पुण्याजवळ उन्हाळी भटकंतीसाठी

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in भटकंती
28 May 2014 - 1:30 pm

नमस्कार मिपाकर्स,

उन्हाळ्याचे २ दिवस सुखकर करण्यासाठी पुण्याच्या जवळ ४-५ तासांत जाता येईल असे ठिकाण शोधतोय.
लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान अनेक वेळा पाहून झाले आहे आणि तिथे परत जायचे नाहीये.

खूप शोधाशोध करूनही भिमाशंकरपेक्षा चांगले ठिकाण सुचत नाहीये, त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी.
जर तुम्ही एखादे यापेक्षा चांगले ठिकाण सुचवले तर खूप मदत होईल.

सोबत आई-वडिल असणार आहेत, त्यामुळे कृपया ट्रेकिंगसाठीची ठिकाणं सुचवू नका.
पुण्यातून सकाळी लवकर निघून रात्रीचा मुक्काम करता येईल आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचता येईल असे ठिकाण सुचवा प्लीज.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

28 May 2014 - 1:51 pm | पिलीयन रायडर

मी मागे सगुणाबागेत गेले होते.. मार्च मध्ये.. सध्या तिथे कती गरम असेल ते माहित नाही पण असंच चक्कर मारायला छान आहे.. शिवाय चढ उतार काही नाही..

नुकतीच मी "स्प्लेंडर कंट्री क्लब" मध्येही जाऊन आले.. दुसरं काही सापडलं नाही म्हणुन.. एक दिवस घालवायला बरं आहे पण महाग आहे.. ११००/ प्रति माणशी..

नांदेडीअन's picture

28 May 2014 - 7:45 pm | नांदेडीअन

सगुणाबाग आणि तुम्ही दिलेली सगळी माहिती आवडेश.
अजून माहिती घेतो या ठिकाणाची.
खूप खूप धन्यवाद. :)

सगुणा बाग छान आहे. मी दोन वर्षा पूर्वी जाऊन आले. गुगल वर साईट सापडेल सगुणा बागेची जर तिथे जायच असेल तर आधी बुकींग करुन घ्या म्हणजे चांगल्या रुम्स मिळतील. जाताना सटर फटर खाऊ सोबत न्या कारण किरकोळ दुकाने नाहीत तिथे.

नांदेडीअन's picture

28 May 2014 - 7:47 pm | नांदेडीअन

थोडी अजून माहिती काढली आणि कळाले की ते टॉवेल वगैरेसुद्धा देत नाहीत.
सावध केल्याबद्दल धन्यवाद. :)

पिलीयन रायडर's picture

29 May 2014 - 11:12 am | पिलीयन रायडर

अहं.. सगुणाबाग प्रकार वेगळा आहे.. हे टिपीकल रेसॉर्ट वगैरे नाहीये.. शेत आहे.. नदी आहे.. आणि तुम्हाला ह्या वातावरणात रात्री मुक्काम करायचा असेल तर "राहण्यापुरती" सोय आहे.. तिथे रुम सर्व्हिस वगैरे नाहीये..नळाला गरम पाणी वगैरे पण नाहीये.. सकाळी चुल पेटवतात.. आणि तिथल्या बायका गरम पाण्याच्या बादल्या आणुन देतात.. आम्ही तर फारच साध्या रुम मध्ये राहिलो होतो.. ७-८ गाद्या घेतल्या आणि पथारी पसरली..

तिथे जरा जास्त चांगल्या रुम्स पण होत्या.. पण आम्ही त्या काही पाहिल्या नाहीत.. पण एकंदरीतच सगुणाबाग रेसॉर्ट नाही हे नक्की..

जिन्क्स's picture

28 May 2014 - 3:05 pm | जिन्क्स

वरंध घाट मार्गे शिवथरघळ ही एक दिवसाची सुंदर सहल होऊ शकते. वाटेत आंबवणे चे नागेश्वर मंदिर, देवधर धरण,वरंध घाट अशी नितांत सुंदर स्थळे पाहता येतिल.

नांदेडीअन's picture

28 May 2014 - 7:49 pm | नांदेडीअन

शिवथरघळबद्दल वाचले होते मागे.
पण उन्हाळ्यात जाणे ठिक होईल ? :(

संजय क्षीरसागर's picture

28 May 2014 - 3:47 pm | संजय क्षीरसागर

सिंहगडापाशी आहे. ही घ्या लिंक

नांदेडीअन's picture

28 May 2014 - 7:51 pm | नांदेडीअन

संजयजी, सिंहगड खूप जवळ होईल.
बाहेर फिरायला गेलोय असे वाटणारच नाही.
सिंहगड, पाणशेतला खूप वेळा गेलोय. :(

प्रवास किती लांबचा झाला यानं फारसा फरक पडत नाही.

ह भ प's picture

28 May 2014 - 8:40 pm | ह भ प

मग लाडघरला जा.. पुण्यापासून जवळ जवळ १९०किमी. वरंधा घाटातून दापोली.. न पुढे लाडघर.. समुद्रकिनारी पिअर्स बीच रिसॉर्ट आहे तेथे राहण्याची चांगली सोय आहे..
म्हणजे ४-५ तासाचा प्रवास.. शनीवारी रहायचे.. दिवसभर समुद्रात खेळायचे.. रात्री उशिरापर्यंत स्वच्छ किनार्‍यावर भटकायचं.. तामस तीर्थ असं बीचचं नाव आहे..
रवीवारी सकाळी हॉटेल सोडायचं येताना शिवथर घळला जायचं.. प्रसाद घ्यायचा.. संध्याकाळी / रात्रीपर्यंत घरी..
जेवण ठीक ठाक.. पण ठिकाण उत्तम.. आंजावर त्यांची वेबसाईट पाहा..
मी जाईन दुसर्यांदा तिथे..

कपिलमुनी's picture

29 May 2014 - 10:48 am | कपिलमुनी

भंडारदरा एमटीडीसी रीसोर्ट आहे ..
आणि २ दिवस फिरण्यासारखे पाँइट आहेत. धरणाचा जलाशय आणि परीसर रम्य आहे

कोयना नगर सुद्धा खुप चांगला ऑप्शन आहे. ह्या भारतवारीत तिथे जाऊन आलो. मस्त आहे जागा. तिथे त्यांनी बनवलेली बाग सुद्धा छान आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 May 2014 - 6:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त आहे, आणि जाता येता चाफळ, सज्जनगड, असे काहीतरी जोडुन घेता येईल. किंवा ११ मारुतींपैकी २-३ सुद्धा होतील जरा ईकडे तिकडे केल्यास..मात्र हिवाळ्यात गेल्यास बेस्ट "गुरसाळे रिसॉर्ट" वर मी राहिलोय..मस्त आहे.

प्रचेतस's picture

29 May 2014 - 1:56 pm | प्रचेतस

आंबा घाटात जा. कराड-कोकरूड-मलकापूर- आंबा. ५ तासाचा रस्ता. उन्हाळ्यातही अतिशय थंडगार हवा. मुक्कामाची सोय पण उत्तम आहे. जंगल सफारी, नाईट सफारी, अतिशय सघन जंगलातून सड्यावर जाणारा ४/५ तासांचा भन्नाट ट्रेक करता येतो किंवा पावनखिंड, विशाळगड अशी ट्रिप पण मारता येते.

काही फोटो बघा.

सड्यावरून काढलेला फोटो. ह्याच जंगलातून उजव्या बाजूने पायपीट करत सड्यावर यावे लागते.
a

आंबा गावाजवळच असलेली ही ८०० वर्षांपासून जास्त काळ अस्पर्षित असलेली ही आंबाबाई देवराई
a

गजापूरची घोडखिंड अर्थात पावनखिंड
a

कंजूस's picture

29 May 2014 - 2:39 pm | कंजूस

घाट उतरून खाली येऊ नका .त्याच्यापेक्षा सोसायटीच्या गच्चीवरती फिरा आणि आईसक्रिम खा.फार गरमा आहे .

ताम्हणी/डोंगरवाडी :
पौडमार्गे पुढे डोंगरवाडी ताम्हणी घाट सुरू होतो तिथे घाटमाथ्यावरच विंझाईदेवीचे देऊळ आहे .राहाण्यासाठी सात खोल्या ,जेवणाची व्यवस्था आहे .पुण्यातून अडीच तास लागतात .स्वारगेटहून ताम्हणी घाटमार्गे कोकणात जाणाऱ्या बस इकडून जातात .बुकिंगचा फोन माहीत नाही .डोंगरवाडी ग्रामस्थ मंडळ भाईंदर पश्चिम(वसईजवळचे) व्यवस्था पाहातात येथूनही बुकिंग होते .मागे एकदा आकाशदर्शनासाठी टिळकस्मारकातल्या ज्योतिविद्या संस्थेने नेले होते .श्रीखंड पुरी उत्कृष्ट होती अशी पुण्यातही मिळत नाही .

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 2:49 pm | मुक्त विहारि

चला परत आमच्या बरोबर "श्रीखंड पुरी" खायला.

पोटासाठी कुठेही भटकतोच आहे, तर मग जीभेचे चोचले पुरवायला पण भटकायला हवेच.

शेखर बी.'s picture

29 May 2014 - 4:16 pm | शेखर बी.

भुलेश्वर सुद्ध छआन आहे

कंजूस's picture

29 May 2014 - 4:16 pm | कंजूस

:-):-):-)

नांदेडीअन's picture

30 May 2014 - 1:20 pm | नांदेडीअन

माफ करा मित्रांनो, भिमाशंकर कन्फर्म झाले आहे.
पण तुमच्या मदतीसाठी खूप खूप धन्यवाद.
किमान पुढच्या वेळी जास्त शोधाशोध करण्याची गरज भासणार नाही.
जोडून करता येण्यासारख्या अनेक ठिकाणांची माहिती मिळाली इथे.
परत एकदा आभार. :)

ट्रिप अ‍ॅडवाइजरवर २७ मे ला ही कमेंट आहे :

The jungle is dry. U can hardly spot even a boar. The village is dirty. There aren't any good places for accomodation. But the only good jungle spot in maharashtra. You can go as a friends group. Don't consider this for family outing.

दि ओनली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्रा???? व्हॉट द *क???? अरे त्या मूर्खाला म्हणावं सातारा, कोल्हापूर, इ. ठिकाणचे जंगल बघ, कोकणाकडचे जंगल बघ, ताडोबा इ. बघ, मुंबैचं संजय गांधी न्याशनल पार्क बघ. पाहिजे तितकी चिकार जंगलं आहेत. डोसक्यावर पडलाय ती कमेंट लिहिणारा. असो.

गवि's picture

30 May 2014 - 2:52 pm | गवि

-ताडोबा- अंधारी
-नवेगांव-नागझिरा
-सातपुडा रेंज
-ठाणे जिल्हा उत्तर-पूर्व
-भंडारदरा
-भीमाशंकर
-महाबळेश्वर-पांचगणी-तापोळा
-कोयना खोरे आणि बॅकवॉटर परिसर-वासोटा
-संपूर्ण कोंकण
-आंबोली-आजरा
-दाजीपूर- राधानगरी
-गगनबावडा
-माळावरच्या वाईल्डलाईफसाठी सोलापूर जिल्हा

अगदी लोणावळा-खंडाळा-ताम्हिणी परिसर आणि बोरिवली नॅशनल पार्कसुद्धा.

हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पण समृद्ध जंगल परिसर आहेत. दाजीपूर राधानगरी, भीमाशंकर, आंबोली या ठिकाणी काही सदाहरित पट्टे आहेत. ताडोबा, नवेगाव इथे पानगळीची अरण्ये आहेत. गडचिरोली जिल्हा हे तर पूर्ण जंगल आहे.

ओन्ली गुड जंगल स्पॉट इन महाराष्ट्र हे फार मर्यादित अनुभवाने म्हटले असेल काय ? की जंगल म्हणजे खिडकीतून हात बाहेर काढला की भरव जिराफाला केळे अन हात पुढे केला की बसला बहिरी ससाणा येऊन, उरलेले चिकनचे हाडूक फेकले की आले तरस पळत पळत.. अशा कल्पना असतात?

प्राण्यांचं "सायटिंग" माणसांना न होणं हेच समृद्ध जंगलाचं लक्षण आहे. जिथे जंगल उरलेलंच नाही आणि प्राण्यांना राहायला जागाच नाही तिथे प्राणी उघड्यावर दिसू लागतात.

असो.

बॅटमॅन's picture

30 May 2014 - 3:15 pm | बॅटमॅन

एक नंबर गविकाका.

जंगलाबद्दल कैच्याकै कल्पना असल्या की असली मुक्ताफळे सुरू होतात.

बाकी प्राण्यांच्या सायटिंगबद्दल अंशतः सहमत आहे, पण समजा आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार, नै का?

हो.. तेही बरोबर आहे. वर्क्स बोथ वेज.

प्राणीच नसले तरी सायटिंग रोडावतं.

पण जंगल व्हिज्युअली दाट दिसतंय आणि त्यात प्राणीच नाहीत असं क्वचित होतं. अगदी शिकार वगैरे झाली तरी वाघासारखे टॉप लेव्हल प्राणी वगळता इतरजण अशा ठिकाणी वीण वाढवून टिकाव धरतातच जमेल तेवढा.

निसर्गतः भक्षक प्राण्यांचा विणीचा वेग हा भक्ष्य प्राण्यांच्या विणीपेक्षा बराच कमी ठेवला जात असतो.. आणि त्यात तो भक्षक प्राणी शिकारी लोकांना थेट कॅश देणारा असेल तर (वाघ) मग त्यांची पार वाईट अवस्था होते.

हत्ती, गेंडा हे प्राणी असेच कॅश देणारे असले तरी ते कोणाचे भक्ष्य नसल्याने त्यांचाही विणीचा वेग कमी असतो. म्हणून ते झपाट्याने नामशेष होत जातात. आणि हरणे वगैरे शिकार्‍यांनी शौकाखातर किंवा खाण्यासाठी मारली तरी ती भराभर पुनरुत्पादित होत राहतात. फक्त त्यांच्या खाद्य वनस्पती शिल्लक असल्या म्हणजे झाले. म्हणून अनेक शेतांमधे हरणांचा उच्छाद होतो.

एनीवे तो वेगळाच विषय झाला.

अगदी सहमत. माणसासाठी एखादी गोष्ट अ‍ॅट्रॅक्टिव्ह असेल तर संपलंच.

निओ's picture

13 May 2015 - 4:00 pm | निओ

लय भारी

यशोधरा's picture

30 May 2014 - 11:17 pm | यशोधरा

+ इन्फिनिटी!

भुमन्यु's picture

30 May 2014 - 3:05 pm | भुमन्यु

राहण्यासाठी चांगला पर्याय म्हणजे ब्ल्यु मोरमोन. वाजवी दर, सुंदर जागा. भ्रमणध्वनीला रेंज नाही, टी. व्ही. उपलब्ध नाही, त्यामुळेही राहण्याचा
आनंद द्विगुणित होतो.

राहुल

नांदेडीअन's picture

30 May 2014 - 5:38 pm | नांदेडीअन

@ संजयजी

प्राणी बघण्यासाठी जातच नाहीयोत मुळी.

मी सुरूवातीलाच एक वाक्य वापरले आहे.
"...त्यामुळे भिमाशंकरवरच येऊन अडकली आहे गाडी"

‍^^ यापूर्वी दोन वेळा गेलोय मी भिमाशंकरला. (दोन्ही वेळा फॅमिलीसोबत.)
मला तिथले वातावरण आवडते, देवराई आवडते, कच्च्या रस्त्यावर आडवाटेला गाडी थांबवून जंगलाच्या निरव शांततेचा आवाज ऎकायला आवडतो.
आई-वडिलांचीसुद्धा पहिली पसंद भिमाशंकरच आहे.

२००६ मध्ये शेवटचा गेलो होतो मी तिथे.
शेकरूचा फक्त आवाज ऎकण्यात चांगले २ तास घालवले होते तेव्हा.
प्राणी दिसणे न दिसणे हा केवळ नशिबाचा भाग आहे.

गवि यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
जंगल म्हणजे काहीतरी वेगळीच कल्पना असेल त्या व्यक्तीची.

बॅटमॅनजी, भिमाशंकरला बरेच प्राणी आहेत.
हे बघा.
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Bhimashankar-home-to-529-an...

"आडातच कै नै तं पोहर्‍यात तरी काय दिष्णार"
या वाक्याशी मी थोडा असहमत आहे.
मेळघाटच्या जंगलात खूप प्राणी आहेत, पण तिथे सायटिंग फार क्वचितच होते.

नांदेडीअन's picture

30 May 2014 - 5:52 pm | नांदेडीअन

@ राहूल जी

ब्ल्यु मॉरमॉन थोडेसे महाग वाटले, पण त्याचे रिव्ह्युज चांगले आहेत.
एन्जॉय पॉईंट स्वस्त आहे आणि तिथला परिसर फार सुंदर आहे, पण मंदिरापासून २०-२५ कि.मी.वर आहे आणि याचे रिव्युजसुद्धा नाहियेत जास्त.
ब्ल्यु मॉरमॉनच कन्फर्म करून टाकतो.

म्हातारबाची वाडीचा स्टॉप दहा किमी अगोदर आहे येथे मॉरमॉन आणि टोल नाका आहे .एमटीडिसीत खाजगी हॉटेल झाले आहे त्याचे फोन नुलकरांनी "भि०च्या देवराईत " दिले आहेत .
मी ४जूनला टरेकिंगला इथे जात आहे .

जंगल रीसाट(कस टायपायच)अंबाला कोणी जाऊन आले आहे का?