साहित्य - दीड वाटी बारीक रवा, अर्धी वाटी तांदूळाचे पिठ, एक वाटी ताक्,अर्धा टी-स्पुन बेकींग पावडर, चवीनुसार मिठ, दोन मोठे कांदे, एक-दोन टोमॅटो, तीन्-चार हिरव्या मिरच्या(अथवा आवडीनुसार कितीही),अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती - रवा, तांदूळाचे पिठ, ताक्, बेकींग पावडर, चवीनुसार मिठ हे सर्व एकत्र करुन थोडे पाणी घालून सरसरीत भिजवा, आता हे दहा मिनिटे बाजूला ठेवा, तो पर्यंत कांदा, टोमॅटो, मिरच्या हे सर्व बारीक चिरुन ठेवा.
आता आपला नॉनस्टीक तवा गरम करुन घ्या, त्याला थोडेसेच तेल लावुन त्यावर पळीने पिठ घाला व जरा जाडसरच पसरा,
त्यावर कोथिंबीर, कांदा, टोमॅटो पसरुन घाला. हा उत्तापा दोन्ही बाजुने भाजावा.
नारळाच्या चटणीबरोबर खावयास द्यावा.
डाळ, तादूळ भिजवुन पिठ आंबवण्यापे़क्षा हा झटपट उत्तापा मुलांच्या डब्यासाठी जरुर देता येईल.
प्रतिक्रिया
25 Apr 2014 - 2:02 pm | दिपक.कुवेत
झटपट उत्तापाची पाकृ आवडली. आता झटपट त्याचे फोटो टाका पाहु त्याशीवाय मी झटपट प्रतीक्रिया कशी देणार???
25 Apr 2014 - 2:22 pm | मुक्त विहारि
पण कदाचित....
जितक्या झटपट उत्तप्पे केले तितक्याच किंबहूना त्याहून अधिक झटपट ते खाल्ल्या गेले असतील, त्यामुळे झटपट फोटो काढता आले नसतील.
25 Apr 2014 - 10:27 pm | निवेदिता-ताई
हे हे ....असेच झाले आहे..झटपट खाल्ल्या गेले आहेत, त्यामुळे फोटू नाही.
25 Apr 2014 - 2:27 pm | दिपक.कुवेत
हि शक्यता मात्र झटपट पटल्या गेली आहे!
25 Apr 2014 - 3:13 pm | पैसा
सोप्पी! दीपक, तूच का नाही असे उत्तापे करत? म्हणजे फोटो टाकशीलच!
25 Apr 2014 - 3:54 pm | मदनबाण
बाय डिफॉल्ट ताई... अहो फोटो कुठे आहे ?
25 Apr 2014 - 4:15 pm | सानिकास्वप्निल
पाकृ मस्तं पण फोटो कुठाय ;)
25 Apr 2014 - 6:36 pm | सूड
फोटो??
25 Apr 2014 - 7:51 pm | बेमिसाल
फोटो शिवाय मजा नाही.
28 Apr 2014 - 10:19 pm | अनन्या वर्तक
झटपट उत्तापाची पाकृ आवडली वेगळी व छान पाककृती.