थांबा आणि वाट पहा !
भारताचे नवनिर्वाचित प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी शपथग्रहण करून पदभार स्वीकारण्यापुर्वीच त्यांच्या सार्क राष्ट्रप्रमुखाना बोलावण्याच्या निर्णयावरून उलटसुलट निष्कर्ष काढून रणकंदन करणार्या मंडळीना सांगावेसे वाटते ते इतकेच् की जरा थांबा आणि वाट पहा !
पाकिस्तानशी युद्ध पुकारून लढण्या ऐवजी गनिमी काव्याचा वापर करून आर्थिक कोंडी करणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या बाजूने दबावगट निर्माण करणे / बलुचिस्तान वझिरीस्तान फुटीरतावादाला सहाय्य करून पाकिस्तानला अंतर्गत वादात व्यस्त ठेवणे / अफघाणिस्तानला सर्वतोपरी मदत करून आपले मित्र व पाकिस्तानचे शत्रू वाढवणे व पाकिस्तान ला दुर्बल /जर्जर करून सोडणे असे अनेक कूटनीतिक उपाय उपलब्ध आहेत . परंतु आजतागायत भ्रष्ट अन लुळ्या -पांगळ्या काँग्रेसी सरकारच्या लकवा मारलेल्या परदेशी धोरणामुळे ते उपाय अमलात आणले गेले नव्हते , पण आता चित्र पालटले आहे .
भारतात मोदींच्या रूपाने समर्थ , स्वाभिमानी अन राष्ट्रभक्त नेतृत्वाचा उदय झाला आहे…,त्यामुळे आता वर उल्लेख केल्याप्रमाणे कूटनीतिक उपाय वापरून पाकिस्तान ची नाकाबंदी केली जाइल . व त्यातूनच दबावतंत्राचा वापर करून काश्मीर आणि दहशतवादा सारख्या समस्यांची सोडवणूक केली जाऊ शकते …….
यास्तव ………… थांबा आणि वाट पहा !
प्रतिक्रिया
25 May 2014 - 8:37 am | माईसाहेब कुरसूंदीकर
मोदी सरकरला यश मिळो.
अवांतर-कूट पर्याय जर माझ्यासारखीला कळतात तर ते परराष्ट्र खात्यातल्या लोकांना,पाकिस्तानला कळत नसतील काय?
असो, कूट पर्यायांचा काथ्याकूट मिसळपाववर पाडू शकतो.
25 May 2014 - 9:44 am | मित्रहो
मोदींच्या रुपाने एक समर्थ नेतृत्व लाभले आहे, सारा भारत त्यांच्या पाठीशी उभा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारनावर ठसा उमटवायला थोडा वेळ द्यावा लागेलच.
थांबा आणि वाट पहा.
25 May 2014 - 10:52 am | उडन खटोला
नरेन्द्र मोदी हे अतिशय मुरब्बी अन मुत्सद्दी नेत्रुत्व आहे. असा विचारपूर्वक विचार करणारी आणि योग्य परिस्थिती जाणून घेणारी लोकं आहेत तर … , great …! छान वाटल हि पोस्ट वाचून …कारण आजकाल सगळीकडे मोदींच्या सल्लागारांची संख्या शेकड्यात झालीय । कीव येते अशा लोकांच्या पोस्ट न comnt वाचून …। धन्यवाद हि पोस्ट टाकल्याबद्दल …। !
13 Jun 2014 - 10:26 am | सामान्यनागरिक
थोडा वेळ द्यावा लागेल हे खरेच आहे. पण निवडणूकीच्या आधीचे नरेंद्र मोदी आणि नंतरचे यात फरक आहे. नक्कीच
१. कान्ग्रेसने केलेली घाण साफ करयालवे़ळ लागणारच.
२. पण मोदी त्याचे दळण दळत बसलेले नाहीत. शांतपणे सोदाहरण ते कामे करताहेत.
३. नोकरशाहीला नक्कीच कामाला लावतीलही. तशी सुरुवात झालेलीच आहे.
फक्त :
भाजपावाल्यांनीच काहीतरी गोची करुन ठेवायला नको. उदा. व्ही के सिंग यांचे वागणे.
----
25 May 2014 - 9:56 pm | मंदार कात्रे
काश्मीरात शांतता आणि विस्थापित काश्मिरी हिन्दून्चे काश्मिरातच पुनर्वसन करण्याच्या मार्गात पाकिस्तान पुरस्कॄत दहशतवाद हा फार मोठा अडथळा आहे. तसेच अनधिकॄत रीत्या पाक ने बळकावलेला काश्मीर चा भाग परत घेणे १९७१ च्या युद्धानंतरच्या तहाच्या वेळी शक्य होते ,कारण तेव्हा पाकिस्तान पराभूत देश होता अन सुमारे १ लाख पाकी सैन्य युद्धबन्दी म्हणून भारताच्या ताब्यात होते .
पण तरीही मुत्सद्देगिरीत कमी पडल्याने असेल किंवा आन्तरराष्ट्रीय दबावाला बळी पडल्याने असेल, पण इन्दिराजी पाकव्याप्त काश्मीर भारतात परत आणन्यास असमर्थ ठरल्या होत्या . तसे आता होता नये. यासाठी भारताला कूटनीतिक दबावतंत्र वापरून पाकिस्तानचा काटा काढावाच लागेल !
26 May 2014 - 7:03 am | मदनबाण
सध्याकाळी ६ पर्यंत थांबा... :)
26 May 2014 - 9:05 am | आत्मशून्य
तर यापेक्षा जास्त भरीव अन कौतुकास्पद जिल्बिराहित लिखाण करता आले असते. असो सार्क लोकांना शपथविधीला बोलावणे इथूनच गेम इज ऑन. मोदी रोक्स.
मस्त लिखाण. आवडले.
- धन्यवाद
26 May 2014 - 12:32 pm | बाबा पाटील
आगे आगे देखो होता है क्या.......
26 May 2014 - 1:17 pm | आनन्दा
जाता जाता, पाकिस्तान आणि श्रीलंकेने एकून २५० पेक्षा अधिक भारतीय कैदी सोडले आहेत. या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न मी करत आहे. कोणी मदत करेल का?