मी आणि माझे नशीब

सुनिल जाधव १९७९'s picture
सुनिल जाधव १९७९ in काथ्याकूट
20 Apr 2014 - 11:55 am
गाभा: 

मी आणि माझे नशीब हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझे नशीब कुणी लिहिले हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझे नशीब यावर चर्चा बंद करा आणि नशीब घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

प्रतिक्रिया

मी आणि माझी बायको हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण मी लग्न का केलं हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि सुखाचा काळ गेला आणि उद्याचा दिवस भोगायचाच आहे तेव्हा उद्याच्या युद्धासाठी तयार राहा... तेव्हा मी आणि माझी बायको यावर फालतू चर्चा बंद करा आणि तयारीला लागा... आजच आणि आतापासूनच.... पळतो मी आता....

मीपा आणि डुआयडी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण डुआयडी खरा कोण हे मालक सोडून कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण एखादा डुआयडी मातला की लगेच सगळे त्रासतात .... कोण होता तो आणि काय लिहितो तो ..... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि मला एका डुआयडी ला सांभाळून घ्या ... आणि ते फक्त आपण आणि आपणच मिपाकर घडवू शकता ...... तेव्हा मी आणि माझा चवथा आयडी यावर चर्चा बंद करा आणि सोसायला सुरुवात करा ... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

इरसाल's picture

21 Apr 2014 - 2:11 pm | इरसाल

मय अवर मेरी तन्हाइ अकसर ये बाते कर्ते हय कि तुम होति तो ऐसा होत तुम होति तो वैसा होता,
अच्छा है तुम नै हो तुमको मालुम किराया कित्ता बढ गयेला. और साला वो टुलिप का फुल भी कित्ता मैंगा हो रेला.
कहासे लाता मय इत्ती सारी चिजां तुम्हारे वास्ते.

अब रुलाओगे क्या ? (मैने सुना वो अन्ग्रेजा तुम्कु खुंदल-खुंदले मारे ?)

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 3:13 pm | प्यारे१

अब्बा! इरसाल मियाँ को भी पता चल गया? ;)

क्या स्माईलभाई?

टवाळ कार्टा's picture

21 Apr 2014 - 4:33 pm | टवाळ कार्टा

(मैने सुना वो अन्ग्रेजा तुम्कु खुंदल-खुंदले मारे ?...भगा भगा के मारे)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

21 Apr 2014 - 2:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मी आणि माझा देश हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण माझा देश कुणी घडवला हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघालकी लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच भूतकाळात जातात.... कोण होतो मी आणि काय झालो मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि काळाचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी आपला देश घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा देश यावर चर्चा बंद करा आणि देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....
(भावी पंतोजी)श्री श्री गुरुजी

संजय क्षीरसागर's picture

21 Apr 2014 - 4:31 pm | संजय क्षीरसागर

मी आणि माझा बिजेपी हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण बिजेपी कुणी काढला हे मलाच काय कुणालाच माहित नसते.... बरोबर ना? तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या कोषात म्हणजेच मंदिरात जातात.... कशाला हवी बिजेपी? आणि काय झालंय तीचं?...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि बिजेपीचा नारा गेला आणि उद्याचा दिवस देशाच्या इश्यूंचा आहे तेव्हा उद्यासाठी आपले नशीब घडवा... आणि ते फक्त आपण आणि आपणच घडवू शकतो ...... तेव्हा मी आणि माझा बिजेपी यावर चर्चा बंद करा आणि निधर्मी देश घडवायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येतो मी आता....

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

१) http://www.sherv.net/cm/emoticons/object/pen-2-smiley-emoticon-emoji.gif

२) http://www.sherv.net/cm/emoticons/water/island-smiley-emoticon.gif

३) http://www.sherv.net/cm/emoticons/rain/strong-wind-smiley-emoticon.gif

४) http://www.sherv.net/cm/emoticons/weather/singing-in-the-rain-smiley-emoticon.gif

५) http://www.sherv.net/cm/emoticons/eating/corn-on-the-cob-smiley-emoticon.gif

पैसा's picture

21 Apr 2014 - 3:37 pm | पैसा

मी आणि आमची गंगूबाई हा विषय खूप मजेशीर आणि तितकाच गंभीर आहे.... कारण गंगूबाई कधी दांडी मारील हे मला आणि कुणालाच माहित नसते.... बरोबर ना तरी पण हा विषय निघाला की लगेच सगळे आपापल्या विश्वात म्हणजेच स्वयंपाकघरात जातात.... कोण होते मी आणि काय झाले मी...... हा हा हा.. बरोबर ना.... अहो पण मला हे सांगायचे आहे कि कालचा दिवस गेला आणि उद्याचा दिवस आपला आहे तेव्हा उद्या साठी गंगूबाईची वाट बघा.... आणि ती कधी येणार हे फक्त गंगूबाईच सांगू शकते...... तेव्हा मी आणि आमची गंगूबाई यावर चर्चा बंद करा आणि भांडी घासायला सुरवात करा... आजच आणि आतापासूनच.... येते मी आता....