नरेंद्र मोदींनी शपथविधीला पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांना आमंत्रण दिले, त्यांनी ते स्वीकारले, आणि येण्यापूर्वी १५१ भारतीय कैदी सोडले.
आतापर्यंतचा इतिहास बघता हे पाकिस्तान च्या अश्या वागण्याने मला धक्का बसलाय, पण हा नरेंद्र मोदींचा "करिश्मा" आहे यावर देखील माझा विश्वास नाही. हा नरेंद्र मोदींचा एक राजनैतिक विजय आहे याबद्दल दुमत नाही. पण पाकिस्तानच्या अश्या वागण्यात पडद्यामागे बरेच राजकारण झालेले असणार हे स्पष्ट आहे.
मुख्यतः मी या वगण्यामुळे बुचकळ्यात पडलो आहे, त्यामुळे हा धागा पाकिस्तानचे छुपे हेतू काय असतील हे जाणोन घेण्यासाठी काढला आहे. व्यक्तिशः मी पाकिस्तानशी युद्ध करण्यपेक्षा राजनैतिक पातळीवर पाकिस्तानला दाबून ठेवावे अश्या मताचाच आहे. (म्हणून शिवसेनेसारख्या कडव्या गटाचे महत्व मकी होत नाही).
आता मला पडलेले मुख्य प्रश्न -
१, हा नेमका कोणाचा विजय आहे? मोदी की मोदींची प्रतिमा?
२. या बदल्यात पाकिस्तानला नेमके काय हवे असेल, जसे की कारगिल घुसखोरी इ.
३. मोदींचे पाय जमीनीवर असतील अशी आशा/ खात्री आहेच, पण त्यासोबत आता कोणकोणत्या पातळीवर पाकिस्तानशी युद्ध लढावे लागेल?
४. लोकसत्ताने मर्याच दिवसांनी प्रथमच स्पष्ट मोदीविरोधी भूमिका घेतली आहे, आता पुरे..!. त्यांना पाकिस्तानने कैदी सोडल्याचे फारसा आनंद वगैरे झाल्याचे दिसत नाही. याला पण टेन्थ मॅन रूल म्हणावे काय?
५. यापश्चात मोदींची आंततरास्ट्रीय राजकारणाची दिशा काय असेल यावरचा तुमचा अंदाज.
आणि, पहिल्या वहिल्या राजनैतिक विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन!! कधी कधी मला असे वाटते की अरे हा माणूस इतके दिवस होता कुठे?
प्रतिक्रिया
26 May 2014 - 2:27 pm | विअर्ड विक्स
याला goodwill gesture असे म्हणतात…. यापलीकडे फार काही अपेक्षा करू नये…. भारताने सुद्धा कैदी सोडले अशी बातमी येईल तेव्हा पण त्यात पाकिस्तानचाच हेतू शोधाल का ? राजनैतिक पातळीवर असे संकेत द्यावे लागतात…
26 May 2014 - 2:45 pm | आनन्दा
ती बातमी येईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. पाकिस्तानने ५०एक कैदी सोडले असते तर मला फार काही वाटले नसते. पण १५० हा आकडा मला मोठा वाटला. तो "goodwill gesture" च्या पलिकडे आहे असे माझे आपले मत आहे.
बाकी तुमच्याशी सहमत.
26 May 2014 - 3:01 pm | श्रीमत
बातमी आलि आहे कि कि मोदींनी defence खाता स्वतःकडे ठेवला आहे.. या वरून शहाण्याने समजून घ्यावे... सत्तेत आल्या बरोबर विनाकारण पाकिस्तान वर कारवाई केली तर जगासमोर चुकीचा संदेश जाइल आणि सगळ्यात महत्वाचा.. आता जनतेचे प्रश्न सोडवणे जास्त महत्वाचे आहे पाक वर चाल करण्यापेक्षा.....
कुठे तरी वाचले आहे ..
अटबिहारी वाजपेयी यांच्या काळात एक घोषणा गाजली होती. "दूध मॉंगो खिर देंगे, काश्मीर मागोगे तो चिर देंगे'... आता या मोदी सरकारची नवीन घोषणा पुढे आलीय, ""ना दूध देंगे, ना खिर देंगे, अगर काश्मीर मांगा, तो सालो लाहोर भी छिन लेंगे.''
मोदी प्रतिमेला अगदी सार्थक त्यामुळे चिंता नको ... :)
27 May 2014 - 5:24 pm | टवाळ कार्टा
ऐला भारीच :)
29 May 2014 - 10:02 am | ऋषिकेश
संरक्षणमंत्री अरूण जेटली आहेत. स्वतः मोदी नव्हेत. (कदाचित काही आठवड्यात ते पद मुरली मनोहर जोशींकडेही जाण्याची शक्यता आहे)
बाकी चालु द्या!
26 May 2014 - 3:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारतात "ताठ कण्याचा" पंतप्रधान "स्वतःच्या बळावर" सत्तेवर आल्याने पाकिस्तानने हे एक प्रतिकात्मक पाऊल उचलले असावे. त्यातच पाकिस्तानी सैन्याचा आणि तेथिल भारतविरोधी शक्तींचा या भेटीला असलेला विरोध कमी करण्यास लागलेल्या वेळामुळे आमंत्रण स्विकारण्यात झालेल्या लक्षणीय उशीराची धार कमी करण्यासही हे पाऊल उचलले गेले असावे.
अर्थात पाकिस्तानचा पूर्वेतिहास आणि अंतर्गत राजकारणातील (सैन्य, आय एस आय, अतिरेकी) वस्तुस्थिती पाहता आजच या कृतीचा पूर्ण अर्थ ठरविण्यात अर्थ नाही. ही किंवा अगदी यापेक्षा चांगली कृती केली तरी पाकिस्तानच्या यापुढच्या चाली आणि चालचलवणूक नीट पाहूनच दर पाऊल सावधगिरीने टाकणे योग्य होईल... पाकिस्तानबाबत अजून खूप, खूप, खूप अविश्वासाचे वातावरण (ट्रस्ट डेफिसिट) आहे.
26 May 2014 - 3:23 pm | प्रभाकर पेठकर
सोडलेत ते कोळी आहेत. तसे निरुपद्रवी. (त्यात हेर घुसवले नसतील तर). चुकून भरकटले आणि पाकच्या हद्दीत पोहोचले असेच चित्र उभे केलेले आहे.
भारतातील निरपराध कोळ्यांना पाकिस्तानने सोडल्याचा आनंद आहेच पण पाकिस्तानच्या ताब्यात भारताचे अनेक युद्धकैदी आहेत. त्यांच्या सुटकेचा श्री. नरेन्द्र मोदींनी प्रयत्न करून यश मिळवावे असे वाटते.
27 May 2014 - 5:07 pm | पैसा
अजूनही काही कोळी पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. मात्र गेल्या वर्षीही २ वेळा पाकिस्तानातून भारतीय कोळ्यांना सोडून देण्यात आले होते. तसेच श्रीलंकेनेही काही भारतीय कोळ्यांना सोडल्याची बातमी आली आहे. या कोळ्यांच्या होड्या मात्र ते जप्त करतात. असेच काही पाकिस्तानी कोळी आणि त्याच्या होड्या भारताच्या ताब्यातही आहेत.
27 May 2014 - 8:50 pm | विकास
जेंव्हा जेंव्हा सचीव पातळीवर अथवा अजून वरच्या पातळीवर चर्चा होणार होत्या तेंव्हा दोन्ही देशांनी काही कोळ्यांना सोडले होते. या वेळेस देखील सदिच्छा म्हणून बर्यापैकी कोळ्यांना सोडण्यात आले आहे. मात्र इतर वेळेपेक्षा यातून एक वेगळा संदेश गेला. तो म्हणजे मोदींनी पंतप्रधान होण्याआधी दिलेल्या निमंत्रणास उत्तर देताना, तो विषय नसताना देखील या देशांना कोळ्यांना सोडावेसे वाटले.
27 May 2014 - 8:37 pm | मंदार कात्रे
आज दिवसभरात मला कंपनीतील पाकिस्तानी , श्रीलंकन आणि बांगलादेशी कर्मचार्यांनी अतिशय आदरपूर्वक आणि आस्थेने "मोदी कोण? ते कसे नेते आहेत ? त्यांच्यामुळे भारतात कायकाय बदल होतील ? आमचे नेते भारतात गेले आहेत , आता संबंध सुधारतील ना ?" अशी चौकशी केली …
माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शपथ-ग्रहण समारंभाला सार्क परिषदेच्या नेत्यांना बोलावले , साहजिकच या परिषदेचे सदस्य असणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंका या देशाच्या प्रमुखाना आमंत्रण दिले गेले , यावरून नाराजीचा सूर आळवून आपले अज्ञान जाहीर प्रकट करणार्या महाभागाना सांगावेसे वाटते की या निर्णयामुळे अन्य देशात भारताचा मान आणि भारताविषयीचा आदर दुणावला आहे ,
28 May 2014 - 12:32 am | भृशुंडी
मागे आपण क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यावर इथेही काही गोर्या बॉलर्सनी मला तशी मवाळ बोलंदाजी केली. आणि सचिन तेंडुलकर कसा आहे? त्याल बोंबील आवडतात का असे प्रश्नसुद्धा विचारले.
28 May 2014 - 11:47 am | अनुप ढेरे
=))
28 May 2014 - 3:59 pm | मराठी कथालेखक
आधी चुकुन घुसलेल्या निरपराध कोळ्यांना महिनो न महिने वा वर्षानुवर्षे डांबून ठेवावे आणि मग कधी मधी सदिच्छेचे निमित्त करुन सोडावे हा नेहमीचाच प्रकार दिसतोय.
अर्थात मोदींच्या कृतिवर टीका करण्याचा मानस नाही. त्यांनी नेमक्या काय हेतूने शरीफ यांना निमंत्रित केले, याचे results काय वगैरे समजायला वेळ लागेल.