कलिया

चिन्मयी भान्गे's picture
चिन्मयी भान्गे in पाककृती
10 Apr 2014 - 11:46 am

साहित्य: बटाटे १ किलो ,कांदे मध्यम ५, धणे अर्धी वाटी, जीरे पाव वाटी,बडीशोप अर्धी वाटी,
लसूण दोन कांदे, किसलेले खोबरे एक वाटी, खसखस अर्धी वाटी, आले, तिखट,
हळद, मीठ चवीनुसार.

मसाला कृती:खसखस २ तास आधी गरम पाण्यात भिजत ठेवणे. २ तासांनंतर ती खोबऱ्याच्या अर्ध्या कीसाबरोबर (कच्च्याच) वाटणे. उरलेला कीस, कांदा (कच्चाच) व लसूण बारीक करणे. धणे व जीरे भाजून बारीक करणे. बडीशोप, न भाजता, कच्चीच वाटणे. आले वेगळे वाटून घेणे. आले सोडून, उरलेला मसाला, त्यात हळद व तिखट घालून, मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेणे.

बटाटे उकडून त्यांच्या फोडी करून घेणे. फोडणीसाठी , तेलाचा तवंग येईल असे भरपूर तेल घेउन ,त्यात मोहोरी टाकून, ती तडतडल्यावर त्यात आधी आले परतून घेणे व त्यानंतर त्यात मसाला चांगला परतून घेणे. मग त्यात बटाटयाच्या फोडी टाकून परतणे.नंतर त्यात पाणी टाकून त्यात मीठ व चवीला साखर टाकून उकळणे.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

10 Apr 2014 - 11:54 am | स्पंदना

नविनच!
पहिल्यांदाच ऐकते आहे असली काही पाककृती.
आज काही तरी करावस वाटतय नविन नाही तर मग डायरेक्ट झुणका! बघु.
खस खस जरा जास्त नै का झाली? झोप येइल न खाल्ल्याबरोबर?
फोटो टाकता आले तर नक्की कस दिसत्य त्याचा अंदाज आला असता. पण असो.
नव्या दिसता. मिपावर स्वागत.

चिन्मयी भान्गे's picture

10 Apr 2014 - 12:08 pm | चिन्मयी भान्गे

होय!..मी नवीन आहे इथे!..फोटो टाकणार आहे.

ज्ञानव's picture

10 Apr 2014 - 11:59 am | ज्ञानव

आंतरराष्ट्रीय होतोय तर आता.
ही एक सुरेख डिश आहे.
पण मला ती सकाळी करून फ्रीजमध्ये थंड करून संध्याकाळी खायला जास्त आवडते.

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2014 - 1:21 pm | प्रभाकर पेठकर

'कलीया' म्हणजे माझा जीव कि प्राण आहे.
मांसाहारी चवीचा शाकाहारी पदार्थ आहे हा.
आमच्याकडे तिघांसाठी कलीया करायचा झाला तरी पातेलेभर करावा लागतो.
खसखशीचे प्रमाण मलाही जास्त वाटते आहे. मी फक्त २ छोटे चमचे (टि स्पून) घेतो. आणि धणे जास्त तर जीरं कमी घेतो.
आपापल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करावे.
'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'.
'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात.

चिन्मयी, मिपावर स्वागत आहे.

नंदन's picture

21 Apr 2014 - 4:13 pm | नंदन

'कलीया' ही मटण बनवायची काश्मिरी पद्धत आहे. काश्मिरी पद्धती २. एक 'कलिया' तर दुसरी 'कोर्मा'.
'कलीया' मध्ये, इतर मसाल्यांबरोबर, मटण पाणी घालून शिजवले जाते. अंतिम कालवणातही पाण्याचे प्रमाण बर्‍यापैकी असते. 'कोर्मा' मध्ये मटण, मंद विस्तवावर, घी किंवा तेलात बनविले जाते. शिजवताना पाणी घालत नाहीत. जरी घातले तरी अतिंम अवस्थेत पाणी आटवून टाकले जाते. मटणावर एक सेंटीमिटर इतका घी किंवा तेलाचा तवंग उरतो. 'कोर्मा' दिसायला, चवीला उच्च प्रतीचा असतो. उष्मांकही 'कलीया' पेक्षा कितीतरी जास्त असतात.

हे वर्णन वाचूनच तोंडाला पाणी सुटलं :). काका, शक्य होईल तेव्हा ही पाककृती तुमच्या लेखणीतून स्वतंत्र धाग्यात, सविस्तर वाचायला आवडेल.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2014 - 1:38 pm | अत्रुप्त आत्मा

इतकी भार्री पाककृती. :)

त्यामुळे फोटू..हवेच्च्च!!! :-/

पिलीयन रायडर's picture

10 Apr 2014 - 1:40 pm | पिलीयन रायडर

कुणीतरी फोटो द्या.. इतके सगळे म्हणत आहेत म्हणजे नक्कीच मस्त असणार रेसेपी.. केल्याबर किमान बरोबर तरी केली आहे का ते चेक करायला एक फोटो द्या..

पेठकरकाका म्हणतात आहे म्हणजे भारीच असणार, पण ही खातात नुसतीच की भात्/पोळी अशी कशाबरोबर? फोटो टाका म्हणजे कल्पना येईल.

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2014 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर

दाट किंवा जरा पातळ कशीही करा. मध्यम करावा अशी माझी व्यक्तिगत आवड आहे. पोळी, परोठा, भात कशाबरोबरही छान लागतो. नुसता गरमागरम वाट्याच्या वाट्या रिचविणे हाही माझा छंद आहे.

स न वि वि's picture

10 Apr 2014 - 2:23 pm | स न वि वि

ह्या पदार्था चे नाव 'कलिया' असे का?

प्रभाकर पेठकर's picture

10 Apr 2014 - 8:42 pm | प्रभाकर पेठकर

अर्थ माहित नाही पण काश्मिरी शब्द असावा.इथे विस्ताराने दिले आहेच.

नक्की करून बघणार … सगळं सामान आहे फक्त शनिवार ची वाट आहे…

मी आधी चुकून 'कालिया' वाचलं आणि म्हटलं की या पिच्चरची सालं काढली की काय कोणीतरी?
असो, फोटोशिवाय पाककृती वाचणं म्हणजे चॉकलेटचा स्वाद वेष्ट्न न काढता घेण्यासारखं आहे.

रमेश आठवले's picture

11 Apr 2014 - 12:26 am | रमेश आठवले

माझी आई कांदे आणि बटाटे वापरण्या ऐवजी फक्त कॉलीफ्लॉवर वापरून असाच कलिया करत असे.

मुक्त विहारि's picture

11 Apr 2014 - 12:31 am | मुक्त विहारि

झक्कास..

पा.क्रु. करून बघण्यात येईल...

@ पेठकर काका.

जमल्यास "मटण कलिया"ची पा.क्रु. टाकू शकाल का?

कवितानागेश's picture

12 Apr 2014 - 6:22 pm | कवितानागेश

१ किलो बटाटे आणि ५ कांदे म्हणजे किती माणसांसाठी होईल? ६?

करुन पहायला हवे. पेठकरकाका म्हणतात तसे २ चमचे खसखस घेऊन पहायला हवी.

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2014 - 3:24 pm | प्रभाकर पेठकर

Kalia

एका पार्टी ऑर्डरसाठी, कालच केला होता कलिया. सर्वांसाठी छायाचित्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 4:05 pm | प्यारे१

करुन दाखवलं म्हणून ह्याला 'केलिया' म्हणावं असं सुचवतो! ;)

उफ्फ ये प्यारेकाका और उनके जोक्स !! *dash1*

प्यारे१'s picture

21 Apr 2014 - 4:59 pm | प्यारे१

सूड, लागलं काय गं तुला? सांभाळ हो स्वतःला! ;)

अय्य्याऽऽऽऽ!! कायतरीच हो तुझं प्यारेकाकू. भारीच ही आहेस बै तू.

रेवती's picture

27 Apr 2014 - 7:25 pm | रेवती

पेठकर काकानु, फोटू झकास!

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2014 - 3:42 pm | पिलीयन रायडर

अहो दिसत नाही मला फटु...

मला मिपावरच्या अर्ध्या अधिक धाग्यातले फोटो दिसत का नसावेत?

पैसा's picture

21 Apr 2014 - 4:08 pm | पैसा

गंभीरपणे बोलायचं तर काही जणांकडे सेटिंग्जमुळे फ्लिकरवरचे फोटो दिसत नाहीत. तुझ्या हापिसात सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम आहे का ते विचारून उपाय कर!

पिलीयन रायडर's picture

21 Apr 2014 - 4:25 pm | पिलीयन रायडर

फ्लिकर वरचे फोटो दिसत नाहीत हे खरय.. ह्यावर काही उपाय नाही का?

कारण मला सानिकेचे सगळे पदार्थ नीट दिसतात (चांगलं की वाईट?!!)

पैसा's picture

21 Apr 2014 - 5:09 pm | पैसा

आमच्या घरी सानिका आणि इतरांच्या पाकृ लपून छपून वाचाव्या लागतात. कारण मग, "मिपावरचे फोटो बघून ते आम्हाला खायला मिळणार का?" असली बोलणी ऐकावी लागतात!

स्पंदना's picture

26 Apr 2014 - 9:46 am | स्पंदना

चिन्मयी आज कलिया केलं?? केल्या?? केली मरु दे तिकड. ही रेसीपी केली आज पण चिकन घालुन. मस्त लागते.
धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

26 Apr 2014 - 12:22 pm | प्रभाकर पेठकर

'कलीया' केला.

तो कलीया.

चिन्मयी भान्गे's picture

27 Apr 2014 - 7:22 pm | चिन्मयी भान्गे

धन्यवाद! आम्ही पूर्ण व्हेज अस्ल्याने, बटाट्यावरच फीदा!