नगर च्या घटनेत काहीतरी भयंकर घडलयं आणि ते लपवल जातयं.

गुल-फिशानी's picture
गुल-फिशानी in काथ्याकूट
11 May 2014 - 9:27 am
गाभा: 

आजच सकाळी दिव्य मराठी च्या “रसिक” पुरवणीत नितीन आगे या अहमद नगर जिल्ह्यातील खर्डा गावातील दलिय युवकाच्या क्रुर हत्ये संदर्भातील नागराज मंजुळेचा “जब्याने मारलेला दगड समाजापर्यंत पोहोचलाच नाही” हा अतिशय संवेदनशील असा लेख वाचण्यात आला. याच पुरवणीत याच घटनेवरील प्रा. सतीश वाघमारे यांचा आणखी एक संवेदनशील लेख “पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो” या नावाने आलेला आहे. दोन्ही लेख अत्यंत विचार प्रवृत्त करणारे व अतिशय अस्वस्थ करणारे असे आहेत. ही बातमी अगोदर वाचनात आली होती पण हे लेख वाचल्यावर त्या घटनेच्या तीव्रतेने अतिशय सुन्न झालोय.

त्याहुन अधिक अस्वस्थ झालोय ते यासाठी की नितीन आगे हा फ़क्त १७ वर्षांचा होता असे कळते. व त्याची क्रुर रीतीने हत्या झाली. वाघमारेंच्या लेखात उल्लेख येतोय की सकाळी ७.३० पासुन दुपारी ३.३० पर्यंत त्याचा अमानुष छळ सुरु होता व नंतर त्याला मारण्यात आले. नागराज मंजुळे पण या बाबतीत फ़ारस बोलत नाहीयेत. मी जी पहीली बातमी वाचली होती त्यात तर याचा काहीच उल्लेख नव्हता हत्या झाली इतकचं. निश्चीतच काहीतरी भयंकर घडलेल आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे हे नेमकं कस घडलयं हेच जाणीवपुर्वक लपविण्यात येतयं की कायं अस वाटतयं.

मला एक कळत नाहीये की हे डीटेल्स काळजीपुर्वक का लपविली जात आहेत ? मला खालील प्रश्न पडलेत
१-नितीन आगे ने जे काय केल होत ते नेमक काय होत त्याचा गुन्हा नेमका काय होता अस काय भयंकर पाप त्याने केल होत? त्या विषयी डीटेल माहीती बाहेर का येत नाही त्याचा इतका राग त्याच्या मारेकरयांना का आला?
२-नितीन ला नेमकं कुठल्या भयंकर क्रुर रीतीने मारण्यात आलं ? त्याच्या झालेल्या टॉर्चर ला जाणीवपुर्वक लपवल जात आहे का ? यात मारेकरयांना वाचविण्याचा प्रयत्न होतोय का ? सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० त्याच्यावर काय अत्याचार करण्यात आला? या विषयी सर्वत्र इतकी गुप्तता का बाळगली जात आहे ?
३-एरवी उठ सुठ कुठल्याही फ़ालतु विषयाचा कंटाळा येइपर्यंत कीस काढणारी माध्यमं आश्चर्यकारक अस मौन बाळगुन आहेत. कुणीच काहीही बोलायला तयार नाही. मारेकरी कुठल्या राजकीय आर्थीक सामाजिक घटकांचा पांठीबा असलेले आहेत का ?
४-आचारसंहीता चालु आहे म्हणुन ही काही निर्बंध आहेत का ? की एकंदरीत उदासिनता च आहे घटनेविषयी ?

मला एकच म्हणायचय की काहीतरी भयंकर घडलेलं आहे आणि त्याहुन भयंकर म्हणजे ते जनतेपासुन लपविण्याचा दडपण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय.नुसता औपचारीक निषेध केला जातोय.

तुमच्यापैकी कोणाला घटने संदर्भात काही माहीती असल्यास कृपया जनतेसमोर आणावी. सत्य समोर येणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाला कळलच नाही नेमक काय? कस? का? झालय तर पिडीताची बाजु तरी कोण घेणार आणि त्यांना न्याय तरी कसा मिळणार?
तुर्तास या कोवळ्या मुलाचा लेखात दिलेला चेहरा सारखा डोळ्यासमोर येतोय आणि फ़ारच अस्वस्थ वाटतयं. काय केलं असेल त्यांनी याच्या बरोबर?

प्रतिक्रिया

सिरीयसली सांगतो पेपर बदला. घटना घडली त्यानंतर दुसर्यादिवशी लोकसत्तामध्ये डिटेल आलाय . नंतरही पाठपुरावा केला जातोय. abp maza वर चालुय बगा जरा. काल राष्ट्रिय चॅनलवरपण आलत.
वाईट घडल.

गुल-फिशानी's picture

11 May 2014 - 11:32 am | गुल-फिशानी

जेपी जी
मला माहीत नव्हतं लोकसत्ता मध्ये आलय माझ्या कडे दिव्य मराठी येतो व लोकमत मी बघितला त्यात ही नव्हत. योगायोगाने मी एबीपी माझा ही बघितला नाही. माझी माहीती व रीसोर्सेस कमी आहेत बहुधा मी अजुन शोध घेतो.
पुन्हा माहीतीसाठी आभार.

खटपट्या's picture

11 May 2014 - 9:39 am | खटपट्या

यात नागराज मंजुळे नि काय बोलावे अशी अपेक्षा आहे ?

नगरीनिरंजन's picture

11 May 2014 - 10:36 am | नगरीनिरंजन

बरं. त्याच्या छळाचे सगळे तपशील जन्तेसमोर आले तर काय करायचा विचार आहे जन्तेचा?

नगरी जी
काही करण्याचा वगैरे हेतुने नाही हो बोललो मी मला अस्वस्थ होत होत की कोणी बोलत नाहीय कुठे च उल्लेख नाही प्रकरण इतक झाल आणि कुठेच कस नाही आल. पण वरील जेपी च्या प्रतिसादाने लक्षात आल की बहुधा दिव्य मराठी लोकमत मध्ये कव्हरेज नाही झाल पण लोकसत्ता त वगैरे आहे माझे च वाचन आणि रीसोर्सेस कमी पडले बहुधा.
बाकी काही अजुन नाही मला वाटल की प्रकरण दडपल जातय की आचार संहीतेमुळे कोणी बोलत नाही इ. व तो मुलगा फारच कोवळ्या वयाचा असल्याने इमॅजिन करुन अस्वस्थ झालोय इतकचं अशी अनेक प्रकरणं सहसा दडपुन टाकली जातात असा अनुभव आहे ते या बाबतीत न व्हाव इतक्याच साध्या अपेक्षेने ते प्रकरण अस सुटुन जाउ नये म्हणुन

नगरीनिरंजन's picture

11 May 2014 - 8:16 pm | नगरीनिरंजन

तुम्हाला व्यक्तिशः उद्देशून नाही म्हणालो मी; पण अशा घटना घडतात, चार दिवस चर्चा होते मग दुसरी घटना घडेपर्यंत सगळं कसं शांत शांत.
आणि लपवण्याचं म्हणाल तर लपवा-छपवी सोडून यात जातीपातीचं काहीच नसून निव्वळ दोन कुटुंबांमधला झगडा होता असं छातीठोकपणे सांगितलं जातंय. काय करणार आहे जन्ता?
हे वाचा:http://www.loksatta.com/maharashtra-news/squat-down-and-march-in-jamkhed-protest-to-nitin-age-case-508605/

मी कालच खर्ड्यावरुन परतलो , मंजुळेंच मला माहीत नाही, पण माझ्या आधी वाघमारे तिथे येवुन गेले होते..

असो ...प्रकाराची बरीच शी माहीती गोळा केली आहे मी ...पण माझं मन मात्र इथ(मिपावर) लिहायला तयार नाही...

इतकच सांगतो की ..त्या माय माऊलीच्या डोळ्यांतल्या अश्रुचं थांबेनात, त्या असं टाहो ई. फोडुन रडत नाहीयेत..आवाज देखील निघत नाही ...डोळ्यांमधुन सदैव धारा लागलेल्या असतात ..

सुहास यांना विंनती प्रत्यक्ष भेट दिली आहे तर लिहावे . कदाचीत काही सुटलेले लक्षात येईल.

तुम्ही प्रत्यक्ष जागेवर जाउन काय परीस्थीती आहे ते बघितलय त्यामुळे तुमच्या भावना समजु शकतो. लिहीणे न लिहीणे हा ही अर्थातच तुमचा निर्णय आहे त्याचा ही पुर्ण आदर करतो. मी स्वत: मंगळवारी जायच ठरवलेलं आहे असो.

दुश्यन्त's picture

11 May 2014 - 12:35 pm | दुश्यन्त

१७ वर्षाच्या कोवळ्या जीवाला फार हालहाल करून मारले. पोस्ट-मार्टम या सगळ्याचा उल्लेख नाही असेपण कळते. सुरुवातीला प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला. दलित (मातंग) समाजातील मुलगा आणि आपली मुलगी (सवर्ण- मराठा) बोलतात, कथित प्रेम वगैरे आहे म्हणूनच ही घटना घडली आहे.अर्थात अश्या स्वरूपाची हि काही पहिलीच घटना नाही. आता बघूया मीडिया आणि काही दलित संघटनानी ओरड केल्यावर काय होतंय ते. संपूर्ण मराठा समाजाला आरोपीच्या पिंजर्यात उभे कार्नायचे पण प्रयत्न होत आहेत मात्र ते चूक आहे.नितीन आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळो हीच अपेक्षा.पुरोगामी वगैरे म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात अश्या क्रूर हत्या घडत आहेत ही चिंतेची बाब आहे.

साती's picture

11 May 2014 - 1:00 pm | साती

काहीतरीच काय लिहिताय?
असे कुठे होते का?
आजकाल असा जातीभेद कुठे शिल्लक तरी आहे का?
असलाच तर या पुरोगामी महाराष्ट्रात तरी नाही.
फँड्री आला तेव्हाच आम्ही म्हटलं होतं, हा अवास्तव सिनेमा आहे.
आता तर काय पेवच फुटणार अश्या खोट्या गोष्टींचं.

आत्मशून्य's picture

11 May 2014 - 1:23 pm | आत्मशून्य

दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. तरी ही जात नि पक्ष निरपेक्ष विचार होऊन (तथाकथित किमान) 'न्याय' मिळावा हीच अपेक्षा आहे.

बाकी महाराष्ट्र पुरोगामी कधी होता???????

अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2014 - 10:03 am | llपुण्याचे पेशवेll

दुर्दैवाने खरं आहे.

बॅटमॅन's picture

12 May 2014 - 2:05 pm | बॅटमॅन

ऐकलं तर आम्हीही असंच आहे, परंतु इथे ते अप्रस्तुत आहे असं वाटतंय.

प्यारे१'s picture

12 May 2014 - 2:26 pm | प्यारे१

>>> अप्रस्तुत आहे असं वाटतंय.
शक्यता आहे देखील आणि नाही देखील.

दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत. (जर तर : प्रस्तुत केसमध्ये असं झालं नसेल देखील अथवा तेवढी कसलाच विचार करण्याची क्षमता देखील नसेल त्या मुलाची पण तरी पुढील संभाव्य गोष्टी टाळण्यासाठी घेतली गेलेली फारच पुढची पायरी असेल.) मात्र कुणाचाही जीव जाणं तितकंच तिरस्करणीय आणि घृणास्पद आहे.

बहुसंख्यांक समाज असला की साहजिक संख्याबळामुळं, सांपत्तिक स्थितीमुळं आणि इन जनरलच येणारा माज आणि तथाकथित प्रतिष्ठा वाचवणे ह्या साठी सो कॉल्ड जमीनदार वतनदार मिशीवर ताव देणारे लोक ह्या गोष्टी करताना दिसतात. बर्‍याचदा समाजात एकदा बोलबाला झाला की केस आपल्या हातातून निसटून समाजातल्या पुढा र्‍यांच्या हाती जाते नि तिथं राजकारण सुरु होतं.

माझ्या नात्यातल्याच एकाला (चुलतचुलतभाऊ) एका ओळखीतल्या मुलीशी फोनाफोनी आणि मेसेज देवाणीघेवाणीवरुन असंच सतरा अठरा वर्षांचा असताना माझ्या भावोजींना सांगून (त्यांच्या गावाजवळ असल्यानं) गावी बोलावलं आणि तिथे मारलं. (लाथाबुक्क्या) मारल्यावर त्याला फिट आली मग मारणारांनीच दवाखान्यात नेलं.

दोन तीन केस अशा ऐकल्या आहेत की प्रेमाच्या आणाभाका घेऊन मुलीला पळवायचं, लग्न करायचं आणि तिच्याकडं नंतर अजिबात लक्ष द्यायचं नाही. २ मुली तरी खंगून खंगून संपलेल्या ठाऊक आहेत.

हजारो वर्षांपूर्वीचे तथाकथित स्कोर सेटल करायचे म्हणून त्या मुलींचा बळी घेतलेल्या अशाच काही केसेसबद्दल ऐकून आहे खरा. याचा निषेध किती करावा त्याला सीमा नाही. फक्त या केसमध्ये तो मुद्दा कितपत आहे हे स्पष्ट नसताना तो मुद्दा तिथे आणणे अप्रस्तुत आहे असं आणि इतकंच म्हणणं आहे. असो.

मालोजीराव's picture

12 May 2014 - 5:07 pm | मालोजीराव

मराठ्यांची मराठ्यांशीच लव म्यारेज होताना हाणामार्या होतात,मुडदे पडतात…मग बाकीच्यांनी मध्ये पडायचंच कशाला म्हणतो मी ;)

बॅटमॅन's picture

12 May 2014 - 6:00 pm | बॅटमॅन

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2014 - 6:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

प्रसाद१९७१'s picture

12 May 2014 - 6:10 pm | प्रसाद१९७१

*clapping*

नानासाहेब नेफळे's picture

12 May 2014 - 7:21 pm | नानासाहेब नेफळे

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .

आपल्या अचाट बुद्धीमतेचं कौतुक नेहमीच वाटत आलंय.. :)
असल्या फालतु माहीतीचा स्त्रोत कुठला हे सांगाल का? की आपल्याच अपार ज्ञानाचं पिल्लु आहे .

नानासाहेब नेफळे's picture

12 May 2014 - 11:23 pm | नानासाहेब नेफळे

स्त्रोत मी स्वतःच ,जे बघतो, ऐकतो, अनुभवतो तेच लिहतो.

तुमचा अभिषेक's picture

13 May 2014 - 12:29 am | तुमचा अभिषेक

मराठा- मराठा असे लव म्यारेज होते??? मराठा समाजातील मुलीना नवर्याचे तोंड थेट अंतरपाट पडल्यानंतरच दिसते असे आम्ही ऐकून होतो.इतके उच्चसंस्कार मराठ्यात असतात .

हे मराठा - मराठा म्हणजे ९६ कुळी मराठ्यांबद्दल बोलत आहात का?
कारण आम्ही पण ते आहोत.
आणि आमच्यात माझ्या पिढीत आम्हा भावंडांमध्ये टोटल १०-१२ असू तर दोनच अपवाद वगळता सर्वांचीच आंतरजातीय लव्हमॅरेज आहेत. किंबहुना आंतरधर्मीय देखील आहेत. आंतरप्रांतीय देखील आहेत.

पण आपण म्हणता तसे असेल, किंबहुना कुठल्याही जातीधर्मात असेल तर दुर्दैवी आहे.

नानासाहेब नेफळे's picture

13 May 2014 - 12:47 am | नानासाहेब नेफळे

सगळया मराठ्यात ही रितभात आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2014 - 12:05 pm | अत्रुप्त आत्मा

@सगळया मराठ्यात ही रितभात आहे.>>> नेफळे महाराज..तुमच्या ठरवलेल्या जगातून बाहेर या. मी माझ्या कामा निमित्तानी याच अंतरपाटाच्या जवळचं आयुष्य गेली १६ वर्ष जगतोय. त्यामुळे,तुंम्हाला हा अस्तित्वात नसलेला हणुभव कुठून आला म्हंन्तो मी??? ;) की स्वखुषिनी अंधत्व पत्करलय आपण..काही ठराविक विषयात! :p तसं असेल..तर चालू द्यात..निवांत!

स्पंदना's picture

13 May 2014 - 6:40 am | स्पंदना

पुरे झालय मराठ्यांच मराठ्यांना, त्यात ही धाबळी आणि कोण वाळवणार म्हणते मी.

एस's picture

30 May 2014 - 7:13 pm | एस

अवांतर नसावं खरं तरः काही विशिष्ट जाती आणि धर्मामध्ये अनुक्रमे सवर्ण आणि हिंदू मुलींशी प्रेम करावं, लग्न करावं आणि नंतर त्या मुलीचं जे होईल ते होईल अशा सुप्त आणि खुल्या इच्छा बाळगून सूड मिळवल्याचा आसुरी आनंद मिळवतात असं 'ऐकलं' आहे.

बदाऊंच्या ताज्या घटनेबद्दल तुम्हांस काय म्हणायचे आहे?

“Members of dominant castes are known to use sexual violence against Dalit women and girls as a political tool for punishment, humiliation and assertion of power.”

दर आठवड्याला २१ दलित स्त्रियांवर बलात्कार होतात. स्त्रियांवरील अत्याचारासंबंधीचा संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल वाचून पहा. दलित असणं आणि त्यातही दलित स्त्री असणं ही किती मोठी शिक्षा असेल...

शिक्षा म्हणून, अपमान म्हणून किंवा बळाचा धाक घालण्यासाठी दलितांच्या स्त्रियांवर लैंगिक अत्याचाराचे शस्त्र सवर्ण पुरुषांकडून सर्रास वापरले जाते आणि त्याचे सुप्तपणे समर्थनही केले जाते याबद्दल काय म्हणाल?

क्षमा करा प्यारेकाका, पण आपल्या प्रतिसादाचा स्वर पाहून तिडीक आली म्हणून हा प्रतिसाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 May 2014 - 3:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

मराठा समाजात अशा प्रकारच्या घटना खुप प्रमाणात आढळातात.
पुण्यामधे आमच्या एका ओळखीच्यांनी स्वतःच्या मुलीचे लग्न जबरदस्तीने लावले होते. त्या मुलीला इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न करायचे होते म्हणुन. तो मुलीला लग्नाला तयार करण्याचा प्रकार फार भयंकर होता. दुर्दैवाने ते सगळे अतिशय जवळुन आणि मुकाट पणे पहावे लागले होते.

स्पंदना's picture

11 May 2014 - 4:00 pm | स्पंदना

हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक पिढी जावी लागेल. म्हणजे आणखी वीस वर्ष. कारण कोणताही बदल तडकाफडकी होत नसतो.
घडलेली घटना खरच वाईट. सगळ्यांसाठीच वाईट.

टवाळ कार्टा's picture

11 May 2014 - 11:32 pm | टवाळ कार्टा

हे सगळ बदलण्यासाठी अजुन एक पिढी जावी लागेल. म्हणजे आणखी वीस वर्ष.

शंकाच आहे

दुर्दैवी आणि चीड आणणारी घटना. तरी ही जात नि पक्ष निरपेक्ष विचार होऊन (तथाकथित किमान) 'न्याय' मिळावा हीच अपेक्षा आहे.+१

आयुर्हित's picture

11 May 2014 - 4:54 pm | आयुर्हित

जर कोणी कायदा हातात घेवून शिक्षा केली असेल किंवा जर तो खून असेल तर अपराध्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यात वादच नाही. यात कोणीही जातीचा/धर्माचा बावू करू नये व प्रसंगाला विपरीत वळण लावू नये.

फार वाईट घडले. पण......

विषय चुकीच्या दिशेने नेणाऱ्या लोकांसाठीच लिहितो आहे ते असे :
परंतु मला कीव येते त्या पोराची आणि त्याच्या चुकीवर पांघरून घालनारयांची.

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे? तोवर नुकतेच १२ पास असेल किंवा नसेलही!
म्हणजे हा मुलगा कमावता तर नक्कीच नसावा. मग प्रेम करायचे हे उद्योग शिकवले कोणी?

कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे!

ज्याला दोन वेळेला खायची मारामार आहे, त्यांच्या आई बापांनी आपल्या मुलाला कडक शब्दात परिस्थितीची जाणीव करून देणे हे पालकांचे कर्तव्य नाही का?

आजकाल मुलांना फारच लाडावून ठेवले आहे असे नाही का वाटत?
माझा त्यावेळचा प्रतिसाद बघा. नवा विचार काय दिला आहे समाजाला ?

यावरून जर कोणाला बोध घ्यायचा असेल तर फ़्यंड्री सारखे Teen age love चे सिनेमे बंद केले पाहिजेत, नाही तर असे प्रसंग अजून होतील व नवीन पिक्चरही निघेल ह्या सत्य घटनेवर आधरित.

नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

11 May 2014 - 5:08 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे?
मग २७ की ३७व्या वर्षी करायचे का?असो विष्य तो नाही. ज्यांनी ही हत्या केली त्यांचे कुटुंबीय रयत शिक्षण संस्थेशी संबंधीत आहेत.त्या भागातल्या राजकिय पुढार्‍यांचा प्रामाणीक म्हणून काही नावलौकिक नाही. केस कशी हाताळली जाते
पोलिसांकडून ते पाहुया.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2014 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> १७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे ?

समजा तो प्रेमात पडलाय, तो काही काम करत नाही त्याला कमवायाची अक्कल नाही. त्याच्या घरात खायची मारामार असेल, पालकांनी त्याला वळण लावलं नसेल, आजकाल मुलांना खुप लाडावून ठेवलं असेल. म्हणुन प्रेमात पडायचं नसतं ?

आणि समजा एखादा मुलगा कोणाच्या प्रेमात पडला म्हणून एखाद्याचा जीव घ्यावा काय ? दुसरे कोणतेच पर्याय नसतात ?

-दिलीप बिरुटे

प्रेमात पडा हो सर पण या अश्या कोवळ्या वयातल्या गोष्टींवर थोडा निर्बंध असावा. उगा टाईमपास सारखे चित्रपट अश्या गोष्टींना अवास्तव महत्व देतात. ही बातमी काय सांगते? माझ्या मते तरी यातली ५०% प्रकरण तरी असल्या कोवळ्या प्रेमाची असावीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2014 - 10:08 am | llपुण्याचे पेशवेll

अपर्णाताईंशी सहमत. टाईमपास सारखे चित्रपट या सारासार विवेक नसलेल्या वयात प्रेम (शरीरसंबंध) करायला उत्तेजन देतात अप्रत्यक्षपणे. तथाकथित फँड्री देखील याच वाटेने जातो. अप्रत्यक्षपणे या वयातल्या संबंधांना उत्तेजनच देतो.
यावयातले शारीरीक आकर्षण नैसर्गिक असते मान्य, परंतु त्यातून अप्रत्यक्ष बोध घेऊन तसे वागून कोणाचे नुकसान होत असेल तर त्या चित्रपटांचे समर्थन करणे अयोग्य.
त्याच्यातच समाधान मानायचे असेल तर ठीक.

अभिजित - १'s picture

11 May 2014 - 6:31 pm | अभिजित - १

त्याचे काहीही प्रेम वगैरे नव्हते . ती मुलगीच मागे होती याच्या. फोन नंबर मागत होती. हा हे आईला बोलला. आई म्हणाली लक्ष देऊ नकोस तिच्याकडे. हे सगळे पेपर मध्ये आले आहे.
आणि दुसरे म्हणजे समजा असलेच प्रेम तरी हि शिक्षा द्यायचा अधिकार यांना कोणी दिला ? फार तर तुम्ही आपली मुलगी सांभाळा , समजावा तिला .. दुसर्याच्या मुलाला का शिक्षा ?

राजेश घासकडवी's picture

11 May 2014 - 11:05 pm | राजेश घासकडवी

अरेरे, बळी पडलेल्याच व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची प्रवृत्ती इतक्या निरर्गलपणे प्रकट झालेली पाहून अतिशय वाईट वाटलं. अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात. फ्यंड्री सारखे सिनेमे बघून तरुण पोरं प्रेमात पडतात वगैरे काहीही त्यातून बकलं जातं. 'आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.' ही गर्भित धमकी तर फारच घृणास्पद.

अवांतर - कृपा करून ती सही बदला हो, या प्रतिसादाला ती शोभत नाही.

संदीप चित्रे's picture

12 May 2014 - 9:54 pm | संदीप चित्रे

अत्यंत समर्पक प्रतिसाद राजेश... अगदी अवांतरसुद्धा समर्पक.
तुझ्या प्रतिसादाशी सहमत.

आयुर्हित's picture

14 May 2014 - 12:08 am | आयुर्हित

नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.क्रुपया पुर्ण ओळ वाचावी.....ज्यामुळे अर्थबोध होइल ही खात्री.
सही गहन अर्थपुर्ण आहे. प्रतीसाद व सही वरवर वाचणार्याला समजत नाही.

चिगो's picture

15 May 2014 - 5:09 pm | चिगो

समर्पक प्रतिसाद, गुर्जी..

आता मुळ प्रतिसाद..

कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे!

अरे च्यामारी ! हा असला सल्ला द्यायला कुणी शहाणी व्यक्ती नसल्याने, प्रेम करते, ते निभावून सुखाचा संसार करणारे लोक पाहीले आहेत ब्वॉ.. अस्मादिकही त्यांतलेच..
आणि तो लाखो रुपयेवाला महिन्याला वाला फंडा लावला तर आणखी दहाएक वर्षं तरी वाट बघायला पाहीजे होती आम्ही.. ;-)

नाहीतरी फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनवणारे आहेतच आजच्या या समाजात! आज एक हत्या झाली उद्या मास मर्डर होतील.

देवा !! मीच गर्भगळीत का काय म्हणतात ते झालोय..
असो.. शक्य झाल्यास, मोठे व्हा !! (श्रामो, तुम्ही आठवलात बघा एकदम)

काळा पहाड's picture

11 May 2014 - 11:46 pm | काळा पहाड

अशा प्रवृत्तीतून येणाऱ्या विचारांतून 'खून करणं वाईटच हो, पण...' असं त्रोटकपणे म्हणून पण... च्या पुढे जे लिहिलेलं असतं त्यात अत्यंत प्रतिगामी विचार दडलेले असतात.

आयुर्हित साहेब,
जाऊ द्या हो, ते पुरोगामी मराठावाले आणि पुरोगामी दलितवाले बघून घेतील. तुम्ही काहीही प्रतिसाद द्या, हे लोक स्वतः पुरोगामी असतात आणि तुम्ही कायमच प्रतिगामी असता. अशा प्रतिसादातून तुमच्या जातीवर हल्ला करायची संधीच शोधत असतात हे लोक. यांना पुरोगामीत्वाची फार चाड असते असं नाहीये, असतात हे स्वतःपण जातीयच (जाणता राजा पहा कसं सोयीस्कर रित्या राजू शेट्टींची जात काढतात, किंवा चड्डीवाल्यांबद्दल विधान करतात, पण ते पुरोगामीच! तसेच हे पण!) पण काही जातींना शिव्या दिल्याशिवाय काही लोकांना जेवण जात नाही. आपापसात लढाया करून मरतील झालं.

मंदार कात्रे's picture

12 May 2014 - 1:02 am | मंदार कात्रे

कमवायची काही साधने हाती आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला घरी येत आहेत व फक्त पैसे कसे उडवायचे हा प्रश्न आहे त्यांनीच प्रेम करावे! यालाही आक्षेप आहे !

नगरीनिरंजन's picture

12 May 2014 - 5:18 am | नगरीनिरंजन

१७ हे प्रेम करायचे वय नाही?
आयुर्हितजी,
आपल्या प्रतिसादातली भाषा चुकून वेगळी पडली असे वाटते. १७व्या वर्षीही प्रेम करता येऊ नये असा समाज आपण निर्माण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना लाज वाटली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं होतं बहुतेक.
१७वे वर्ष हेच खरे तर प्रेमाचे वय आहे पण आमच्या अपयशामुळे कृपया मुलांनो तुम्ही तुमच्या जिवाला धोका असल्याने आणखी दहा-बारा वर्षे थांबावे आणि शक्यतो स्वतःच्या जातीतलीच मुलगी बघून लग्न 'उरकावे' असेच तुम्हाला म्हणायचे होते ना? शिवाय समाजाने तुम्हाला काय दिले किंवा जुन्या विचारावर काय कृती केली हे तुम्ही विचारायचं नाही पण तुम्ही समाजाला काय नवा विचार दिला हे तुम्हाला सांगावंच लागेल हेही म्हणायचं होतं बहुतेक. :-)

तुमचा अभिषेक's picture

11 May 2014 - 6:56 pm | तुमचा अभिषेक

१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे?
पहिल्या प्रेमाचे हेच वय असते.
असो, कोणते वय प्रेमाचे हा धाग्याचा विषय नाही.
एखादी मुलगी जीन्स-टीशर्ट असा मॉडर्न पेहराव करायची मग तिच्यावर बलात्कार नाहीतर आणखी काय होणार असे या गुन्ह्याचे समर्थन या धाग्यावर करू नका.

जर त्या मुलाने एकतर्फी प्रेमातून त्या मुलीची छेड काढली असेल (जे अजूनपर्यंत तरी कुठे बातमीत आले नाहीये) तरच त्याला धडा शिकवण्याचे समर्थन होऊ शकते. अर्थात त्या ही परिस्थितीत हि असली क्रूर हत्या, जी थंड डोक्याने ठरवून केली आहे असे वाटतेय, ती खरेच शॉकींग आणि अजूनही आपला समाज कुठे आहे हे दर्शवणारी आहे.

प्रसाद गोडबोले's picture

11 May 2014 - 11:29 pm | प्रसाद गोडबोले

त्यातल्या त्यात समाधान येवढेच की ज्या एका विशिष्ठ समाजाविरुध्द महारष्ट्रात( विशेषकरुन पश्चिम महाराष्ट्रात) हेतुपुर्वक पोलरायझेशन चालु आहे त्या समाजाचा ह्या प्रकरणाशी डायरेक्टली संबंध नाही .

(डायरेक्टली असे म्हणण्याचे कारण हेच मी , "मनुवादी" ह्या शब्दाखाली इन्डायरेक्टली त्यांचाच दोष आहे असे ठासुन सांगायलाही लोक पुढे मागे पहाणार नाहीत. )

प्रसाद गोडबोले's picture

11 May 2014 - 11:33 pm | प्रसाद गोडबोले

आणि ह्या घटनेच्या निमित्ताने "जब्याने मारलेला दगड" नक्की कोणत्या "समाजाच्या" थोबाडावर मारला आहे ह्यावर एकदा चिंतन होण्याची गरज आहे असे वाटते .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2014 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं.

जब्याने दगड मारलाय तो त्याला माणूस म्हणून जगू न देणा-या माणसाच्या थोबाडावर. मग ही माणसं कोणत्याही जाती-पातीची असू द्या. माणसांनी 'जब्याच्या' शोषनाच्या आणि त्याच्यावर अन्याय करण्याच्या ज्या ज्या गढ्या उभारुन ठेवल्या त्या त्या गढ्यांविरुद्ध जब्याचा दगड आहे. आपापली सर्व 'शस्त्रे' वापरून ज्यांनी ज्यांनी त्या त्या 'शस्त्रांच्या' आधारे 'जब्याला' माणूस म्हणूण जगू द्यायचे नाकारले त्या त्या विरोधात जब्याचा दगड आहे. माणूस म्हणून मला आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच एक उदाहरण होऊन अन्यायाविरुद्ध ,समतेसाठी विषमतेविरुद्ध आणि माणुसकीचे हक्क हिरावून घेणा-या अमानुषतेविरुद्ध मारलेला तो दगड आहे.

माणसाचा माणसाला स्पर्श नको म्हनणारी, घाणेरडी माणसं स्वच्छ माणसात यायलाच नको असे म्हणनारी, बकाल जीवन जगणा-यांनी आपापल्या औकातीने राहावं असं समजणारी, भिकारडी साली एक वेळ खायची सोय नाही आणि निघालीत प्रेमाची स्वप्न बघायला, अशांवर तो भिरकावलेला दगड आहे.

प्रत्येक माणसाला विकासाची संधी आहे पण तशी संधी न मिळू देणा-याच्या तोंडावर तो दगड आहे. जात-धर्मभेद, वर्ण-वंशभेद, लिंगभेद आदींचाचा विचार करणा-यांच्या तोंडावर तो मारलेला दगड आहे. माणूस म्हणून आपूलकीची जिव्हाळ्याची भावना व्यक्त करण्यापेक्षा, स्वार्थभाव, परस्परद्वेष मत्सर, तिरस्कार वा तुच्छताभाव बाळगणा-यांच्या विरुद्ध जब्याचा दगड आहे. जब्याला अक्कल नाही, जब्याला शिक्षण नाही, जब्याला ढुंगावर गुंडाळायला नीट कपडे नाहीत, जब्याला वळण नाही, जब्याला नैतिकता बैतिकता समजत नाही, जब्याची काय चूक त्याच्या आई-बापाची चूक कारण त्यांनी त्याच्यावर संस्कार केले नाही, आणि साला अल्लड वयात प्रेमाची स्वप्न बघतो, असा विचार करणा-यांया थोबाडावर तो दगड आहे.

आणि सांगू फँड्रीतला 'जब्या' असू दे नाही तर 'किरवंत' मधलं 'अंत्येष्टी संस्कार’ करणारं पात्र असू दे यांची जात आणि समाज मला माहिती असते नसते तरी त्यांचं जर माणूसपण नाकारलं गेलं असेल तर अशा दोघांनाही अशा कोणत्याही लोकांच्या विरुद्ध दगड मारण्याचा अधिकार आहे, असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

12 May 2014 - 10:13 am | नगरीनिरंजन

ज्जे बात!

स्पंदना's picture

12 May 2014 - 10:16 am | स्पंदना

केव्हढ स्पष्ट अन व्यवस्थीत लिहीलं सर!
__/\__!!

यशोधरा's picture

12 May 2014 - 10:35 am | यशोधरा

सुरेख प्रतिसाद. आवडला.

आत्मशून्य's picture

12 May 2014 - 11:21 am | आत्मशून्य

मदनबाण's picture

12 May 2014 - 11:24 am | मदनबाण

सुरेख प्रतिसाद !

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2014 - 1:05 pm | प्रसाद गोडबोले

जब्याने मारलेला दगड नक्की कोणत्या समाजाच्या थोबाडावर मारलेला आहे... माझी उत्तरं.

बिरुटे सर , हे इतकं सोप्पं आहे ? माझ्या माहीतीत तर फक्त एक विषिष्ठ समाजच शोषक आहे आणि त्यांच्या थोबाडावर मारलेला आहे तो दगड असे आजवर ऐकत होतो , रादर सर , तुम्ही येथे सातारा कराड कोल्हापुरात येवुन पहा जब्याच्या आडुन कोण कोण दगड मारत होते ते ही तुमच्या लक्षात येईल , पण ह्या घटने मुळे जब्याच्या आडुन दगड मारणारेच जब्याच्या जिवावर उठलेत हे स्पष्ट झालय म्हणुन म्हणलं की एकदा परत चिंतन करायची गरज आहे :)

आता जरा स्पष्टच : ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादातल्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या असमानते बद्दलचा सारा रोष रीतसर पणे ब्राह्मण समाजाकडे वळवला ... पण आता हळु हळु लोकांच्या लक्षात येतय की जब्याला मारणारे कोणत्या गटातील आहेत ते !!

समाजाचं अर्थकारण ज्या गटाकडं असतं त्याच्याकडं समाजाच्या वाटचालीच्या चाव्या असतात.
१९४८ पर्यंत तरी ब्राह्मण समाज सगळ्या समाजाच्या शीर्षस्थानी होता हा इतिहास आहे. बुद्धीच्या बळावर, ज्ञानाच्या बळावर नि धूर्तपणा, लवचिकपणा, स्वतःमध्ये कालानुरुप बदल करण्याची क्षमता (पुन्हा बुद्धीच) ह्या गुणांच्या आधारे सगळ्यांवर वरचष्मा ठेवणं शक्य होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील डोकं शांत ठेवून नि अनुकूल परिस्थितीमध्ये उतमात कमी करुन त्यांनी हे शक्य केलं होतं.

ह्याच्या विरुद्ध खालचा समाज अशिक्षित, वर येण्याचा विचार न करणारा, अंधश्रद्ध असा तर 'वरचा' समाज देखील पैशानं बरा पण परिस्थिती अनुकूल असली की उधळपट्टी नि प्रतिकूल झाली की 'गावातल्या ब्राह्मण+/सावकाराकडं' जमीन्/दागिने गहाण ठेवून उधळपटटीच असं करणारा झाला.
४८ च्या गांधीहत्येनंतर बर्‍याच जणांनी 'स्कोअर सेटल' केले नि ब्राह्मणांचं वर्चस्व बर्‍यापैकी कमी झालं. आजही जुनी पुस्तकं वाचून नि जुन्या आठवणी/जखमा भळभळत्या ठेवून लोक मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेतच.

प्रकाश घाटपांडे's picture

12 May 2014 - 2:48 pm | प्रकाश घाटपांडे

+१

अवतार's picture

12 May 2014 - 9:42 pm | अवतार

झकास प्रतिसाद!

कोणावरही दगड भिरकावून व्यवस्था बदलत नसते तर समतावादी विचारांची मुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजवूनच व्यवस्था बदलता येते हे सत्य बाबासाहेबांना उमजले होते. म्हणूनच त्यांनी दगड मारण्याच्या फंदात न पडता व्यवस्था बदलणाऱ्या विचारांची मुळे समाजात रुजवली. त्या मुळांचा आज वृक्षविस्तार होऊन त्यांना पालवी फुटत आहे. हे सत्य स्वीकारण्याची ज्यांची तयारी नाही त्यांनाच कोणत्यातरी "एका समाजावर" दुसऱ्या समाजाने दगड मारला हे आठवून वांझोटा मानसिक आनंद मिळतो.

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2014 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा

अवतारबाबा आणि बिरुटे सर>>> +++१११

राजेश घासकडवी's picture

12 May 2014 - 9:38 am | राजेश घासकडवी

बिरुटेंचा प्रतिसाद आवडला.

मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे.

पांथस्थ's picture

12 May 2014 - 11:42 am | पांथस्थ

प्रा. बिरुटे, प्रगल्भ प्रतिसाद १+

राजेश १+

मला आणखीन एक उत्तर सुचतं म्हणजे हा दगड मारला जातो तेव्हा तो 'चौथी भिंत' पार करून प्रेक्षकांकडे येतो. म्हणजे हे सर्व ढळढळीतपणे चाललेलं दिसत असतानाही ते नुसतं बघत राहणाऱ्या निष्क्रिय प्रेक्षकी वृत्तीवर मारलेला तो दगड आहे

या आधी काहि धाग्यांवर प्रतिसाद म्हणुन हे वाक्य दिलं होतं पुन्हा एकदा -

" History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people.

- Martin Luther King, Jr."

लोकशाही खिळखिळी होण्याचे प्रमुख कारण - लोकशाही उपभोगणार्‍या लोकांची निष्क्रियता!

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2014 - 12:59 am | प्रभाकर पेठकर

>>>>१७ वर्ष काय वय आहे प्रेम करण्याचे?
कुठल्या वयापासून मुलगा आणि मुलगी ह्यांना परस्परांबद्दल 'शारीरिक' औत्सुक्य आणि आकर्षण निर्माण होतं. त्या वयापासून 'प्रेम' ह्या विषयी मनांत विचारमंथन आणि धारणा बनण्यास सुरुवात होते. कोणासाठी हे वय १२ असेल तर कोणासाठी १७. पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे. मग ते २५-३० काहीही असू शकेल. असो.

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला. जे कांही नव्या पिढीचे व्हायचे असेल ते होऊ द्यावे. ज्याचे त्याचे पालक पाहून घेतील. आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे. नव्हे, मिपाकरांनीच आणून सोडले आहे. मिपाकरांना दोन्ही बाजूंनी बोलताना पाहिलं आहे. शहाण्याने, योग्य असली तरी, कुठली बाजू घेऊ नये. असो.

मंदार कात्रे's picture

12 May 2014 - 1:05 am | मंदार कात्रे

'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' ??????????????

इथपर्यंत मजल गेली का?

वा वा ...चान चान !

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2014 - 1:09 am | प्रभाकर पेठकर

होय मंदार. तेंव्हा जी जखम मनाला झाली ती कधीच भरून येणार नाही. मी आजतागायत माझ्या कट्टर शत्रूचेही मरण इच्छिलेले नाही. असो.

पेठकर जी जाऊ देत प्रत्यकजण वेगवेगळ्या मुशीतून बनलेला असतो. प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही.आपल्या भावना समजू शकते. पण असे शेरे अजिबात मनाला लावून घ्यायचे नसतात.

प्रभाकर पेठकर's picture

12 May 2014 - 1:06 pm | प्रभाकर पेठकर

>>>>प्रत्येकाची अक्कल, विवेक, बुद्धी चांगली असेलच असे नाही.
खरं आहे शुचि. ज्या सदस्याने ही मुक्ताफळे उधळली आहेत त्या सदस्याबद्दल मला आदर होता. तो इतका अस्थानी ठरेल असे वटले नव्ह्ते. मिपावर मी, 'संस्थळावर कसे वागावे/लिहावे आणि किती संवेदनशील असावे' हे नाईलाजाने शिकलो आहेच. मिपा किंवा इतर कुठलेही संस्थळ हे फक्त मनोरंजनाचे/टवाळकीचे/आपल्या वैफल्याला दूसर्‍यावर शाब्दिक आसूड ओढून नकारात्मक वाट करुन देणारे नसावे. तिथे चांगल्या विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान व्हावे असे वाटते. थोड्याफार टवाळक्या ह्या होणारच पण त्या जेवणातील मीठाइतक्याच असाव्यात.
असो. धाग्याच्या विषयाला सोडून बरेच अवांतर झाले. क्षमा असावी.

प्रकाश घाटपांडे's picture

12 May 2014 - 1:41 pm | प्रकाश घाटपांडे

हे अवांतर नसून समांतर आहे. अशा प्रवृत्ती समाजात असणारच. कधी कधी उन्मादाच्या भरात इतर वेळी सुज्ञ वाटणारे लोक देखील असे खरडतात.आताही खरडणारे हा धागा वाचत असतील तर बोध घेतील अशी आशा करु या.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2014 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.

मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे.

असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे ही प्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.

बाप्रे.. पहिल्या वाक्याचा अर्थ बराच वेळ लागलाच नाही. सावरकरांच्या वर्ताण झाले

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2014 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

"आपला मुद्दा जिंकण्यासाठी सत्य आणि वास्तविकतेचे भान सोडणे" ही कुप्रवृत्ती सोडणे फार कमी जणांना जमते... हे न जमणार्‍यात तथाकथित सभ्य, जाने-माने लोकही भरपूर प्रमाणात असतात.

मात्र त्यामुळे आपण आपला मूळ चांगला "स्वभाव" सोडणे म्हणजे त्या सभ्यतेचे कातडे पांघरलेल्या "धूर्त" लोकांना रान मोकळे सोडल्यासारखेच नाही का? त्यांना त्यांची जागा दाखवून तो मुद्दा सोडून देणे वेगळे आणि त्याप्रकारच्या मुद्द्यावर कायम मौन बाळगणे वेगळे.

असो. "कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही." ही म्हण खास याच प्रकारच्या लोकांसाठी बनविलेली आहे.

जर एखादा धागा चर्चा या सदरात असेल तर त्यावर साधक बाधक अश्या दोन्ही बाजुंनी चर्चा होणार पेठकर काका. पण जेंव्हा लोक मुद्द्यावरुन गुद्द्यावर येतात तेंव्हा त्यांची अक्क्ल आपण समजुन घ्यायची असते.
अन जोवर स्वत्;ला झळ लागत नाही तोवर नुसती चर्चा करुन मनोरंजन एव्हढाच उद्देश असतो. मग तेथे पोटतिडीकेने सांगणारे चेष्टेचा विषय बनतात.

राजेश घासकडवी's picture

12 May 2014 - 8:05 am | राजेश घासकडवी

पण जो पर्यंत आपण स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम नाही, दूसर्‍या जीवाची जबाबदारी उचलण्यासाठी परिपक्व नाही तोपर्यंतचं वय, हे 'संयमाचं वय' असलं पाहिजे.

नाही हो पेठकर काका. आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का? सतराव्या वर्षी नाही प्रेमात पडायचं तर कधी? निसर्ग कसा बदलणार आपण?

शिक्षण पुरं होईपर्यंत, जबाबदारी उचलण्याची क्षमता निर्माण होईपर्यंत मुलं होऊ देऊ नये म्हणणं निश्चितच पटत. पण त्यासाठी खूप सोपे उपाय आहेत हो आजकाल.

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2014 - 12:10 pm | प्रभाकर पेठकर

राजेश घासकडवी साहेब,
>>>>आता पूर्वीच्या काळी भारतभर बाराव्या-चौदाव्या वर्षी मुलामुलींची लग्नं होत. मुलीला पाळी आली की तिला नांदायला पाठवत. त्या लोकांचं चुकीचं होतं का?

प्रेम करणं राहू दे बाजूला पूर्वीच्याकाळी आई-वडीलच मुलांच्या आयुष्याचे निर्णय घेत. ते सर्व बाजूंचा विचार करण्यासाठी सक्षम असत, सुनेची आर्थिक जबाबदारी उचलण्याची ताकद त्यांच्याकडे असायची. मुलाने-सुनेने केंव्हा 'एकत्र' यायचे हेही तेच ठरवायचे. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलाची-सुनेची राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था घरचेच पाहायचे. आता विभक्त कुटुंब पध्दतीत निर्णयक्षमतेपासून अमलबजावणीपर्यंत आणि त्या अनुषंगाने येणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यापर्यंत प्रत्यक्ष मुला-मुलीलाच सर्व भूमिका पार पाडाव्या लागतात. त्यामुळे आजच्या काळात ठराविक काळापर्यंत संयम बाळगणे अत्यंत आवश्यक ठरते.
आचारविचारांचे स्वातंत्र्य आधुनिक काळानुसार पाहिजे पण जबाबदार्‍या जुन्या काळाप्रमाणे घरच्यांनी उचलाव्यात ह्या विचारसरणीत विसंगती आहे.

व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच. आपल्याला त्या स्विकारल्याच पाहिजेत. आणि कायदा हातात घेऊन एखाद्याला मृत्यूदंड देणं केंव्हाही समर्थनिय नाही. जे चुक ते चुकच आहे.

व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक अशा घटनांना जन्म देत राहणारच.
सहमत !
मागच्याच महिन्यात एक धक्कादायक बातमी वाचली होती :-
Girl, 12, becomes Britain's youngest mother

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2014 - 8:52 am | प्रसाद गोडबोले

आपण फक्त आपल्या मुलावर चांगले संस्कार करावेत. दुसर्‍यांच्या मुलांवर चुकुनही काही संस्कार करायला जाऊ नये अशा भूमिकेप्रत आलो आहे.

मी तर म्हणतो की आपण आपल्या मुलांवरही चांगलेबिंगले संस्कार करण्याच्या भानग्डीत पडु नये ... खलिल गिब्रान काय म्हणाला की तुम्ही पोरान्ना फक्त जन्म देवु शकता ...तुमचे विचार नाही !

थोड्या टेक्निकल भाषेत बोलायचे तर संस्कार करणे हे सुपरवाईझड लर्निंग झाले पण अनसुपरवाईझड लर्निंग हे मानवी मेन्दुचे ( आणि काहीच्यामते बर्‍याच विकसित प्राण्यांच्या मेन्दुचे ) डिफायनिंग फीचर आहे !!

आपण पोरांपुढे फक्त आपले अनुभव ठेवुयात वाटल्यास चांगले साहित्य ठेवुयात बस्स ...बाकी त्यापुढे काय चांगले काय वाईट , कार करावे काय करु नये हे त्यांचे त्यांनाच ठरवुदेत !! उगाच संस्काराम्च्या मोल्डिंग मधुन काढलेल्या पोरापेक्षा स्वतःचे संस्कार स्वतःच्याच बुध्दीने विचाराने केलेली पोरं मला जास्त आवडतील !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2014 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. शेवटी नाद सोडून दिला.

काय पेठकर साहेब, काही लोकांना मुळात कोणाचा तरी अपमान करायचा असतो. व्यक्तिगत पातळीवर चर्चा करायची असते. मान-अपमान करायचा असतो, तेव्हा इतका काय विचार करायचा अशा लोकांचा. त्रास होतो थोडासा हे मान्य. मी अनेकदा अनेकदा म्हटलंय. आपण खूप जीवाला लावून घ्यायचं नाही. जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन.

आपल्याला काय वाटतं ते लिहून मोकळ व्हायचं. आपल्याला उपप्रतिसाद आला तर त्याला उपप्रतिसाद लिहित नाय बसायचा त्याला फाट्यावर मारायचं. दुर्लक्ष करण्यासारखं मोठं अस्त्र नाही, जालावर. आता तुम्ही काय नवीन नाही संकेतस्थळावर खूप दिवसांपासून वावरता, तेव्हा तुम्ही तरी असं लिहायचा नाद नाय सोडायचा. आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे. ;)

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

12 May 2014 - 3:10 pm | मुक्त विहारि

सहमत...

@ पेठकर काका...

मिठाई बरोबर पुठ्ठ्याचा खोका येतो.तो खोका फेकून द्या, आणि मस्त इथल्या लेखांची चव चाखा,जमल्यास आम्हाला पण एखाद्या लेखाची मेजवानी द्या.

अहो, समाज म्हटले की, गहनविचारी माणसे येणारच.

लहान तोंडी मोठा घास घेतला, त्याबद्दल क्षमस्व.

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2014 - 12:22 pm | प्रभाकर पेठकर

बिरुटेसर,

>>>जालावर वावरतोय ना. आपली कातडी गेंड्याची करुन घ्यायची. कितीही टोचलं तर वरची कातडीला सुद्धा जाणवू नये की काय टोचलंय म्हणुन.

तेच होऊ द्यायचं नाहिये मला. मी आहे तो ठिक आहे. कातडी अगदी गेंड्याची करायची वेळ आली तर मी संस्थळावर वावरणेच सोडून देईन. आहे काय आणि नाही काय. कितितरी वेळ वाचेल. असो.

बिरुटेसर,
मला पोलीसात उपनिरिक्षकाच्या जागेसाठी वर्णी लावण्यासाठी एका ओळखितल्या निरिक्षकाने मंत्र्यापर्यंत ओळख लावण्याची तयारी दाखविली होती. पण, 'पोलीसात लाच खावीच लागते. सुरुवातीला त्रास होतो पण पुढे पुढे मन मरतं.' अशा त्याच्या वक्तव्यामुळेच पोलीसखात्याच्या नोकरीकडे मी पाठ फिरविली. पोलीसखात्याच्या नोकरीसाठी 'लाच न खाण्याचं' तत्व मी सोडू इच्छित नव्हतो. असो. असतात कांही माणसं आडमुठी. जाउद्या.

सुबोध खरे's picture

14 May 2014 - 6:56 pm | सुबोध खरे

people laugh at me because I am different.
I laugh at people because they are all the same.
आपण का बदलायचे? शेवटी रात्री आपल्याला थंड झोप लागत असेल तर काय वाईट आहे.
माझ्या मावशीचे यजमान ३६ वर्षे आयकर विभागात अधिकारी म्हणून नोकरी करून फक्त निवृत्तीवेतनासहित निवृत्त झाले. त्यांच्या सहकार्यांनी त्यांना विचारले साहेब तुमच्या बरोबरच्या अधिकाऱ्यांची पार्ले अंधेरीला तीन चार घरे/ सदनिका झाली तुम्ही असे राहून काय फायदा झाला?
त्यांनी शांतपणे सांगितले ते लोक पैसे खाऊन थंड झोपू शकत असत. मी त्यातला नाही. पण माझ्या ३६ वर्षाच्या झोपेची किंमत काय कराल?
(त्यांची मुले उच्च विद्या विभूषित आणि अत्यंत गुणी निघाली आणि मुलांनी प्रचंड पैसा कमावला.) बापाचे काय नुकसान झाले?

मिसळपाववर अशा विषयावर कांही लिहावं म्हंटलं तर मन धजावत नाही. मागे २-४ वेळा प्रयत्न केले पण 'आले हे स्वयंघोषित संस्कृती संरक्षक' अशी संभावना केली जाते. एवढ्यावर विषय संपत नाही तर खरडवह्यांमधून 'ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा' अशी आमच्या मरणाचीच इच्छा धरणार्‍या टोकाच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या.
काकाश्री असल्या वायझेड लोकांची मते कशाला मनाला लावुन घेता ? उलट त्यांचा उद्देशच अशाने सफल होतो. बरळणार्‍या लोकांच्या प्रतिक्रिया शक्योतो वाचायच्या टाळाच, आणि वाचल्याच तर हा वायझेड आहे समजुन दुर्लक्ष करुन टाका.

आपल्या लिहिण्याचा नाद पाहुन अमक्या धमक्या लोकांनी लिहायचा नाद सोडला पाहिजे.
बिरुडे सरांशी बाडिस... ज्याला योग्य प्रकारे लिहायचे असेल तर तो तसे लिहतोच आणि ज्याला वायझेडपणा करायचा आहे तो तसा करतोच ! आपण आपल्याला इथे आपले विचार मुक्त आणि स्वतंत्रपणे मांडायची मोकळीक आहे ती कोणा सोम्या-गोम्या मुळे का घालवायची ? मी तर कोण आला कोण गेला याचा विचार सुद्धा करत नाही. ज्याला लिहायची आणि मिपावर वावरायची इच्छा आहे त्याचे नेहमीच इथल्या सर्व लोकांकडुन स्वागत केले जाते... मग तो जुना असो वा नवा. उगाच फालतु माज करणार्‍यांना दुर्ल़क्षीत करणेच योग्य.

जाता जाता :- असल्या लोकांना फाट्यावरच मारा. भले देउ कासेची लंगोटी|, नाठाळांच्या माथी हाणु काठी || हे तुकोबांचे वाक्य प्रमाण असावे. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

12 May 2014 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

जाता जातां - ते वाक्य समर्थांचे नसून तुकोबांचे आहे असे सुचवतो.

स्पंदना's picture

12 May 2014 - 10:34 am | स्पंदना

कुठे चाललात?

हो. माझा संदर्भ चुकला आहे.
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी

असे आहे ते, संपादकांना विनंती जमल्यास बदल केल्यास आभारी राहेन. :) धन्स पुपे.

मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
या वरील अभंगात संत तुकाराम यांनी वापरलेला मुळ शब्द "कासेची" हा नव्हता. विख्यात कादंबरीकार व लिंग्वीस्टीक्स मध्ये पी.एच्.डी. केलेले ( इथे पी.एच्.डी. चा विषय महत्वाचा आहे) यांनी आपल्या एका लेखात तुकारामांनी वापरलेला मुळ शब्द दिला आहे. आता मुळ शब्दा एवजी हा कासेची शब्द का वापरण्यात आला बदलण्यात आला यामागे काही महत्वपुर्ण अशी समाजशास्त्रीय कारणे आहेत.
मी ही तो शब्द का देत नाहीये या मागे ही नेणीवे वरील तो दबाव कार्यरत आहे. भालचंद्र नेमाडेंच्या समीक्षा व तुकारामावरील त्यांनी लिहीलेले साहीत्य वाचलेले असल्यास मी काय म्हणत आहे याची कल्पना येइल.

मदनबाण's picture

12 May 2014 - 11:17 am | मदनबाण

हो... माहित आहे. गां** असा आहे तो.

आत्मशून्य's picture

12 May 2014 - 11:14 am | आत्मशून्य

ही जुनी खोडं आज ना उद्या मरायचीच, त्यांच्याशी काय वाद घालायचा

कोण हो तो सदस्य ? नक्कि काय घडले होते की अशी प्रतिक्रीया दिली त्याने ?

भालचंद्र नेमाडे हा उल्लेख टंकायचा चुकन राहीला मी भालचंद्र नेमांडे विषयी बोलत होतो त्यांच्या लेखात याचा उल्लेख आहे.

सुबोध खरे's picture

12 May 2014 - 12:27 pm | सुबोध खरे

जाता जाता -- एखाद्या मुलाने तुमच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याला मृत्युदंड देणे हे महाराष्ट्र पाचव्या शतकात असावा याचा पुरावा आहे. मुलाने किंवा मुलीने प्रेम करणे आणि त्यांनी लग्न करणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत. अव्यक्त प्रेम हे साधारण ८० ते ९० टक्के( कदाचित १००%) लोक करतात.यातील एक दशांश लोकांचे प्रेम उघड होते किंवा व्यक्त केले जाते. यातील पाच टक्के लोकांचे लग्न होते. प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही.
एक नम्र सूचना --
मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल.
(मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते)

वरील एका प्रतिसादात पांथस्थ यांनी मार्टीन ल्युथर किंग चे हे सुभाषित दिलेले आहे.
" History will have to record that the greatest tragedy of this period of social transition was not the strident clamor of the bad people, but the appalling silence of the good people.
- Martin Luther King, Jr."
या किंग यांच्या प्रतिसादा चे उत्तम रीअल लाइफ उदाहरण म्हणजे या प्रतिसादातील हे सुबोध खरे यांच्या प्रतिसादातील खालील वाक्य -- पुरोगामी लोक= गुड पिपल ( आणि यांच अपालिंग सायलेन्स ते बाळगा हा आग्रह)

मागास वर्गीय आणि इतर मागास वर्गीय यातील लढा यात पुरोगामी लोकांना पडण्याचे कामच नाही म्हणजे हा काथ्याकुट टाळता येईल असे वाटते

मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देऊन टाकावे म्हणजे हा दलित सवर्ण असा वाद आणि हत्या टाळता येईल.

काय कमाल आहे इतक्या जटील कॉम्प्लेक्स समस्ये च इतक सोप उत्तर होत कोणाच्याच कस लक्षात आल नाही आजतागायत ? मराठा समाजाला इतर मागास वर्गीयात आरक्षण देउन टाका म्हणजे या हत्या आणि वाद टळतील ? म्हणजे अशा हत्या या मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याच्या रागातुन झालेल्या आहेत ? यात वर्णव्यवस्था काम करत नाही का ? आऱक्षण झाले असते तर या संबधांना विवाहाला आनंदाने मान्यता मिळाली असती का ?
खरे साहेब वर्णव्यवस्था जी खोलवर रुजलेली आहे ती इथे काम करत आहे आणि मराठा आरक्षणाचा आग्रह हा त्याने मिळणारया आर्थिक हीता च्या आकांक्षेतुन आहे तो मिळाल्यावर सर्वांना समान वागणुक देणे वा आपल्यापेक्षा खालच्या जातीत विवाह करणे इ. ला प्रोत्साहन मिळण्याचा काहीही संबध नाही.
वर्ण व्यवस्था आपली उतरंड सांभाळण्याचे काम आरक्षणाचा लाभ मिळाला अथवा नाही मिळाला तरी थांबविणार नाही मुळ समस्या वर्णव्यवस्थेची आहे.

प्रेम का होते याचा कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आणि ते होऊ नये यासाठी आजतरी काही करता येत नाही.

डॉक्टर साहेब, प्रेम होऊच नये म्हणुन काही गोळ्या काही इंजेक्शन, काही जडीबुटी, साबुदाण्याच्या आकाराच्या गोळ्या काही काढा देता येतील का येत्या पिढीला. म्हणजे, वय वर्ष तिशी-चाळीशीला पुन्हा अशी भावना त्याच्या मनात निर्माण झाली पाहिजे. शिक्षण, नोकरी इतर जवाबदा-याही पार पडलेल्या असतील. मेंदुत असं एखादा बदल करायचा की बैलाला झापड लावल्यासारखं पोरं-पोरी एका सरळ एका रेषेत चालली पाहिजेत. पोरांकडे लक्ष द्यायची गरज पडणार नाही.पोरं मोकाट सुटणार नाहीत. मुलगी अजून घरी का आली नाही अशी चिंता पालकांना राहणार नाही. सारांश प्रेमभावना दडपून टाकता येतील असं काही करता येईल काय ? :)

दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

अस म्हणुन वाट पाहणा-या प्रियकराला चिऊताई म्हणते अरे बाबा ! आज लय काम आहेत, अरे बाबा आत्ताशी कुठं घर बांधतेय. अरे बाबा, आत्ताशी कुठं मुल मुलांची लग्न झालीत. आत्ताशी कुठं नवरा सासरा यांचं करते आहे, अरे नातु पणतु होऊ दे बाबा. चिमणा बिचारा वाट पाहुन 'उडुन जातो.' चिऊताय दार उघडते. मला वाट पाहणा-या त्या कावळ्याची खुप दया येते. डॉक्तर साहेब कसं थांबवता येईल हो हे ?

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
(मंगेश पाडगावकर)

-दिलीप बिरुटे

अहो असं करता आला असतं तर प्रश्नच मिटला असता. आता बघा दिग्गीराजा साहेबाना या वयात ( फक्त ६७) सुद्धा प्रेम झालं.
ttps://www.google.co.in/search?q=digvijay+singh+affair&rlz=1C2CHNY_en-ININ376&t...
मग १७ व्या वर्षी एखाद्या तरुण/ तरुणीला कसं काय थांबवणार?

धाग्याचा मुख्य विषय आहे त्या संबंधाने वेगवेगळ्या मुद्यांची सरमिसळ होताना दिसतीए. मला पडलेले काही प्रश्न पडले ते असे

एक. हे प्रकरण वाचताना कनीष्ठ महाविद्यालयही शाळेला जोडलेली असण्यापेक्षा वरीष्ठ महाविद्यालयांना जोडलेली असण अधीक श्रेयस्कर असत का हा विचार मनात तरळून गेला. वरीष्ठ महाविद्यालयांच्या सोबत एकतर अधीक चांगल्या दर्ज्याच्या शैक्षणिक वातावरणाची साथ मिळते ज्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अधिक चांगली वाचनालय सुविधा लॅब्स वगैरे उपलब्ध असण्याची शक्यता वाढते. आणि आयुष्याच पुढच ध्येयही खुणावत असतं. दुसर्‍या बाजूला पौगंडावस्थेतून संक्रमणशील अवस्थेतील मुलांची भावनिक अवस्था समजून सुयोग्य पाठबळ आणि मार्गदर्शन करण्यासाठी त्या अवस्थेतून पुढे गेलेला अनुभवी वरीष्ठ अनुभवी विद्यार्थी वर्ग तसेच व्यक्ती स्वातंत्र्याच्या परिघांची प्रगल्भ समज वरीष्ठ महाविद्यालयीन वातावरणात अधीक बरी असण्याची शक्यता असू शकते का?

दोन. या विशीष्ट प्रकरणात मुलगा आणि मुलगी दोघेही कायद्याच्या दृष्टीने नाबालीग आहेत म्हणजे कंसेंटची पुर्ण अधिकार नाही याचा अर्थ या वयात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही असे नाही. इन एनी केस इथे जबाबदारी शालेय प्रशासन आणि पालकांची दोहोंची आहे. त्या संक्रमणावस्थेतील वयातील भावनांचा आदर ठेऊन आकर्षण आणि प्रेम यातील सुक्ष्म भेद समजावून देणे तसेच अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने सुयोग्य समुपदेशन उपलब्ध करणे हि जबाबदारी जशी शालेय व्यवस्थापनाची आहे तशी पालकांची आहे पण हे करण्याची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता शहरांमध्येही पुरेशी नाही ग्रामीण क्षेत्रात आहे का ? इथे ग्रामीण भागातही मुलांच शिक्षणाच आणि लग्नाच वय सावकाश का होईना वाढत आहे, बालविवाहांच प्रमाण कमी होत आहे आणि हि सामाजिक बदलांनी समोर उभी टाकणारी आव्हान पालकांना आणि शालेयव्यवस्थापनांना सांभाळायची आहेत याबाबत सजगतेची गरज असू शकते का ?

तीन. यात सामाजिक दुराव्यांचा संबंध नाही असाही एक दावा पुढे येतो आहे, त्यात प्रथम दर्शनीतरी तथ्य जाणवत जे कुटुंबच बाहेर गावातून येऊन राहील आहे त्याच्या आडनावावरून जात समजली असेल आणि असली तरी ती अबकड आहे का हळक्षज्ञ या पेक्षा आपल्या बहिणीची सुरक्षा आणि प्रतिष्ठा हे दोन मुद्दे अधिक प्रभावी असू शकतात तरी हे मुद्दे सोडवण्याची प्राथमिक जबाबदारी शालेय व्यवस्थापन पालक आणि सुरक्षा व्यवस्थांच सहकार्य याच्याशी संबंधीत आहेत. अर्थात इथे नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेताना आपण हे विशीष्ट प्रकरण जरा बाजूला ठेऊन विचार केला की; मुलगा आणि मुलगी दोघेही अबकड सामाजिक गटाचे अथवा दोघेही हळक्षज्ञ सामाजिक गटाचे आहेत अशा स्थितीत प्रकरणे या टोकाला जाण्याच प्रमाण सहसा कमी असेल किंवा कमी ऐकण्यात असेल. समजा (अशा कोणत्याही प्रकरणातील) मुलगा हा मुलीच्या भावाचा मीत्रांपैकी/नातेवाईकांपैकी समजा मामेभाऊ असता तरीही प्रकरण अशाच पद्धतीने हाताळल गेल असत का ? सहसा मीत्रवर्ग एकाच समाजाचा असतो का ? मग एकाच सामाजिक गटाची प्रकरणे टोकाच्या मार्गाने तडिस न नेणे आणि सामाजिक गटात फरक झाला की प्रकरण हाताळणी टोकाच्या मार्गाने होणे असे काही होते आहे का ? समाजशास्त्रातील तज्ञानी हा सामाजिक अभ्यास करण्याची गरज आहे का ?

चार. या विशीष्ट प्रकरणात सामाजिक दुरावा हे कारण नाही हे क्षणभर मान्य जरी केल, तरीही सामाजिक दुराव्यांच्या बाबतीत सर्वच आलबेल आहे अशी परिस्थिती आहे का ? समजा हि मुले कायदेशीर दृष्ट्या (लिगली) कंसेंटीग अ‍ॅडल्ट असती तर त्यांना स्वतंत्र पणे त्यांचे निर्णय घेऊ देण्या इतपत भारतीय आणि महाराष्ट्रीय समाजाने प्रगती साधली आहे म्हणण्याची परिस्थिती निश्चीत आहे का ? ऐतिहासिक सांस्कृतीक सामाजिक पुरोगामीत्वाच मापच लावायच झाल तर तामीळनाडू महाराष्ट्राला उजवा ठरावयास हवा पण विवाह आणि सामाजिक दुरावा आणि बंधने आणि तामीळनाडूतील काही विभागातील हिंसा हि चिंतनीय बाब आहे. महाराष्ट्रात सामाजिक दुराव्याचे प्रश्न अस्तीत्वातच राहीलेले नाहीत हि भूमीका वास्तव आहे का ? नगरजिल्ह्याचेच (दुसर्‍या खेड्यातील) उदाहरण घ्यावयाचे झाल्यास स्मशानभूमीत अबकड समाजाचे लोक हळक्षज्ञ समाजाची प्रेते आमच्या समाजाच्या स्मशानभूमीत आणू नका म्हणतात म्हणजे मेलेल्या माणसांच्या बातीतही जर आम्ही सामाजिक दुरावा सांधू शकलो नसू तर जिवंत माणसांच्या बाबतीत सामाजिक सर्व दुरावे सांधले गेले आहेत हे दावे आत्मपरिक्षणाने तपासण्याची कोणत्यातरी अंशातून जागा शिल्लक आहे का ?

पाच. अधिक व्यापक स्तरावर विचार केला असता. खरेतर एका यरलव दिवशी प्रेम व्यक्तकेले जाणे हे एक सामाजिक आव्हान म्हणून भारतीय समाजापुढे आल तेव्हा यरलव दिवस 'भारतीय संस्कृतीचा भाग नाही', एवढी भूमिका घेऊन सामाजिक स्थित्यंतराने पुढे येत आसलेल्या काळानुरुप पुढे येणार्‍या मुख्य सामाजिक प्रश्नांची अधिक व्यवस्थित चिकित्सा करून व्यक्तीस्वातंत्र्याच्या आणि सुरक्षेच्या सर्व परिघांचा समतोल साधण्याच्या प्रयास करण्या एवजी, डिनायलीझम वापरून भारतीय समाजाने बगल देण्याचा प्रयत्न केला आहे का ? कि ज्या मुळे बदलत्या काळास आवश्यक व्यक्ती आणि सामाजास आवश्यक संवाद कौशल्य आणि सुरक्षा विषयक आवश्यकतांकडे दुर्लक्षतर झालेले नाही ?

मुक्त विहारि's picture

12 May 2014 - 3:15 pm | मुक्त विहारि

नगर बद्दल इतके पण.....

मुझफ्फर नगर बद्दल कुणीच बोलत नाही.

असो....

कालाय तस्मै नमः

टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला?

बाकी हे प्रकार कोणत्याही जाती-धर्मात चालूच असतात. प्रत्यक्ष घडलेल्या घटना बघून हे प्रकार मराठ्यांमध्ये जास्त'च' असतात हे सांगू शकतो. एका मित्राच्या भावाला दुसर्‍या मुलीशी लग्न करायला बळंच तयार केलेलं अगदी जवळून पाह्यलंय. असं का विचारल्यावर, 'अरे, त्याचं जिच्याशी अफेअर आहे ती मुलगी जयभीमवाली आहे' असं सांगितलेलं पाह्यलंय.

आणि दलितही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. एकाने मराठ्याची लेक आणून तिच्याशी पळून जाऊन लग्न केलं तर त्यांचं अख्खं घर हे सर्वांना कौतुकाने सांगत होतं. मराठ्यांच्या, ब्राह्मणांच्या लेकींना पळवून नेऊन लग्न करणं म्हणजे फार काहीतरी शौर्य केल्या सारखं मानतात आजही हे लोक.

तेवढंच कशाला एका देशस्थाच्या प्रेमविवाहात मुलीचं आडनाव जरा हटके, म्हणजे ब्राह्मणांपै़की वाटणार नाही असं होतं. तो मात्र ती मुलगी कोब्रा असल्याचं सांगत होता. ग्रूपमधल्याच सर्व मुलांच्या आया मग ही देवरुख्यांची असेल का, कर्‍हाड्यांची असेल का? अशा चर्चा करत होत्या. एकीने तर, 'अगं कुणब्याची असेल' अशी कमेंट पास केली होती.

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.
आता मी स्वतः जिथे याबाबतीत आग्रही आहे तिथे दुसर्‍यांनी तसं वागू नये हे सांगण्याचा अधिकार मला नाही.

बॅटमॅन's picture

13 May 2014 - 4:12 pm | बॅटमॅन

टाईमपास वैगरे सिनेमे अशा प्रेमप्रकरणांना भरीस पाडतात वाचून मिपाकरांच्या विचारांचं कवतिक करावं तेवढं कमी वाटलं. टाईमपास बघून प्रेमप्रकरणांना भरीस पडत असतील लोक, तर बालक पालक बघून किती पालकांनी आपल्या वयात आलेल्या मुलांशी हितगुज केलं? फ्यांड्री बघून किती लोकांनी सोवळ्या-ओवळ्याचा नाद सोडला?

हे अतिशय जबरदस्त. मान गये सूडराव!!!!

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2014 - 5:05 pm | प्रसाद गोडबोले

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.

भावाला काय वाट्टेल तो उपदेश कराल राव ... स्वतःच काय ते सांगा *biggrin* हलके घ्या .

स्वतः पण 'येथे पाहिजे जातीचे' वर ठाम आहोत !!

सूड's picture

13 May 2014 - 5:12 pm | सूड

*Conditions Apply राह्यलं. ;)

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2014 - 5:30 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या पुर्ण मताशी सहमत नसलो तरी आपल्या मताचा आदर आहे :)

थेटरात शर्ट काढुन नाचणारी पोर पहायची होती सूड तुम्ही.
अन जे अवघड असत ते करायला कोणी जात नाही, पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत.
अन ज्या वयाच्या मुलांची ही कहाणी आहे त्या वयाच्या मुलांना जरा दम धरा म्हणण्या ऐवजी उलट संदेश पोहोचतो अश्या गल्लाभरु तुफान चालणार्‍या पिक्चर्स नी.
आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या.
गुंडगिरी करत रस्त्याने फिरण हे सुद्धा चित्रपटांचीच देणं आहे.
बाकी तुमच्या विचार करुन वागण्याच कौतुकच आहे. घरात फक्त दोन माणस अन चार भिंती असण वेगळ, अन त्याच घर असण वेगळ हे समजलेलं दिसतय तुम्हाला.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 May 2014 - 12:49 pm | llपुण्याचे पेशवेll

अपर्णाताईंच्या याही प्रतिसादाशी सहमत आहे.

>> पण प्रेम काय हो पडल बाहेर जरा घराच्या की कोपर्‍या कोपर्‍याला होत.

असो. प्रेम होणं इतकं सोपं असतं?

>>आमच्या वेळी "एक दुजे के लिये" आला अन भरारा तरुण जोडप्यांच्या आत्महत्या सुरु झाल्या.
त्या स्वत:ची अक्कल गहाण टाकलेल्यांनी केल्या असतील.

माझ्यापेक्षा चार पावसाळे कदाचित जास्त पाह्यले असाल तुम्ही, पण प्रतिसाद पटला नाही. माझं म्हणणं इतकंच आहे सो कॉल्ड वाईट चित्रपट पाहून जर लोक तसे वागायला प्रवृत्त होत असतील तर चांगलं बघून त्याचासुद्धा परिणाम झाला पाहिजे. तसं होत नसेल तर एखादी गोष्ट, चित्रपट जबाबदार नसून लोकांच्या मनोवृत्ती त्यासाठी जबाबदार आहेत.

सुबोध खरे's picture

14 May 2014 - 7:08 pm | सुबोध खरे

सूड साहेब,
मुले घरी आई बाप म्हणत असलेले श्लोक शिकत नाहीत पण शिव्या मात्र पटकन शिकतात. हे forbidden fruit सारखे असते. म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो.
चित्रपटात सिगारेट ओढणे किंवा दारू पिणे याचे अतिरिक्त दर्शन करू नये असे जगभरातील संशोधन दाखवते आणि त्या गोष्टींच्या जाहिराती आणि उदात्तीकरणाला जगभरातील संशोधकांनी यासाठीच विरोध दर्शविला आहे.
मुळात सिगारेट( किंवा दारूचा ग्लास) हातात धरून "आधुनिक" फार पटकन होता येते. पण आपल्या बायकोला/ आईला/ बहिणीला समान दर्जा देण्यासाठी त्याग करावा लागतो.
modernism is not just smoking/drinking. It is a state of mind
प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.
अवांतर -- बाकी मी कोणताच सिनेमा पाहिलेला नाही त्यामुळे सिनेमात काय दाखविलेले आहे याबद्दल मला सांगता येणार नाही.

>>म्हणून चित्रपटातील वाईट गोष्टी पटकन शिकल्या जातात पण चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यास फार काळ जावा लागतो.

मान्य!! मग दोष चित्रपटांना द्यावा का? हाच माझा प्रश्न होता आणि आहे. वाईट गोष्टी लोक पटकन आत्मसात करत असतील तर तो चित्रपटाचा दोष कसा काय होऊ शकतो.

>>प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.

माझ्या दृष्टीने हा स्वैराचार आहे, प्रेम नव्हे.

भलतंच? अहो सूडपंत आपल्या महान सौन्स्क्रुतीप्रमाने प्रेम ह्योच एक स्वैराचार हाये नै का? शहाणी मुलं असल्या प्रेमाबिमाच्या भानगडीत पडत नैत, हो की नै?

सूड's picture

15 May 2014 - 1:16 am | सूड

हो!! तेही खरंच म्हणा!!

अत्रुप्त आत्मा's picture

15 May 2014 - 9:56 am | अत्रुप्त आत्मा

@सौन्स्क्रुतीप्रमाने>>> *biggrin* आपल्याला सौन्स्क्रुती"गंडा"प्रमाने, असं म्हनायचं हुतं का??? http://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-scared008.gif

सुबोध खरे's picture

15 May 2014 - 10:19 am | सुबोध खरे

आमचा एक मित्र "वास्तू"चा सल्लागार आहे. तो कोरेगाव पार्क च्या एका बंगल्यात गेला होता. तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले.
माझ्या एका नातेवाईकाची मुलगी कॉलेजात शिकते. ती एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. हा मुलगा बारावी नंतर दोन वर्षे ड्रोप घेऊन घरी असतो. त्याचे वडील नाहीत आई आहे आणि त्याचे घर त्याच्या लग्न झालेल्या बहिणी पाठवत असलेल्या पैश्यात चालू आहे. माझ्या नातेवाईकाचे आंतरधर्मीय(प्रेमविवाहच ) लग्न आहे त्यामुळे त्याचा जाती धर्मा बद्दल काही म्हणणे नाही परंतु मुलमध्ये काहीतरी कर्तृत्व असावे एवढेच त्याचे म्हणणे आहे.
माझ्या बायकोला एक वर्ष मागे असलेल्या एका डॉक्टर मुलीने कॉलेज समोर असलेल्या पानवाल्याशी लग्न केले. दोन वर्षाचा संसार आणि एक मुल पदरात आल्यावर ती आता आपला व्यवसाय करीत मुलाला वाढविते आहे.
आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं.
याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच.
अशा अनेक सुरस आणि चमत्कारीक कथा आहेत. शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही.

राजेश घासकडवी's picture

15 May 2014 - 10:44 am | राजेश घासकडवी

आपल्या सख्ख्या मुलीने कोणाशी लग्न नक्की का केलं हे जर माहीत नसेल, आणि तसं होण्यामागे त्या 'वास्तुचा' दोष आहे असं वाटणारा बाप असेल तर त्या मुलीचीच दया वाटते. च्यायला सिनेमामुळे पोरं बिघडतात यापेक्षा ही विचित्र थियरी आहे!

अहो, तुम्ही डॉक्टर असून त्याला समुपदेशकाला भेटण्याचा सल्ला का दिला नाहीत? वास्तुतज्ञाला काय शष्प तरी कळतं का मुली कोणाशी बापाच्या मनाविरुद्ध का लग्न करतात ते?

राजेश घासकडवी's picture

15 May 2014 - 10:52 am | राजेश घासकडवी

सॉरी टाइप केलं आणि नंतर लक्षात आलं की तो बंगलेवाला तुमचा मित्र नव्हता तर वास्तुवाला तुमचा मित्र होता. त्यामुळे तुम्ही सल्ला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा मी तुुम्ही सल्ला देण्याबद्दलचं विधान मागे घेतो. बाकीची विधानं मात्र योग्य आहेत.

>>तेथे राहणाऱ्या मुलीने बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर असलेल्या उत्तर भारतीय फळ विक्रेत्याबरोबर लग्न केले. आणि आजही कितीही विनवण्या करूनही ती मुलगी परत येण्यास तयार नाही. अत्यंत नैरासह्याने त्यांनी माझ्या मित्राला "वास्तुदोष" आहे का हे शोधण्यासाठी बोलावले.>>

आपली लेक कोणाशी लग्न करायला जातेय हे ठाऊक नसेल तर तो वास्तूचा की सिनेमाचा दोष? माझी लेक असती तर तो दोष माझा म्हटलं असतं मी. कारण लेकीने हे सांगण्याइतपतही तिला अवघड जात असेल तर तिचा विश्वास मिळवण्यात मी कुठेतरी कमी पडलो.

>>आमच्या दवाखान्यात काम करणाऱ्या मावशीनी आपल्या मुलीचे १८ व्या वर्षी लग्न उरकले. आम्ही विचारले असे का तर त्या म्हणाल्या साहेब मी येथे कामाला येते घरी मुलगी एकटीच असते. दहावी पास झाल्यावर शिकायचंच नाही म्हणते. आजूबाजूची टवाळ पोरं घरी येऊ लागली. उगाच नसतं लफडं होण्यापेक्षा लग्न केलेलं बरं.
याला आता प्रेम म्हणणार कि स्वैराचार. ते वय वेड असतं त्यात तारतम्य पाहण्याचे भान नसतं. म्हणूनच त्याला autonomic nervous system म्हणतात. आपल्या शेजारी सुंदर मुलगी बसली कि आपल्या छातीत धडधड सुरु होते जी थांबविणे आपल्या हातात नसते. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच.

हे त्या मावशींनी कोणता सिनेमा बघून केलं ते कळलं तर तुमच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल.

>> शेवटी निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही हे खरे. यात जात धर्म किंवा पैसा काही करू शकत नाही.
मग फायनली काय ठरलं, निसर्ग जबाबदार की चित्रपट??

सुबोध खरे's picture

15 May 2014 - 7:27 pm | सुबोध खरे

ते वयच विचित्र असतं. सिनेमाशी संबंध नाही पण सिनेमात पाहून बंगल्यातील मुलीला फळवाल्याशी लग्न करणे हे बरोबर आहे असेच वाटते. असे केल्याने आपली काय वाताहत होईल हा विचार करण्याची प्रगल्भता त्या वयात नसते. तो दिलवाला आहे आणि मला फार सुखात ठेवेल अशी भाबडी अशा त्या मुलीला सिनेमातून मिळाली तर दोष कुणाचा?
कारण सिनेमात "झोपडीमे रहनेवाला उन्ची हवेलीमे रहनेवाली"से प्यार करता है तो दिलवाला वगैरे असतो आणि शेवटी श्रीमंत होऊन सासर्याला धडा शिकवतो. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती फार वेगळी आणि भीषण असते . व्यंकटेश माडगूळकरांच्या एका सत्यकथेत गावचा एक मुसलमान एका मराठ्याच्या मुलीबरोबर मुंबईला पळून येतो. (आपला गाव आणि माणसे सोडून). काही वर्षांनी माडगुळकर त्याच्या घरी जातात तेंव्हा त्याची झालेली परवड त्यांनी यथातथ्य शब्दात लिहिली आहे. शेवती तो माणूस म्हणतो," साहेब, जवानी फार खराब चीज आहे. माणूस बोकडाचा सुद्धा मुका घेतोय. ते काही खरं नाही"
विशीत प्रेम किंवा मृत्यू हि एक सुंदर कविता असते. चाळीशीत ते एक रुक्ष गद्य होऊन जाते

विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघळणारच.
पाशवी आणि दानवी(!) शक्ती कुठे आहेत?

हाडक्या's picture

15 May 2014 - 4:11 pm | हाडक्या

प्रेमाचे म्हणाल तर एखादी मुलगी तयार असेल तर खरोखरच कितीही मुलगे मजा मारायला तयार असतात. त्यामुळे हा प्रतिसाद कोपर्या कोपर्या वर प्रेम होते हा आहे.

या वाक्यावर आक्षेप. इथे मुलं म्हणजे भुकेलेले कुत्रे असल्यासारखे लिहिले आहे.
याचा दूसरा अर्थ असा की 'मुलं कायम तयार असतात' ही अतिशय चुकीची पद्धत झाली विचार करण्याची.

वरून 'मुलगी तयार असेल तर' म्हणजे काय हो ? केली एखाद्या मुलीने दोन चार प्रेम-प्रकरणं, अगदी तुमच्या शब्दातली 'मजा' पण केली तिने.. मग काय बिघडलं इतकं ? त्यतून ती शिकेल बर्‍याच गोष्टी.
यात सर्वात तिच्या महत्त्वाची बाब म्हणजे आयुष्याबद्दल तिला जबाबदारीची जाणीव असणे महत्त्वाचे.

सर, तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून काही सांगू पाहतोय. 'मजा' हा शब्दप्रयोग खटकला..

एस's picture

23 May 2014 - 3:32 pm | एस

वरील प्रतिसादातील प्रत्येक शब्दास अनुमोदन. स्त्री म्हणजे भोगवस्तू आणि पुरुष म्हणजे भोगवादी हे वर्गीकरण डोक्यात तिडीक आणते.

किती शाळकरी निष्कर्ष काढावेत याला सीमा नाही. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

असो, बाकी चालू द्या.

समोरचा काय बोलतओ आहे हे खोलात जाउन समजायला सुद्धा वय असाव लागतं. बर्‍याच गोष्टी अनुभव शिकवतात. त्या अश्या बसल्या बसल्या कधीच येत नाहीत. बघालच आता टवाळ मुलांच्या तथाकथीत प्रेमाच्या गोष्टी समोर यायला लागतील.
चित्रपट हे फार मोठं सामाजीक संवादाच साधन आहे. अन त्यातल्या जमतील त्या गोष्टी घेणं हे ही काही फारस नवं नाही. कपडे बदलले, हेअरस्टाइल बदलल्या, मानसिकता बदलली. अन हे सगळ चित्रपटांनी झटपट साध्य केलं. चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं.

बॅटमॅन's picture

15 May 2014 - 12:06 pm | बॅटमॅन

स्वतःच्या वैयक्तिक अनुभवापलीकडे जाऊन बघायला पण एक मॅच्युरिटी असावी लागते. स्वतःचाच चष्मा योग्य असे म्हणत बसलो तर कितीही अनुभव असला तरी तो शष्प कामाचा नाही.

आणि हो, पिक्चर नसतानाचा समाज काय धुतल्या तांदळासारखा होता अशी गैरसमजूत असेल तर हॅ हॅ हॅ. धन्यवाद चकटफू मनोरंजनाबद्दल.

फक्त एक अवांतर: शष्प शब्दाचा अर्थ 'घंटा' आहे का हो ? ;)

बाकी चालू द्या..

शष्पचा अर्थ खरंच माहीत नाही?

आदूबाळ's picture

15 May 2014 - 4:15 pm | आदूबाळ

It's a universal unit for measurement of small quantities.

हाडक्या's picture

15 May 2014 - 4:16 pm | हाडक्या

हे म्हणजे 'ये पीएस्पीओ नही जानता' सारखं वाटतय..
[अर्थ माहीतीये हो साहेब .. ]

>>चांगले संस्कार व्हायला वेळ जावा लागतो पण हलकं फार लवकर उचलल जातं.

पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!! हलकं लवकर उचललं जातं हा दोष कोणाचा? उचलणार्‍यांचाच ना? दाखवणार्‍यांनी सांगितलंय का आम्ही सांगतो तसं वागा? आपणच ठरवतो ना तसं वागायचं की नाही ते?

मी स्वत: भावाला सांगितलंय, अरेंज्ड मॅरेजचा अट्टाहास नाही. मात्र निवडशील ती सोनारांच्या घराला साजेशी असली पाह्यजे.

उपरोक्त वाक्यावर "पितृसत्ताक रुढींनी लादलेल्या अपेक्षा" च्या समकक्ष आक्षेपांचा अभाव म्हणजे मिपाकडे घनघोर स्त्रीवाद्यांची कमतरता आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2014 - 6:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिसळपाव हा समाजाचा आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही. - मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

अंमळ जुने दिवस आठवले आदिती तै .. :)

काय त्या लढाया, काय ते आवेश, काय त्या पाशवी शक्ती ! बाब्बौ..!! *biggrin*
आता उरलंय फक्त अनाहिता महिला मंडळ आणि कंपुबाजी हो.. ( हव्या त्या स्माईली कल्पा इथे.. )

( बादवे धाग्याची जाहिरात समजावी काय? )

नानासाहेब नेफळे's picture

13 May 2014 - 3:59 pm | नानासाहेब नेफळे

नळी फूंकली सोनारे ....
पुरोगामी महाराष्ट्राचा विजय असो..

आत्मशून्य's picture

13 May 2014 - 4:01 pm | आत्मशून्य

सूड's picture

13 May 2014 - 4:03 pm | सूड

एक्झॅक्टली !! ;)

काय राव नेफळे आण्णा सॉरी नाना!

माणसानं प्रामाणिक असू नये का काय? स्वतःची भूमिका स्वतःला ठरवणं ह्यात काय आला पुरोगामी अथवा प्रतिगामी पणा? दुसर्‍यानं कसं वागावं हे नाही ठरवू शकत पण स्वत:चं मत मांडणं म्हणजे 'नळी फुंकली सोनारे'??????

सूडनं प्रामाणिक मत मांडलंय त्याबद्दल त्याचं अभिनंदन. ह्यामागं 'माझ्या मते' सामाजिक विचार असतो. जिथं दोन पोटजाती मध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात तिथं वेगळ्या जाती अथवा धर्माच्या रुढी, रीतीभाती अगदीच वेगळ्या असतात. नव्या सून/ जावयानं त्या आत्मसात करणं अपेक्षित असतं. घराण्याचं पाठबळ अशा घटनांमधून त्या नव्या व्यक्तीला मिळत असतं.

अगदी 'बघून' आणलेली सून जेव्हा एक गोष्ट चुकते तेव्हा तिच्या घराचा उद्धार बर्‍याच ठिकाणी होतो इथं सगळंच वेगळं असल्यानं सगळ्याचाच उद्धार होणार. ही मानसिकता आहे. सगळ्यांचीच. आधी मानसिकता बदलली जावी, गरज असेल तर. अन्यथा उगाच पुरोगामीत्वाचा आव आणू नये. सरधोपट वाट सोडून बिकट मार्गाला वहिवाट बनवण्याची कुवत सगळ्यांची नसते, गरज देखील नाही.

नानासाहेब नेफळे's picture

13 May 2014 - 4:38 pm | नानासाहेब नेफळे

सॉरी! सॉरी!
नळी शोषली सोनारे..
प्रतिगामी महाराष्ट्राचा विजय असो.

एस's picture

13 May 2014 - 10:13 pm | एस

थोडे प्रश्न, थोडे धक्के, थोड्या वेदना इथेही पोहोचलेल्या, थोडे हुंकार मग तिथेच दडपलेले. थोड्या संतापाला मौनात म्यान केलेले, किंचित ओले बाजूला वळवलेले.
उद्याही असेल मी थोडासा जिवंत
आजही फक्त थोडासाच तर मेलोय!

शैलेन्द्र's picture

15 May 2014 - 12:37 pm | शैलेन्द्र

:)

आजानुकर्ण's picture

14 May 2014 - 7:32 pm | आजानुकर्ण

श्री नमोजी यांस,

पंतप्रधान म्हणून खालील विनंतीवर कार्यवाही करणेचे आदेश आपल्याच अखत्यारीत असलेल्या समाजकल्याण मंत्रालयास देणेचे करावे.

तात्पुरता उपाय म्हणून नगरच्या घटनेस कारणीभूत असलेल्या फँड्री, बालक-पालक, शाळा व टाईमपास या मराठी चित्रपटांवर लागलीच बंदी आणावी. त्याचबरोबर कायमचा उपाय म्हणून अशा स्वरुपाचे सिनेमे रिलीज करण्यास बंदी आणावी. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची बोंबाबोंब होऊ नये म्हणून असे सिनेमे येणार असतीलच तर प्रियकर व प्रेयसी एकाच जातीचे असावेत असा नियम करावा म्हणजे जातीभेद व दलितांवरील अत्याचाराचे निर्मूलन होईल असे वाटते.

सदर निष्कर्ष सखोल चर्चा व काथ्याकुटातून काढण्यात येत आहे.

आपला विश्वासू,
आजानुकर्ण

यापेक्षा सरळ मिपा वाचण्याची शिफारस करावी. गल्लीतल्या दीडदमडीच्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या आर्थिक घडीपर्यंत सर्व गोष्टींचा अक्सीर इलाज मिपावर मिळेल यात सौंशय नाही.

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2014 - 9:09 am | प्रसाद गोडबोले

व्यक्ती द्वेषाचा कहर !

अहो ज्या महाराष्ट्रात घटना घडली त्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहा ना हे पत्र....

पण ते तुम्हाला जमणार नाही , मोदीचा जमेल तसा जमेल तिथुन द्वेष करणे आणि ते कसे "जातीयवादी" "धर्मांध" आहेत हा कोळसा उगाळत बसणे येवढेच तुम्हाला जमते वाटते .

आणि हो , मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत त्यामुळे तुम्ही असले उपरोधिक पत्र खरेच जरी लिहिलेत तरी त्यांना मुळ प्रसंगाचे गांभीर्य कळेल ....

असो . देव तुमचे भले करो .

प्यारे१'s picture

15 May 2014 - 3:48 pm | प्यारे१

>>>>मोदी स्वतः मागासवर्गीय आहेत

इतर इतर.... ऑदर बी सी ;)

आजानुकर्ण's picture

15 May 2014 - 6:31 pm | आजानुकर्ण

गिरीजाशेठ,

अहो, नमोजी असे लिहिले आहे! 'जी' हा बहुवचनी आदरार्थी प्रत्यय आहे.
व्यक्तीद्वेषाचा आरोप टाळण्यासाठी आता गोब्राम्हणगुजरातीप्रतिपालक, अविवाहिततरुणीपाळतकारक, मोदीकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज नरेंंद्रमहाराजसाहेब म्हणायचे की काय?

नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2014 - 7:20 pm | प्रसाद गोडबोले

नमोजींना जमणार नसेल तर पृथ्वीराजसाहेबांना सांगू. नमोजी कार्यकुशल असल्याचा प्रवाद असल्याने झटकन काम व्हावे म्हणून त्यांना सांगितले इतकेच.

अता कसं जरातरी सकारात्मक बोललात :)

पृथ्वीराज साहेबांना खरचं पत्र लिहा . त्याचा फोटो इथे शेयर करा . त्यांचे उत्तर आले तर तेही शेयर करा ... आणि उत्तर नाही आले तर मी स्वतः मोदीजींना पत्र लिहिन ... तेही तुमच्या पत्राची अटॅचमेन्ट लावुन :)

शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही :)
(फक्त पृथ्वीराजांच्या हातुन जर काही कारवाई झाली तर महाराष्ट्राचे प्रश्ण महाराष्ट्राला सोडवता येतात , सारखी दिल्लीची चरणधुळ घावी लागत नाही येवढेच काय ते समाधान मिळेल !)

आजानुकर्ण's picture

15 May 2014 - 7:46 pm | आजानुकर्ण

शेवटी कसं आहे की कोणत्याही सुसंस्कृत समाजात ही घटना नीचच आहे , अशा प्रवृत्तींचा नायनाट व्हायलाच हवा मग तो पृथ्वीरांजांच्या हातुन झाला की मोदींच्या ह्याच्याशी आम्हाला घेणे देणे नाही कारण आम्ही अश्या गंभीर विषयात राजकारण घुसडत नाही

हो पण पृथ्वीराजजींऐवजी नमोदीजींना पत्र लिहिले तरी तुम्हाला राग आला आणि व्यक्तिद्वेषाचा आरोप तुम्ही केला. राजकारण घुसडायचे नव्हते तर पृथ्वीराजजींचा विषयही काढायचे कारण नव्हते. कोणाच्याही हातून नायनाट झाला तर नमोदीजींच्या हातून झाला तर काय हरकत आहे? पृथ्वीराजजींच्या हातून फाईल पुढे सरकत नाही असे म्हणतात आणि नमोदीजी कार्यकुशल असल्याची वावडी आहे मग दोन वेळा पत्र पाठवून प्रोसीजरमध्ये वेळ घालवायचा की प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे?

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2014 - 8:00 pm | प्रसाद गोडबोले

१.अहो घटना महाराष्ट्रात घडली आहे ,सो आधी महाराष्ट्रातच त्यावरचे उत्तर शोधुन काढले पाहिजे .
२. तुम्ही नमो चे नाव घेवुन राजकारण घुसडलेत , त्या आधीच्या कोणत्याही प्रतिसादात कोणीही कोणत्याही राजकीय नेत्यावर ह्या घटनेचे खापर फोडल्याचे मलातरी दिसलेले नाही . त्यातही तुमचा प्रतिसाद सकारात्मक नाही , उपरोधिकच आहे हे कोणही सांगेल. "मोदी कार्यकुशल आहेत ते नक्कीच हा विषय योग्य रितीने हाताळु शकतील" असा प्रतिसाद असता तर हा इतका काथ्याकुट झालाच नसता
३.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या पृथ्वीराज आहेत (भले मग निवडुन आलेले नसले तरीही ) आणि मुख्यमंत्री ह्या नात्याने माणुसकीला काळीमा पुसणार्‍या ह्या घटनेचे जबाबदारी सर्वप्रथम त्यांच्यावर येत ...येतेच !
४. मोदींकडुन प्रश्न सुटला तर आनंदच आहे हो ...पण सारखं काय दिल्ली कडे पळायचे ...महाराष्ट्र राज्य आहे , केन्द्रशासित प्रदेश नव्हे.
५.आता कोणताही गुन्हा घडल्यावर स्थानिक कोर्ट > जिल्हा न्यायालय > उच्च न्यायालय > सर्वोच्च न्यायालय असाच खटल्याचा प्रवास होतो ... आणि तो तसाच योग्य आहे . प्रोसीजर मधे वेळ गेला तरी तो योग्यच आहे .
६. केवळ प्रश्न दिल्लीकडे घेवुन जाणे म्हणजे प्रामाणिक प्रयत्न नव्हे.... आधी तो स्थानिक पातळीवर सोडवायचा प्रयत्न तरी करा .

बाकी पत्र लिहुन झाले की मिपावर एकदा ड्राफ्ट दाखवा , सुजाण मिपाकर आनंदाने सुधारणा सुचवतील .... आणि तुम्ही पत्र पाठवले नाहीत तर निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल :)

प्रसाद१९७१'s picture

15 May 2014 - 8:02 pm | प्रसाद१९७१

फक्त उद्याचा एक दिवस आहे गिरीजा काकू, नंतर आवाज बंद च होणार आहे त्यांचा. तुम्ही कशाला डोक्याला ताप करुन घेता?

आजानुकर्ण's picture

15 May 2014 - 8:10 pm | आजानुकर्ण

नंतर आवाज बंद च होणार आहे त्यांचा

आमचा आवाज कोण बंद करणार आहे म्हणे?

आजानुकर्ण's picture

15 May 2014 - 8:10 pm | आजानुकर्ण

१. महाराष्ट्र भारतात आहे. संपूर्ण भारतासाठी उत्तर शोधले तर महाराष्ट्रासकट इतर राज्यांमधील जातीभेदावरही उपाययोजना होईल की नाही?
२. नमोंचे नाव घेतल्याने लगेच राजकारण कसे काय झाले बॉ? नमोंवर खापर वगैरे तर काहीच्या काहीच आरोप आहेत. नमो दलितांप्रती अन्यायकारक असल्याचे मी कुठे लिहिले आहे बॉ?
३. पृथ्वीराजजींवर जबाबदारी येतेच पण कामे करण्यात ते संथ आहेत की नाहीत?
४. मोदींकडून प्रश्‍न सुटल्याने आनंदच असणार आहे तर मग मोदींनी प्रश्‍न सोडवायला काय हरकत आहे? की मुळात प्रश्‍न सोडवायचाच नाहीये?
५. सदर गुन्हा प्रोसीजर पाळत बसण्याइतका सामान्य आहे का? निर्भया खटल्यात स्पेशल कोर्टाची स्थापना करुन झपाट्याने न्यायनिवाडा झाला होता. शिवाय न्यायालयात गेल्यास चित्रपटांसंबंधी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि मानवाधिकार वगैरे नसती झेंगटे उपस्थित होतील.
६. या प्रश्‍नाच्या मुळाशी असलेल्या चित्रपटांवर बंदी आणण्याचे काम स्थानिक पातळीवर कसे काय होईल? चित्रपटांवर बंदी आणायची आहे की स्थानिक थेटरांवर?

पत्र आधीच लिहिले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गंगामैयाची माफी ते पंतप्रधानांना विनंती ही सर्व कामे आंतरजालावरच होतात.

निव्वळ काड्यासारायला मोदींच्या नावाने प्रतिसाद दिला होतात असे खेदाने म्हणावे लागेल

तुम्हाला काय वाटते व म्हणायचे आहे यावर माझे नियंत्रण नाही.

प्रसाद गोडबोले's picture

15 May 2014 - 9:13 pm | प्रसाद गोडबोले

बरं

इरसाल's picture

27 May 2014 - 4:12 pm | इरसाल

आजकल फायरफॉक्स चालत नाय ;) !

२२ तारखेला घडलेल्या आणखिन एका घटनेनंतर हा धागा आठवला. :-(