डिस्क्लेमर-
मूळ धाग्याच्या लेखिका शुचिताई यांचे बद्दल पूर्ण आदर असून त्या धाग्याची थट्टा / विडंबन करण्याचा अजिबात हेतु नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो .
तर माझ्या बायको-पोलर डिसॉर्डर ची कथा एकुणात अशी आहे -
वयाच्या २० व्या वर्षी आम्ही सर्वप्रथम प्रेमात पडलो. इतरांप्रमाणेच आम्हालाही ती इन्द्राची परी वगैरे वाटू लागली. मग तिच्या भावाकडून "प्रसाद" खाल्ला तरीही काही ती मनातून जाईना !मग आम्हाला मनोवैद्यकाकडे धाडण्यात आले. त्याची औषधे घेवुन जरा सुस्थितीत आलो तर पुन्हा एका चंचलेशी नेत्रपल्लवी सुरू झाली! असे करता करता ३-४ नवयौवनाना विचारुन झाले तरी डाळ शिजेना ,म्हणून मग कन्टाळून हिमालयाचा रस्ता धरला!
तेथे हिमालयात बाबा योगीनाथ यांच्या दर्शनाचा योग आला, मग त्यानी ४/६ महिने तिथेच आश्रमात ठेवून घेतले. त्यावेळी त्यानी जो उपदेश केला तो अजून स्पष्ट लक्षात आहे...
बालका... मनुष्यजातीत दोन भेद आहेत . स्त्री व पुरुष. आपल्या पूर्वजानी २१व्या शतकाचे भविष्य आधीच लिहून ठेवले आहे ... जेव्हा चित्रे बोलू लागतील , पुरुष स्त्रियाप्रमाणे व स्त्रिया पुरुषाप्रमाणे केस वाढवतील व कपडे घालतील , आणि भ्रष्टाचार्/अनाचार्/अनैतिकता वाढेल तेव्हा समजावे की हा धर्म-ग्लानीचा काळ आहे. पुरुष स्त्रीचा गुलाम होइल आणि आपली बुद्धी ,स्वातन्त्र्य आणि शूर-वीरता गमावून बसेल . यास्तव सावधान वत्सा, हा काळ खरेच कठीण आहे!
आता या घटनेला वीसेक वर्षे उलटली . पण अजुनही माझ्या मनात विचार येतो, खरेच स्त्रियाण्चे सौन्दर्य आणि मोह अशा तत्सम गोष्टीपायी पुरुष जमात आपले भव्यदिव्य बुद्धिवैभव विसरून गेली आहे का? अन्य शब्दात , पूर्वीच्या लोकांपेक्षा हल्लीचे लोक स्त्रीच्या अधिक आहारी जात आहेत का ? मनुष्याची बुद्धी ही जर तो एकटा किंवा स्वतन्त्र राहिला ,तर अधिक तल्लखपणे काम करते का?की प्रेम /लग्न /संसार यातील तडजोडी यामुळे त्याची एकूण कार्यक्षमता किंवा बुद्धीक्षमता यामध्ये कुठेतरी तडजोड होते आहे का? पुरुष स्त्रीचा गुलाम झाला आहे का?
समस्त पाशवी शक्तींची या धाग्यावर कडक नजर असणार हे ग्रुहीत धरलेच आहे , पण यात कुठेही स्त्रियांचा अपमान करण्याचा उद्देश नसून एका निराळ्या अँगलने आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न आहे, एवढेच !
प्रतिक्रिया
30 Apr 2014 - 12:57 am | शुचि
नो प्रॉब्लेम!!
30 Apr 2014 - 9:31 am | आत्मशून्य
एक तर दोन धाग्यांचा दुरुनहि संबंध नाही. ट्यार्पि पाई तुम्हाला उगाच गोवलय. पुन्हा जिलबी अशी तेल न तापवता भट्टी न जमवलेली. फसवणुक आहे तुमच नाव यात घुसड्ने. आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला तर ना हे तुमचे यजमान आहेत ना हां धागा स्पष्टपणे बायोकोच्या केंद्रीत कसली ऑर्डर दाखवतो :(
30 Apr 2014 - 11:40 am | ब़जरबट्टू
आधी वाटलं माझ्या बायकोची डिसोर्डर नामक हां आपल्या यज्मानांनी टाकला म्हणून घाइन्ने उघडला
अगदी हाच ईच्चार करुन येथी आल्तो... पण कसल काय.... बेचव जिल्लब्बी... :(
30 Apr 2014 - 1:05 am | यसवायजी
जम्या नही.
30 Apr 2014 - 2:14 am | सूड
बात कुछ हज़म नही हुयी !!
30 Apr 2014 - 8:45 am | अत्रुप्त आत्मा
आज सूडशी सहमत... ;)
मेडन ओव्हर पडलीय राव! विकेट बी नाय,,,रन बी नाय!
30 Apr 2014 - 3:40 am | Rahul Bhuskute
निराळा विचार आहे !सविस्तर प्रतिसाद मागाहून देतो
30 Apr 2014 - 4:17 am | राजेश घासकडवी
अहो पुरुष स्त्रीचा गुलाम नव्हता कधी? रामाचंच उदाहरण बघा. सीतेने हट्ट केला की मला तो कांचनमृग पायजे म्हणजे पायजेच. मग त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला तरी गेलाच ना? मग रावणाने तिला पळवून नेल्यावर तिच्याचसाठी युद्ध लढला ना? पुरुष हे शतकानुशतकं स्त्रीचे गुलाम राहिलेले आहेत. सर्व सत्ता स्त्रियांच्याच हातात राहिलेली आहे. आणि त्यामुळे स्त्रीमुक्ती वगैरे करण्यापेक्षा पुरुषमुक्तीच करण्याची गरज आहे.
मिपावरती पुरुष विभाग - झालाच पाहिजे. झालाच पाहिजे....
(बाकी शीर्षकावरून हे खरंच विडंबन असेल असं वाटलं होतं. पण जम्या नै हेच खरं - सूड आणि यसवायजींशी सहमत)
30 Apr 2014 - 1:18 pm | बॅटमॅन
ही संस्कृती बायकांनी बायकांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे असे कुणीसे म्हटले आहे ते उगीच नाही!!
बाकी यसवायजी अन सूड व गुर्जी यांचेशी सहमत.
2 May 2014 - 11:10 am | Pain
अतिशय सहमत
30 Apr 2014 - 4:49 am | आत्मशून्य
ती मज्या नॉय.
30 Apr 2014 - 5:43 am | कंजूस
उर्मि आल्याशिवाय लिहु नका ,तेल तापल्याबिगर जिलब्या पाडू नका .
30 Apr 2014 - 6:17 am | शुचि
हाहाहा =))
30 Apr 2014 - 10:23 am | इरसाल
लाडाक्या लेकीला लाडासारीखं काम सांगा
पूजेला पानी मागा
हे तर पैसा यांनी करायचं ना, कारण त्यांच्या सुनबैंच नाव पुजा का कायस होत.
30 Apr 2014 - 8:51 am | अत्रुप्त आत्मा
अजून र्हायलं... पिठात..पाणी अंदाजानी घाला...तांब्याचं होल मापात असू द्या. =)) आनी तळताना लक्ष...पाकाच्या पिपात असू द्या! =))
30 Apr 2014 - 9:55 am | टवाळ कार्टा
=))
30 Apr 2014 - 10:01 am | पगला गजोधर
'मुंज-संस्कार की वैचारिक दिवाळखोरी?', लेख लिहिला ना आपण ? आता घ्या भोगा ! त्याचा राग, तुमच्या ह्या व पुढील लेखांवरच्या प्रतिक्रियेमागच्या भावनेत, बहुतेक दिसेल आता, काहीजनाकडून.
30 Apr 2014 - 10:06 am | टवाळ कार्टा
"पगला गजोधर"
ड्वैडी?? ;)
30 Apr 2014 - 10:39 am | मृत्युन्जय
नाही जमले. आणि कितीही डिस्क्लोजर्स टाकले असतील तरीही विडंबनासाठी चुकीचा धागा निवडला असे म्हणावेसे वाटते आहे. याबाबतीत थोडे तारतम्य दाखवले असते तर बरे झाले असते.
30 Apr 2014 - 11:27 am | पिंगू
जिलबी कच्ची आणि कडू पडली आहे..
30 Apr 2014 - 12:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छ्या, मला वाटलं खरंच वहिनींना असा काही आजार आहे आणि तुम्ही काय काय उपाय केले आणि आयुष्य वगैरे कसं बदलून गेलं वगैरे असं काही असेल या अपेक्षेने धागा उघडला होता. :(
छ्या, च्यायला जमलं नाही.
मनकी बाते. : प्राडॉ. या गंभीर विषयावर आलेलं निरर्थक विडंबन आलं तसं डब्बल ब्यारलनं उडवलं असतं तरी चाललं असतं का रे....!
-दिलीप बिरुटे
30 Apr 2014 - 12:44 pm | कंजूस
काहितरी लोचा ट्विस्ट असेल या आशेने हितचिंतक आलेले आणि निराश झाले .
30 Apr 2014 - 5:09 pm | रेवती
काय हे? आधीच्या धाग्याची शंभरी पार करून दिली तरी तुम्हाला प्रतिसादांचा मोह पडलाय? अजून जरा बरा विषय तरी निवडायचात! अगदी काही नाही तरी पुणे विरुद्ध कोणतेतरी गाव, लग्नसंस्था स्त्रीयांमुळेच मोडकळीस, जातीयवाद, मोदी आणि गांधी (वेगळ्या काळातले असले म्हणून काय झालं?), मांसाहार श्रेष्ठ की शाकाहार?, पुरुषांची कुचंबणा टाईप विषय म्हणतीये मी! ;) हा धागा म्हणजे मऊ जिलबी खावी की धम्मकलाडू? असा झालाय. स्वारी हां.
30 Apr 2014 - 7:32 pm | रमेश भिडे
जिलबी फसली का ?
असो असो
तुम्हाला काहितरी नवीन सांगायचय , पण ते योग्य शब्दात व्यक्त झाले नाही, इतकेच म्हणेन!
30 Apr 2014 - 8:05 pm | भाते
मुळात धाग्याचे शीर्षकच चुकीचे आहे. शुचिताईंनी गंभीर विषयावर इतका छान धागा काढला असताना त्याचे शिर्षक वापरून विडंबन करायची अवदसा कुठून आठवली तुम्हाला? विडंबनासाठी शेकडो धागे पडलेले असताना हाच धागा मिळाला का तुम्हाला?
कंजूसकाका आणि गुरुजींशी सहमत.