हा प्रकार आमच्या घरी नेहमी होतो ..तसा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करतात .आमच्या घरी जास्त तिखट सहन होत नसल्याने आम्ही या पद्धतीने करतो ..यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल.
साहित्य :कमी तिखट हिरव्या मिरच्या ९-१०,लसुन पाकळ्या ८-९, एक टोमाटो,३ चमचे तेल,मीठ चवीप्रमाणे .
कृती :सर्व प्रथम मिरच्या धुवून कापून त्यांचे काप करावेत..
एका कढाई मध्ये अर्धा चमचा तेल टाकून त्या मिरच्या परताव्यात .
मिरच्या चांगल्या भाजल्या गेल्या कि एका मिक्सर च्या भांड्यात किवा (खलबत्ता असल्यास त्यात)मिरच्या लसुन आणि मीठ घालून थोडे सरबरीत बारीक करावे
आता कढाई मध्ये तेल टाकून त्यात तयार ठेचा टाकावा
तो नीट परतावा .
साधारण फोटोप्रमाणे रंग आल्यावर(म्हणजे मिरच्या shijalyavar ) त्यात टोमाटो बारीक कापून टाकावे आणि परतावे . टोमाटो शिजत आल्यावर थोडा त्यातच smash करावा ..
बाजूने तेल सुटायला लागले कि ठेचा तयार ..
हा ठेचा भाकरी बरोबर अप्रतिम लागतो ..माझ्याकडे भाकरीचे पीठ संपल्याने मी मात्र गरम गरम वरण भातासोबत खाल्ला ...+)
प्रतिक्रिया
29 Apr 2014 - 8:27 pm | पैसा
जरा वेगळा प्रकार आहे. आमच्याकडे ठेचा म्हणजे हिरव्या मिरच्या आणि मीठ अक्षरशः ठेचून भरड करतात. टोमॅटोमुळेही तिखटपणा कमी होईल.
29 Apr 2014 - 10:05 pm | सानिकास्वप्निल
मिरच्या, लसूण व मीठ ठेचून करतात. ही पाकृ टोमॅटोमुळे वेगळे वाटतेय.
30 Apr 2014 - 11:24 am | दिपक.कुवेत
येस्स...ठेचा म्हटलं कि कसं ठेचलेलाच हवा तरच मजा. एकदा फोडणीत मीरच्या घातल्या कि त्याला भाजी अथवा आमटिचा फिल येतो!
29 Apr 2014 - 8:52 pm | रेवती
छान दिसतोय. मी एकदा खाल्ला होता पण थोडा वेगळ्या पद्धतीने केला असावा. त्यात शेंगदाणे किंवा कूट होते असे आठवतेय.
29 Apr 2014 - 8:55 pm | मधुरा देशपांडे
टोमॅटो घालून कधी केला नाहीये. मस्त दिसतोय.
29 Apr 2014 - 8:57 pm | किसन शिंदे
आम्ही ठेचा करताना त्यात दाण्याचा कुट (हा फार बारीक नाही करत) वापरतो. त्यामुळे लै भारी चव लागते. :)
29 Apr 2014 - 9:25 pm | शुचि
अहाहा करुन पाहणारच.
29 Apr 2014 - 9:41 pm | सखी
थोड्याश्या भरड दाण्याच्या कुटाने ठेचा अगदी छान मिळुन येतो. परवा माझ्या साबांनी असाच टोमॅटो घालुन केला होता तोही छान झाला होता, त्या म्हणाल्या त्यांची बंगाली मैत्रिण असा करायची.
अव्देय फोटो बघुन लगेच ज्वारीची भाकरी घेऊन ताट घ्यावं असं वाटतयं.
30 Apr 2014 - 2:46 pm | ज्ञानोबाचे पैजार
ये साबां साबां क्या है
ये साबां साबां?
30 Apr 2014 - 3:05 pm | किसन शिंदे
चेपूवर एका मयतरनीला या शब्दाचा अर्थ विचारला तर तीने मला वेड्यात काढलं. :) हे मराठीतले नवे शॉर्टकट आहेत. ;)
सांबा = सासूबाई
साबू = सासरेबूवा
हे ज्ञानामृत तिच्याकडून मिळालं. :D
30 Apr 2014 - 3:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
असे आहे होय....
आम्हाला आता पर्यंत हे माहित होते

आणि हे

माहित होते,
लवकर मोठ व्हायला पाहिजे आहे खर....
1 May 2014 - 9:38 am | यशोधरा
पयल्या चित्रात सांबा हाय, साबां नाय. की तुम्ही साबां म्हंजी सांबा अशे म्हंताय?
दुसरे चित्र दिसत नाय.
1 May 2014 - 5:09 pm | आदूबाळ
अवांतराबद्दल क्षमस्व
पैजारबुवा
चाचा चौधरी कॉमिक्स ऑनलाईन मिळतात का?
29 Apr 2014 - 8:59 pm | वन्दना सपकाल
नविन आहे. खुप दिवस झाल ठेचा बनययचि इछा आहे.
29 Apr 2014 - 9:45 pm | पिंगू
ठेचा करताना हिरव्या मिरच्या हात सोडून वापरल्या आहेत.. तेव्हा तुम्ही वर दिलेली पाककृती त्यामानाने बरीच सोज्वळ आहे.
30 Apr 2014 - 11:47 am | सुहास झेले
यप्प.... :)
29 Apr 2014 - 9:50 pm | आरोही
हो ठेचा बनवायच्या विविध पद्धती आहेत ...माझ्याकडे शेंगदाणे ,मटकी ,तुरीचे दाने ,सुके बोंबील ,टोमाटो,किवा मग नुसत्या मिरच्यांचा असे विविध प्रकारे ठेचा होतो ..
29 Apr 2014 - 10:17 pm | यसवायजी
हू.. हा..
29 Apr 2014 - 10:28 pm | आत्मशून्य
स्पार्टन असा आवाज दिल्यावर ऐकू येणारी आरोळी कशापाई हो ?
29 Apr 2014 - 10:40 pm | यसवायजी
आमच्याकडे याला खर्डा म्हणतात. तो खाल्ला की नाका-डोळ्यातून पाणी, तोंडातून असे हू..हा.., आणी ..... मधून धूर येतो. ;)
29 Apr 2014 - 11:06 pm | सूड
खर्डा!! सातारकर शेजार्यांमुळे हे फ्याड आमच्याही घरात आलं आणि अधूनमधून कधीकधी सैंपाकघरात होतं.
29 Apr 2014 - 11:30 pm | गणपा
झँट्मॅटिक पाकृ.
29 Apr 2014 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआ ! येकदम ४४० व्होल्ट'चा झटका!
..........आमच्या हितल्या यका मेस'वर दर दोन दिसाला असला काय तरी परकार लोन्च्याऐवजी तोंडीलावनं म्हनून असतो. ह्यो वरचा बी असतो! येकदम करंट द्येनारं काम हाय. कालच्याला कांदा/कैरी/लालमिरच्या..त्येलात परतून दिलत्या त्येन्नी,त्याची बी आटवान झाली. ह्ये सालं टेश्टला म्हनूनपन नीस्तं जिबंला लाऊ न्हाई..डोक्यात झिनझिन्या येत्यात पार! ;) पन णंतर अर्दातास लै फ्रेस्स वाट्टं... :D
आणि त्यावर येकशेवीस/तिणशे पाण लावलं..की येक तास!
30 Apr 2014 - 6:02 am | स्पंदना
हे सगळ खाल्ल्या दिवसाच झाल आत्मुस!
दिवस पलटल्यावर काय होतं ते पण येउ दे बैजवार!! :))
30 Apr 2014 - 9:05 am | अत्रुप्त आत्मा
=)) सध्या मी अणुभव सांगन्यापरास ..पर्वाची धन्या'ची ताजी रेकार्ड(त्यालाच) वाजवू द्या =))
(जोर्रात) कॉलिंग = धन्या!!! =))
30 Apr 2014 - 9:34 am | प्रचेतस
=))
30 Apr 2014 - 6:03 am | स्पंदना
हे बघ अद्वेय आम्ही याला अजिबात ठेचा म्हणणार नाही. आमचा ठेचा फार वेगळा असतो.
हव तर हिरव्या मिरचीची लाल टोमॅटो घालुन चटणी म्हणु.
आता लाल टॉमॅटो का? तर आम्ही हिरव्या टोमॅटोचीही अशीच चटणी करतो. ;)
30 Apr 2014 - 6:44 pm | आरोही
अगदी अपर्णा तै,
तू याला काहीही म्हण माझी काहीही हरकत नाही .
30 Apr 2014 - 10:21 am | इरसाल
ठेचा नाहीच्च !
खान्देशी ठेचा हा एक येगळाच प्रकार अस्तो.
लवकरच तो ठेचा आणी मिरच्यांची भाजी ही पाकृ टाकण्यात येईल.
30 Apr 2014 - 11:49 am | समीरसूर
ठेचा माझा अत्यंत आवडता पदार्थ. फोटो खूप छान आले आहेत. ठेचा अत्यंत आकर्षक दिसतो आहे. :-)
पण ठेच्यात टोंअॅटो टाकून तुम्ही आमच्या उत्साहाचा केचप केलात. :-( निषेध! निषेध!! निषेध!!!
तिखटपणा घालवण्यासाठी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीरदेखील टाकू शकतो. पण नुसत्या मिरच्या आणि लसूण यांचा ठेचा ओरिजिनल लागतो. एकदम फक्कड! एकदम झणझणीत! मेंदूचे सगळे दरवाजे खाडकन उघडणारा... :-) भाकरी-ठेचा यासारखे हेल्दी खाणे नाही या मताचा मी आहे.
मला लाल तिखटाचा त्रास होतो पण ५-६ कच्च्या हिरव्या मिरच्या जेवणात खाऊन देखील मला अजिबात त्रास होत नाही. हिरव्या मिरच्यांमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात असे ऐकले आहे.
त्यामुळे आता ठेचा-भाकरी खाणे आलेच. सावजी चिकन काय, ठेचा-भाकरी काय...पुढच्या दोन जन्मांचे रिझर्वेशन आताच करून ठेवावे लागेल बहुधा...एका जन्मात काय काय आणि किती किती करणार हो?
30 Apr 2014 - 6:55 pm | आरोही
समीरसूर ,
धन्यवाद .मी आधीच म्हटल्याप्रमाणे ठेचा किवा खर्डा बनवायच्या विविध पद्धती आहेत ..नुसत्या मिरची आणि लसुन यांचा ठेचा आमच्या घरी हि होतो पण तो आमच्या फक्त माझ्या आजीला च झेपतो...बाकी सगळ्यांना तो जमत नाही ..आणि म्हणून माझ्या आतेससुबाइ हा ठेचा करतात बाकीच्या लोकांसाठी ..टोमाटो टाकल्याने तिखटपना कमी होतो ..तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेगदाणे आणि कोथिम्बिर टाकून हि ठेचा होतो पण तो सर्वांनाच माहित आहे टोमाटो घालून जरा वेगळा प्रकार असल्याने येथे हि पाककृती दिली आहे ...
जसा तुम्हाला लाल तिखटाचा त्रास होतो तसाच माझ्या नवऱ्याला शेंगदाण्याचा होतो म्हणून मी शक्यतो शेग्दण्याचा ठेचा टाळते ..
बाकी तुमची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणेच सुंदर अन प्रामाणिक आहेच त्यामुळे प्रतिसाद देणे महत्वाचे वाटले ..
30 Apr 2014 - 2:33 pm | Maharani
Mastach ekadaम
30 Apr 2014 - 2:52 pm | मोक्षदा
सुदर,
30 Apr 2014 - 3:01 pm | निवेदिता-ताई
मस्त
30 Apr 2014 - 3:07 pm | कवितानागेश
ठेचा मी आत्तापर्यन्त नुसताच पाहिला होता. टोमॅटो घालतात हे माहित नव्हतं. खरडा करताना फोडणीलाच मिरची आणि लसणासोबत शेन्गदाणे आणि कोथिंबीर घालतात बहुतेक.
30 Apr 2014 - 3:48 pm | नाखु
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा देचा तूच जो करताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल.
मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल)
ईतर आप्ल्या तब्यीतीनूसार
1 May 2014 - 7:38 am | स्पंदना
तवा विसरला काय?
तापलेला तवा चरचरीत. त्यावर जरास नावाला तेल सोडायच, मग हिरव्या मिरच्या अन लस्णाच्या न सोललेल्या पाकळ्या. जरा परतायच की सांडशीने तवा खाली घ्यायचा. अन मग खडे मिठ घालुन वाटी अथवा भत्त्याने खरडायचा!
उ आह्ह्ह्हा आहा आहाह्ह्ह!!
अन हे सगळं बाकी सगळे जेवायला सुरवात करत असताना. म्हणजे अगदी ऐनवेळी ताटावरुन उठुन!! त्यामुळे उरलेली पंगत तुमच्या या कर्तबगारेकडे अगदी डोळे लावुन बसलेली.
1 May 2014 - 5:02 pm | शुचि
=)) mast!!
30 Apr 2014 - 3:50 pm | नाखु
ठेच्याला जगात "तोड" नाही खरा ठेचा तोच जो तयार होताना जोरदार "चर्$$$$र्" आवाज आणि किमान १५-२० मिनिटे खकाणा/ठ्स्का उडवून देइल.
मूख्य कलकार फक्तः लसूण्+मिरची+ जाडे मीठ (हा वरीजनल)
ईतर आव्रुत्या आप्ल्या तब्येतीनूसार
30 Apr 2014 - 4:01 pm | जागु
टोमॅटोने चव नाही बदलत? मी शेंगदाणा भाजून, तव्यात थोड्या तेलावर मिरची, लसुण, कोथिंबीर भाजून मिठ घालून शेंगदाणे एकत्र करून ठेचते. भाकरी बरोबर अफलातून लागते.
30 Apr 2014 - 6:59 pm | आरोही
जागू
प्रत्येक ठिकाणी वेगळ्याप्रकारे ठेचा होतो माझ्या माहेरी तू सांगितल्याप्रमाणेच होतो अगदी ..पण सासरी मी दिलेल्या कृतीप्रमाणे होतो ..टोमाटो ने तिखट पणा कमी होतो ..आणि दोन्ही चवीत फारच फरक असतो ..
30 Apr 2014 - 5:59 pm | एसमाळी
लाल पेक्षा हिरवे टोमॅटो घालुन केलेला ठेचा जाम भारी लागतो.हि. टो.+ मिरच्या + लसुण एकत्र बाफवुन घ्यायच्या आणी वाफल्यावर smash करायच्या ,वरुन फोडणी दिली की फक्त भाकरी बरोबर आख्ख जेवण करु शकतो.
30 Apr 2014 - 7:00 pm | आरोही
हा प्रकार मी हि पहिल्यांदाच ऐकते आहे ..नक्की करणार ...+)
30 Apr 2014 - 7:12 pm | सुहास..
टमाटे टाकुन ठेचा/खर्डा नाही पाहिला ब्वा आपण अजुन
1 May 2014 - 5:32 pm | मदनबाण
टोमॅटो टाकुन केलेला हा ठेचा पहिल्यांदाच पाहिला. :)
2 May 2014 - 3:23 pm | भावना कल्लोळ
मिपाबंधुनो आणि गर्ल्स … जरा मोठाले कडी -कुलुप आणुया का आपण? … स्पेशली सानिका, गणपाभाऊ, दीपक. कुवेत, अद्वेय, मधुरा आणि हो आता सध्याच्या घडीला या अपर्णेला सुद्धा एकाद्या खोलीत बंद करून ठेवु ,,,,,,, मग टाका किती धागे टाकायचे आहेत ते, हे इथे धागे टाकतात आणि ते धागे पाहून आमचा हाफिसात जीव जातो लाळ डी हायड्रेड होऊन. याला जवाबदार कोण?