बाळकांदे म्हणजे shallots.
साहित्य
- बाळकांदे
- २ लिंबांचा रस
- लोणचे मसाला
- फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि मेथीदाणे
कृती
बाळकांदे सोलून घ्या. हे त्रासदायक प्रकरण आहे. वर दाखवलेला आख्खा गुच्छ सोलायला जवळजवळ दोन तास लागले.
लिंबाच्या रसात सोललेले कांदे, मीठ आणि लोणचे मसाला घाला. एखादी वाटी किंवा masher घेऊन या मिश्रणात कांदे ठेचून घ्या, म्हणजे कांद्याचा रस, लोणचे मसाला आणि लिंबाचा रस एकजीव होईल. कांद्याचे पापुद्रे थोडे मोकळे होतील आणि कांदे छान marinate होतील.
साधारण दोन तास हे मिश्रण विश्रांतीअवस्थेत ;) ठेवल्यावर आता फोडणी घाला. मिसळून घ्या. लोणचं तय्यार!!
सुगरण्याचा सल्ला #१- लोणच्यांवर फोडणी गार करून घालावी म्हणजे ज्यावर घातली आहे ते जळत नाही.
सुगरण्याचा सल्ला #२ - हे लोणचं वास घेताक्षणी नाकात आणि डोक्यात झिणझिण्या उत्पन्न करतं. या हिशोबाने फेसलेली मोहरी या लोणच्यात मस्त लागेल. (पण मला मोहरी फेसता येत नसल्याने हे करू शकलो नाही…)
(टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत ;) )
प्रतिक्रिया
5 May 2014 - 3:58 pm | पैसा
मस्त पाकृ! तळटीपा पण भारी आहेत.
मोहरी फेसायची सोप्पी आयड्या. घरात मिक्सर आहे ना? जरासं पाणी घालून मोहरी घुसळून घ्या. मिक्सरचं भांडं उघडताना मात्र सावध. नाहीतर पहिला फटका तुम्हालाच बसेल!
5 May 2014 - 4:48 pm | सूड
>>टीपः फोटो काढताना नखं कापलेली आहेत
फोटो काढताना ठीकै, रेशिपी करताना कापलेली होतीत का? आणि रच्याकने, फोटो दिसत नाहीयेत.
5 May 2014 - 4:49 pm | स्पंदना
टिप :- फोटो काढताना नख काढली असली तरी वॅक्सिंग केलं नाही आहे. *pardon*
5 May 2014 - 5:20 pm | दिपक.कुवेत
कांदे, लोणच्याच्या मसाला, पाकृ सोडुन अपर्णे तुला तेवढं वॅक्सिंग केलं नाही हेच बरं दिसलं.
5 May 2014 - 4:50 pm | स्पंदना
असं असतयं होय शेलॉटच लोणच? करुन पहाते. तसे ही कांदे उन्हाळ्यात प्रकृतीला चांगलेच ना?
5 May 2014 - 5:25 pm | दिपक.कुवेत
नाकानी सोलले असतेस तर?? (हलके घे हो आदुबाळा). वेल आता पाकृ बद्दल. सोपी, छान आणि सुटसुटित. ईकडे मद्रासी कांदे मीळतात ते बघुन केल्या जाईल. पण लोणच्याचा मसाला घरी नाहिये (आता झाला का लोच्या). ईथे मिळणहि दुरापास्त सबब त्याला पर्याय असेल तर सांग.
5 May 2014 - 5:37 pm | पैसा
सर्वप्रथम गुगल सर्चवर 'लोणच्याचा मसाला' असं सर्च करा. त्यापैकी जी मानवेल ती रेशिपी वाचून काढा. त्यात दिलेल्याप्रमाणे लागेल तेवढा मसाला तयार करा. हाकानाका!
5 May 2014 - 5:50 pm | दिपक.कुवेत
चला आता गुगलवर 'लोणच्याचा मसाला' शोधणे आले.
5 May 2014 - 5:31 pm | दिपक.कुवेत
आदुबाळ + बाळकांदे....कित्ति गोड योगायोग (हे हि ह घे अ आ क)
5 May 2014 - 5:46 pm | मदनबाण
अरे वा... बेबी ओनियन पिकल ची आयड्या आवडली. :)
5 May 2014 - 6:46 pm | पिंगू
बाळकांद्यांचे लोणचे करुन बघायला पाहिजे..
5 May 2014 - 6:49 pm | कवितानागेश
छान आहे लोणचं.
मिपा विश्रांती अवस्थेत गेल्यानी आदूबाळला नखे कापायला आणि लोणची घालायला वेळ मिळाला असावा असं दिसतंय.
5 May 2014 - 7:43 pm | अत्रुप्त आत्मा
आदुबाळ लोन्चीवाले!!!
झिंदाबाद...झिंदाबाद...झिंदाबाद...!
5 May 2014 - 8:00 pm | प्यारे१
आदूबाळकांद्यांचं लोणचं आवडलं.
5 May 2014 - 8:57 pm | सानिकास्वप्निल
मस्तं दिसतयं लोणचं :) करुन बघायला हवे.
किती दिवस टिकतं ओ?
5 May 2014 - 10:08 pm | आतिवास
नवीनच ऐकलं; वाचलं आणि पाहिलं - आता खायचं बाकी आहे :-)
5 May 2014 - 10:15 pm | सस्नेह
बाळकांदे हा प्रकार प्रथमच ऐकला. पातीचे कांदे चालतात का ?
अन या लोणच्याला कच्च्या कांद्याचा वास नाही का येत ?
किती दिवस टिकते ?
6 May 2014 - 3:23 pm | मुक्त विहारि
पण आज काल कुणाला "बाळकांदे" समजत नाहीत....
"मद्रासी कांदे" असे विचारा,,,,आमच्या गल्फ मध्ये ह्यांना "मद्रासी कांदे" असेच म्हणतात.
6 May 2014 - 3:56 pm | आदूबाळ
"मद्राशी राम कोनाला कलणार नाही. त्याला कवडीबुवाचा राम म्हणतात!" याची आठवण झाली...
6 May 2014 - 7:07 pm | मुक्त विहारि
"वो छोटा कांदा हय काय?" असे विचारले तर तो टपरी वाला बघत पण नाही.
पण, "वो मद्रासी कांदा हय काय?" असे विचारले तर लगेच उत्तर देतात.
6 May 2014 - 11:15 pm | सखी
दक्षिण भारतात हे अख्खे कांदे (सोलुन) सांबारमध्येही घालतात, फार छान चव येते.
पाकृ चवदार असावी, सुगरण्याचा सल्लेही आवडले.
7 May 2014 - 8:26 am | यशोधरा
डोंबोली आज दु:खाने धाय धाय रडली असेल हो! :D
दलबदलू डोंबोलीकर! :P
7 May 2014 - 3:16 pm | बॅटमॅन
हा हा हा ;)
6 May 2014 - 10:00 am | मितान
लोणचं आवडलं.
माझी सिंधी मैत्रिण यात विनिगर घालते. ते बरेच दिवस टिकते. यात लिंबू आहे. जास्त दिवस टिकेल ना ?
6 May 2014 - 3:24 pm | मुक्त विहारि
धन्यवाद
7 May 2014 - 3:04 pm | आदूबाळ
सर्वांना धन्यवाद!
मिपावरच्या दिग्गज सुग्रणींनी आणि बल्लवांनी माझं कौतुक करणं म्हणजे सचिन तेंडुलकरने स्वप्नील अस्नोडकरला "बरा कवर ड्राईव मारतोस रे" असं म्हणण्यासारखं आहे.
व्याक्सिंगचा सल्ला मनावर घेतल्या जाईल. ;)
7 May 2014 - 6:30 pm | अनन्न्या
नाहीतर लगेच प्रयोग करून पाहिला असता!
17 May 2014 - 9:11 pm | इरसाल
सध्या बाळकराम नामक आयडीने दिलेले प्रतिसाद पाहता मला वाटले उसकाइच लोणचा बनाया हे!
अवांतरः लगेहात कांद्यांचेहे