लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

विकास's picture
विकास in राजकारण
16 May 2014 - 5:55 am

नमस्कार मंडळी!

आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल.

हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे.

आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे. तो माहितीसाठी येथे डकवत आहे.

Election Result History

सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा!

प्रतिक्रिया

नेत्रेश's picture

16 May 2014 - 1:30 pm | नेत्रेश

अशिक्षीत म्हणायचे असावे. शाळेत गेली नसेल.

व्हॊट्सपवर सुद्धा फिरतेय, आणि तिथे बंडल बातम्या जास्त फिरतात, राखी सावंत नाव बघून लोक चवीने शेअर करतात.

अशीच अजून एक बातमी बघा,
सनी लिओन बुधवारपेठेतून आघाडीवर ..

एकट्या भाजपाला २७२ मिळताहेसं दिसतंय
तसं झाल्यास राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे मुद्देही भाजपा निकालात काढु शकेल. नाही का?

विकास's picture

16 May 2014 - 11:41 am | विकास

भाजपाला २७२ जागा मिळतात तेंव्हा त्याचा असा अर्थ आहे की सगळ्या बाजूने त्यांना मते मिळाली आहेत. तुर्तास इतकेच. तुम्ही सांगितलेले मुद्दे कसे हाताळतील याची उत्सुकता आहे.

तीच भीती आहे. म्हणूनच भाजपला संपूर्ण बहुमत मिळू नये अशी अपेक्षा होती. त्यात आता मोदींसारखे कणखर आणि संघाच्या प्रभावाखालील नेतृत्व आले आहे. माझ्या चिंता खोट्या ठरोत अशीच अपेक्षा.

सुहासदवन's picture

16 May 2014 - 11:52 am | सुहासदवन

राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७०
हे प्रश्न ताटकाळत ठेवण्यापेक्षा लागू दे ना सोक्षमोक्ष.

आणि ह्या भारतात जर राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे विषय जर बहुसंख्यांना मोडीत काढायचेच असतील तर मग हीच योग्य वेळ आहे.... त्यात भिण्याचे कारण काय?

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 11:54 am | बाळ सप्रे

अरे हो हो.. इतकी घाई करु नका..
:-)

तसं झाल्यास राममंदीर, समान नागरी कायदा, कलम ३७० हे मुद्देही भाजपा निकालात काढु शकेल. नाही का?

३७० साठी मला वाटते की राजीव गांधींसारखे पाशवी बहुमत पाहिजे. तेव्हा पुढची ५ वर्षे तरी त्याची काळजी नको. यावेळेस चांगले काम केले तर पुढच्या वेळेस २/३ सीट मिळतील, तेव्हा बघू.. तसे देखील मोदी हे फार दूरदर्शी नेते आहेत, तेव्हा ते पहिले २-३ वर्षे हे मुद्दे काढणार देखील नाहीत असे वाटते.

आजानुकर्ण's picture

16 May 2014 - 11:57 am | आजानुकर्ण

सुप्रियाताई सुळे, राणे सुपुत्र पिछाडीवर. इतर निकाल कोठे पाहावयास मिळतील?

आदूबाळ's picture

16 May 2014 - 12:00 pm | आदूबाळ
भाते's picture

16 May 2014 - 12:01 pm | भाते

अजुन एकाही जागेवर विजय मिळाला नाही बिचाऱ्यांना.
राहुल बाबा तिसऱ्या क्रमांकावर. :)

खांग्रेस कार्यकर्त्यांची दिल्लीत पक्ष कार्यालयासमोर निदर्शने. घोषणा - "प्रियंका गांधी लाओ, देश बचाओ" बोंबला!!!

कुठे गेले आप समर्थक? हाहाहा...पडले का तोंडावर.
त्या केजरीला म्हणावं ओरड अजुन जोर जोरात मोदींच्या नावाने..

एका नवीनच असलेल्या पार्टीचा झालेला फायदा लक्षात घेता त्यांचे (अपेक्षितच असलेले) पडणे आश्चर्यजनक अजिबातच नाही. आता अनेक विरोधी पार्ट्यांमधील एक असल्याने पुढील ५ वर्षात काय शिकतात हे महत्वाचे.

आनन्दिता's picture

16 May 2014 - 12:42 pm | आनन्दिता

नारायण राणे पदाचा राजीनामा देणार...

54 प्रतिसादातच धागा दुसर्या पानावार कसा काय गेला मंनतो मी?

आनन्दिता's picture

16 May 2014 - 1:05 pm | आनन्दिता

छगन भुजबळांचा १ लाख ८७ हजार मतांनी दारुण पराभव..

हे मतदारयाद्यांमधून नावं गायब करुन! जर नावं गायब झाली नसती तर..

http://eciresults.nic.in/ConstituencywiseS1334.htm?ac=34

ANIL SHIROLE Bharatiya Janata Party 304731
DR.VISHWAJEET PATANGRAO KADAM Indian National Congress 143418

वेताळ's picture

16 May 2014 - 1:17 pm | वेताळ

एक नंबरचा गाढव मानुस आहे हा.

बहिरुपी's picture

16 May 2014 - 1:28 pm | बहिरुपी

नाशिकमध्ये आपची अनामत रक्कम जप्त होणार

बहिरुपी's picture

16 May 2014 - 1:32 pm | बहिरुपी

सोलापूर मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पराभूत. धक्कादायक निकाल. मोदि त्सुनामीच...

चौकटराजा's picture

16 May 2014 - 1:40 pm | चौकटराजा

आहो नाशिक मधे मनसेची अनामत जप्त झाली आहे.

बरोबर. म. न. से. ची पण अनामत जप्त झाली आहे. 63050 मते मिळ्वून आणि तिसरा क्रमांक असुनही. आप ला १०००० चा ट्प्पा पण ओलांडता आला नाही.

मनसेच्या एकुण १९ उमेदवारांची डीपॉजिट्स जप्त झालीत. राज ठाकर्यांची रडीची प्रतिक्रिया ऐकुण अंमळ करमणुक झाली.

बिचारा कुमार विश्वास! फक्त ६३६८ मतं आहेत त्याला दुपारी १.३३ पर्यंत. संदर्भ

धर्मराजमुटके's picture

16 May 2014 - 1:54 pm | धर्मराजमुटके

अरे ! रामदास आठवलेंचा काय समाचार ?

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 1:57 pm | बाळ सप्रे

व्हॉट्सअ‍ॅपवरील एक फिरता विनोद..
this proves that a Gujarati can do anything to get US Visa!!!
*lol*

बहिरुपी's picture

16 May 2014 - 2:01 pm | बहिरुपी

सांगलीमध्ये भाजप उमेदवार संजय पाटील दीड लाख मतांनी विजयी.संदर्भ

दीड लाखाचे मताधिक्य आहे, पण अजून मतमोजणी सुरू आहे.

http://eciresults.nic.in/statewiseS13.htm?st=S13

बहिरुपी's picture

16 May 2014 - 3:29 pm | बहिरुपी

आपले बरोबर आहे. माझा संदर्भ चुकीचा निघाला.

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 2:29 pm | बाळ सप्रे

काँग्रेसचच्या सर्व मुख्यमंत्र्यांचे राजीनामे??

बॅटमॅन's picture

16 May 2014 - 2:37 pm | बॅटमॅन

संदर्भ??

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 2:46 pm | बाळ सप्रे
बॅटमॅन's picture

16 May 2014 - 2:59 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

विकास's picture

16 May 2014 - 9:42 pm | विकास

मला वाटते फक्त आसामच्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला आहे.

पण राहूल गांधींना नेता मानण्याची नैतिक चूक केल्याबद्दल सर्वांनी राजीनामे दिले तर त्यात काही गैर नसेल. ;)

बाकी अजून एक रोचक म्ह. सातार्‍यात सत्तापालट कै झाला नाही. तिथे पालट होईल तो सुदिन!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2014 - 10:05 pm | llपुण्याचे पेशवेll

असे म्हणू नका. सातारा आणि परिसरातल्या लोकांना म्हाराजांबद्दल फार अदर आणि निष्ठा आहे. मारून मुटकून नाही. जनता राजाच्या राज्यात सुखी असेल तर काय वाईट.

काल ऑफीसच्या कॅब ड्रायव्हरशी गप्पा मारताना तोही हेच म्हणाला, "म्हाराज गरीबांसाठी चांगलं हायेत. "

प्रीत-मोहर's picture

16 May 2014 - 8:49 pm | प्रीत-मोहर

आमच्या गोव्याच्या दोन्ही सीटस वर कमळ फुलले :)

पैसा's picture

16 May 2014 - 10:09 pm | पैसा

विधानसभा निवडणुकांचा ट्रेण्ड पुढे चालू. मात्र केंद्रीय राजकारणात जायची इच्छा नाही असे पर्रीकरांनी सांगितल्यामुळे बहुसंख्य गोंयकारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे!

अर्धवटराव's picture

16 May 2014 - 10:40 pm | अर्धवटराव

नरेंद्र मोदि आणि राहुल गांधींचे हार्दीक अभिनंदन आणि शुभेच्छा !!
दोघांच्याहि कारकिर्दीचा अत्यंत महत्वाचा टप्पा आता सुरु होतोय. दोघांनीही प्रामाणिक प्रयत्न करावे व भारताचे भविष्य उज्वल करावे.

कवितानागेश's picture

16 May 2014 - 11:21 pm | कवितानागेश

तूच रे एक.. फक्त फक्त तूच आलास बघ राहुल गांधीचं अभिनंदन करायला.
सक्काळपासून नुसतं त्या मोदी त्सुनामीचे कौतुक सुरुये. :)

विकास's picture

17 May 2014 - 12:05 am | विकास

यकदम सहमत!

बाकी राहूल गांधीं आणि त्यांच्या पक्षामुळेच मोदींना गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागत आहे हे कसे विसरून चालेल? :D

अर्धवटराव's picture

17 May 2014 - 11:24 am | अर्धवटराव

आमच्याशिवाय कोण त्या बिचार्‍याचं कौतुक करणार... *unknw*