नाचणीचे लाडू

चिन्मयी भान्गे's picture
चिन्मयी भान्गे in पाककृती
30 Apr 2014 - 1:59 pm

नाचणीचे पीठ - २ वाट्या
पीठी साखर - १ वाटी
तूप - ३/४ वाटी

कृती: कढईत ३/४ वाटी तूप घालून, नाचणीचे पीठ भाजून घ्या. नाचणीचे पीठ दिसण्यास लालसर असल्यामुळे, भाजल्यानंतर पिठाचा रंग फारसा बदललेला कळत नाही, पण खमंग वास नक्कीच कळतो.
भाजलेल्या पिठात, (पीठ) गरम असतानाच, पीठी साखर घालावी व मिश्रण नीट एकजीव करवे.
हाताला थोडेसे तूप लावून, लगेच लाडू करावेत.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

30 Apr 2014 - 2:57 pm | मुक्त विहारि

पण लाडवाचा फोटू कुठे आहे?

असो,

लाडू अप्रतिम झाल्यामुळे, एक पण लाडू, फोटो काढण्यापुरता पण शिल्लक राहिला नसावा.

प्रकाश घाटपांडे's picture

30 Apr 2014 - 3:57 pm | प्रकाश घाटपांडे

मला आवडतात. माझी बायको छान करते.

भाते's picture

30 Apr 2014 - 8:13 pm | भाते

थंडीतला आवडता पदार्थ.

स्पंदना's picture

1 May 2014 - 7:31 am | स्पंदना

थंडीसाठी का? मग मी बनवते.

शुचि's picture

1 May 2014 - 6:47 pm | शुचि

फोटो???

निवेदिता-ताई's picture

1 May 2014 - 6:50 pm | निवेदिता-ताई

सुंदर

सोप्पे आणि छान .थंडीसाठी योग्य कारण नाचणीचे पीठ उष्णता निर्माण करते .इतरवेळी छोटे लाडू करून खावेत .आम्ही जास्तीकरून तांदुळाच्या पिठाचे करतो आणि प्रवासात नेतो .पुढे मग लवकर उठून निघायचे असते त्यावेळी हॉटेलच्या नाश्त्यासाठी थांबावे लागत नाही याचा उपयोग होतो आणि असिडटी होत नाही .

स्पंदना's picture

2 May 2014 - 6:35 am | स्पंदना

मी राईस कुकर (इलेक्ट्रिक) बरोबर ठेवते. अन घरातुन कायम उपम्याचे तयार साहित्य बरोबर नेते. म्हणजे रवा भाजुन राई जीरं, कडीपत्ता कांदा मिरची हिंग मिठ अन साखर सगळ घालुन व्यवस्थीत परतुन पण पाणी न घालता. जेथे असेन तेथे राईस कुकर कनेक्ट करायचा मोजुन हे मिश्रण घालायच जरा गर्म झाल की दुप्पट पाणी. सगळ्यांच आवरे पर्यंत अगदी निवांत उपमा तयार. अन वर पोटभरीचा. मी खिसलेले सुकं खोबर पण मिसळते यात. अन फोडणीत कोथींबीर पण घालते. दोन तिन दिवस तरी निवांत टिकत माझ्याकडे.

हे जरा विस्कटुन सांगाल का कसे करतात ते? जिर, कढीपत्ता, कांदा तेलात फोडणीत घालुन परतात कि नुसते तसेच? कांदा घातल्यावर प्रवासात कस्कायं टिकतं?

इरसाल's picture

2 May 2014 - 9:40 am | इरसाल

फोटो नाय म्हंजे धाग फावुल .

हा उपमा मी ट्रेकिंगला नेतो ,aparna akshay .

अनिता ठाकूर's picture

30 May 2014 - 1:01 pm | अनिता ठाकूर

अपर्णा अक्षय, रवा फोडणीत घालायचा ना? राईस कूकरमध्ये रवा गरम केल्यानंतर वरून आधणाचे पाणी घालायचे ना? तसे असेल तर त्याची सोय कशी करायची? राईसकूकरमधील जाळी काढून ठेवावी लागेल ना? ती काढून ठेवली तर चालते का?