हे फक्त भारतीय चित्रपटातच घडू शकत.

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
28 Jul 2008 - 2:54 pm
गाभा: 

बाघबानः अमीताभ आणी हेमा हे होळी नंतर (आठवा होली खेले रघुवीरा...गाण) सहा महिन्या करीता एकमेंकापासुन वेगळे होतात (म्हणजेच मार्च पासुन सप्टेंबर) आणी त्या सहा महीण्याच्या कालावधीत ते वेलेंटाईन डे साजरा करतात जो १४ फेब्रुवारी ला असतो ,करवा चौथ पण (जे साधारणता ऑक्टोंबर मधे असते).

आता काही माझ्या क्रिकेट प्रेंमीसाठी ...

लगानः ते म्हणतात की ही कहाणी १९व्या शतकातील आहे (भारत ईंग्रंजाच्या पारतंत्र्यात असतांना). त्या वेळेस क्रिकेट मधील एक षटक हे ८ चेंडु च असायच परंतु पिक्चर मधे ते ६ चेंडुच दाखवलय. कदाचीत आधुनीक क्रिकेट या पिक्चर पासुन शिकलेल असाव.

अमर अकबर एन्थोनी : तीन मनुष्य एकाच वेळेस एकाच माणसाला रक्त देतात?????

खलनायक : पोलीस गुंडा चा शोध ms word document screen ने लावतात.

प्यार तो होना ही था: काजोल ट्रेन मधन पब्लीक टॉयलेट वापरायला उतरते आणी तीची ट्रेन सुट्ते(बिचारी ..तीला कोणी सांगा बर
ट्रेन मधे प्रत्येक कम्पार्टंमेंट मधे चार्-चार टॉयलेट असतात)

तेरे मेरे सपने : प्रीया गील ही बी.ए. शीकत असते आणी एका सीन मधे बस स्टॉप वर तीच्या हातात ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja हे पुस्तक असते ( हीम्मत तर बघा मुलीची)

हे झाले माझे चित्रपट बघतांना चे निरीक्षण आणी तुमचे पण असतील काही...नाही का???
मग वाट कसली बघता येऊ द्यात...........

------नितिन

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

28 Jul 2008 - 3:01 pm | केशवसुमार

( हीम्मत तर बघा मुलीची)
खरयं गांधीशेठ,
ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja चार वर्षे झेलले आहे.. खरच हिम्मत लागते..
(इलेक्ट्रिकल अभियंता)केशवसुमार
बाकी धाग मजेशीर आहे...
रजनिकांतचे सगळे शिनेमे लिहायला गेले तर जागा कमी पडेल..
(शिवाजी द डॉन)केशवसुमार

प्रियाली's picture

28 Jul 2008 - 10:02 pm | प्रियाली

मलाही भीतीदायक स्वप्न पडतात तेव्हा त्यांत काही वाईट-साईट पुस्तकं डोळ्यासमोर नाचतात. ;) त्यात शाळेतील भूमितीच्या पुस्तकांपासून पुढे.. असं सुरू असतं आणि बी. एल. थेराजांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगचं पुस्तक त्यांत हमखास असतं.

खरंच हिम्मत लागते - १०१% सहमत.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jul 2008 - 11:19 am | प्रकाश घाटपांडे

मला ही अशी वाईट स्वप्न पडायची. ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा हा विषय राहिला आहे. त्यामुळे अजुन आपल्याला बिएस्सी ची डिग्री मिळाली नाही. पेपर द्यायचाच लक्षातनाही, आता बोंबला.
उपाय व कारणे
मग मी परत कॉन्होकेशन करुन डिग्री सर्टिफिकेट घेतले. त्यानंतर हे स्वप्न पडायचे बंद झाले. माझा ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा हा ३ र्ड सेमिस्टरचा विषय ५थ सेमिस्टरला हि राहिला होता. त्यामुळे माझे वर्श वाय गेले होते. ती धास्ती मनात होती. ८४ ला पास झाल्यावर कोनव्हकेशन केले होते पण पोस्टाने डिग्री घरी आली नव्हती व कॉलेजमध्येही आली नव्हती.नोकरी विनासायास मिळाल्याने व तिथे डिग्री सर्टिफिकेटची गरज नसल्याने तो विषय बाजुला राहिला होता.
प्रकाश घाटपांडे

नि३'s picture

28 Jul 2008 - 4:17 pm | नि३

रजनिकांतचे सगळे शिनेमे लिहायला गेले तर जागा कमी पडेल..
हे मात्र एकदम जबरा.....
---नितिन.

झकासराव's picture

28 Jul 2008 - 9:26 pm | झकासराव

प्रीया गील ही बी.ए. शीकत असते आणी एका सीन मधे बस स्टॉप वर तीच्या हातात ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja हे पुस्तक असते ( हीम्मत तर बघा मुलीची>>>>>>>>>
=)) हा सगळ्यात जबरा होता. :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सखाराम_गटणे™'s picture

28 Jul 2008 - 10:06 pm | सखाराम_गटणे™

प्रीया गील ही बी.ए. शीकत असते आणी एका सीन मधे बस स्टॉप वर तीच्या हातात ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja हे पुस्तक असते
अरे, मला हे माहीतच नव्हते,
आता सिनेमे नीट पाहीले पाहीजेत.

आम्ही होरोईन कडे बघतो, तीच्या हातात काय आहे हे नाही.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

प्राजु's picture

28 Jul 2008 - 10:12 pm | प्राजु

भारी निरिक्षण....
अजून येऊ द्यात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

लंबूटांग's picture

28 Jul 2008 - 10:34 pm | लंबूटांग

मध्ये जेव्हा Defence Minister ला मारल्याची बातमी दाखवत असतात तेव्हा सांगतात की त्याला ७:५८ ला मारले आणि TV screen वर दिसणारी वेळ असते ७:४६ :P..

चतुरंग's picture

29 Jul 2008 - 2:12 am | चतुरंग

नायगरा फॉल्सला व्हिजिटर सेंटरमधे एक थिएटर आहे तिथे त्या फॉल्सबद्दल एक छोटी फिल्म दाखवतात. त्यात दारूच्या रिकाम्या पिंपात बसून धबधब्यावरुन पडलेल्या एका बाईची गोष्ट दाखवतात. त्या बाईबरोबर एक काळ्या रंगाचे मांजराचे पिलूही त्या पिंपात बसलेले दाखवले आहे. धबधब्यावरुन पडल्यावर ते पिंप वहात येते आणि किनार्‍याला वाट पहाणारे काही लोक ते ओढून बाहेर काढतात आणि त्या म्हातारीला बाहेर काढतात, ती जिवंत असते. पण पिंपातून बाहेर येणारे ते मांजराचे पिलू मात्र पांढर्‍या रंगाचे दाखवले आहे! आहे की नाही मज्जा? धबधब्याने त्याचा रंग धुवून नेला म्हणायचा का? ;)

बाकी बी.एल. थेराजा बद्दल काय म्हणावे महाराजा? अरे, अशी पुस्तकं लिहायची म्हणजे हिम्मत पाहिजे आणि ती शिकायची म्हणजे त्याहून हिम्मत पाहीजे!
होस्टेलवर रॅगिंग करताना बी.एल. थेराजा वाचायला लावल्याने एक मुलगा भ्रमिष्ट झाल्याची वदंता आमच्यावेळी फार प्रसिद्ध होती! ;)

चतुरंग

एडिसन's picture

29 Jul 2008 - 2:43 am | एडिसन

काय आठवण काढली राव..मी लगेच BLT कपाटातून बाहेर काढून डोक्याला लावले..आमच्यासाठी ज्ञानेश्वरीच ती! पुरंदर्‍यांच्या "राजा शिवछत्रपतीच्या" साईजचा हा आयुष्यात पाहिलेला पहिला Technical ग्रंथ..नंतर त्याचे ४ भागात विभाजन झाले पण फुल व्हॉल्यूमची मजा काही निराळीच होती.
होस्टेलवर रॅगिंग करताना बी.एल. थेराजा वाचायला लावल्याने एक मुलगा भ्रमिष्ट झाल्याची वदंता आमच्यावेळी फार प्रसिद्ध होती!
हो..आमच्याकडेही अशी वंदता होती..जसं वय आणि अनुभव वाढत गेला तशा BLT मधल्या असंख्य चुका लक्षात आल्या..पण अजूनही एखादी अगदी बेसिक गोष्ट बघायची असेल तेव्हा हात BLT लाच लागतो.

(जुन्या दिवसात रमलेला) एडिसन

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jul 2008 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे

कुठल्या तरी पिक्चर मध्ये मी चोर पकडायचे यंत्र या नावाखाली ऍनॉलॉग मल्टिमीटर दाखवला होता.
प्रकाश घाटपांडे

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Jul 2008 - 11:29 am | डॉ.प्रसाद दाढे

पुष्कळदा हि॑दी सिनेमात ऑर्थोपेडिक सर्जन (अस्थी-तज्ञ) स्टेथोस्कोपने पेश॑टला तपासतो व हात फ्रॅक्चर आहे असे जाहीर करतो!
श्वास चित्रपटातला शेवटचा ऑपरेशन थिएटरमधला सीनः कॅन्सर सर्जनची भूमिका करणारा स॑दीप कुलकर्णी आधी हातात ग्लोव्ह्ज घालतो, विचार करतो आणि मग चेहर्‍यावर मास्क ओढतो. (सर्जरीत एकदा हातात मोजे घातले की मास्कला स्पर्श करणे निषिद्ध आहे, कारण तो निर्ज॑तूक नसतो.)
त्याच चित्रपटातली दुसरी अतिशयोक्ती म्हणजे पेशन्ट बेपत्ता झाल्यावर दाखविलेला गो॑धळ व मिडीयाची धावपळ. रूग्णालयातून रूग्ण पळून जाण॑ (ऍब्स्कॉन्ड होण॑) ही फारशी नवीन बाब नाही (पुष्कळदा बिल चुकविण्यासाठी मोठ्या इस्पितळातून लबाड पेशन्ट पळून जातात) व असे झाल्यावर फाईलवर शेरा मारून ऑफिसला व गरज पडल्यास पोलीस ठाण्यास वर्दी देणे एव्हढेच असते. श्वासमध्ये फारच अति दाखविलेले आहे.
'वास्तव' मध्ये अ॑त्यविधीच्या वेळच्या गोळिबारात शिवाजी साटम जखमी होतो, त्याला रक्त देण्याची आवश्यकता भासते ते॑व्हा डॉक्टर ग॑भीर चेहर्‍याने रक्त देणारे कोणी आहे का असे विचारतात. सध्याच्या रक्तस॑क्रमणाच्या नियमा॑प्रमाणे असे आयत्या वेळचे रक्त शक्यतो वापरत नाहीत. त्याऐवजी बॅ॑कमध्ये पूर्णतया तपासलेले, साठविलेले रक्तच देतात.

भडकमकर मास्तर's picture

30 Jul 2008 - 9:34 am | भडकमकर मास्तर

श्वासमध्ये फारच अति दाखविलेले आहे.
अगदी अगदी हेच... एखाद्या हॉस्पिटलमधून पेशंट पळून गेला किंवा एकाच डॉक्टराचे ५ पेशंट एका महिन्यात पळून गेले , त्यात काय बातमी आहे ??

आणि ती ( ओव्हर ऍक्टिंग करणारी ) मेडिकल सोशल वर्कर .... इतकी हायपर का होते ही सोशल वर्कर बाई ?? माझ्या माहितीप्रमाणे मेडिकल सोशल वर्कर डोक्याने शांत असतात, त्यांना पेशंट्ची मानसिक स्थिती समजून घेऊन त्यांना भावनिक आधार देणे, आर्थिक अडचण असल्यास मदत करण्यास विविध संस्थांची माहिती देणे अशी कामे असतात... अत्यंत अननुभवी मेडिकलच्या फर्स्ट इयरला असलेली मुलगी जशी त्या स्थितीत बावचळून जाईल तसे वाटले, मला वाटलं हिलाच कोणाच्या तरी आधाराची गरज आहे...
..... तुम्ही आतून त्या मुलाच्या वेदनेने हादरून गेलाय पण बाहेरून जगाला त्या पदाचा आत्मविश्वास दर्शवताय, असं काहीतरी असायला हवं होतं...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Jul 2008 - 11:20 am | डॉ.प्रसाद दाढे

मला असे वाटते की दिग्दर्शकाचा मेडिकल क्षेत्राचा अभ्यास कमी पडलाय (आमच्या रामदासजी॑चा पाहा म्हणावे). श्वासच्या वेळेला अशी हवा निर्माण केली होती की लहान मुला॑मध्ये कॅन्सर ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे व त्यातल्या त्यात डोळ्याचा तर फारच रेअर आहे. प्रत्यक्षात मी जे॑व्हा मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये प्रशिक्षणासाठी गेलो (डिसे॑बर ०५) तेव्हा पहिल्याच दिवशी ओ.टीत सेम केस होती. मी तिथल्या सर्जनला विचारले की हीच ती श्वास फेम रेअर केस ना? त्यावर स्मित करून ती सर्जन मला म्हणाली की टाटात महिन्यातन॑ एक तरी अशी केस आपण करतो!
मास्तर म्हणतात त्याप्रमाणे समाजसेविकाही इतक्या बावळत नसतात. त्या॑चा रूग्ण मानसिकतेचा चा॑गला अभ्यास असतो व अनुभवही. शिवाय चित्रपटात दाखविल्याप्रमाणे माझ्या माहितीतला तरी कुठलाच कॅन्सर सर्जन पेशन्टला अस॑ झटकून टाकत नाही, कि॑वा वैतागत नाही. आधी नीट काउन्सिली॑ग करून मगच शस्त्रक्रिया केली जाते.
श्वासचे परिक्षण करण्याची ही जागा नव्हे पर॑तु ह्या आणि अशा अनेक गोष्टी खटकल्या होत्या व ह्या चित्रपटास ऑस्कर मिळणे शक्य नाही हेही भविष्य मी तेव्हाच वर्तविले होते. (स॑पूर्ण चित्रपटभर बॅकग्राउ॑डला भयाण शा॑तता ही आणखी जाणवलेली त्रुटी! चमत्कारिक टायटल म्युझिक आणि महत्वाच्या प्रस॑गास मागे शा॑तता! च॑दावरकरा॑नी माझी निराशा केली)
त्याच्या काही दिवस अगोदर मी 'लाईफ इज ब्यूटिफुल' हा निता॑तसु॑दर चित्रपट पाहिला व तीन ऑस्कर का व कसे मिळतात हे अनुभवले.

मनिष's picture

30 Jul 2008 - 1:30 pm | मनिष

फक्त श्वास, वळू (मला अजिबात नाही आवडला) सारख्या चित्रपटांविषयी काही त्रुटी काढायच्या म्हटल्या तर लोक अंगावर येतात. एकाने मला नुकतेच मी 'दे धक्का' पाहिला नाही म्हटल्यावर -- "असा कसा तू मराठी माणूस?" म्हणून मला शॉक दिला होता.
श्वास -काही त्रुटी असल्या तरी त्याचा 'टोटल इफेक्ट' अतिशय चांगला होता, मला आवडला. पण देवराई कितीतरी सरस!!!

- मनिष

विजुभाऊ's picture

30 Jul 2008 - 9:43 am | विजुभाऊ

दे धक्का हा चित्रपट सर्वार्थाने धक्का देणारा
हार्ट ऍटॅक आलेला शिवाजी साटम बेडवरुन नाकाला लावलेल्या ऑक्सीजन मास्कसहित पळुन जातो.
तो मुम्बैलाही नाकाला ऑक्सीजन मास्क लावुनच रस्त्यावरुन फिरत असतो.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

बबलु's picture

29 Jul 2008 - 11:46 am | बबलु

शोले मधील गावात आपला धर्मेंद्र पाण्याच्या ऊंच टाकी वरून भाषण देतो........
गावात व गावाजवळ कोठेहि वीज नाही. पाण्याची टाकी कशाला कोण बांधेल ??
पाणी चढवायला वीज लागते भाऊ !!!

सखाराम_गटणे™'s picture

29 Jul 2008 - 10:18 pm | सखाराम_गटणे™

मान लिया, आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनोको !!!!!!!

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

पाणी पुरेश्या दाबाने (प्रेशर) येत असेल तर वीजेची गरज नाही.

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Jul 2008 - 11:56 am | डॉ.प्रसाद दाढे

वा! बबलूजी, अचूक निरिक्षण! कधी लक्षात नाही आल॑.

पार्टनर's picture

30 Jul 2008 - 10:07 am | पार्टनर

मिथुन चक्रवर्ती एअरपोर्ट वर हमाल असतो ! :)

- निस्सिम गुंडा प्रेमी !

साती's picture

30 Jul 2008 - 12:35 pm | साती

प्यार तो होना ही था: काजोल ट्रेन मधन पब्लीक टॉयलेट वापरायला उतरते आणी तीची ट्रेन सुट्ते(बिचारी ..तीला कोणी सांगा बर
ट्रेन मधे प्रत्येक कम्पार्टंमेंट मधे चार्-चार टॉयलेट असतात)

हाच प्रश्न आम्हालाही पडला पण चित्रपटातच उत्तर दिलं होतं.
म्हणजे काजलच सांगते त्याला की ट्रेनमधले टॉयलेट सारखे हलत असल्याने तिला चक्कर येते.

बाकी शोलेतल्या टाकीचे निरीक्षण मस्तच!

साती

सुबक ठेन्गनी's picture

31 Jul 2008 - 1:51 pm | सुबक ठेन्गनी

एक गोष्ट आहे ....काजोल चा हा एकुन दुसरा होलिवूद् पसुन चोरलेला मुवि....
१)"प्यार तो हो ना हि था '' - फ्रेन्च किस्स
२)'' यु मि और हम'' - ५० फर्स्ट डेट्स

सुबक ठेन्गनी's picture

31 Jul 2008 - 1:52 pm | सुबक ठेन्गनी

एक गोष्ट आहे ....काजोल चा हा एकुन दुसरा होलिवूद् पसुन चोरलेला मुवि....
१)"प्यार तो हो ना हि था '' - फ्रेन्च किस्स
२)'' यु मि और हम'' - ५० फर्स्ट डेट्स(थोद्या फार फरकाने सेम)

झकासराव's picture

31 Jul 2008 - 2:41 pm | झकासराव

ढापलेल्या चित्रपटाविषयी बोलायच झाल तर वेगळा थ्रेड सुरु करावा लागेल इतके असतील.
मला आताच एक आठवला. अजय देवगणचा "कयामत" हा "द रॉक" ह्या चित्रपटावरुन सरळ सरळ ढापलेला आहे.
फक्त त्यात अजय देवगण आणि नेहा धुपियाच्या प्रेमाची फोडणी एक्श्ट्रा आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुबक ठेन्गनी's picture

31 Jul 2008 - 4:50 pm | सुबक ठेन्गनी

Leon नावाचा कालच पाहिला...तो आपला ''बिछु'' आहे...आपल्या बोबि देओल चा....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

31 Jul 2008 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेऑन मी पण पाहिला. पण त्यापेक्षा बिच्छू किती चांगला आहे! एकतर केवढी संदर्भहीन गाणी आहेत त्यात.
आणि लेऑन मधे राणी मुखर्जीच्या जागी १०-१२ वर्षांची पोरगी आहे. कसा चालणार आपल्याकडे असा पिक्चर??

(संदर्भहीन गाणी आवडणारी) अदिती

सुबक ठेन्गनी's picture

31 Jul 2008 - 8:45 pm | सुबक ठेन्गनी

ते आहे..

हे हे आम्हि अशा गण्याना आम्हि "भड्न्ग" गाणि म्हण्तो.... :D

देवदत्त's picture

31 Jul 2008 - 8:39 pm | देवदत्त

तसेच 'कुछ खट्टी कुछ मिठी' हा ही एका इंग्रजी सिनेमावरून होता. हिंदीमध्ये आधी ही 'दो फूल', 'प्यार के दो पल' हे सिनेमा त्याच कथेवर होते.

खरोखरच ईंग्रजी ते हिंदी करीता नवीन धागा सुरू करावा लागेल. :)

डॉ.प्रसाद दाढे's picture

30 Jul 2008 - 12:56 pm | डॉ.प्रसाद दाढे

हेराफेरी (नवा) चित्रपटात परेश रावलने बाबूराव आपटेची धमाल भूमिका केली आहे, पण नाव मात्र खटकते! आपटे आडनावाचा कोणताच मनुष्यप्राणी अशी भाषा वापरणे अशक्य आहे!
मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये डॉ. अस्थाना सर्जरी करता॑ना दाखविला आहे (म्हणजे तो सर्जन आहे) आणि न॑तर वर्गात शरीररचनाशास्त्राचा (ऍनाटॉमी) पाठ घेताना दाखविला आहे. सहसा असे होत नाही. फारच क्वचित प्रस॑गी ऍनाटॉमीला कुणी अजिबातच स्टाफ मिळत नसेल तरच सर्जन ऍनाटॉमी शिकवितो. तसेच मुन्नाभाई परिक्षेत पहिला येतो ते फक्त पेपर लिहून, वायवा न देताच! मेडिकलला प्रत्येक परिक्षेत तो॑डी परिक्षा अनिवार्य असते.

सखाराम_गटणे™'s picture

30 Jul 2008 - 1:35 pm | सखाराम_गटणे™

तसेच मुन्नाभाई परिक्षेत पहिला येतो ते फक्त पेपर लिहून, वायवा न देताच! मेडिकलला प्रत्येक परिक्षेत तो॑डी परिक्षा अनिवार्य असते.

हे मात्र जबरा.

सखाराम गटणे
आम्ही भुकेल्या माणसांना खोटे अन्न दाखवुन उपाशी ठेवत नाही.

सुबक ठेन्गनी's picture

31 Jul 2008 - 12:54 pm | सुबक ठेन्गनी

रजनिकान्त च्या एका मुविमधे तर कमाल च आहे.तो विलनच्या मागे असतो. एका खोलित्....पार्तिशन् च्या एका बाजुला तो आनि विलन दुसरया बाजुला विलन...आनि हा सुपर हिरो हातात आरसा घेतो ,त्याला पाह्तो तिरके आर्श्यात्....आनि गोलि वर स्लाब ला लागुन विलनला लागते म्हने :O ....कलयुगातला अर्जुन च म्हनायचा.......

सुनील's picture

31 Jul 2008 - 1:18 pm | सुनील

रजनीकांतच्या कुठल्याशा चित्रपटात म्हणे (मी त्याचा कुठलाही चित्रपट पाहिलेला नाही), तो आणि व्हिलन यांच्या मध्ये एक उंच भिंत असते. रजनीकांतच्या हातात दोन पिस्तूले असतात. तो एक पिस्तूल हवेत उडवतो. दुसर्‍या पिस्तूलाने पहिल्या पिस्तूलाच्या ट्रिगरवर गोळी झाडतो. हवेत उडवलेल्या पिस्तूलाचा ट्रिगर दाबला जाऊन गोळी सुटते ती थेट व्हिलनच्या छातीवर!!

आता बोला!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 1:56 pm | विसोबा खेचर

सर्व निरिक्षणे सह्ही! :)

तेरे मेरे सपने : प्रीया गील ही बी.ए. शीकत असते आणी एका सीन मधे बस स्टॉप वर तीच्या हातात ELECTRICAL TECHNOLOGY by B L Theraja हे पुस्तक असते ( हीम्मत तर बघा मुलीची)

हे तर खासच! नितिनराव, अजूनही येऊ द्या! :)

आपला,
(हिंदीचित्रपट प्रेमी) तात्या.

देवदत्त's picture

31 Jul 2008 - 8:44 pm | देवदत्त

मि. एंड मिसेस खिलाडी मध्ये जुही चावला कादरखान कडे लग्नाची परवानगी मागण्याकरीता गाडी तोडत फिरविते. त्यात गाडी तुटेपर्यंत भारतीय प्रकाराची (right hand drive)असते, शेवटी कादरखान उतरतो तेव्हा ती दुसरीच गाडी असते (left hand drive)