खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
14 Apr 2014 - 4:40 pm
गाभा: 

खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत. त्यात सुधारणा सुचवून हव्या आहेत पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाच्या अंगाने विश्लेषण करून हवे आहे.

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत ।

२) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होता.

३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होता.

४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारा होते.

५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय आहे.

६) त्याची सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते

७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) प्रारंभिक एकोणिसाव्या शतकाच्या इंग्रजी कवी होता.

८) कविता लेखन करण्यासह, तो एक उत्कृष्ट स्पीकर होते

९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एक बॅंकर ची मुलगी होती.

विशीष्ट कारणाने सध्या केवळ वरील वाक्ये तेवढीच देत आहे. बाकी बॅकग्राऊंड पुढचा धागा काढताना देईन. येथील प्रतिसादातील माहिती मराठी विकिप्रकल्पात वापरली जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त होत आहेत असे गृहीत धरले जाईल. चर्चा सहभागा करीता धन्यवाद.

प्रतिक्रिया

१) पल्लवी जोशी या एक चित्रपट आणि दूरचित्रवाहिनीमध्ये काम करणार्‍या भारतीय अभिनेत्री आहेत.

२) विल्यम ड्रमंड (१३ डिसेंबर १५८५ - ४ डिसेंबर १६४९) "हॉथोर्नडेन" नावाचे एक द स्कॉटिश कवी होते.

३) हेन्री वड्सवर्थ लाँगफेलो (२७ फेब्रुवारी १८०७ - २४ मार्च १८८२) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते.

४) सॅम्युएल बटलर (१४ फेब्रुवारी १६१३ (बाप्तिस्मा) - २५ सप्टेंबर १६८०) हे एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते.

५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करीत आहे.

६) त्याने सर्वोत्तम संगीत १९६७ आणि १९७१ दरम्यान लिहिले होते.

७) पर्सी शेली (४ ऑगस्ट १७९२ - ८ जुलै १८२२) हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचे इंग्रजी कवी होते.

८) ते कवी आणि उत्कृष्ट वक्ते होते.

९) जीन इंगेलो (१७ मार्च इ.स. १८२० - २० जुलै १८९७), या इंग्रजी कवयित्री व कादंबरीकार होत्या. बोस्टन, लिंकनशायर येथे त्यांचा जन्म झाला होता. विल्यम इंगेलो नावाचे एक बॅंकर त्यांचे वडील होते.

--------------------
दमलो बुवा!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2014 - 6:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

१) पल्लवी जोशी या एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.

२) विल्यम ड्रमंड ऑफ हावथॉर्नडन (William Drummond of Hawthornden; इ. स. १३ डिसेंबर १५८५ ते- ४ डिसेंबर १६४९) नावाचा एक स्कॉटिश कवी होता.

३) हेन्री वाड्सवर्थ लाँगफेलो (Henry Wadsworth Longfellow; इ. स. २७ फेब्रुवारी १८०७ - २४ मार्च १८८२) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते.

४) सॅम्युएल बटलर (इ.स. १४ फेब्रुवारी १६१३ - २५ सप्टेंबर १६८०) हे एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे लेखक होते.

५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील एक सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांत अभिनय करतो.

६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत इ. स. १९६७ आणि १९७१ च्या दरम्यान लिहिले गेले

७) पर्सी शेली (इ. स. ४ ऑगस्ट १७९२ - ८ जुलै १८२२) हा एक इंग्रजी कवी एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभात होउन गेला.

८) कविता लेखन करण्याबरोबरच तो एक उत्कृष्ट वक्ताही होता.

९) जीन इंगेलो (इ. स. १७ मार्च १८२० - २० जुलै १८९७) या एक इंग्रजी कवयित्री व कादंबरीकार होत्या. बोस्टन, लिंकनशायर येथे त्यांचा जन्म झाला. विल्यम इंगेलो नावाचे एक बॅंकर त्यांचे वडील होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Apr 2014 - 7:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

१) पल्लवी जोशी या एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.

मिहिर's picture

14 Apr 2014 - 11:02 pm | मिहिर

६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत इ.स. १९६७ आणि १९७१ च्या दरम्यान रचले गेले.

नाही. पाश्चात्य अभिजात संगीत "लिहिलं" जातं.

होय, पण कन्फूजन नको म्हणून रचणे हे अजून जनरल क्रियापद जास्त योग्य वाटते.

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत ।

२) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होते.

३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते.

४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते.

५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करतो.

६) त्याने सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते

७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) प्रारंभिक एकोणिसाव्या शतकाचा इंग्रजी कवी होता.

८) कविता लेखन करण्यासह, ते एक उत्कृष्ट स्पीकर होते

९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897), इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो, एका बॅंकर ची मुलगी होती.

खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा

वाक्यांतील
व्याकरणविषयक किंवा व्याकरणाच्या

एक अवांतरः खूप धागे विकीवर निर्माण करणे याला 'सध्या असलेले धागे अधिक चांगले करणे' असाही एक पर्याय आहे. अन्यथा विकीची वाचनीयता मर्यादित आहे ती तशीच राहील असं वाटतं. संख्या आणि गुणवत्ता हे नेहमीचं द्वन्द्व ... आंग्ल विकीवर माहिती ब-यापैकी तटस्थ आणि चांगली असते म्हणून ते वाचले जाते (याला भरपूर अपवाद आहेत याची जाणीव मला आहे). मराठीतली बरीच 'विकी पेजेस' फक्त शीर्षक घालून पानं राखून ठेवल्यासारखी वाटतात. असो.

माझे मत चुकीचे असल्यास ते सुधारून घेण्याची (!) तयारी आहे.

आतिवास यांच्याशी बर्‍यापैकी सहमत आहे. मला खरं तर पहिलंच वाक्य वाचताना अडखळायला झालं.

खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत

यातला 'प्रयास' हा हिंदीच्या जवळ जातो. म्हणजे आपण मराठीत सहसा 'प्रयत्न' हा शब्द वापरतो. हेच वाक्य मी

खाली काही साधी वाक्ये मराठीत लिहिण्याचा प्रयत्न आहे.

असं लिहिलं असतं.

(प्रयास शब्दाने "प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायु आहे" याची आठवण करून दिली! :P)

आदूबाळ's picture

14 Apr 2014 - 10:07 pm | आदूबाळ

केतकी पिवळी पडली चे लेखक. ख्यातनाम.

अत्रन्गि पाउस's picture

14 Apr 2014 - 10:10 pm | अत्रन्गि पाउस

ह्या ह्या ह्या
वा बुवा !!

बॅटमॅन's picture

15 Apr 2014 - 4:30 pm | बॅटमॅन

अस्सं!! मराठीत कुडचेडकर नावाचा कुणी लेखक आहे हे मला तोपर्यंत ठाऊक नव्हते. आणि या गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' या पुस्तकातली (आता हे नाटक होते, कादंबरी की अजून काय कोण जाणे) वाक्येच्या वाक्ये पाठ होती. या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

प्यारे१'s picture

16 Apr 2014 - 4:34 pm | प्यारे१

>>> या गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.

कुठल्या म्हणे?

बॅटमॅन's picture

16 Apr 2014 - 4:45 pm | बॅटमॅन

त्याच त्या ५ डोळ्यांत सशांची व्याकुळता साठवणार्‍या गटण्याची केस ओ.

ठीक. मला वाटलं आजूबाजूला आहेत ते!

पोटे's picture

17 Apr 2014 - 2:48 pm | पोटे

५६ सशांची व्याकुळता.

व्याकरणाच्या धाग्यात सख्याचा बोळा का अडकवला?

व्याकरणाच्या धाग्यात सख्याचा बोळा का अडकवला?

अहो प्राज्ञ मराठी बोलणार्‍या सख्याची आठवण अशावेळेस येणे क्रमप्राप्त नाही काय?

पिशी अबोली's picture

17 Apr 2014 - 3:11 pm | पिशी अबोली

५ डोळ्यांत सशांची व्याकुळता

५ डोळ्यांत? गटण्या काय एलियन आहे का?

बॅटमॅन's picture

18 Apr 2014 - 2:57 pm | बॅटमॅन

ळॉळ =)) अंमळ ग़फलत झाली खरी.

बाकी

नडणी खंयूय पावूं कण्ण हालूंक जाय!

ही कुठली प्राकृत आहे म्हणे?

अत्रन्गि पाउस's picture

14 Apr 2014 - 10:09 pm | अत्रन्गि पाउस

१) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या अभिनेत्री आहेत.
२) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक स्कॉटिश कवी होते.

३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते.

४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारे होते.

५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळी चित्रपटात अभिनय करतो.

६) त्याने सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान निर्माण केले गेले होते

७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) एकोणिसाव्या शतकातील प्रारंभिक काळातील इंग्रजी कवी होता.

८) कविता करणे ह्याबरोबरच , ते एक उत्कृष्ट वक्ते होते

९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897),हि एक इंग्रजी कवी व कादंबरीकार होती. बोस्टन, Lincolnshire जन्म, ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकर ची मुलगी होती.

विजुभाऊ's picture

14 Apr 2014 - 11:54 pm | विजुभाऊ

) पल्लवी जोशी ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहे

२) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचा, एक स्कॉटिश कवी होउन गेला किंवा . विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " हा, एक स्कॉटिश कवी होता

३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते

४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स. 1613 14 baptized - सप्टेंबर 1680 25) एक कवी आणि उपहासात्मक लेख लिहिणारा होता.

५) सुरेश गोपी दक्षिण भारतातील सुपरस्टार आहे. तो प्रामुख्याने मल्याळम चित्रपटात अभिनय करतो / करायचा किंवा तो प्रामुख्याने मल्याळी चित्रपटात अभिनय करतो .

६) त्याचे सर्वोत्तम ज्ञात संगीत 1967 आणि 1971 दरम्यान लिहिले होते . किंवा त्याने

७) पर्सी शेली (4 ऑगस्ट 1792 - 8 जुलै इ.स. 1822) हा एकोणिसाव्या शतकाच्या प्रांरभाकलातील इंग्रजी कवी होता.

८) कविता लेखन करण्याबरोबरच , तो एक उत्कृष्ट भाषणदेखील करायचा

९) जीन इंगेलो (17 मार्च इ.स. 1820 - 20 जुलै 1897) ही एक इंग्रजी कवयीत्री व कादंबरीकार होती. तीचा जन्म बोस्टन , Lincolnshire इथे झाला, ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकर ची मुलगी होती.

पिशी अबोली's picture

15 Apr 2014 - 1:13 am | पिशी अबोली

वाक्य क्रं १,२,३,४,८ मधे मराठीच्या आणि एकूणच इंडो-आर्य भाषांमधील 'अ‍ॅग्रीमेंट' (योग्य मराठी शब्द माहीत नाही) च्या सर्वसाधारण नियमांचे उल्लंघन झाले आहे.
कर्ता आणि क्रियापद यांचे लिंग, वचन आणि पुरुष सारखे असले पाहिजेत. जेव्हा सकर्मक वाक्यात कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागतो, तेव्हा कर्म व क्रियापद जुळले पाहिजेत (हा नियम मराठीच्या अनुषंगाने सांगत आहे)
क्र. ७- early nineteenth century चे जसेच्या तसे भाषांतर. इंग्रजी आणि मराठी या टायपॉलॉजिकली (मराठी शब्द माहीत नाही) वेगळ्या भाषा आहेत. भाषांतरकाराने याचे भान ठेवलेले नाही.
एकूणच या सर्व वाक्यांमधे मुख्य चूक हीच आहे, की इंग्रजी वाक्यांचे जसेच्या तसे भाषांतर करायचा प्रयत्न झालेला आहे. विशेषण-विशेष्य मधे उडालेला गोंधळ, 'रचणे' च्या जागी 'लिहिणे' इ. हेच दर्शवितात.

बर्‍याच जणांनी अगोदरच सुधारणा सुचविल्या आहेत. फक्त पहिले वाक्य मला या पद्धतीने लिहीलेले जास्त बरोबर वाटते.
१) पल्लवी जोशी या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणार्‍या एक अभिनेत्री आहेत.

सहमत.
हेच सुचवायला आले होते.

माहितगार's picture

15 Apr 2014 - 1:01 pm | माहितगार

पल्लवी जोशी ह्या मराठी विकिपीडियावरील लेखातील सध्याचे लेखन सौऋत राय नावाच्या बंगाली विकि सदस्यांची केले आहे. मला त्यांच लेखन नवशिकं मराठी वाटलं पण मराठी विकिपीडियावरील इतरांच मत, ते मशिन ट्रांसलेशन (गूगल शिवाय इतर कोणतंतरी) + नवशिकं मराठी आहे.

बाकीची वाक्ये स्थानिकस्तराच मराठी येणार्‍यांनी मशिन ट्रांसलेशनचा त्रुटी अभ्यास करण्यासाठी गूगल मशिन ट्रांसलेशन वरून मराठी विकिपीडिया लेखात घेतली गेली आहेत.

मोठ्याप्रमाणावरील मशिन ट्रांसलेशन्सना आम्ही मराठी विकिपीडियावर प्रोत्साहीत करत नाही. क्वचीत होणाऱ्या तुरळक प्रयत्नांना पुढील सुधारणा आणि भाषिक अभ्यासा करीता टॅग लावून ठेवतो. वरील वाक्ये त्या पैकी होती. बाकी इंग्रजी वाक्यांच्या यांत्रिकी अनुवादांच्या मानाने ज्ञानकोशीय पद्धतीने विषयाचा परिचय घडवणारी, इंग्रजी विकिपीडिया लेखातील पहील्या वाक्याचा अनुवाद त्यातला त्यात ठिक ठाक म्हणजेच वरील प्रमाणे होत आहेत. त्यात काय सुधारणा व्हावयास हव्यात हे माहित करून घेण्या साठी, आपण सर्वांनी दिलेली माहिती अमूल्य अशीच आहे.

अपरिष्कृत यांत्रिकी अनुवाद कुणी मोठ्या प्रमाणात मराठी विकिपीडियात भरण्याचा प्रयत्न केल्यास त्याला यांत्रिकी पद्धतीने थांबवण्यासाठीही कदाचित वरील येथील चर्चा मला उपयोगात येऊ शकेल. तसेच येत्या काळात मशिन ट्रांसलेशनच्या संबंधाने वेगळा धागा काढावयाचा आहे. त्यात या धाग्यावरील चर्चा वापरणे हा हेतु आहे.

आदूबाळ, इस्पीकचा एक्का, मिहिर, प्रमोदताम्बे, आतिवास, पैसा, अत्रन्गि पाउस, विजुभाऊ, रामपुरी आणि व्याकरणाच्या अंगाने विशेष माहिती देण्याकरता 'पिशी अबोली' आपणा सर्वांनाच या अमूल्य मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी खूप खूप धन्यवाद.

करू देत की यांत्रिकी अनुवाद. त्यातल्या त्रुटी सुधारणं हे कमी कष्टाचं काम आहे. फार तर अशा मशीन ट्रान्स्लेटेड पानांना "बीटा" (किंवा "मटा" ;) ) असा टॅग लावून ठेवा, म्हणजे (१) लोक व्याकरणाकडे दुर्लक्ष करतील, आणि (२) इच्छा असेल तर सुधारणा करतील.

चुकांमधून शिकणारं यंत्र असेल तर यांत्रिकी अनुवाद अचूक होत जाईल.

माहितगार's picture

15 Apr 2014 - 4:08 pm | माहितगार

मी व्यक्तीगत स्तरावर आपल्या प्रमाणेच मत बाळगतो. इंग्रजी वि. मराठी 'नॉलेज गॅप' स्टॅटिस्टीकली अभ्यासला तर, नॉलेज गॅप कमी करण्यासाठी, अंशतः यांत्रिकी अनुवाद तंत्रज्ञानात मराठी भाषिकांनी प्रगती साधण गरजेच आहेच. वेगवेगळ्या तंत्रज्ञान शक्यता आसपास दिसताहेत. ट्रांसलेट विकि वर जुन्या अनुवादांवर आधारीत सर्वाधिक जवळचे मॅच पुरवले जातात, हिंदी आणि संस्कृतातील अनुवाद संदर्भाकरता पाहता येतात. गूगल अनुवाद यंत्र जुन्या अनुभवावर आधारीत स्टॅटीस्टीकल प्रमाण वापरत वापरकर्त्यांनी केलेल्या सुधारणातून शिकत पुढे जातं. या दोन्ही पद्धतींना खर म्हणजे फेसबुक ने त्यांचे संदेश अनुवादीत करण्यासाठी जशी किती लोक एखादा अनुवाद मान्य करताहेत याची सुविधा दिली तशी सुविधा उपलब्ध झाल्यास आपण म्हणता तस "चुकांमधून शिकणारं एक चांगल यंत्र कदाचित तयार होऊ शकेल. विकिपीडियावरील बॉट आणि इतर छोट्या सुविधाही दिमतीस येऊ शकतात. अर्थात हे केवळ मराठी विकिपीडियाच्या मर्यादित स्वयंसेवी बळावर होणार नाही. यांत्रिकी अनुवादाचे पर्याय देण्यासाठी http://www.saakava.com/ ने काही चांगले काम केले आहे. (अलिकडे मराठीतील वर्ड फ्रिक्वेंसी याद्या उपलब्ध करण्याचे उत्कृष्ट काम त्यांनी केले आहे) .

थोडासा मानवी टच दिला की खालील वाक्याप्रमाणे यांत्रिक अनुवाद सहज साध्य झाला आहे.:
" 'चिकित्सामक विचार', एखादा युक्तीवाद अथवा दावा नेहमी सत्य, कधी कधी सत्य, अंशतः सत्य, किंवा चुकीचा आहे किंवा नाही हे ठरवण्याचा एक मार्ग आहे. " ह्या अनुवादात यंत्र अनुवाद वापरला आहे हे सांगितल तर कदाचित खर नाही वाटणार.

अर्थात प्रत्यक्षातील अडचणी आहेतच सध्याची अनुवाद यंत्रे गुंतागुंतीच्या वाक्यांना अद्यापी हाताळू शकत नाहीत. आणि सध्याच्या अनुवाद यंत्रात शब्द प्रमाण मानले जातात आणि द्वैअर्थी शब्द आल्यास यंत्र चुकते. हे चुकण्याचे कारण म्हणजे यंत्र त्या वाक्यातील इतर शब्दांचा विचार करून काम करत नाही. ज्या वाक्यात चित्रपट आहे त्या वाक्यात डायरेक्टरचा अनुवाद संचालक होणार नाही दिग्दर्शक होईल हे या यंत्रांना अजून जमत नाही. दुसरे तर मराठी भाषा शब्द नाही तर 'पद' या संकल्पनेवर चालते ते सध्याच्या यंत्रांमध्ये अद्यापी विचारात घेतले गेले नाही.

१) पल्लवी जोशी या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये कार्यरत अभिनेत्री आहेत.
२) विल्यम ड्रमंड ऑफ हावथॉर्नडन (इ.स. 13 डिसेंबर, 1585 ते 4 डिसेंबर, 1649) नावाचे एक स्कॉटिश कवी होते.
३) हेन्री वर्डस्वर्थ लाँगफेलो (इ.स. २७ फेब्रुवारी, 1807 ते २४ मार्च, 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होते.
४) सॅम्युएल बटलर (इ.स.१४ फेब्रुवारी, 1613 ते २५ सप्टेंबर, 1680 ) हे एक कवी आणि उपहासात्मक (Is this विडंबनकार) लेखन करणारे लेखक होते.
५) सुरेश गोपी हे दक्षिण भारतातील सुपरस्टार आहेत. ते प्रामुख्याने मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनय करतात.
६) त्यांनी सन 1967 ते 1971 दरम्यान सर्वोत्तम ज्ञात संगीत रचना केल्या.
७) पर्सी शेली हे एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील (इ.स. 4 ऑगस्ट, 1792 - 8 जुलै, 1822) इंग्रजी कवी होते.
८) काव्य लेखना बरोबरच ते एक उत्कृष्ट वक्ता होते./ ते एक चांगले कवी तसेच उत्कृष्ट वक्ता होते.
९) जीन इंगेलो (इ.स.17 मार्च, 1820 - 20 जुलै, 1897) ही एक इंग्रजी कवयित्री आणि कादंबरीकार होती. बोस्टन, लिंकनशायर येथे तिचा जन्म झाला. ती विल्यम इंगेलो नावाच्या एका बॅंकरची मुलगी होती.
*** क्र.७ मध्ये एकोणीसाव्या शतकाचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात वर्षाचा उल्लेख (इ.स. 4 ऑगस्ट, 1792 - 8 जुलै, 1822) असा आहे.

माहितगार's picture

15 Apr 2014 - 6:07 pm | माहितगार

मराठी विकिपीडियावर बरेच जण यंत्र-अनुवाद मूळ इंग्रजी उतारा न देताच अनुवाद टाकतात. आणि अनुवाद तपासताना सुधारताना खरचं अडचणीच होत. आणि आम्हाला तो मजकुर जसा आहे तसाच डिल करण्याची पाळी येते. तीच परिस्थिती जशीच्या तशी उपस्थित करून त्यातून काही शिकाव असा प्रयत्न होता म्हणून हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत.

इंग्रजी विकिपीडियावरील मूळ मजकुर बदललेला असू शकतो त्यातील पहिली वाक्ये आपल्या माहिती साठी खाली देतो.
२) William Drummond (13 December 1585 – 4 December 1649), called "of Hawthornden", was a Scottish poet.
३) Henry Wadsworth Longfellow (February 27, 1807 – March 24, 1882) was an American poet and educator
४) Samuel Butler (baptized 14 February 1613 – 25 September 1680) was a poet and satirist.
५) सुरेश गोपींबद्दलचे वाक्य मल्याळम ते मराठी व्हाया गूगल ट्रांसलेटर आले असण्याची शक्यता आहे तरीही इंग्रजी विकिपीडियातील वाक्य देतो: Suresh Gopinathan (born 26 June 1959),[3] commonly known as Suresh Gopi, is an Indian film actor who has starred in more than 200 Malayalam films.
६) Marek Grechuta यांच्या बद्दल आहे पण इंग्रजी विकिपीडियावरील लेखात सदर वाक्य जसेच्या तसे सध्या आढळत नाही. वगळले गेले असू शकते.
७)इंग्रजी विकिपीडियावरील लेखात सदर वाक्य जसेच्या तसे सध्या आढळत नाही. वगळले गेले असू शकते. (पर्सी शेलीं अल्पवयीन कवी असण्याची शक्यता दिसते. इ.स. १८०० मध्ये ते ८ वर्षाचे असावेत. पर्सी शेलींचा लेखनाचा काळ एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीचा असावा कारण 1822 मध्ये तर निधनही झाले.)
८) In addition to writing poetry, he was an excellent speaker.
९) Jean Ingelow (17 March 1820 – 20 July 1897), was an English poet and novelist. Born at Boston, Lincolnshire, she was the daughter of William Ingelow, a banker.

प्रतिसादांसाठी धन्यवाद

आनन्दा's picture

16 Apr 2014 - 12:54 pm | आनन्दा

हे यंत्रानुवाद आहेत हे सांगण्याच धाग्याच्या सुरवातीस टाळल होत.

हे तर कळलेच होते, पण मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..

माहितगार's picture

16 Apr 2014 - 4:29 pm | माहितगार

मला वाटत होते की आपण अनुवाद-सेवादात्याला काही फीडबॅक देऊ इच्छिता..

हो निश्चीत, असे अनुवाद पुढे करण्यापुर्वी अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरून मग नंतरचे अनुवाद घेणे अधिक सोपे होणारे वेळ वाचवणारे आहे. अर्थात मी वर नमुद केल्या प्रमाणे, वाक्यातील 'कि' संदर्भ शब्द शोधून त्या नुसार इतर शब्दांचा अनुवाद आणि पद हि संकल्पना यंत्र अनुवाद सुविधेत आंतर्भूत केली जाई पर्यंत अनुवाद-सेवादात्याच्या सुविधेत ह्या सुधारणा भरूनही रिझल्ट्सवर मर्यादा रहातीलच असा कयास आहे. म्हणजे सध्या अनुवादातील उर्वरीत काम मानवी हस्तक्षेपानेच किंवा इतर सुविधा वापरून करावे लागेल. आणि या उर्वरीत कामा करीता सुद्धा वरील अनुवाद मदतींची मदत होते आहे असे वाटते.