली मध्ये ओमेगा-३ हे शरीराला आवश्यक ऑईल हे जास्त असते. परंतु तारली आकाराने जास्त मोठी असेल तर त्यातील तेलामुळे त्याला जास्त उग्र वास येतो.