बीट सार

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
16 Apr 2014 - 6:15 pm

साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने.
कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या. साराला उकळी काढा, गरमागरम सार भाताबरोबर वाढा.
यात लाल तिखटाऐवजी ओली मिरची वापरायची असल्यास फोडणी करताना त्यात घालावी. लसूण नको असल्यास घालू नये, पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही. नुसते प्यायलाही मस्त वाटते.
sar

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

16 Apr 2014 - 6:19 pm | त्रिवेणी

मी पैली.
उद्याच करुन बघेन.

स्पंदना's picture

17 Apr 2014 - 6:48 am | स्पंदना

:))
काय केलं पयला येउन? :))
देवा वाचव मला! :))

त्रिवेणी's picture

17 Apr 2014 - 11:34 am | त्रिवेणी

अग अपर्णा ताई आजकाल तसा ट्रेंड आहे मी मिपावर.

त्रिवेणी तै , वेलकम टु'मी पयला' क्लब .
=))

त्रिवेणी's picture

21 Apr 2014 - 4:20 pm | त्रिवेणी

थांकु थांकु जेपी.

कवितानागेश's picture

16 Apr 2014 - 6:30 pm | कवितानागेश

ओके.
पण लसणीमुळे बीटचा उग्र वास येत नाही.>
मी आत्ता विचारणार होते, एवढा जास्त लसूण घातला तर सार उग्र होणार नाही का?
बीटचा उग्रपणा हिंगानी कमी होईल ना?

अनन्न्या's picture

16 Apr 2014 - 6:35 pm | अनन्न्या

सात - आठ पाकळ्या जास्त नाही होत, दोन बीट आहेत ना! या प्रमाणात पंधरा माणसाना एक वेळ पुरेल एवढे सार होते.

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 6:40 pm | प्यारे१

>>>>नुसते प्यायलाही मस्त वाटते.

थोडं तूप घ्या पिताना. एकदम आहाहा!

रेवती's picture

16 Apr 2014 - 6:42 pm | रेवती

वाह! छानच!

दिपक.कुवेत's picture

16 Apr 2014 - 6:43 pm | दिपक.कुवेत

पण आमचुर घालुन चव वेगळि लागेल ना? किंवा नाहि घातला तरी काहि विशेष फरक पडेल असं वाटत नाहि. तिखटाएवजी ओल्या हिरव्या मिरच्याच योग्य.

दिव्यश्री's picture

16 Apr 2014 - 6:49 pm | दिव्यश्री

व्वा ...मस्त फोटू आणि पाककृती . :)

नारळाच्या दुधाने रंगात फरक पडत असेल णा?

अनन्न्या's picture

16 Apr 2014 - 6:49 pm | अनन्न्या

बीट आणि नारळाचे दूध याला आमचुरामुळे जी थोडी आंबट्सर चव येते ती चांगली वाटते, आमच्याकडे हे आमचुराचे प्रमाण थोडे जास्त आवडते. ओल्या मिरच्या चांगल्या लागतात. लहान मुले घरात जास्त असल्याने मिरच्या कमी वापरते, मिरच्या कधी कधी खूप तिखट असतात, त्याचा अंदाज येत नाही.

अनन्या वर्तक's picture

16 Apr 2014 - 7:43 pm | अनन्या वर्तक

अनन्न्या रेसिपी आवडली. रस्सम सारखी सूप म्हणून सुद्धा आवडेल. करून पहावयास हवी. ही सोलकढी सारखी दिसेल का?

सानिकास्वप्निल's picture

16 Apr 2014 - 9:10 pm | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ
करुन बघते :)

अजया's picture

16 Apr 2014 - 9:41 pm | अजया

मस्त पा कृ. !

शुचि's picture

16 Apr 2014 - 9:50 pm | शुचि

मी करुन बघणार आज किंवा उद्यामध्ये.

स्पंदना's picture

17 Apr 2014 - 6:50 am | स्पंदना

गरम गरम भातु अन अस कोणतही सारं.
ए मला भुक लागली :(

मस्त ग अनन्या ..आवडली पाककृती ...+)

पैसा's picture

17 Apr 2014 - 11:28 am | पैसा

कलरफुल आणि हेल्दी रेशिपी!

छान आहे गं पाकृ. पण घरात कोणालाच बीट आवडत नाही. बीटा ऐवजी टोमॅटो चालेल का?

ब़जरबट्टू's picture

18 Apr 2014 - 10:12 am | ब़जरबट्टू

अहो, बीट सहसा आवडत नाही, म्हणूनच असा भरवा :).. बीटमंदी भरपूर लोह असते, बनाच आता "आयर्नवुमन".. :)

मला बीट आवडतं. गोड असतं. उकडून नुसतंही छान लागतं :) त्यात लोह असतं हे माहीत नव्हते.

सस्नेह's picture

17 Apr 2014 - 1:20 pm | सस्नेह

सूप पेक्षा सार म्हणून शोभते.

मधुरा देशपांडे's picture

17 Apr 2014 - 3:43 pm | मधुरा देशपांडे

थंडीच्या दिवसात असे गरमागरम सार आणि भात. आहाहा. बीट खूप आवडते त्यामुळे नक्की करून बघणार.

थंडीच्या दिवसात असे गरमागरम सार आणि भात.

+१११

तों.पा.सु. मस्त पाकृ.

अनन्न्या's picture

17 Apr 2014 - 3:57 pm | अनन्न्या

@दिव्यश्री, थोडा फिकट होतो रंग, फार नाही.
@मृणालिनि, चालेल. टोमॅटोचे सार करतिच आपण फ्क्त त्यात आमचुराची गरज नाही.

मदनबाण's picture

17 Apr 2014 - 4:14 pm | मदनबाण

मस्त !

मनीषा's picture

17 Apr 2014 - 4:25 pm | मनीषा

छान आहे पा.कृ.

आयुर्हित's picture

18 Apr 2014 - 11:02 pm | आयुर्हित

आरोग्यदायी पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.

ब़जरबट्टू's picture

21 Apr 2014 - 9:22 am | ब़जरबट्टू

घरी प्रयोग केला होता..मस्त जमला..खोबरे नव्हते, तरी चव व रंग छान मस्त.. सर्वात मस्त म्हणजे, बीटची उग्रता पुर्णपणे गेली होती, सर्वाना आवडली... :) आभार...

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2014 - 3:32 pm | प्रभाकर पेठकर

Beet-Sar

आजचा मेन्यू 'अनन्या बीट सार'.

ब़जरबट्टू's picture

21 Apr 2014 - 3:49 pm | ब़जरबट्टू

अस्साच रंग होता बघा.... :)) ते अनन्याताय चा सार येगळा कसा ....

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 4:05 pm | प्यारे१

आमच्याकडं पण असंच 'पिन्क' दिसतं.

त्रिवेणी's picture

21 Apr 2014 - 4:22 pm | त्रिवेणी

काका आपके सुप का रंग गुलाबी कैसे?

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2014 - 5:10 pm | प्रभाकर पेठकर

कल्पना नाही. पण बीट जास्त शिजवले नाही (३ शीट्या), त्यामुळे कदाचित रंग टिकला असेल.

आधी असाच आला होता रंग! तेव्हा फोटो काढायचे लक्षात नव्हते.

अनन्न्या's picture

22 Apr 2014 - 4:01 pm | अनन्न्या

धन्यवाद लगेच करून पाहिल्याबद्दल!

प्रभाकर पेठकर's picture

22 Apr 2014 - 4:27 pm | प्रभाकर पेठकर

नारळाच्या दुधाऐवजी २ मोठे चमचे (टेबल स्पून) ताजी साय (फ्रेश क्रिम) घोटून वापरतात. तेही करून पाहायला पाहिजे.

आजच करून पाहिले. थोडे औषधी चवीचे पण मस्त झाले. allergy मुळे घसा दुखत होता त्यावर आराम पडला.