तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय

जातवेद's picture
जातवेद in भटकंती
20 Apr 2014 - 10:15 pm

तोक्यो राष्ट्रीय संग्रहालय हे तोक्यो मधल्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे संग्रहालय सकुरासाठी प्रसिद्ध असणार्‍या युएनो उद्यानाजवळ आहे. इथे एकूण ५ प्रदर्शन इमारती आहेत.
१. होंकान (मुख्य ईमारत) - इथे जपानशी संबंधीत वस्तू मांडलेल्या आहेत.
२. तोयोकान - इथे इतर भारतासकट सबंध आशियामधिल वस्तू आहेत.
३. ह्योकेकान - ही इमारत मेजी घराण्यातील युवराज तैशो याच्या लग्नासाठी सन १९०९ मधे बांधली होती. सध्या तिथे काही नाही.
४. हेसेकान - इथे पुरातत्वशास्त्राच्या वस्तू आहेत. आणि
५. ह्योरूजी कलादालन - नारा मधिल ह्योरूजी मंदिर येथील कलावस्तू.

नेहमीप्रमाणे आम्ही २ तासात संपवू म्हणून गेलो आणि मुख्य इमारतीनेच घाम फोडला. अर्थात ते आपल्या रसकतेवर अवलंबून आहे :) . या मुख्य इमारतीतल्याच काही वस्तू...

१. तोक्यो राष्ट्रीय संग्रहालयाची मुख्य इमारत.
image 1

२. जपानमधे सुद्धा चहाला फार महत्व आहे. पण इकडे दुधाच्या चहापेक्षा ग्रीन-टी फार पितात. इथे "चहाच्या समारंभाची कला" या विशयावर स्वतंत्र दालन आहे. हे तिथे दिलेले वर्णन,

चहा समारंभाचा मुरोमाची काळात (इ.स. १३९२ - इ.स. १५७३) उदय झाला आणि याला अझूची-मोमोयामा काळात (इ.स. १५७३ - इ.स. १६०३) टी मास्टर सेन-नो-रिक्यू यांच्याकडून औपचारिक स्वरूप प्राप्त झाले. ही जपानमधील एक प्रख्यात परंपरा आहे. टी रूम (चहाच्या खोली) मधे कलेच्या वस्तू आणि भांडी जसे की, शोभेच्या गुंडाळ्या, शोभेची पात्रे, चहाचा डबा, चहादाणी आणि इतर भांडी उदारतेने जमा केलेली असत. या भांड्यांमधे कधी कधी चीन आणि कोरिया मधून आयात केलेल्या भांड्यांचा देखील समावेश असतो आणि हि भांडी पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. काळजीपूर्वक निवडलेली आणि जमवलेली हि भांडी पाहुण्यांसाठी काढली जातात. हे दालन चहा संस्कृतीने रोवलेल्या कलात्मकतेसाठी समर्पित आहे

चहापूड आणि तत्सम ठेवायच्या छोट्या बरण्या (एदो काळ सतरावे शतक)
image 1

३. चहाच्या बरण्या आणि चहादाणी (एदो काळ)
image 1

४. मोठा जार - चेरीब्लॉसम नक्षीचा वाडगा - ड्रगन आणि फिनीक्स च्या नक्षीचा वाडगा - आणखीन एक मोठा जार (एदो काळ सतरावे शतक)
image 1

५.मोठी डिश - चेरीब्लॉसम स्त्रीची नक्षी (एदो काळ अठरावे शतक)
image 1

६. रंगीतदार भांड्यांवर सोनोरी नक्षीची कला जपानी लोक चीनी लोकांकडून शिकले. पण यात ते इतके पुढे निघून गेले की युरोपमधे जपानचीच भांडी जास्त पसंत केली जाउ लागली.
(एदो काळ अठरावे शतक)
image 1

७. दंतकथेतल्या राक्षसांच्या नक्षीचा आरसा (कोफून काळ चौथे शतक)
image 1

८. जपान मधे इ.स १२०० पासून जवळ जवळ ७०० वर्षे राजकीय शक्ती लढवय्ये समुराई लोकांच्या हातात होती. ह्या लोकांचे विशीष्ट पोषाख असत.
image 1

९. आणखीन एक

१०. हा पुतळा एका लढवैय्याची सोपी शैली दाखवतो. बहुधा मिनामोतो योरीतोमो चा पुतळा
image

११. कलादालन
image

या कलादालनात चित्रे, कलाकुसरीचे कपडे आणि हस्तकलेच्या वस्तू मांडल्या आहेत.
१२. कलाकुसरीचे कपडे (ती बाई, अय्या किती छान, असं जपाणी भाषेत म्हणाली सुद्धा :) )
image

१३. वर दोन्ही कोपर्‍यात दिसणारे कुत्र्याच्या आकारच्या पेट्या - मध्यभागी हिना बाहुल्या - आणि हिनाच्या वस्तू (एदो काळ एकोणिसावे शतक)
image

१४. हिना....
image

१५. हिना बाहुली आणि तिचा राजवाडा (मेजी काळ एकोणिसावे शतक)
image

१६. खोगीर आणि रिकीब
image

१७. श्वान जन्माला येताना लवकर जन्म घेतात त्यामुळे श्वानाच्या आकाराचे डबे बाळंतपणाच्या वेळी पलंगाच्या बाजूला ठेवले जायचे. एदो काळापासून ते हिना बाहुल्यांच्या बरोबर सुद्धा ठेवले जाउ लागले आणि त्यांच्यामुळे मुलिंना चांगले आरोग्य मिळते असे मानले जाउ लागले. जपानी भाषेत यांना ओतोगिइनू आणि तोनोइइनू म्हणतात.
बाजुला दिसतायत त्या छोट्या उशा
image

१८. जपानची चित्रकला
image

१९. ही दोनही चित्रे एकाच चित्राच भाग आहेत
image

२०. आणि आता आपल्या सर्वांनाच परिचयाचे असणारे ह्सुअ‍ॅन त्सँग. विकी म्हणते यांचा काळ ६०२ ते ६६४ होता. हे चित्र कामाकुरा काळात १४व्या शतकात रेशमी कपड्यावर काढलेले आहे.
image

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Apr 2014 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

खटपट्या's picture

20 Apr 2014 - 10:34 pm | खटपट्या

छान माहिती

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 1:00 am | अत्रुप्त आत्मा

मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!!!

प्रचेतस's picture

21 Apr 2014 - 9:52 am | प्रचेतस

सुरेख

पैसा's picture

21 Apr 2014 - 10:00 am | पैसा

काय छान छान वस्तू आणि त्यांचे फोटो! मस्तच!

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2014 - 5:04 pm | पिलीयन रायडर

+१

फार सुंदर फोटो..

दिपक.कुवेत's picture

21 Apr 2014 - 11:37 am | दिपक.कुवेत

जपानची हि वेगळि सफर मनाला भावतेय. क्रमशः टाकुन अजुन फोटो येउद्या.

जातवेद's picture

21 Apr 2014 - 5:59 pm | जातवेद

इस्पीकचा एक्का, खटपट्या, अत्रुप्त आत्मा, वल्ली, पैसा, दिपक.कुवेत धन्यवाद :)
क्रमश: मधे दुसर्‍या ठिकाणाचे फोटो टाकू ;)

यसवायजी's picture

22 Apr 2014 - 4:51 pm | यसवायजी

मस्त फोटो.

फोटो आवडले. अधिक वर्णन असतं तर आणखी मजा आली असती.
या राष्ट्रीय संग्रहालयाची साईट वगैरे असेल तर (असेलच म्हणा) तर तिचा पत्ता पुढच्या भागात देऊ शकाल का?

जातवेद's picture

22 Apr 2014 - 8:09 pm | जातवेद

याचा एकच भाग आहे :)
पत्ता: युएनो स्टेशनच्या जवळच आहे. गिंझा किंवा हिबीया लाईन पकडून इथे येता येईल.
हि लिंक,

मुक्त विहारि's picture

22 Apr 2014 - 7:30 pm | मुक्त विहारि

झक्कास

फोटो आवडले.

कुसुमावती's picture

6 May 2014 - 12:27 pm | कुसुमावती

सर्व फोटो आवडले. वेगळ्याच वस्तु आहेत.